Dnamarathi.com

IPL 2024 : नेहमी सोशल मीडियावर चर्चित राहणारा भारतीय संघाच्या स्टार खेळाडू हार्दिक पंड्या गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. तो यावेळी IPL 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करत होता मात्र यावेळी आयपीएलमधून बाहेर पडणारा मुंबईचा संघ पहिला संघ ठरला होता.

तर आता हार्दिक वैयक्तिक आयुष्याबाबत काही धक्कादायक बातम्या समोर येत आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, हार्दिक आणि नताशा स्टॅनकोविक एकमेकांपासून घटस्फोट घेणार आहेत, ज्याचे संकेत नताशानेच दिले आहेत. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हार्दिक पांड्या आणि पत्नी नताशा स्टॅनकोविक यांच्यातील संबंध चांगले चालले नाहीत आणि हे दोघेही एकमेकांपासून वेगळे होऊ शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे. Reddit वर मंगळवारी कोणीतरी एक पोस्ट टाकली होती, ज्यामध्ये असे लिहिले होते की, हार्दिक आणि नताशा एकमेकांपासून वेगळे होत आहेत असा अंदाज बांधला जात आहे. मात्र, हार्दिक आणि नताशाच्या वेगळ्या होण्याची बातमी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

नताशाने असे संकेत दिले

सर्बियन मॉडेल आणि अभिनेत्री नताशा स्टॅनकोविकने सोशल मीडिया इंस्टाग्रामवरून हार्दिक पांड्याचे आडनाव हटवले आहे. नताशा आधी पांड्या हे आडनाव वापरायची, पण तिने आता ते काढून टाकले आहे. याशिवाय तिने हार्दिकसोबतचे अनेक फोटोही डिलीट केले असून अनेक दिवसांपासून तिने एकमेकांसोबतचे फोटोही पोस्ट केलेले नाहीत. एवढेच नाही तर हार्दिकने नताशाला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या नाहीत. 4 मार्च रोजी नताशाचा वाढदिवस आहे

चार वर्षांपूर्वी लग्न झाले होते

हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांनी 31 मे 2020 रोजी एकमेकांशी लग्न केले. दोघांनी कोर्ट मॅरेज केले असले तरी. वास्तविक, लग्नाच्या काही महिन्यांनंतर 31 जुलै रोजी नताशा आणि हार्दिक आई-वडील झाले. नताशा लग्नाआधीच प्रेग्नंट होती. हार्दिक आणि नताशाच्या मुलाचे नाव अगस्त्य आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *