Dnamarathi.com

Suresh Dhas: काही दिवसांपूर्वी भाजप आमदार सुरेश धस यांनी एका पोलीस अधिकाऱ्याने करुणा शर्मा यांच्या गाडीत साडी नेसून पिस्तुल ठेवल्याचा दावा केला होता. पण त्यावेळी त्यांनी अधिकाऱ्याचं नाव घेतलं नव्हतं. पण आता त्यांनी थेट अधिकाऱ्याचं नाव सांगितलं आहे.

“बीडमध्ये हक्काची दहशत मोडून काढतील चुकीच्या व्यक्तीला मदत करणारे व्यक्ती म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार नाही. ते कधीही चुकीच्या व्यक्तीला पाठीशी घालणार नाही. एलसीबीच्या 107 च्या टेबलवर प्रति आरोपी पाच हजार ते वीस हजार असा रेट सुरू असून करुणा शर्मांच्या गाडीमध्ये पिस्तूल ठेवण्याचे बक्षीस म्हणजे सचिन सानप यांची एलसीबीला झालेली बदली. कोल्हापूरवरून गणेश हंगे बदलून आणला तो 107 चा टेबल आहे, सचिन आंधळे याला ही बदलून आले,” असे सुरेश धस म्हणाले.

दरम्यान, सुरेश धस यांच्या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे. यावर आता काय प्रतिक्रिया येतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तर दुसरीकडे भाजप आमदार सुरेश धस यांनी सरपंच संतोष देशमुख प्रकरणामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील सातत्याने करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *