DNA मराठी

ताज्या बातम्या

दुकानात घुसून व्यापाऱ्यावर कोयत्याने वार, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Jalna Crime : जालन्यात दुकानात घुसून एका व्यापाऱ्यावर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. माहितीनुसार, जालना शहरातील कडबी मंडी भागात हरकाराम चेलाराम चौधरी यांची खुशी इमिटेशन नावाची ज्वेलरीची दुकान आहे. या दुकानात अज्ञात दोन तरुणांनी प्रवेश केला. यातील एका तरुणाकडे एक धारदार कोयता ही होता. यावेळी अज्ञात तरुणांनी पैसे मागत व्यापाऱ्याला कोयता मारून जखमी केलंय. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, या प्रकरणी अज्ञात दोन तरुणांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत हरकाराम चौधरी यांच्या पोटाला चाकू लागल्याने ते जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या प्रकरणी दोन संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

दुकानात घुसून व्यापाऱ्यावर कोयत्याने वार, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद Read More »

भाजपचेच सगळे वाचाळवीर शिवरायांचा अवमान करण्यात पुढे, गुन्हा दाखल करा, संभाजी ब्रिगेडची मागणी

Pradeep Purohit : उठ सूट कुणीही महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर छत्रपती शिवरायांचा अवमान आणि बदनामी करत आहे. भाजपचेच सगळे वाचाळवीर शिवरायांचा अवमान करण्यात पुढे आहे. अशी टीका संतोष शिंदे, प्रवक्ता संभाजी ब्रिगेड यांनी केली आहे. तसेच भाजप खासदार प्रदीप पुरोहित यांच्यावर महाराष्ट्र सरकारने गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील माध्यमांशी बोलताना संतोष शिंदे यांनी केली. पुढे बोलताना ते म्हणाले की, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे मागच्या जन्मी शिवाजी महाराज होते अशा पद्धतीचं संसदेच्या सभागृहात वक्तव्य करणे हे अत्यंत निषेधार्य आहे. संभाजी ब्रिगेडच्या वतीने या वक्तव्याचा निषेध करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना फक्त स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांसोबतच होऊ शकते. असं संतोष शिंदे म्हणाले. तर भाजपच्या खासदाराचं दुर्दैवी आणि आक्षेपार्ह वक्तव्य हे प्रशांत कोरटकर सारख्या शिवद्रोहींना पाठबळ देणार आहे. असेही यावेळी ते म्हणाले. तर औरंग्याच्या कबरीवर आग पकड करणारे सत्ताधारी मंत्री राणे आणि त्यांच्या लोकांनी पुरोहित प्रकरणावर तोंड उघडावे असा आव्हान देखील त्यांनी यावेळी नितेश राणे यांना दिला. सरकार जाणीवपूर्वक अजूनही प्रशांत कोरटकरला पकडत नाही. कारण तो भाजपचा माणूस आहे. या सगळ्यांचा ठरवून प्लान केला जात आहे. यापुढे तमाम शिवप्रेमींना मनुवादी यांचा हा कुटील डाव उध्वस्त करावा लागेल. मुख्यमंत्र्यांनी शिवद्रोह्यांना तात्काळ पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली. काय म्हणाले होते प्रदीप पुरोहित?देशाला एक शक्तिशाली राष्ट्र बनवण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे. माझ्या बारगढ मतदारसंघात गिरीजा बाबा नावाचे एक संत राहतात. त्यांनी मला एक दिवस बोलताना सांगितलं की देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पूर्वजन्म हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा होता. त्यांचा दुसरा जन्म मोदी आहे. त्यामुळे या देशाला जगात सर्वात शक्तिशाली राष्ट्र करण्याच्या हेतूने ते काम करत आहेत.

भाजपचेच सगळे वाचाळवीर शिवरायांचा अवमान करण्यात पुढे, गुन्हा दाखल करा, संभाजी ब्रिगेडची मागणी Read More »

भुसावळ येथील औष्णिक विद्युत केंद्रातील राखेच्या विक्रीत गैरव्यवहार, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप

Vijay Wadettiwar : भुसावळ येथील औष्णिक विद्युत केंद्रातील राखेच्या विक्रीत गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात केला आहे. यावेळी त्यांनी भुसावळ येथील औष्णिक विद्युत केंद्रात राखेची किंमत 600-660 रुपये असताना फक्त 353 रुपये टन राख विकण्यात आली असा दावा त्यांनी केला आहे. विधान सभेत प्रश्नोत्तराच्या काळात राखेच्या विक्रीत घोटाळा झाल्याचे प्रकरण वडेट्टीवार यांनी मांडले. भुसावळ येथील राख विक्रीसाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात येत असताना अर्धी राख मोजमाप न होता विकली गेली. इथे ठरवून भ्रष्टाचार करण्यात आला. यातूनच वाल्मीक कराड सारखे लोक तयार होतात आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो अस विधिमंडळ नेते वडेट्टीवार म्हणाले. त्यामुळे या प्रकरणी सबंधित अधिकाऱ्यांना निलंबित केले पाहिजे. राख विक्रीत जो भ्रष्टाचार झाला त्याची जबाबदारी निश्चित केली पाहिजे अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राख विक्रीत भ्रष्टाचार झाल्याचे मान्य केले. या प्रकरणी चौकशी करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. राख विक्री प्रकरणी जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करू असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

भुसावळ येथील औष्णिक विद्युत केंद्रातील राखेच्या विक्रीत गैरव्यवहार, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप Read More »

अल्पवयीन मुलीवर विनयभंग करणारा आरोपी कोतवाली पोलीसांच्या ताब्यात

Ahilyanagar News : सुपा पोलीस स्टेशन हद्दीत अल्पवयीन मुलीवर विनयभंग करणारा आरोपीला कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. 18 मार्च रोजी सुपा पोलीस स्टेशन, अहिल्यानगर येथे भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 74, बालकांचे लैगिक संरक्षण अधिनियम सन 2012 चे कलम 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच या प्रकरणाचा तपास सूपा पोलीस ठाण्यात सुरू होता पोलीस अधीक्षक अहिल्यानगर या प्रकरणातील आरोपीबाबुराव हरीभाऊ शिंदे याला अटक करण्याचे आदेश दिल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी अहिल्यानगर शहर विभागातील प्रभारी अधिकारी यांना अलर्ट करुन अहिल्यानगर शहरात आरोपीचा शोध घेणेबाबत सुचना केल्या. याप्रमाणे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे व गुन्हे शोध पथकांचे अंमलदार यांनी नमुद आरोपीचा पोलीस स्टेशनल हद्दीत शोध घेत असताना तो अमरधाम रोड, अहिल्यानगर परिसरात आला असल्याची माहीती पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली. त्यांनी गुन्हे शोध पथकांचे अंमलदार यांना सदर परिसरात आरोपीचे शोधकामी पाठविले असता नमुद आरोपी हा गाडगीळ पटांगण, अमरधाम रोड, अहिल्यानगर या ठिकाणी मिळुन आला. पुढील कारवाईसाठी आरोपीस कोतवाली पोलीस स्टेशन येथुन सुपा पोलीस स्टेशनचे अंमलदार यांचे ताब्यात पुढील कार्यवाहीकरिता देण्यात आले आहे. नमुद गुन्ह्याचा पुढील तपास सुपा पोलीस करीत आहेत.

अल्पवयीन मुलीवर विनयभंग करणारा आरोपी कोतवाली पोलीसांच्या ताब्यात Read More »

MPSC च्या तीन रिक्त पदांवरील सदस्यांची नियुक्ती तातडीने करा, अजित पवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Ajit Pawar: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) माध्यमातून राज्यसेवेत अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या युवकांना न्याय देण्यासाठी ‘एमपीएससी’च्या तीन रिक्त सदस्यपदांवरील नियुक्ती तातडीने करण्यात यावी, अशी विनंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे. दरम्यान ही नियुक्ती तातडीने झाल्यास परीक्षा, मुलाखती, निकालाची प्रक्रिया गतिमान होऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल, असेही अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे. ‘एमपीएससी’द्वारे उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, पोलिस निरीक्षक, प्राध्यापक अशा राज्यसेवेतील महत्वाच्या पदांवरील नियुक्त्या करण्यात येतात. त्यासाठी ‘एमपीएससी’मध्ये एक अध्यक्ष आणि पाच सदस्यांची पदे मंजूर आहेत. मंजूर पाच पदांपैकी अध्यक्ष आणि दोन सदस्यांची पदे भरलेली आहेत, तर सदस्यांची तीन पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे आयोगाच्या कामकाजावर विपरीत परिणाम होत असून परीक्षांना विलंब होत आहे. मुलाखती, निकालाची प्रक्रिया रखडत आहे. त्यामुळे ही पदे तातडीने भरावीत अशी मागणी विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि विविध संघटनांकडून निवेदनांद्वारे केली जात आहे. या मागण्यांची दखल घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले असून ‘एमपीएससी’तील तीन सदस्यांची रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी विनंती केली आहे.

MPSC च्या तीन रिक्त पदांवरील सदस्यांची नियुक्ती तातडीने करा, अजित पवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र Read More »

नागपूरची घटना गृहविभागाचे अपयश, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल

Harshwardhan Sapkal: नागपूर शहरात घडलेला दगडफेकीची घटना अनावश्यक व अत्यंत दुर्देवी आहे. नागपूरकरांनी शांतता राखावी अफवांवर विश्वास ठेवू नये अशी विनंती मी सर्व नागपूरवासियांना करतो. नागपूर शहरात सर्व धर्मीय लोक अत्यंत गुण्यागोविंदाने व आनंदाने रहात आहेत. नागपूर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे शहर आहे. या शहरात एवढ्या प्रमाणात तणाव निर्माण होतो दगडफेक, जाळपोळ होते हे गृहविभागाचे अपयश आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्री जाणिवपूर्वक प्रप्रक्षोभक वक्तव्ये करून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या प्रयत्नांना नागपूरमध्ये यश आले आहे असे दिसते. राज्यासमोर अनेक ज्वलंत प्रश्न आहे. महागाई, बेरोजगारी, शेतीमालाला भाव नाही सरकारने दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण केले नाही लाडक्या बहिणींना वाढीव रक्कम मिळाली नाही, मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या सुरु आहेत. यावरून दुसरीकडे लक्ष वळविण्यासाठी सत्ताधारी सातत्याने प्रक्षोभक वक्तव्ये करत होते त्याचा हा परिपाक आहे. नागपूर सामाजिक सलोखा जपणारे शहर आहे. देशाच्या इतर भागात दंगली होत असताना नागपूरात कधीही दंगल झाली नव्हती रामनवमीला हिंदू मुस्लीम एकत्रीतपणे रथ ओढतात ताजुद्दीन बाबाच्या दर्ग्यात मुस्लिमांपेक्षा जास्त हिंदू दर्शनाला जातात राजकीय फायद्यासाठी नागपूर पेटवण्याचा डाव आपण ओळखावा आणि शांतता राखावी असे मी आपणा सर्वांना आवाहन करतो.

नागपूरची घटना गृहविभागाचे अपयश, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल Read More »

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील वकील वाजीद खान बिडकर यांचे जुनिअर साहिल डोंगरेंवर जीवघेणा हल्ला?

Pune News: स्वारगेट बस स्थानकावर 26 वर्षीय तरुणीवर घडलेल्या अत्याचार घटनेत आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेचे वकील वाजीद खान बिडकर यांचे जुनिअर साहिल डोंगरे याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला असल्याचा आरोप वाजीद खान बिडकर यांनी केला आहे. आज्ञात लोकांनी त्यांना गाडीत उचलून नेले आणि मारहाण करून दिवेघाटात सोडून दिले असा आरोप वाजीद खान बिडकर यांच्याकडून करण्यात आला. तर दुसरीकडे पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, साहिल बबन डोंगरे वय- 25, धंदा- वकिली व समाजकार्य (वंचित बहुजन आघाडी पदाधिकारी) यांना पहाटेच्या सुमारास काही इसमानी गाडीतळ परिसरातून जबरदस्तीने गाडीत बसवून मारहाण करून दिवे घाट येथे सोडून दिले. त्यांना डोळ्याजवळ, पायाला व शरीरावर किरकोळ जखमा दिसत असून त्यांना नेमके कुठून व कधी गाडीत बसवून नेले याबाबत व्यवस्थित माहिती सांगता येत नाही अधिक माहिती घेतली असता ते रात्री दारू पिऊन होते व मोटर सायकलवर स्लीप होऊन पडले असल्याची शक्यता वाटते. हडपसर पोलीस स्टेशन येथे ते हजर होताच , त्यांना उपचारासाठी पोलीस अंमलदार देऊन ससून रुग्णालय येथे पाठविले आहे.

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील वकील वाजीद खान बिडकर यांचे जुनिअर साहिल डोंगरेंवर जीवघेणा हल्ला? Read More »

हजारो प्रकल्पग्रस्तांना विमानतळ सेवा क्षेत्रात नोकरीची सुवर्ण संधी

Mangal Prabhaat Lodha : कौशल्य विभागाच्या प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमाने राज्यातील लाखो तरुण स्वतःच्या पायावर उभे राहिले आहेत. आता सिडको व कौशल्य विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबई विमानतळाकरिता कुशल मनुष्यबळासाठी कौशल्य विभाग प्रशिक्षण देणार असून प्रकल्पग्रस्तांनारोजगाराचे नवे द्वार उघडले आहे. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या मार्गर्शनात प्रकल्पग्रस्तांसाठी विमानतळाशी सबंधित लवकरच प्रशिक्षण कार्यक्रम सुरु होणार आहे. सिडको निर्माण करत असलेल्या नवी मुंबई विमानतळासाठी या परिसरात काही गावांची जमीन संपादित करण्यात आली आहे. या प्रकल्पग्रतांच्या पुनर्वसनाच्या अनुषंगाने तिथल्या इच्छुक प्रकल्पग्रस्तांसाठी विमानतळाशी संबंधित व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासंदर्भात प्रस्ताव सिडकोने कौशल्य, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाला सादर केला होता. या प्रस्तावाला कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी तातडीने मान्यता देऊन कार्यवाहीला सुरुवात केली. त्यानुसार इच्छुक प्रकल्पग्रस्तांना विमानतळाशी संबंधित व्यावसायिक प्रशिक्षण लवकरच सुरू होणार असल्याची माहिती कौशल्य विकास विभागाने दिली. प्रकल्पग्रस्तांना देण्यात येणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमात अनुक्रमे एअरलाईन बॅगेज हॅण्डलर, एअरपोर्ट टर्मिनल ऑपरेशन्स, एअरपोर्ट कार्गो ऑपरेशन्स, कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह आणि एअरलाईन ग्राउंड स्टाफ अर्थात विमानतळ सेवा क्षेत्राशी संबंधित अशा पाच व्यावसायिक अभ्यासक्रमांचा यात समावेश आहे. पहिल्या टप्प्यात 1191 प्रकल्पग्रस्तांनी यात नोंदणी केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या ( https:www.mahaswayam.gov.in) महास्वयम संकेतस्थळावर आवश्यक बाबींची पूर्तता झाल्यावर केंद्राच्या कौशल्य विकास निकषानुसार प्रत्यक्ष प्रशिक्षणाला सुरुवात होणार आहे. व्यावसायिक, औद्योगिक प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास विभागाने राज्यातल्या लाखो तरुणांना रोजगाराच्या हजारो संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. ‘सामाजिक दायित्व’ हा या विभागाच्या कार्याचा महत्वाचा घटक असून या अनुषंगाने नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांना स्वतः च्या पायावर उभे राहण्याची मोठी संधी उपलब्ध करून देत असल्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी म्हटले आहे. जागतिक नकाशावर नवी मुंबई हे शहर लवकरच आपला ठसा उमटवणार असून यात कौशल्य विकास विभागाचे ही मोठे योगदान असेल याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने कौशल्य, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग सामाजिक बांधिलकीतून कार्यरत असून यापुढेही सिडकोच्या संयुक्त विद्यमाने प्रकल्पग्रस्तांना मदतीचा हात दिला जाईल, असेही लोढा यांनी स्पष्ट केले आहे.

हजारो प्रकल्पग्रस्तांना विमानतळ सेवा क्षेत्रात नोकरीची सुवर्ण संधी Read More »

माझ्या वक्तव्यावर मी ठाम, औरंगजेब- फडणवीस प्रकरणात हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले

Harshvardhan Sapkal : माझ्या वक्तव्यावर मी ठाम असून कोणतीही वयक्तिक टिका केली नाही. असं स्पष्टीकरण काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज देवेंद्र फडणवीस प्रकरणात दिले. ते आज पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस यांना कोणताही अपशब्द वापरला नाही. मी औरंगजेबचा कारभार आणि सरकारचा कारभार असा काल म्हणालो होतो. माझं वक्तव्य सरकारच्या अनुषंगाने आलेले वक्तव्य आहे. फडणवीस यांना त्यांच्याच पक्षातील लोक औरंगजेब ठरवू पाहत आहेत. माजी तुलना राज्य कारभाराशी असून मी माझ्या वक्तव्यावर ठाम असून कोणतीही वयक्तिक टिका केली नाही. असं या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना काँग्रेस प्रदेशाध्यक हर्षवर्धन सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीस यांचे राज्य कारभार देखील औरंगजेबप्रममाणे क्रूर असल्याचं म्हटले होते. त्यानंतर भाजप नेत्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर चारही बाजूने टीकेला सुरुवात केली होती.

माझ्या वक्तव्यावर मी ठाम, औरंगजेब- फडणवीस प्रकरणात हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले Read More »

आणखी एक मंत्री वादाच्या भोवऱ्यात, जयकुमार रावल यांच्यावर 2 कोटी 65 लाख रुपयांची फसवणूक करण्याचा आरोप

Jayakumar Rawal : गेल्या काही दिवसांपासून महायुतीमधील काही मंत्र्यांवर गंभीर आरोप करण्यात येत आहे. विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील करण्यात येत आहे. तर आता मंत्री जयकुमार रावल यांनी शासनाची फसवणूक करून दोन कोटी 65 लाख रुपये लाटले असल्याचा आरोप शिवसेना नेते (ठाकरे गट) अनिल गोटे यांनी केला आहे. शिंदखेडा तालुक्यातील शेवाळे धरणामध्ये पाण्याच्या बुडाताखाली आपली जमीन जात असल्याचे भासवून खोटे अर्ज करून महाराष्ट्र शासनाकडून मंत्री जयकुमार रावल यांनी तब्बल 2 कोटी 65 लाख रुपये हडप केले असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे. जयकुमार रावल आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आपल्या मालकीच्या शेत जमीन ही शेवाळे धरणात जाणार असल्याचे सांगून शासनाची फसवणूक केली आहे. मात्र असे धादांत खोटे अर्ज दाखल करून आपल्या आमदारकीचा गैरफायदा जयकुमार रावल यांनी घेतला आहे. तसेच सातत्याने सरकारी अधिकाऱ्यांवर खोटे आरोप करून तीन वेळा सदर जमिनीचा जॉइंट सर्वे करण्यासाठी तत्कालीन सरकारला आणि शासकीय कर्मचाऱ्यांना वेटीस धरून सदर कृत्य मंत्री जयकुमार रावल यांनी केल्याचे म्हणत माजी आमदार अनिल गोटे यांनी दोंडाईचा पोलीस ठाण्यामध्ये जयकुमार रावल आणि त्यांच्या परिवारावर तक्रार देखील दिली असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषद मध्ये दिली. मंत्री जयकुमार रावल तसेच धुळे महानगरपालिका भ्रष्टाचार विरोधात अनिल गोटे हे सातत्याने आवाज उठवत आहे व वेगवेगळ्या प्रकारची माहिती मागत असल्याने भाजपच्या वरिष्ठ पातळीवर अनिल गोटे यांच्या संदर्भात गांभीर्याने चर्चा झाली असून मराठवाड्यातील बीड पॅटर्न प्रमाणे धुळ्यातील राजकीय विरोधक असलेले अनिल गोटे यांचा संतोष देशमुख सारखाच बंदोबस्त केला पाहिजे अशी चर्चा झाली असल्याचे आपल्याला पोलीस खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने खात्रीशीर माहिती दिली असल्याचे अनिल गोटे यांनी यावेळी सांगितले.

आणखी एक मंत्री वादाच्या भोवऱ्यात, जयकुमार रावल यांच्यावर 2 कोटी 65 लाख रुपयांची फसवणूक करण्याचा आरोप Read More »