DNA मराठी

ताज्या बातम्या

fb img 1775543598086

Aditi Tatkare : ॲसिड हल्ला पीडितेस शासन सर्वतोपरी मदत करणार; महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंची मोठी घोषणा

Aditi Tatkare : संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील ॲसिड हल्ल्यातील पीडित मुलीची महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लोणी येथील प्रवरा रुग्णालयात जाऊन भेट घेतली. या अत्यंत निंदनीय घटनेतील पीडित मुलीच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे आणि तिच्या पुढील उपचारांचा संपूर्ण खर्च शासन करेल, अशी ग्वाही तटकरे यांनी दिली. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या या मुलीची प्रकृती सध्या स्थिर आहे. मात्र, तिचे वय लहान असून त्वचा संवेदनशील असल्याने तिला आणखी काही दिवस उपचारांची तसेच एका शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे. डॉक्टर व प्रशासन तिची पूर्ण काळजी घेत आहेत. मुलीचे विशेष समुपदेशकाकडून समुपदेशन करण्यात आले असून, स्थानिक डॉक्टरांच्या मदतीने हे समुपदेशन पुढेही प्रभावीपणे सुरू ठेवण्याबाबत चर्चा झाली आहे. पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे, या उपचारांचा कोणताही आर्थिक भार पीडितेच्या कुटुंबावर पडू दिला जाणार नाही. पीडितेस महिला व बालविकास विभागाच्या ‘मनोधैर्य’ योजनेअंतर्गत एक लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य तात्काळ देण्यात येईल. यासोबतच, न्याय विभागाच्या ‘व्हिक्टिम कॉम्पेन्सेशन स्कीम २०२२’ अंतर्गत तिच्या कुटुंबाला तातडीची मदत म्हणून ३ लाख रुपये आधीच देण्यात आले आहेत. घटनेच्या दिवसापासूनच आपण पोलीस अधीक्षकांच्या संपर्कात असल्याचे सांगून मंत्री तटकरे म्हणाल्या, स्थानिक आमदारांनीही हा मुद्दा सभागृहात मांडला होता. सध्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचा तपास वेगाने सुरू असून, विविध यंत्रणांची मदत घेतली जात आहे. कुटुंबाकडे काही अतिरिक्त माहिती असल्यास ती पोलिसांना द्यावी, तसेच त्यांच्या काही अपेक्षा असल्यास त्या सांगाव्यात, असे आवाहनही त्यांनी केले. या सांत्वनपर भेटीदरम्यान पीडित मुलीच्या कुटुंबातील तिची आई, मावशी व मामा उपस्थित होते. तसेच, आमदार काशिनाथ दाते, आमदार अमोल खताळ, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संजय कदम हेही याप्रसंगी उपस्थित होते.

Aditi Tatkare : ॲसिड हल्ला पीडितेस शासन सर्वतोपरी मदत करणार; महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंची मोठी घोषणा Read More »

Radhakrishnan Vikhe Patil : अवकाळीने नुकसान…तातडीने पंचनामे करा, मंत्री विखेंच्या प्रशासनाला सूचना

Radhakrishnan Vikhe Patil : अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे राहाता तालुक्यात झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीचे तातडीने व अचूक पंचनामे करून अहवाल सादर करावेत, तसेच बाधित शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळवून द्यावी, असे निर्देश पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला दिले. याच पार्श्वभूमीवर त्यांनी मौजे पाथरे (बु.) येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. पाथरे (बु.) येथील शेतकरी संजय भाऊसाहेब घोलप यांच्या शेताला भेट देऊन पालकमंत्र्यांनी नुकसानीचा सविस्तर आढावा घेतला. वादळामुळे विजेची तार अंगावर पडून आणि विद्युत धक्का बसल्याने ९ गायी दगावल्याच्या घटनेचीही त्यांनी पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांनी त्यांना धीर दिला व प्रशासनाने संवेदनशीलतेने कार्य करावे, असे निर्देश दिले. या पाहणी दौऱ्यावेळी शिर्डीचे उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, संगमनेरचे उपविभागीय कृषी अधिकारी अक्षय गोसावी, तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे, गटविकास अधिकारी विवेक गुंड, नायब तहसीलदार हेमंत पाटील, मंडळ कृषी अधिकारी रमेश चौपडे, सहायक कृषी अधिकारी श्रीमती मीना जाधव तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. दौऱ्यात तालुक्यातील विविध भागांतील नुकसानीची प्राथमिक माहिती सादर करण्यात आली. बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून आवश्यक ती मदत तातडीने मिळवून देण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे, अशा सूचनाही पालकमंत्री विखे पाटील यांनी दिल्या.

Radhakrishnan Vikhe Patil : अवकाळीने नुकसान…तातडीने पंचनामे करा, मंत्री विखेंच्या प्रशासनाला सूचना Read More »

gopichand padalkar

Gopichand Padalkar : अंजनगाव पुतळा वादावरून गोपीचंद पडळकर भडकले

Gopichand Padalkar : सोलापूर जिल्ह्यातील अंजनगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून सुरू असलेल्या वादाला आता राजकीय रंग चढताना दिसत आहे. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी या प्रकरणावर भाष्य करत आंदोलकांवर जोरदार टीका केली आहे. रात्रीच्या वेळी पुतळा बसवण्याची गरज काय? असा सवाल उपस्थित करत त्यांनी शिवाजी महाराज आमची अस्मिता असल्याचे स्पष्ट केले. पुतळ्याला विरोध नसला तरी ज्या ठिकाणी तो उभारला जात आहे, तेथे जातीयवाद आणि राजकारण होत असल्याचा आरोप त्यांनी केला. खेलोबा देवस्थानाच्या आवारात पुतळा उभारणे सहन केले जाणार नाही, तो अन्यत्र उभारावा, तसेच पुतळा उभारण्याची जबाबदारी दिल्यास तो वाजतगाजत उभारून दाखवू, असेही पडळकर म्हणाले. यावेळी राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करत, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर राज्यात वातावरण अस्थिर करण्याचा प्रयत्न होतो, असा आरोप त्यांनी केला. दरम्यान, आंदोलकांवर टीका करताना गोपीचंद पडळकर यांची जीभ घसरल्याचेही समोर आले असून त्यांनी शिवराळ भाषेचा वापर केल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

Gopichand Padalkar : अंजनगाव पुतळा वादावरून गोपीचंद पडळकर भडकले Read More »

bachchu kadu

Bachchu Kadu : माजी मंत्री बच्चू कडू अडचणीत; हत्येचा कट उघड, गुन्हा दाखल

Bachchu Kadu : अमरावती जिल्ह्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. आमदार प्रवीण तायडे यांचे चुलत भाऊ अभिजित तायडे यांच्या तक्रारीनुसार माजी मंत्री बच्चू कडू व काही साथीदारांनी अभिजित तायडे यांचा अपघात घडवून त्यांना ठार मारण्याचा कट रचल्याचा आरोप पोलिसांनी नोंदवला आहे. तक्रारीनुसार डिसेंबर महिन्यात कुरळपूर्णा येथील निवासस्थानी हा कट आखण्याची चर्चा झाली होती. या संभाषणाचे गुप्त रेकॉर्डिंग एका साक्षीदाराने मोबाईलमध्ये केले. पोलिसांनी रेकॉर्डिंगची तपासणी केली असता प्राथमिकदृष्ट्या तथ्य आढळल्यामुळे चांदूर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात बच्चू कडू, शुभम उर्फ गोलू माहोरे यांच्यासह इतरांवर भारतीय दंड संहिता कलम ५५, ५८, ६१ अंतर्गत कारवाई करण्यात आली असल्याची माहिती विशाल आनंद,पोलीस अधीक्षक ग्रामीण यांनी दिली आहे. तर दुसरीकडे या घटनेमुळे अमरावतीतील राजकीय वातावरण तापले असून, पुढील तपासात काय निष्पन्न होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Bachchu Kadu : माजी मंत्री बच्चू कडू अडचणीत; हत्येचा कट उघड, गुन्हा दाखल Read More »

rain alert

IMD Rain Alert: अहिल्यानगरसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ व ‘यलो अलर्ट’; जाणून घ्या हवामान अपडेट

IMD Rain Alert : भारतीय हवामान विभाग यांनी निर्गमित केलेल्या इशाऱ्यानुसार जिल्ह्यात ३ एप्रिल २०२६ या कालावधीत तुरळक ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह वादळे, सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’जारी करण्यात आला आहे. तसेच ४ एप्रिल २०२६ रोजी वीजांच्या कडकडाटासह वादळे, मध्यम पाऊस व जोरदार वाऱ्याची शक्यता असल्याने ‘येलो अलर्ट’देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. मेघगर्जना, वीजांचा कडकडाट व वादळी वाऱ्याच्या वेळी झाडाखाली थांबू नये; सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. वादळादरम्यान कोणतेही विद्युत उपकरण वापरू नये; विद्युतवाहक वस्तूंना स्पर्श टाळावा.मोकळी मैदाने, टॉवर्स, विद्युत खांब, धातूची कुंपणे, ट्रान्सफॉर्मर यांपासून दूर राहावे.जाहिरात फलक (होर्डिंग्ज) जवळ थांबू नये; कोसळण्याचा धोका संभवतो.मोकळ्या जागेत अडकले असल्यास गुडघ्यावर बसून डोके खाली झाकून घ्यावे व जमिनीशी कमी संपर्क ठेवावा. धरण, नदी, कालवे येथे पर्यटनासाठी जाताना विशेष काळजी घ्यावी; पाण्यात उतरू नये व धोकादायक ठिकाणी सेल्फी घेऊ नये.शेतकऱ्यांनी पाऊस व गारपीटीमुळे नुकसान टाळण्यासाठी शेतीमालाचे योग्य नियोजन करावे.बाजारात आणलेला किंवा साठवलेला शेतीमाल सुरक्षित ठेवण्याची खबरदारी घ्यावी. जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. नागरिकांनी स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. आपत्कालीन परिस्थितीत जवळच्या पोलीस स्टेशन, तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथे टोल फ्री क्रमांक १०७७ तसेच ०२४१-२३२३८४४/ २३५६९४० वर संपर्क साधावा. वादळ, वीज, पाऊस व गारपीट यापासून स्वतःचे व जनावरांचे संरक्षण करण्यासाठी दक्षता घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

IMD Rain Alert: अहिल्यानगरसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ व ‘यलो अलर्ट’; जाणून घ्या हवामान अपडेट Read More »

kolhapur

Kolhapur News : कोल्हापुरात गोवा बनावटी मद्याचा मोठा साठा जप्त

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात गोवा बनावटी दारूविरोधी मोहिमेत शाहूवाडी पोलिसांनी यशस्वी कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नेर्ले-बांबवडे रोडवर कापशी गावाजवळ सापळा रचून एका टाटा ट्रकला अडवले. या कारवाईत सुमारे 1 कोटी 64 लाख रुपयांचा गोवा बनावटी ‘सनकी’ ब्रँडचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. ट्रकसह एकूण 1 कोटी 79 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. ट्रकचालक संतोष बंडू पेटकर याला ताब्यात घेतल्यानंतर चौकशीत मध्यप्रदेशातील असीम अब्दुल्ला शेख याचा सहभाग उघड झाला. त्यानंतर शेखलाही अटक करण्यात आली आहे. दोघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार शाहूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी सांगितले की, “मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. सर्व मुद्देमाल जप्त करून दोघांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.”

Kolhapur News : कोल्हापुरात गोवा बनावटी मद्याचा मोठा साठा जप्त Read More »

Dhule Crime: धुळ्यात हातावरील ‘टॅटू’ने उलगडले खुनाचे गूढ; अनैतिक संबंधातून तरुणाची निर्घृण हत्या

Dhule Crime : धुळे जिल्ह्यात नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधांच्या रागातून एका पतीने आपल्या नात्यातील तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने पत्नी आणि अल्पवयीन मुलाच्या मदतीने मृतदेह सायकलवरून नेऊन विहिरीत फेकला. सुमारे नऊ दिवस पाण्यात राहिल्याने मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता, त्यामुळे ओळख पटवणे कठीण झाले होते. मात्र हातावरील टॅटूमुळे पोलिसांना महत्त्वाचा धागा मिळाला. अवधान एमआयडीसी परिसरातील विहिरीत सापडलेल्या मृतदेहाच्या छातीवर “RAVI” आणि हातावर “Radha” असे टॅटू आढळले. यावरून मृत व्यक्ती दिवाणमळा येथील रवी मालचे असल्याचे निष्पन्न झाले. तपासात उघड झाले की, रवीचे आरोपी बापू मालचे यांच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते. याच रागातून १८ मार्चच्या रात्री बापू मालचे यांनी पत्नीच्या मदतीने रवीची हत्या केली आणि कुटुंबाच्या मदतीने मृतदेहाची विल्हेवाट लावली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलीस ठाण्याच्या निरीक्षक शिल्पा पाटील आणि त्यांच्या पथकाने वेगाने तपास करत अवघ्या २४ तासांत गुन्ह्याचा उलगडा केला. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, पुढील तपास सुरू आहे.

Dhule Crime: धुळ्यात हातावरील ‘टॅटू’ने उलगडले खुनाचे गूढ; अनैतिक संबंधातून तरुणाची निर्घृण हत्या Read More »

sunetra pawar dcm

Sunetra Pawar: राष्ट्रवादीत बंडाचे संकेत? सुनेत्रा पवारांच्या ‘त्या’ पत्रामुळे पक्षात चर्चेला उधाण

Sunetra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या पडद्यामागे मोठे राजकीय नाट्य रंगले असून पक्षांतर्गत वादाचा स्फोट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पक्षाच्या घटनेत बदल करून कार्याध्यक्षांना झुकते माप देण्याच्या मुद्द्यावरून पक्षात आता स्पष्टपणे दोन गट पडल्याचे दिसून येत आहे. या अंतर्गत संघर्षामुळे सुनेत्रा पवार आणि पक्षातील इतर वरिष्ठ नेत्यांमध्ये मोठा पेच निर्माण झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला एक खळबळजनक पत्र धाडले आहे. 28 जानेवारीनंतर झालेला पक्षाचा कोणताही अधिकृत पत्रव्यवहार वैध मानू नये, अशी आग्रही विनंती त्यांनी या पत्राद्वारे केली आहे. घटनेतील बदलांमुळे अधिकारांच्या वाटपावरून हा वाद विकोपाला गेल्याचे समजते. या वादावर पडदा टाकण्यासाठी दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी सुनेत्रा पवारांची भेट घेऊन प्रदीर्घ चर्चा केली व स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. मात्र, या खुलाशानंतरही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांचे समाधान झाले नसल्याची सूत्रांची माहिती आहे. पत्रावरून उद्भवलेला हा कायदेशीर आणि राजकीय तिढा सोडवण्यासाठी सध्या पक्षाच्या कोअर कमिटीच्या आणि दिग्गज नेत्यांच्या तातडीच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार दिल्लीत असून भाजप श्रेष्ठींच्या भेटीगाठी घेणार असल्याचे सूत्रांकडून समजते. ऐन राजकीय धामधुमीत राष्ट्रवादीतील हा कलह नेमके कोणते वळण घेतो, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Sunetra Pawar: राष्ट्रवादीत बंडाचे संकेत? सुनेत्रा पवारांच्या ‘त्या’ पत्रामुळे पक्षात चर्चेला उधाण Read More »

Radhakrishnan Vikhe Patil: मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सहकार्याने साकळाईचे स्वप्न पूर्ण होणार

Radhakrishnan Vikhe Patil: श्रीगोंदा व अहिल्यानगर या दोन तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाला वरदान ठरणाऱ्या साकळाई उपसा सिंचन योजनेस मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाली मिळाली असून, दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या 32 गावांतील 10 हजार हेक्टर क्षेत्रास पाणी देण्याचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यामातून पूर्ण होत असल्याचे समाधान जलसंपदा तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले. वेळोवेळी बैठका घेऊन विविध आवश्यक परवानग्या व मान्यता प्राप्त करुन घेतल्यामुळे साकळाई योजनेचे लोकनेते पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील यांनी पाहीलेले स्वप्न पुढील 4 वर्षात पुर्ण करण्याचा निर्धार महायुती सरकारचा आहे.साकळाई उपसा सिंचन योजने अंतर्गत म्हसेगांव येथून 4 टप्प्यांमध्ये पाणी उचलून अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा व अहिल्यानगर या दोन तालुक्यांतील एकूण 32 गावांमध्ये विकेंद्रीतजलसाठ्यांद्वारे अस्तित्वातील ल.पा. तलाव, पाझर तलाव, सिमेंट नाला बंधारे व गाव तलावां मध्ये पाणी सोडण्याचे नियोजन आहे. या योजनेत सिंचनासाठी 1.60 TMC व पिण्यासाठी 0.20 TMC असा एकूण 1.80 TMC इतका पाणी वापर नियोजित असल्याची माहीती मंत्री विखे पाटील यांनी दिली. साकळाई योजनेमध्ये घोड धरणाच्या जलाशयातून मौजे म्हसे येथे पंपगृह क्रमांक 1 चे बांधकाम करण्यात येणार आहे. पंपगृह क्रमांक 1 ते 4 व वितरण कुंड 1,2 व 3 द्वारे एकूण 4 टप्प्यांमध्ये सुमारे 208.34 मिटर उपसा करुन चिखली व घुटेवाडी येथील डोंगरावरील वितरण हौदामध्ये सोडण्यात येणार आहे. वितरण हौद क्रमांक 2 व 3 मधून गुरुत्वीय बंदीस्त नलिका प्रणालीद्वारे लाभ क्षेत्रातील 32 गावांतील 196 तलाव भरण्यासाठी पाणी सोडण्याचे नियोजन आहे. दुष्काळग्रस्त भागाला पाणी मिळावे म्हणून लोकनेते पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील यांनी अनेक वर्षे पाठपुरावा केला. राज्यात महायुती सरकार आल्यानंतर योजनेच्या सर्वेक्षणापासून ते योजनेच्या सर्व प्रस्तावांना मान्यता देण्याच्या सर्व निर्णयांचे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे असल्याचे स्पष्ट करून, मंत्री विखे पाटील म्हणाले की,लोकसभा निवडणुकीत योजनेच्या संदर्भात जाणीपुर्वक राजकारण करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला. परंतू अंतिमता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच दुष्काळग्रस्त भागातील जनतेला पाणी देण्याचा शब्द पूर्ण केला आणि आदरणीय खासदार साहेबांनी पाहीलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी महायुती सरकाने सहकार्य केल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले. साकळाई योजनेचे काम पूर्णत्वास जावे म्हणून डॉ सुजय विखे पाटील यांची मोठी धडपड होती.प्रशासकीय स्तरावर त्यांचाही पाठपुरावा सात्तत्याने सुरू होता.मंत्री मंडळाने साकळाई योजनेला दिलेल्या मान्यतेबद्दल डॉ सुजय विखे पाटील यांनी आनंद व्यक्त केला असून,महायुती सरकारच्या सहकार्याने दुष्काळग्रस्त भागातील जनतेला न्याय मिळत असल्याचे समाधान डॉ विखे पाटील यांनी व्यक्त केले.

Radhakrishnan Vikhe Patil: मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सहकार्याने साकळाईचे स्वप्न पूर्ण होणार Read More »

img 20260402 wa0003

Sakalai Lift Irrigation Scheme : साकळाई उपसा सिंचन योजनेला मंजुरी; मुख्यमंत्र्यांची घोषणा, हिवरे झरे परिसरात जल्लोष

Sakalai Lift Irrigation Scheme : अहिल्यानगर व श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या साकळाई उपसा सिंचन योजनेला अखेर राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकृत घोषणा केली आहे. तब्बल हजार कोटींहून अधिक निधीच्या या योजनेमुळे दुष्काळी पट्ट्यातील हजारो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या योजनेला मंजुरी मिळाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना अखेर यश आले असून त्यांनी शासन पातळीवर पाठपुरावा करून ही योजना मार्गी लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच मा. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केंद्र व राज्य पातळीवर सातत्याने पाठपुरावा करत प्रश्नाची गांभीर्याने मांडणी केली. स्थानिक कृती समितीने अनेक वर्षे सातत्याने संघर्ष करून, आंदोलने, बैठका व निवेदने देत हा विषय जिवंत ठेवला होता. अखेर शासनाने सकारात्मक निर्णय घेतल्याने कृती समिती व ग्रामस्थांच्या मेहनतीला यश मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर हिवरे झरे येथे ग्रामस्थांनी उत्स्फूर्त जल्लोष साजरा केला. फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर, गुलाल उधळून आनंद व्यक्त करण्यात आला. “साकळाई योजना मंजूर झालीच पाहिजे” अशी अनेक वर्षे लढा देणाऱ्या ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. या योजनेमुळे परिसरातील शेतीला शाश्वत पाणी उपलब्ध होऊन शेती उत्पादनात वाढ होणार असून शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. या वेळी कृती समितीचे अध्यक्ष ह.भ.प. बाबा महाराज झेंडे, नारायणराव रोडे, सोमनाथ घाडगे, सुरेश काटे, बबनराव वाळके, रोहिदास उदमले, तुकाराम काळे, आकाश लंके, विनोद सोनवणे, गणेश झेंडे, प्रमोद पवार, पांडुरंग झेंडे, नवनाथ आनंदकर, रामभाऊ वाळके, भाऊसाहेब चोबे, अक्षय खेंगट, भाऊसाहेब निमसे, रामदास सर झेंडे, चिखलीचे सरपंच भैय्या कदम, मा. श्री बापूसाहेब गाडेकर, माळ सरपंच राजेंद्र झेंडे, कोरेगावचे सरपंच बाबासाहेब विधाटे, राजाराम घुटे, सोन्याबापू वाणी, प्रतापराव नलगे तसेच पंचायत समितीचे माजी सभापती पुरुषोत्तम भैय्या लगड आदी मान्यवर उपस्थित होते. साकळाई उपसा सिंचन योजना प्रत्यक्षात आल्यानंतर परिसरातील पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात कमी होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली ही योजना आता प्रत्यक्षात येण्याच्या मार्गावर असल्याने नागरिकांमध्ये आशावाद निर्माण झाला आहे.

Sakalai Lift Irrigation Scheme : साकळाई उपसा सिंचन योजनेला मंजुरी; मुख्यमंत्र्यांची घोषणा, हिवरे झरे परिसरात जल्लोष Read More »