DNA मराठी

ताज्या बातम्या

Bank

September Bank Holidays: सप्टेंबरमध्ये बँका राहणारा 15 दिवस बंद, जाणून घ्या संपूर्ण लिस्ट

September Bank Holidays: येत्या काही दिवसांत सप्टेंबर महिना सुरू होणार आहे. या सप्टेंबर महिन्यात बँका तब्बल 15 दिवसांसाठी बंद राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.   सप्टेंबर महिन्यात सण आणि राष्ट्रीय सुट्ट्यांव्यतिरिक्त, या महिन्यात प्रादेशिक आणि धार्मिक सणांसह एकूण दोन शनिवार आणि पाच रविवार असतील. ग्राहकांनी लक्षात ठेवावे की भारतातील बँकांच्या सुट्ट्या राज्यानुसार बदलतात आणि माहिती ठेवण्यासाठी तुमच्या स्थानिक बँकेच्या शाखेत सुट्टीची यादी वेळेपूर्वी तपासणे चांगले. सप्टेंबर 2024 मध्ये किमान 15 सूचीबद्ध सुट्ट्या आहेत (शनिवाराच्या सुट्टीसह). विशेषत: काही मोठे वीकेंड्स आहेत, त्यामुळे कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी बँकेला भेट देण्याची योजना त्यानुसार करा.   सप्टेंबर 2024 मधील बँक सुट्ट्यांची संपूर्ण यादी 1 सप्टेंबर – रविवार – संपूर्ण भारत 7 सप्टेंबर – विनायक चतुर्थी – संपूर्ण भारत 8 सप्टेंबर — रविवार / नुआखाई — संपूर्ण भारत / ओडिशा 13 सप्टेंबर — रामदेव जयंती / तेजा दशमी (शुक्रवार) — राजस्थान 14 सप्टेंबर — दुसरा शनिवार / ओणम — संपूर्ण भारत / केरळ 15 सप्टेंबर — रविवार / तिरुवोनम — संपूर्ण भारत / केरळ 16 सप्टेंबर — ईद-ए-मिलाद (सोमवार) — संपूर्ण भारत 17 सप्टेंबर – इंद्रजात्रा (मंगळवार) – सिक्कीम 18 सप्टेंबर – श्री नारायण गुरु जयंती (बुधवार) – केरळ 21 सप्टेंबर – श्री नारायण गुरु समाधी (शनिवार) – केरळ 22 सप्टेंबर – रविवार – संपूर्ण भारत 23 सप्टेंबर – वीर हुतात्मा दिन (सोमवार) – हरियाणा 28 सप्टेंबर – चौथा शनिवार – संपूर्ण भारत 29 सप्टेंबर – रविवार – संपूर्ण भारत ऑनलाइन बँकिंग सेवा रोख आणीबाणीसाठी, सर्व बँका त्यांच्या ऑनलाइन वेबसाइट्स आणि मोबाइल बँकिंग सेवा ॲप्स चालवतात – आठवड्याचे शेवटचे दिवस किंवा इतर सुट्ट्यांची पर्वा न करता – जोपर्यंत वापरकर्त्यांना विशिष्ट कारणांसाठी सूचित केले जात नाही. तुम्ही पैसे काढण्यासाठी कोणत्याही बँकेचे एटीएम वापरू शकता.

September Bank Holidays: सप्टेंबरमध्ये बँका राहणारा 15 दिवस बंद, जाणून घ्या संपूर्ण लिस्ट Read More »

Nitesh Rane

Ahmednagar News: नितेश राणेंच्या अडचणीत वाढ, अहमदनगर अखंड मराठा समाजाकडून पोलीस अधीक्षकांना निवेदन

Ahmednagar News: अहमदनगर शहरात 01 सप्टेंबर रोजी रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ भाजप आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वात रॅली आणि सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र या सभेच्या माध्यमातून शहरातील सामाजिक सलोखा खराब होऊ नये यासाठी अहमदनगर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे अहमदनगर अखंड मराठा समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.  मालवण येथील राजकोट किल्ल्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याविषयी घडलेल्या घटनेने शिवप्रेमी व अखंड मराठा समाजाच्या त्रीव भावन लक्षात घेवून या सभेच्या माध्यमातून सामाजिक सलोखा खराब होऊ नये याची खबरदारी घेण्यात आला अशी विनंती या निवेदनाद्वारे अहमदनगर अखंड मराठा समाजाकडून करण्यात आली.

Ahmednagar News: नितेश राणेंच्या अडचणीत वाढ, अहमदनगर अखंड मराठा समाजाकडून पोलीस अधीक्षकांना निवेदन Read More »

Modi

झिरो बॅलन्सवर आजच उघडा PMJDY खाते, मिळणार 2 लाखांचा विमा

Modi Government: प्रधानमंत्री जन धन योजनेला (PMJDY) आज 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. कोट्यवधी लोकांना या योजनेचा लाभ झाला आहे. ही योजना 28 ऑगस्ट 2014 रोजी सुरू करण्यात आली. 28 ऑगस्ट 2018 रोजी सरकारने PMJDY 2.0 लाँच केले. तेव्हापासून उघडलेल्या PMJDY खात्यांसाठी RuPay कार्डवरील अपघात विमा संरक्षण दुप्पट करून 2 लाख रुपये करण्यात आले. या विम्यासाठी कोणताही प्रीमियम आकारला जात नाही. हे NPCI द्वारे दिले जाते. सध्या प्रीमियम 0.47 रुपये प्रति कार्ड आहे. जाणून घ्या PMJDY चे काय फायदे आहेत. झिरो बॅलन्सवर खाते उघडले सर्वसामान्यांना बँकिंग व्यवस्थेशी जोडण्याच्या उद्देशाने पंतप्रधान जन धन योजना सुरू करण्यात आली. यामध्ये अगदी गोरगरिबांची बँक खाती शून्य शिल्लक ठेवून उघडली जातात. या योजनेत सामाजिक सुरक्षा योजनांचे लाभ थेट बँक हस्तांतरण (DBT) द्वारे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतात. कर्ज, विमा, पेन्शन मिळणे सोपे प्रधानमंत्री जन-धन योजनेचा उद्देश गरीब वर्गांना बँकिंग प्रणालीशी जोडणे, बचत खाती उघडणे आणि कर्ज, विमा आणि पेन्शन सुविधा सुनिश्चित करणे हे आहे. यामध्ये कोणत्याही जामीनदाराची गरज नाही. सरकारी आकडेवारीनुसार, आतापर्यंत 52.39 कोटींहून अधिक लोकांची जन धन खाती उघडण्यात आली आहेत. शून्य प्रीमियमवर अपघात विमा जन धन खात्यांमध्ये जमा केलेल्या रकमेवर व्याज मिळते. 1 लाख रुपयांचा अपघात विमा आणि 30,000 रुपयांचे जीवन संरक्षण देखील उपलब्ध आहे. 2018 नंतर उघडलेल्या खात्यांवर अपघात विमा 2 लाख रुपयांपर्यंत आहे. त्याचा प्रीमियमही शून्य आहे. किमान शिल्लक राखण्याचे कोणतेही टेन्शन नाही जन धन खात्यांमध्ये किमान शिल्लक ठेवण्याची गरज नाही. खात्यात 10,000 रुपयांची ओव्हरड्राफ्ट सुविधाही उपलब्ध आहे. जन धन खाते उघडल्यानंतर, लाभार्थ्यांना रुपे डेबिट कार्ड देखील दिले जाते. पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडता येते बँकांशिवाय पोस्ट ऑफिसमध्येही जन धन खाते उघडले जाते. यासाठी फक्त पॅन कार्ड आणि आधार कार्ड असणे आवश्यक आहे. यासोबतच जन धन खातेही ऑनलाइन उघडता येणार आहे.

झिरो बॅलन्सवर आजच उघडा PMJDY खाते, मिळणार 2 लाखांचा विमा Read More »

Screenshot 2024 08 28 12 35 38 32 439a3fec0400f8974d35eed09a31f914

Ahmednagar News: जिल्हा परिषदेवर धडकला पोषण आहार कर्मचाऱ्यांचा संघर्ष मोर्चा

Ahmednagar News: श्रमिक मजदूर संघ शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेच्या वतीने शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेवर संघर्ष मोर्चा काढण्यात आला. पोषण आहार कर्मचाऱ्यांनी विविध प्रश्‍न व समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारात जोरदार निदर्शने करून ठिय्या आंदोलन केले.  या मोर्चात जिल्ह्यातील पोषण आहार कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या आंदोलनात संस्थापक अध्यक्ष महेंद्र विधाते, राज्य उपाध्यक्ष कविता धिवारे, राज्य समन्वयक सविता विधाते, सुभाष सोनवणे, शितल दळवी, कावेरी साबळे, उत्तम गायकवाड, कैलास पवार, विद्या अभंग, मेजबीन सय्यद, अश्‍विनी दळवी, छाया भूमकर, बाबासाहेब गोर्डे आदींसह सर्व तालुकाध्यक्ष, पदाधिकारी व महिला कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.  मार्केटयार्ड चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन मोर्चाची सुरुवात करण्यात आली. जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करुन मोर्चा जिल्हा परिषदेवर धडकला. पोषण आहार कर्मचाऱ्यांनी केलेल्या जोदरार घोषणाबाजी जिल्हा परिषदेचा संपूर्ण परिसर दणाणून निघाला.  जोपर्यंत विद्यार्थी आहे, तोपर्यंत शालेय पोषण आहार सुरु राहणार असल्याने सर्व कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, शासकीय सेवेत सामावून घेत नाही तोपर्यंत किमान वेतन कायद्याप्रमाणे 15 हजार रुपये मानधन द्यावे, इतर केडर प्रमाणे शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना गणवेश मिळावा, गॅस सारख्या ज्वलनशील पदार्थ सोबत काम करायचे असल्याने दुर्दैवाने एखादी दुर्घटना घडल्यास त्या कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून किमान कर्मचाऱ्यांचा 20 लाखाचा विमा उतरवावा, कर्मचाऱ्यांना औषधोपचारासाठी किमान 50 हजार रुपयाची मदत मिळावी, दरवर्षीच्या करार ऐवजी किमान तीन वर्षातून एकदा करार करावा, शालेय परिसर, वर्ग स्वच्छता, स्वच्छतागृह इत्यादींची साफसफाई करण्यासाठी संबंधित शालेय यंत्रणेकडून कर्मचाऱ्यांवर दबाव आनला जात असून, शासन निर्णयानुसार ही कामे करण्यास दबाव आणू नये, गरोदर महिला कर्मचारी यांना बालसंगोपणासाठी सहा महिन्याची पगारी रजा मिळावी, विनाकारण कुणाला कामावरून कमी न करता त्या कर्मचाऱ्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी द्यावी, प्रशिक्षण घेतलेल्या कर्मचाऱ्यांना नियुक्ती द्यावी, ज्याच्या नावावर करार त्यांचीच प्रत्यक्ष नेमणूक करावी, सेंट्रल किचन पद्धती तात्काळ बंद करून पूर्वीप्रमाणे जे कर्मचारी काम करत होते त्यांना तात्काळ कामावर घेण्याची मागणी आंदोलकांच्या वतीने करण्यात आली आहे.  या मागणीचे निवेदन जिल्हा शालेय पोषण आहारचे लेखा अधिकारी रुपेश भालेराव यांना देण्यात आले.

Ahmednagar News: जिल्हा परिषदेवर धडकला पोषण आहार कर्मचाऱ्यांचा संघर्ष मोर्चा Read More »

BJP

Maharashtra Election: भाजपाचे विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना डावलुन शेवगांवांत भाजपाचा भव्य मेळावा….!

Maharashtra Election: शेवगांव व पाथर्डी तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचा निर्धार मेळावा शेवगांव येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अरुण मुंढे तसेच ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष गोकुळ दौंड यांच्या नेतत्वाखाली मेळावा पार पडला. शेवगांव-पाथर्डी विधानसभेच्या भाजपाच्या आमदार मोनिका राजळे यांना डावलुन हा निर्धार मेळावा भाजपाचे राज्य सरचिटणीस अरुण मुंढे आणी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड यांनी निर्धार मेळाव्याचे भव्य आयोजन करून अरुण मुंडे व गोकुळ दौंड यांनी आमदार मोनिका राजळे यांच्या विरोधात शेवगांव-पाथर्डी विधानसभेसाठी दंड थोपटले आहे.  मेळाव्यात अरुण मुंढे किंवा गोकुळ दौंड या दोघांपैकी कोणी एकाला पक्षाने विधानसभेची उमेदवारी द्यावी अशा मागणीने जोर धरला असुन विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना पक्षश्रेष्ठींनी पुन्हा उमेदवारी देऊ नये अन्यथा शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे पदाधिकारी सामुहिक राजीनामे देणार असल्याचे वक्तव्य यांनी केले.  यावेळी भाजपचे शेवगांव तालुकाध्यक्ष तुषार वैद्य, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड, जय शिवसंग्राम पक्षाचे जिल्हाध्यक्ष नवनाथराव ईसारवाडे, बाळासाहेब सोनवने, आत्माराम कुंडकर, बाळासाहेब कोळगे, संजय मरकड सह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Maharashtra Election: भाजपाचे विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना डावलुन शेवगांवांत भाजपाचा भव्य मेळावा….! Read More »

Nanded

Nanded News : विविध मागण्यांसाठी आदिवासी समाज बांधवांचा मोर्चा नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला

Nanded News : विविध मागण्यांसाठी आदिवासी समाज बांधवांचा मोर्चा नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. नांदेड शहरातील महात्मा फुले पुतळा पासून या मोर्चाला सुरुवात झाली. महात्मा फुले पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालया पर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. आदिवासी समाजातील नरहरी झिरवळ,किरण लमहाटे,डॉ राजेंद्र भारुड यांच्या प्रतिमेचे काही समाज कंटकांनी जागतिक आदिवासी दिनी  दहन केले,त्या समाज कंटकांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत,12 हजार 500 जागांवर भरती प्रक्रिया राबविण्यात यावी,पेसा अंतर्गत भरती प्रक्रिया तात्काळ घेण्यात यावी,यासह इतर मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला.या मोर्चात आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  शासनाने तात्काळ आमच्या मागण्याची दखल घेऊन मागण्या मान्य कराव्यात अन्यथा या मागण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आदिवासी समाज बांधव रस्त्यावर उतरले असा इशारा माजी आमदार संतोष टारफे यांनी दिलाय.

Nanded News : विविध मागण्यांसाठी आदिवासी समाज बांधवांचा मोर्चा नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला Read More »

Ahmednagar Accident News

Ahmednagar News: धक्कादायक, स्वस्तिक बस स्थानकात वृद्ध व्यक्ती बसच्या टायर खाली आल्याने गंभीर जखमी

Ahmednagar News:  अहमदनगर शहरातील गजबजलेल्या स्वस्तिक बस स्थानकात एक वृद्ध व्यक्ती बसच्या टायर खाली आल्याने गंभीर जखमी झाला आहे. बस चालकाच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनी सांगितले. वृद्ध व्यक्ती बसटायर खाली आल्याने अक्षरशः त्याचा पाय पूर्ण पणे टायर खाली आल्याने रिकामी झाला असून  व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे.  अंकुश आबा शिंदे ही व्यक्ती गंभीर झाल्यानंतर तेथील उपस्थित प्रवाशांनी तात्काळ त्या व्यक्तीला बसच्या बाजूला करून बस स्थानकात आणले त्यानंतर बराच वेळ एसटीच्या कर्मचाऱ्यांनी त्याच्या अंगावरती चादर देखील टाकली नव्हती किंवा रुग्णवाहिकेला देखील फोन केला नव्हता.  प्रत्यक्षदर्शी पाहणाऱ्या प्रवाशांनी सांगितलं की पूर्णपणे बस चालकाची चुकी असून बस चालकाने कोणताही मागचा पुढचा विचार न करता त्या व्यक्तीच्या अंगावर ती गाडी घातली. त्यामुळे प्रवाशांनी रोष व्यक्त केला असून ड्रायव्हर वरती कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी प्रवाशांची मागणी आहे.  एसटी बस चालकाला कोणी अरेरावी किंवा धक्काबुक्की केली तर प्रशासन किंवा एसटी कर्मचारी हे आंदोलन करतात परंतु आज एका एसटी चालकाच्या चुकीमुळे एका प्रवाशाला गंभीर इजा झाली आहे याकडे प्रशासन कधी लक्ष देणार असं देखील यावेळी प्रत्यक्ष दर्शनी सांगितलं. सदर बस ही शिर्डी ते रोहा अशी अहमदनगर मार्गे जात होती बस चालक आशिक मुबारक शेख याच्यावरती गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी प्रत्यक्षदर्शींची आहे. गाडी क्रमांक mh14kq3970 हिरकणी गाडी होती. अर्ध्या तासाच्या प्रतीक्षेनंतर त्या नागरिकाला रुग्णवाहिकेतून एका खाजगी रुग्णालयात दाखल केले असून पोलीस प्रशासन पुढील कारवाई करत आहे.

Ahmednagar News: धक्कादायक, स्वस्तिक बस स्थानकात वृद्ध व्यक्ती बसच्या टायर खाली आल्याने गंभीर जखमी Read More »

Rape 1

Pune Crime News: पुण्यात धक्कादायक प्रकरण, इंस्टाग्रामवर मैत्री अन् अल्पवयीन मुलीवर अत्याचार

 Pune Crime News:  गेल्या काही दिवसांपासून राज्यात अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत आहे त्यामुळे महिलांचे सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. यातच आता आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आला आहे.  माहितीनुसार, पुण्यातील हिंजवडी परिसरात अल्पवयीन मुलीला धमकावून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी एका 23 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. आरोपीचे नाव कार्तिक कांबळे असे असून, त्याच्यावर आयपीसी कलम अ अंतर्गत कलम 376, 376 (2) आणि 506 तसेच POCSO कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडितेला इंस्टाग्रामवर भेटले आणि तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना या वर्षाच्या सुरुवातीला एप्रिल ते जून दरम्यान घडली होती. रीतसर तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून गुरुवारी आरोपीला अटक केली. आरोपीने पीडितेचा लैंगिक छळही केला सहाय्यक पोलिस आयुक्त सुरेश कुराडे यांनी एएनआयला सांगितले की, आरोपीने पीडितेवरही लैंगिक अत्याचार केले असून त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपीला अटक करण्यात आली  पीडित मुलगी तिच्या कुटुंबासोबत आली आणि घटनेची माहिती दिली. आरोपीला अटक करण्यात आली आहे. पीडित मुलगी आणि आरोपी इंस्टाग्रामच्या माध्यमातून संपर्कात आले. त्यानंतर आरोपीने पीडितेवर लैंगिक अत्याचार केला. तसेच याबाबत घरच्यांना सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. आरोपीला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला 4 दिवसांची कोठडी सुनावली आहे. पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

Pune Crime News: पुण्यात धक्कादायक प्रकरण, इंस्टाग्रामवर मैत्री अन् अल्पवयीन मुलीवर अत्याचार Read More »

BSNL

BSNL देणार Jio-Airtel ला धक्का, लॉन्च केला स्वस्त रिचार्ज प्लॅन, मिळणार बंपर डेटा

BSNL Recharge: Jio आणि Airtel ने त्यांचे प्लान महाग केल्याने अनेकांचे बजेट बिघडले आहे. तर दुसरीकडे बीएसएनएलचे प्लॅन अजूनही खूपच स्वस्त आहेत, त्यामुळे आता बीएसएनएल वापरकर्त्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.  BSNL ने तुमच्यासाठी एक नाही तर दोन उत्तम रीचार्ज प्लॅन आणल्या आहेत. यामधे तुम्हाला बंपर डेटासह सर्व सुविधांचा लाभ मिळणार आहे.  सर्वात आधी आम्ही तुम्हाला 599 रुपयांच्या प्लानबद्दल माहिती देणार आहोत. या प्रीपेड प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना उत्कृष्ट सुविधा मिळत आहेत. 599 रुपयांच्या प्लॅन बीएसएनएलच्या 599 रुपयांच्या प्लॅनने बाजारात खळबळ उडवून दिली आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सला मोठा फायदा मिळत आहे.  या प्रीपेड प्लॅनची ​​किंमत 599 रुपये ठेवण्यात आली आहे. प्रीपेड प्लॅनमध्ये केवळ एकच नाही तर शक्तिशाली सुविधा उपलब्ध आहेत.  या प्लॅनची ​​वैधता 84 दिवसांची निश्चित करण्यात आली आहे. याशिवाय युजर्सना प्रतिदिन 3 जीबी डेटाचा लाभ दिला जात आहे. याशिवाय दररोज 100 एसएमएसची सुविधा देखील मिळणार आहे.  ​​डेटा मर्यादा संपल्यानंतर इंटरनेट 40 Kbps च्या वेगाने चालत राहील. 398 रुपयांच्या प्लॅन  या प्लानमध्ये यूजर्सना अमर्यादित व्हॉईस कॉलिंगसह 120 जीबी डेटा मिळत आहे. प्लॅनमध्ये एक महिन्याची म्हणजेच 30 दिवसांची वैधता दिली जात आहे. यानुसार यूजर्स रोज 4 जीबी डेटा वापरू शकतात. डेटा मर्यादा संपल्यानंतरही इंटरनेट सुरू राहील. यूजर्सला दररोज 100 एसएमएस दिले जात आहेत. हे एसएमएस पाठवण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. 

BSNL देणार Jio-Airtel ला धक्का, लॉन्च केला स्वस्त रिचार्ज प्लॅन, मिळणार बंपर डेटा Read More »

IAS Iqbal Singh Chahal

IAS Iqbal Singh Chahal यांच्या नियुक्तीवरून शिंदे सरकारवर विरोधकांचा हल्लाबोल, लावले गंभीर आरोप

IAS Iqbal Singh Chahal: राज्यातील गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून बीएमसीचे माजी आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची नियुक्ती केल्यावरून ठाकरे गटाने राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.   सरकारच्या या निर्णयावर उद्धव ठाकरेंचे शिवसेना नेते आनंद दुबे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत दुटप्पीपणाचा आरोप केला आहे. सरकारवर निशाणा साधत दुबे म्हणाले की, भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेने ज्या आयएएस अधिकारी इक्बाल चहलवर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, त्याच आयएएस अधिकारी इक्बाल चहल यांना आज राज्यात मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. बीएमसीच्या कथित कोविड हॉस्पिटल घोटाळ्याप्रकरणी चहलला गेल्या वर्षी अंमलबजावणी संचालनालयाने बोलावून चौकशी केली होती. इक्बाल सिंग यांचे नाव कोविड घोटाळा आणि फर्निचर घोटाळ्यात  आनंद दुबे यांनी जारी केलेल्या व्हिडिओ स्टेटमेंटमध्ये सरकार आणि चहलवर आरोप करताना ते म्हणाले, ‘हे दुटप्पीपणाचे आणखी एक प्रकरण आहे. बीएमसीचे माजी आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची एसीएस होम म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, ज्याचे प्रमुख भाजप नेते देवेंद्र फडणवीस आहेत. विचित्र गोष्ट म्हणजे कोविड घोटाळा आणि फर्निचर घोटाळ्यातही भाजप नेत्यांनीच चहलवर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. चहलला ईडीने बोलावून चौकशी केली, पण आता तपासात काय प्रगती झाली, याबाबत कोणालाच माहिती नाही. जेव्हा तुम्ही सरकारशी जवळीक साधून काम करता तेव्हा अशा मोठमोठ्या पोस्टिंग दिल्या जातात. हे सरकार प्रत्येक वेळी वॉशिंग पावडर का घेऊन जाते? अजित पवारांच्या बाबतीतही असेच घडले. दोन्ही प्रकरणांमध्ये त्याच भाजप नेत्याने गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते आणि आता चहल आणि अजित पवार हे दोघेही सरकारचा भाग आहेत. ती व्यक्ती प्रशासक असो की राजकारणी, तपास व्हायला हवा. या राज्यातील जनता सर्व काही पाहत असून येत्या निवडणुकीत याचा बदला नक्कीच घेईल. इक्बाल चहल हे 1989 च्या बॅचचे आयएएस अधिकारी  1989 च्या बॅचचे आयएएस अधिकारी चहल यांनी मे 2020 ते या वर्षी मार्च या कालावधीत बीएमसी आयुक्त म्हणून काम केले आणि लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयुक्तांच्या सूचनेनुसार त्यांची अतिरिक्त मुख्य सचिव पदावर मुख्यमंत्री कार्यालयात बदली करण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बदलापूर बलात्कार प्रकरण आणि त्यानंतर झालेल्या आंदोलनामुळे कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र सरकारवर तीव्र टीका झाली. यानंतर चहल यांची गृह खात्यातील अतिरिक्त मुख्य सचिव गृह या महत्त्वाच्या पदावर तातडीने नियुक्ती करण्यात आली.

IAS Iqbal Singh Chahal यांच्या नियुक्तीवरून शिंदे सरकारवर विरोधकांचा हल्लाबोल, लावले गंभीर आरोप Read More »