Mahayuti Government: शनिवारी रात्री महायुती सरकारकडून पालकमंत्री पदाची यादी जाहीर करण्यात आली होती. मात्र आता महायुतीमध्ये पालकमंत्री पदावरून मोठा वाद निर्माण झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, पालकमंत्री पदाची यादी जाहीर होताच शिवसेना पक्षाचे मंत्री भरत गोगावले आणि ज्येष्ठ नेते मंत्री दादा भुसे नाराज झाले आहे. त्यामुळे आता सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
शिवसेना पक्षाचे मंत्री भरत गोगावले आणि ज्येष्ठ नेते मंत्री दादा भुसे नाराज असल्याने राज्य सरकारकडून परिपत्रक काढून रायगड जिल्हा आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री पदाची नियुक्ती पुढील आदेशापर्यंत स्थगित केली आहे.
शनिवारी जाहीर करण्यात आलेल्या यादीत नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन तर रायगड जिल्ह्याची जबाबदारी मंत्री अदिती तटकरे यांना देण्यात आली होती मात्र आता दोन्ही जिल्ह्याची नियुक्ती पुढील आदेशापर्यंत सरकारने स्थगित केली आहे. त्यामुळे महायुतीमध्ये पालकमंत्री पदावरून मोठा वाद निर्माण झाला असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
शनिवारी जाहीर करण्यात आलेल्या यादीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गडचिरोली जिल्ह्याची तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बीड आणि पुणे जिल्ह्याची तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे जिल्ह्याची आणि जालना जिल्ह्याची जबाबदारी मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.