Walmik Karad : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात चर्चेचा विजय ठरलेल्या वाल्मिक कराडला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. माहितीनुसार आज वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडवर गुन्हा दाखल करण्यात येऊ शकते.
सोलापूर न्यायालयात सुशील कराडविरुद्ध मॅनेजरच्या घरात घुसून मॅनेजर आणि मुलीला मारहाण करण्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात न्यायालयात सुनावणी झाली असून जिल्हा-सत्र न्यायालयाने आदेश राखून ठेवला आहे. त्यामुळे आज या प्रकरणात न्यायालय निकाल देऊ शकते अशी चर्चा सध्या सुरू आहे.
या प्रकरणात पोलिसांनी फिर्याद दाखल करावी का? याबाबत न्यायालय आदेश देणार आहे. या आदेशाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. या प्रकरणात जर न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले तर आधीच अडचणीत असणाऱ्या वाल्मिक कराडच्या आणखी अडचणी वाढू शकतात.
तर दुसरीकडे राज्यात अनेक ठिकाणी वाल्मिक कराडची संपत्ती सापडल्याने त्याच्यावर ईडी कारवाई करणार का? याबाबत देखील आता राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे.