Dnamarathi.com

Post Office Scheme:  आज ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये अनेक प्रकारचे योजना राबवले जातात.  जर तुम्ही देखील गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी पोस्ट ऑफिसची किसान विकास पत्र योजना सर्वात भारी ठरू शकते. 

माहितीसाठी जाणुन घ्या या योजनेत परताव्याची हमी आहे आणि कोणताही भारतीय नागरिक यामध्ये गुंतवणूक करू शकतो आणि योजनेद्वारे मोठ्या प्रमाणात पैसे जोडू शकतो.

किसान विकास पत्रामध्ये, तुम्हाला गुंतवलेल्या रकमेच्या दुप्पट करण्याची हमी सरकारकडून मिळते. म्हणजेच या योजनेत तुम्ही 5 लाख रुपये गुंतवले तर ते 10 लाख रुपये आणि 10 लाख रुपये गुंतवले तर ते 20 लाख रुपये होईल.

तुम्ही किसान विकास पत्र योजनेत गुंतवणूक केल्यास, रक्कम 115 महिन्यांत (9 वर्षे, 7 महिने) दुप्पट होईल. तुम्ही या योजनेत 10 लाख रुपये जमा केल्यास ते 20 लाख रुपये होईल. सध्या या योजनेवर 7.5 टक्के व्याज आहे. व्याजाची गणना वार्षिक आधारावर केली जाते.

या योजनेअंतर्गत कोणतीही प्रौढ व्यक्ती एकल किंवा संयुक्त खाते उघडू शकते. याशिवाय 10 वर्षांपेक्षा जास्त वयाचे मूल त्याच्या/तिच्या नावावर किसान विकास पत्र घेऊ शकते. एक पालक अल्पवयीन किंवा मानसिकदृष्ट्या अस्वस्थ व्यक्तीच्या वतीने खाते उघडू शकतो. खाते उघडताना, आधार कार्ड, वय प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, KVP अर्ज फॉर्म इत्यादी कागदपत्रे आवश्यक असू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *