Dnamarathi.com

KKR vs SRH Match Highlights : बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानची कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल 2024 च्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे. 

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर IPL 2024 चा पहिला क्वालिफायर सामन्यात केकेआरने सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला. या सामन्यात प्रथम खेळणाऱ्या हैदराबादचा संघ 19.3 षटकात 159 धावा करत सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात केकेआरने केवळ 13.4 षटकांत लक्ष्य गाठले आणि सामना 8 विकेटने जिंकला. कोलकाताने आयपीएल 2024 फायनलसाठी तिकीटही बुक केले आहेत. तर हैदराबादला पराभवानंतरही अंतिम फेरी गाठण्याची आणखी एक संधी आहे. 

कोलकाताने 160 धावांचे लक्ष्य गाठले 

कोलकाता नाईट रायडर्ससमोर 160 धावांचे लक्ष्य होते. प्रत्युत्तरात केकेआरने अवघ्या 13.4 षटकांत लक्ष्याचा पाठलाग करत सामना 8 गडी राखून जिंकला. संघासाठी कर्णधार श्रेयस अय्यरने 24 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 58 धावांची खेळी केली. याशिवाय व्यंकटेश अय्यरने 28 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 51 धावांची खेळी केली. या दोघांमध्ये 97 धावांची नाबाद भागीदारीही झाली. 

रहमानउल्ला गुरबाज 23 तर सुनील नारायणला 21 धावा करता आल्या. दोघांनीही डावाची सुरुवात वेगवान केली होती, जी व्यंकटेश आणि श्रेयसने पूर्ण केली. या विजयासह कोलकाता संघाने पुन्हा एकदा अंतिम फेरी गाठली. आता अंतिम फेरीत केकेआरचा सामना कोणत्या संघाशी होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. कारण हैदराबाद अजूनही फायनलमध्ये येऊ शकते, तर राजस्थान आणि बेंगळुरूही या शर्यतीत आहेत. 

KKR विरुद्ध SRH यांच्यातील पहिल्या क्वालिफायर सामन्यात मिचेल स्टार्कने सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. त्याने एकूण 3 विकेट्स आपल्या नावावर केल्या. याशिवाय वरुण चक्रवर्तीने 2, वैभव अरोरा, हर्षित राणा, सुनील नारायण आणि आंद्रे रसेलने प्रत्येकी 1 बळी घेतला. हैदराबादकडून भुवनेश्वर कुमार आणि पॅट कमिन्सने 1-1 विकेट घेतली. 

सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण त्याचा फारसा फायदा संघाला घेता आला नाही. संघ 19.3 षटकात केवळ 159 धावांवर ऑलआऊट झाला. संघाकडून राहुल त्रिपाठीने 35 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने 55 धावा केल्या. याशिवाय ट्रॅव्हिस हेड 0, अभिषेक शर्मा 3, नितीश रेड्डी 9, शाहबाज अहमद 0, हेनरिक क्लासेन 32, अब्दुल समद 16, सनवीर सिंग 0, पॅट कमिन्स 30, भुवनेश्वर कुमार 0 आणि विजयकांत व्यासकांतने नाबाद 7 धावा केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *