DNA मराठी

ताज्या बातम्या

Jalgaon Train Accident मृतांचा आकडा 13 वर पोहोचला, रेल्वेकडून आर्थिक मदत जाहीर

Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे रेल्वे मंत्रालयाने जळगाव रेल्वे अपघातातील प्रत्येक मृतांच्या कुटुंबियांना दीड लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. जळगाव रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 1.5 लाख रुपये, गंभीर जखमींना 50,000 रुपये आणि किरकोळ जखमींना 5000 रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे, असे रेल्वेमंत्र्यांच्या कार्यालयाने सांगितले. 22 जानेवारी रोजी जळगाव जिल्ह्यात कर्नाटक एक्सप्रेसने धडक दिल्याने 13 जणांचा मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले. रेल्वे अपघातात 13 जणांचा मृत्यूएएनआयशी बोलताना जळगावचे एसपी महेश्वर रेड्डी म्हणाले, जळगाव रेल्वे अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. 10 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. रेल्वेने अहवाल सादर केल्यानंतर आम्ही पुढील कारवाई करू. बुधवारी 22 जानेवारी रोजी पुष्पक एक्सप्रेसमधील प्रवासी आगीच्या भीतीने त्यांच्या डब्यातून बाहेर पडले आणि रुळांवर उभे राहिले तेव्हा ही घटना घडली. दरम्यान, कर्नाटक एक्सप्रेस ट्रॅकवरून गेली, ज्यामुळे अनेक प्रवासी चालत्या ट्रेनने धडकले आणि 13 जणांचा मृत्यू झाला. पुढील तपास सुरू आहे. पंतप्रधान मोदी-मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला शोकतत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील जळगाव येथे झालेल्या दुःखद रेल्वे अपघाताबद्दल शोक व्यक्त केला. पंतप्रधान म्हणाले, महाराष्ट्रातील जळगाव येथील रेल्वे ट्रॅकवर झालेल्या दुःखद अपघाताने मला दुःख झाले आहे. मी शोकाकुल कुटुंबांप्रती माझ्या मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो आणि सर्व जखमींच्या लवकर पुनर्प्राप्तीसाठी प्रार्थना करतो. अधिकारी बाधित लोकांना सर्वतोपरी मदत करत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी जळगाव रेल्वे अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली. जखमींच्या सर्व वैद्यकीय खर्चाचा खर्चही राज्य सरकार उचलेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. जळगाव जिल्ह्यातील दुर्दैवी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकार 5 लाख रुपयांची आर्थिक मदत देईल आणि जखमींचा संपूर्ण खर्चही राज्य सरकार करेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो.

Jalgaon Train Accident मृतांचा आकडा 13 वर पोहोचला, रेल्वेकडून आर्थिक मदत जाहीर Read More »

Siddharam Salimath : ‘मिशन 100 दिवस’ अंतर्गत नागरिकांना किमान 5 लाख सेवा देण्याचे उद्दिष्ट ठेवा- जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

Siddharam Salimath : ‘इज ऑफ लिव्हिंग’ या संकल्पनेवर नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी कमी करण्यासाठी विविध विभागांच्या सेवांचे सुसूत्रीकरण करत 100 दिवसांमध्ये सर्व विभागांनी मिळून किमान 5 लाख सेवा देण्याचे उद्दिष्ट ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात विविध विषयांवर आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी हेमलता बडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर उपस्थित होते. जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना असलेल्या 7 कलमी कार्यक्रमांची ‘मिशन 100 दिवस’ उपक्रमाची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमबजावणी करण्यात यावी. महसूल विभागामार्फत विद्यार्थी-विद्यार्थींनींना विविध प्रकारचे एक लाख दाखले देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याप्रमाणे इतर शासकीय विभागांनीही त्यांच्या सेवा देण्याचे नियोजन करावे. प्रत्येक कार्यालय, कार्यालयाचा परिसर स्वच्छ ठेवण्यात यावा. कार्यालयातील दस्तऐवज सहागठ्ठे पद्धतीनूसार ठेवण्यात यावे. अनावश्यक साहित्य निर्लेखित करण्यात यावे. अधिकाऱ्यांनी जिल्ह्याच्या विविध भागांना भेटी देण्यासाठी दोन दिवस क्षेत्रीय भेटीसाठी राखून ठेवावा. भेटीमध्ये शासनाच्या महत्त्वकांक्षी व पथदर्शी योजनांचा आढावा घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. सर्व विभागांनी त्यांच्या संकेतस्थळावरील माहिती अद्ययावत करावी. जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळ अधिक माहितीपूर्ण आणि नागरिकांसाठी उपयुक्त करण्यावर भर द्यावा. जिल्ह्याच्या विकासामध्ये विभागाचे योगदान असलेल्या ब्लॉगची निर्मिती करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी सालीमठ यांनी यावेळी दिल्या. जनतेला पारदर्शक, गतीमान आणि दिलेल्या कालमर्यादेत माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन अधिक प्रभावीपणे ऑनलाईन सेवा देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम तयार करण्यात आला आहे. या अधिनियमांतर्गतची कामे प्राधान्याने करत नागरिकांना विहित मुदतीमध्ये सेवा देण्यात याव्यात. डॅशबोर्डवर एकही प्रकरण प्रलंबित राहणार नाही, याची काळजी घेण्यात यावी. जिल्ह्यात विविध विभागामार्फत अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येतात. या उपक्रमांची माहिती अभिनव पहल या पोर्टलवर अपलोड करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या. बैठकीस दूरदृष्यप्रणालीद्वारे सर्व उप विभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्यासह संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Siddharam Salimath : ‘मिशन 100 दिवस’ अंतर्गत नागरिकांना किमान 5 लाख सेवा देण्याचे उद्दिष्ट ठेवा- जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ Read More »

Walmik Karad : वाल्मिक कराडला मिळणार दिलासा? आज जामीन अर्जावर होणार सुनावणी

Walmik Karad : खंडणी प्रकरणात तुरुंगात असणाऱ्या वाल्मिक कराडसाठी आजचा दिवस महत्वाचा असणार आहे. आज न्यायालयात त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे खंडणी प्रकरणात त्याला जामीन मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. वाल्मिक कराडने अवादा कंपनीच्या पवनचक्की प्रकल्पासाठी दोन कोटी रुपयांची खंडणी विष्णू चाटे च्या माध्यमातून मागितली असल्यास आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. कंपनी या प्रकरणाची तक्रार 11 डिसेंबर रोजी दिली होती. तर दुसरीकडे आज वाल्मिक कराडची एसआयटी कोठडी संपणार असल्याने बीड सत्र न्यायालयात या प्रकरणात महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. काल 21 जानेवारी रोजी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला असून हा व्हिडिओ 29 नोव्हेंबरचा असल्याचा सांगण्यात येत आहे. याच दिवशी वाल्मिक कराडने खंडणी मागितली होती आणि त्याच दिवशी वाल्मिक कराड विष्णू चाठेला भेटायला त्याच्या कार्यालयामध्ये गेला होता तेव्हाचा सीसीटीव्ही फुटेझ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये वाल्मिक कराडसह इतर आरोपी देखील दिसत आहे.त्यामुळे आज वाल्मिक कराडला जामीन मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Walmik Karad : वाल्मिक कराडला मिळणार दिलासा? आज जामीन अर्जावर होणार सुनावणी Read More »

Guillain-Barré Syndrome : सावधान…, पुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोमचे 24 संशयित रुग्ण, जाणून घ्या लक्षणे

Guillain-Barré Syndrome : गुइलेन-बॅरे सिंड्रोमचे पुण्यात 24 संशयित रुग्ण आढल्याने एकच खळबळ उडाली असून राज्य सरकारने या आजाराच्या प्रकरणांमध्ये अचानक वाढ का झाली? याचा तपास करण्यासाठी एक पथक स्थापन केले आहे. पुणे महानगरपालिका आरोग्य विभागाने रुग्णांचे नमुने चाचणीसाठी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीकडे पाठवले आहेत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. यातील बहुतेक प्रकरणे शहरातील सिंहगड रोड भागातून नोंदवली गेली आहेत, असे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ही लक्षणे आहेतडॉक्टरांच्या मते, गुइलेन-बॅरे सिंड्रोम हा एक दुर्मिळ विकार आहे ज्यामुळे अचानक सुन्नपणा आणि स्नायू कमकुवत होतात. यासोबतच, या आजारात हात आणि पायांमध्ये तीव्र कमजोरी अशी लक्षणे देखील आहेत. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या प्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी सांगितले की, शहरातील सहा रुग्णालयांमध्ये जीबीएसचे 24 संशयित रुग्ण आढळले आहेत. पुणे शहर आणि आसपासच्या भागात जीबीएसच्या प्रकरणांमध्ये अचानक वाढ झाल्याची चौकशी करण्यासाठी राज्य आरोग्य विभागाने जलद प्रतिसाद पथक (आरआरटी) स्थापन केले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. डॉ. बोराडे यांनी स्पष्ट केले की बॅक्टेरिया आणि विषाणूजन्य संसर्गामुळे सामान्यतः जीबीएस होतो कारण ते रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करतात. ते म्हणाले, हे मुले आणि तरुण वयोगटातील दोघांनाही होऊ शकते. तथापि, जीबीएसमुळे महामारी किंवा जागतिक महामारी होणार नाही. उपचाराने, बहुतेक लोक या स्थितीतून पूर्णपणे बरे होतात. बहुतेक संशयित रुग्ण 12 ते 30 वयोगटातील आहेत. तथापि, 59 वर्षीय रुग्णाचे प्रकरणही समोर आले आहे. अशी त्यांनी माहिती दिली.

Guillain-Barré Syndrome : सावधान…, पुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोमचे 24 संशयित रुग्ण, जाणून घ्या लक्षणे Read More »

Narhari Zirwal : अन्न पदार्थांच्या गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य -अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

Narhari Zirwal : समाजातील प्रत्येक नागरिकाला स्वच्छ, उत्तम दर्जाचे व निर्भेळ अन्न उपलब्ध व्हावे यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून अन्न पदार्थांच्या गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात असल्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितले. नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे शिवांजली कॉलेज ऑफ नर्सिंग महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उदघाटन झिरवाळ यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, माजी आमदार पांडुरंग अभंग, बाळासाहेब मूरकुटे, रंगनाथ पवार, डॉ.बाळासाहेब पवार आदी उपस्थित होते. मंत्री झिरवाळ म्हणाले, नागरिकांना स्वच्छ, निर्भेळ अन्न प्राप्त होणे हा त्यांचा अधिकार आहे. दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ केल्याच्या अनेक घटना घडतात. अशा घटना होऊ नयेत यासाठी कठोर उपाययोजना करत अन्न व औषध विभागाच्या माध्यमातून सामान्यांना निर्भेळ अन्न पदार्थ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, पाटील परिवाराने शिक्षण संस्थेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचीद्वारे खुली करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. शिक्षणदानाच्या त्यांच्या या पुण्याच्या कार्यात त्यांना भविष्यकाळात आवश्यक असलेली सर्वोतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाहीही झिरवाळ यांनी दिली. यावेळी मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमास पदाधिकारी, विविध वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य, विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होते.

Narhari Zirwal : अन्न पदार्थांच्या गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य -अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ Read More »

Walmik Karad : वाल्मिक कराड येणार अडचणीत, ‘त्या’ प्रकरणात दाखल होणार मुलावर गुन्हा?

Walmik Karad : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात चर्चेचा विजय ठरलेल्या वाल्मिक कराडला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. माहितीनुसार आज वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडवर गुन्हा दाखल करण्यात येऊ शकते. सोलापूर न्यायालयात सुशील कराडविरुद्ध मॅनेजरच्या घरात घुसून मॅनेजर आणि मुलीला मारहाण करण्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात न्यायालयात सुनावणी झाली असून जिल्हा-सत्र न्यायालयाने आदेश राखून ठेवला आहे. त्यामुळे आज या प्रकरणात न्यायालय निकाल देऊ शकते अशी चर्चा सध्या सुरू आहे. या प्रकरणात पोलिसांनी फिर्याद दाखल करावी का? याबाबत न्यायालय आदेश देणार आहे. या आदेशाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. या प्रकरणात जर न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले तर आधीच अडचणीत असणाऱ्या वाल्मिक कराडच्या आणखी अडचणी वाढू शकतात. तर दुसरीकडे राज्यात अनेक ठिकाणी वाल्मिक कराडची संपत्ती सापडल्याने त्याच्यावर ईडी कारवाई करणार का? याबाबत देखील आता राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

Walmik Karad : वाल्मिक कराड येणार अडचणीत, ‘त्या’ प्रकरणात दाखल होणार मुलावर गुन्हा? Read More »

Champions Trophy साठी पाकिस्तानात जाणार नाही Rohit Sharma ? बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

Rohit Sharma: 19 फेब्रुवारीपासून सुरू होत असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उद्घाटन समारंभाला भारतीय कर्णधार रोहित शर्मा जाणार नसल्याची बातमी समोर येत आहे. रोहीत शर्माला पाकिस्तानमध्ये पाठवण्यास बीसीसीआय तयार नसल्याचं सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे बीसीसीआयच्या या निर्णयामुळे पीसीबी देखील नाराज असल्याचं सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे यापूर्वी ही संपूर्ण स्पर्धा पाकिस्तानमध्ये होणार होती, परंतु बीसीसीआयने नकार दिल्यानंतर ती हायब्रिड मॉडेलवर आयोजित केली जात आहे. रोहित शर्मा पाकिस्तानमध्ये कर्णधारांच्या पारंपारिक फोटोशूट आणि कार्यक्रमापूर्वीच्या पत्रकार परिषदेत सहभागी होण्याची अपेक्षा होती. भारत चॅम्पियन्स ट्रॉफीचे सर्व सामने दुबईमध्ये खेळेल, ज्यामध्ये 23 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानविरुद्ध सामना खेळणार आहे. बीसीसीआयने रोहितला पाकिस्तानला पाठवण्याच्या वृत्ताला दुजोरा किंवा नकार दिलेला नाही. पण भारतीय संघ जर्सीवर पाकिस्तानचे नाव न छापण्याचा विचार करत असल्याबद्दल पीसीबीच्या अधिकाऱ्याने नाराजी व्यक्त केली आहे. पीसीबीच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर आयएएनएसला सांगितले की, ‘बीसीसीआय क्रिकेटमध्ये राजकारण आणत आहे, जे खेळासाठी अजिबात चांगले नाही. आधी त्याने पाकिस्तान दौऱ्याला नकार दिला, नंतर आता तो कर्णधाराला उद्घाटन समारंभाला पाठवत नाही. आणि आता बातम्या येत आहेत की त्यांना जर्सीवर यजमान देशाचे (पाकिस्तान) नाव नको आहे. आम्हाला आशा आहे की आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) हे होऊ देणार नाही आणि पाकिस्तानला पाठिंबा देईल. या स्पर्धेसाठी भारताने 15 सदस्यीय संघाची घोषणा केली. रोहित शर्माला कर्णधार आणि शुभमन गिलला उपकर्णधार बनवण्यात आले आहे, तर मोहम्मद शमी, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव आणि यशस्वी जयस्वाल यांचाही संघात समावेश आहे. भारत आपला पहिला सामना 20 फेब्रुवारी रोजी दुबईमध्ये बांगलादेशविरुद्ध खेळेल आणि 23 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरेल. भारताचा गटातील शेवटचा सामना 2 मार्च रोजी न्यूझीलंडविरुद्ध असेल.

Champions Trophy साठी पाकिस्तानात जाणार नाही Rohit Sharma ? बीसीसीआय घेणार मोठा निर्णय Read More »

Mahayuti Government: पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये वाद? ‘या’ जिल्ह्यांबबत सरकारने घेतला मोठा निर्णय

Mahayuti Government: शनिवारी रात्री महायुती सरकारकडून पालकमंत्री पदाची यादी जाहीर करण्यात आली होती. मात्र आता महायुतीमध्ये पालकमंत्री पदावरून मोठा वाद निर्माण झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, पालकमंत्री पदाची यादी जाहीर होताच शिवसेना पक्षाचे मंत्री भरत गोगावले आणि ज्येष्ठ नेते मंत्री दादा भुसे नाराज झाले आहे. त्यामुळे आता सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. शिवसेना पक्षाचे मंत्री भरत गोगावले आणि ज्येष्ठ नेते मंत्री दादा भुसे नाराज असल्याने राज्य सरकारकडून परिपत्रक काढून रायगड जिल्हा आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री पदाची नियुक्ती पुढील आदेशापर्यंत स्थगित केली आहे. शनिवारी जाहीर करण्यात आलेल्या यादीत नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन तर रायगड जिल्ह्याची जबाबदारी मंत्री अदिती तटकरे यांना देण्यात आली होती मात्र आता दोन्ही जिल्ह्याची नियुक्ती पुढील आदेशापर्यंत सरकारने स्थगित केली आहे. त्यामुळे महायुतीमध्ये पालकमंत्री पदावरून मोठा वाद निर्माण झाला असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. शनिवारी जाहीर करण्यात आलेल्या यादीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गडचिरोली जिल्ह्याची तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बीड आणि पुणे जिल्ह्याची तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे जिल्ह्याची आणि जालना जिल्ह्याची जबाबदारी मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

Mahayuti Government: पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये वाद? ‘या’ जिल्ह्यांबबत सरकारने घेतला मोठा निर्णय Read More »

Suresh Dhas : करुणा शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल कोणी ठेवली? पहिल्यांदाच सुरेश धसांनी थेट नावचं घेतलं, म्हणाले…..

Suresh Dhas: काही दिवसांपूर्वी भाजप आमदार सुरेश धस यांनी एका पोलीस अधिकाऱ्याने करुणा शर्मा यांच्या गाडीत साडी नेसून पिस्तुल ठेवल्याचा दावा केला होता. पण त्यावेळी त्यांनी अधिकाऱ्याचं नाव घेतलं नव्हतं. पण आता त्यांनी थेट अधिकाऱ्याचं नाव सांगितलं आहे. “बीडमध्ये हक्काची दहशत मोडून काढतील चुकीच्या व्यक्तीला मदत करणारे व्यक्ती म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार नाही. ते कधीही चुकीच्या व्यक्तीला पाठीशी घालणार नाही. एलसीबीच्या 107 च्या टेबलवर प्रति आरोपी पाच हजार ते वीस हजार असा रेट सुरू असून करुणा शर्मांच्या गाडीमध्ये पिस्तूल ठेवण्याचे बक्षीस म्हणजे सचिन सानप यांची एलसीबीला झालेली बदली. कोल्हापूरवरून गणेश हंगे बदलून आणला तो 107 चा टेबल आहे, सचिन आंधळे याला ही बदलून आले,” असे सुरेश धस म्हणाले. दरम्यान, सुरेश धस यांच्या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे. यावर आता काय प्रतिक्रिया येतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तर दुसरीकडे भाजप आमदार सुरेश धस यांनी सरपंच संतोष देशमुख प्रकरणामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील सातत्याने करत आहे.

Suresh Dhas : करुणा शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल कोणी ठेवली? पहिल्यांदाच सुरेश धसांनी थेट नावचं घेतलं, म्हणाले….. Read More »

imtiyaz Jaleel : धनंजय मुंडेंचे नाव न घेता इम्तियाज जलील यांची सरकारवर टीकाimtiyaz Jaleelimtiyaz Jaleel : धनंजय मुंडेंचे नाव न घेता इम्तियाज जलील यांची सरकारवर टीका

imtiyaz Jaleel : मागील काही दिवसांपासून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्यात एकच खळबळ उडाली आहे. यावरून अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. अशातच आता एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी मोठी मागणी केली आहे. “ज्यांचा मृत्यू झाला ते तर आता परत येणार नाहीत. पण जर आपल्याला त्यांना न्याय द्यायचा असेल तर ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावी. आम्ही त्यांच्या कुटुंबासोबत असून जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत राहू,” असे आश्वासन त्यांनी दिले आहे. पुढे ते म्हणाले की, “सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्रातील सर्वात जास्त गुन्हेगारी बीडमध्ये होत आहे. कशाप्रकारे तिथे गँग ऑपरेट होते. त्याशिवाय वाळू माफी असेल किंवा दुसरे काही असेल. अशावेळी प्रश्न हा उपस्थित होतो की महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना हा प्रश्न का पडत नाही? त्यामुळे जी गुन्हेगारी सुरू आहे, त्याला कुठेतरी राज्य सरकारचं संरक्षण आहे असे दिसत आहे,” असा गंभीर आरोप देखील इम्तियाज जलील (imtiyaz Jaleel) यांनी केला आहे. इम्तियाज जलील यांची मुख्य मागणी: राजकीय प्रतिक्रिया: ह्या प्रकरणामुळे शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि भाजप युती सरकारवर दबाव वाढला आहे. विरोधी पक्षांचा आरोप आहे की, सत्ताधाऱ्यांच्या संरक्षणामुळेच अशी गुन्हेगारी घडत आहे. यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही यावर स्पष्ट भूमिका घ्यावी लागेल. पुढील संभाव्यता: या प्रकरणाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठा प्रभाव पडणार आहे, विशेषत: गुन्हे, प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या जबाबदारीवर चर्चा होत आहे.

imtiyaz Jaleel : धनंजय मुंडेंचे नाव न घेता इम्तियाज जलील यांची सरकारवर टीकाimtiyaz Jaleelimtiyaz Jaleel : धनंजय मुंडेंचे नाव न घेता इम्तियाज जलील यांची सरकारवर टीका Read More »