DNA मराठी

हायलाईट

allu arjun

Allu Arjun : अल्लू अर्जुन कायद्याचा आदर राखत न्यायालयीन सुनावणीत घेतला सहभाग

Allu Arjun : अल्लू अर्जुन यांनी खऱ्या अर्थाने पॅन-इंडिया सुपरस्टारची व्याख्या नव्या उंचीवर नेली आहे. पुष्पा चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर जगभरात त्यांना आयकॉन स्टार म्हणून ओळख मिळाली असली, तरी त्यांची प्रचंड लोकप्रियता आणि अतुलनीय स्टारडम अनेक वर्षांपासून कायम आहे. देशातील सर्वात मोठ्या सुपरस्टार्सपैकी एक असण्यासोबतच ते एक आदर्श आणि कायद्याचे पालन करणारे नागरिकही आहेत. याचे उदाहरण नुकतेच पाहायला मिळाले, जेव्हा न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करत त्यांनी कोणताही विलंब न करता नामपल्ली न्यायालयासमोर व्हर्च्युअल माध्यमातून हजेरी लावली. अल्लू अर्जुन नेहमीच कायद्याचे पालन करतात आणि न्यायव्यवस्थेचा आदर राखतात.

Allu Arjun : अल्लू अर्जुन कायद्याचा आदर राखत न्यायालयीन सुनावणीत घेतला सहभाग Read More »

img 20260622 wa0041

Vikhe Patil: सिंचन सुधारणा कार्यक्रमातांर्गत प्रकल्पांसाठी नाबार्डच्या माध्यमातून निधी उभाणार

Vikhe Patil: महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमातर्गत विविध प्रकल्पांसाठी नाबार्डच्या माध्यमातून निधी उपलब्ध करण्यात येईल. कार्यक्रमाच्या टप्पा दोन अंतर्गत होणाऱ्या या कामातून कृष्णा खोरे आणि गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळा अंतर्गत विविध सिंचन प्रकल्पातील कामांसाठी गती मिळेल असा विश्वास जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. मंत्रालयात जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. याप्रसंगी आमदार सत्यजित पाटील , आमदार अमोल जगताप, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, सचिव संजय बेलसरे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक डॉ हनुमंत धुमाळ, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळचे कार्यकारी संचालक जयंत गवळी उपस्थित होते. मंत्री विखे पाटील म्हणाले, महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम राज्यातील पूर्ण झालेल्या १५५ जलसिंचन प्रकल्पांच्या कालवे व वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करण्याच्या कामासाठी ५ हजार ३६ कोटी रुपये तरतुदीसाठी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. नाबार्ड च्या माध्यमातून निधी उपलब्धतेच्याया दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून कामास गती दिली जाईल. अपूर्ण सिंचन प्रकल्प तसेच पूर्ण प्रकल्पांच्या वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करणेसाठी या टप्प्यातील ७५०० कोटीपैकी गोदावरी व कृष्णा खो-यात निधी उपलब्ध होणार असून सदयस्थिती झालेला खर्चबाबतचा आढावा घेण्यात आला. मंत्रिमंडळ बैठकीत यापूर्वीच महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमांतर्गत निर्मित सिंचन क्षमता व प्रत्यक्ष सिंचन क्षमता यामधील तफावत दूर करण्याच्या दृष्टीने प्रथम टप्यात महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे अंतर्गत २१ प्रकल्पांना व गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत १० प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे आणि गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, छत्रपती संभाजीनगर एकूण ३१ प्रकल्पांच्या बाबत चर्चा करण्यात आली. गोदावरी उजवा तट कालवा प्रकल्पाचा टप्पा २ मधून टप्पा १ मध्ये समावेश करण्यात आला आहे. तसेच प्रवरा डावा व उजवा कालवा दुरुस्ती व भोजापूर मध्यम प्रकल्प या प्रकल्पांचा प्रथम टप्यात नव्याने समावेश करण्यात आला आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली.

Vikhe Patil: सिंचन सुधारणा कार्यक्रमातांर्गत प्रकल्पांसाठी नाबार्डच्या माध्यमातून निधी उभाणार Read More »

img 20260622 wa0001

Ahilyanagar Crime: नगर पाथर्डी रोडवरील हॉटेल शौर्य येथे तरुणाचा खून; एक जण गंभीर जखमी

Ahilyanagar Crime: अहिल्यानगर शहरातील पाथर्डी रोडवरील महेशनगर परिसरातील हॉटेल शौर्य येथे रविवारी रात्री झालेल्या हल्ल्यात एका तरुणाचा चाकूने वार करून खून करण्यात झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सागर धोत्रे व त्यांचा सहकारी हॉटेलमध्ये जेवणासाठी बसले असताना त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात सागर धोत्रे यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर साईदीप हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार, जयेश पाटोळे व त्याच्या दोन साथीदारांनी हा हल्ला केल्याच संशयित आरोपी आहे. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते. घटनेची माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलीस उपधीक्षक दिलीप टिपरसे, एपीआय तेजश्री थोरात यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळाची तपासणी केली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. दरम्यान, संशयित आरोपी जयेश पाटोळे याला पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Ahilyanagar Crime: नगर पाथर्डी रोडवरील हॉटेल शौर्य येथे तरुणाचा खून; एक जण गंभीर जखमी Read More »

ankush kakade

Ankush Kakade : ‘पवार साहेबांच्या पक्षाचे ऑपरेशन करण्याइतका सर्जन अजून जन्माला नाही’ राष्ट्रवादीच्या खासदारांबाबतच्या चर्चांना अंकुश काकडेंचा पूर्णविराम

Ankush Kakade : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील खासदारांबाबत सुरू असलेल्या चर्चांवर पक्षाचे नेते अंकुश काकडे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. पक्षाचे सर्व आठ खासदार शरद पवार यांच्या नेतृत्वावर ठाम विश्वास ठेवून काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. खासदारांच्या नाराजीच्या किंवा पक्षांतराच्या चर्चा निराधार असल्याचे स्पष्ट करत 2029 मध्ये पुन्हा जनतेसमोर जायचे असल्याने सर्वजण पक्षाशी एकनिष्ठ असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच कोणत्याही कामानिमित्त नेते एकमेकांना भेटू शकतात, त्यातून वेगळे अर्थ काढण्याचे कारण नसल्याचे त्यांनी नमूद केले. शरद पवार यांना त्यांच्या खासदारांबाबत कोणतीही अस्वस्थता नसल्याचे सांगत पक्ष फोडण्याच्या चर्चांवरही त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

Ankush Kakade : ‘पवार साहेबांच्या पक्षाचे ऑपरेशन करण्याइतका सर्जन अजून जन्माला नाही’ राष्ट्रवादीच्या खासदारांबाबतच्या चर्चांना अंकुश काकडेंचा पूर्णविराम Read More »

img 20260620 wa0004

Amol Khatal : ज्या ठिकाणी खासदार वाकचौरे यांना विरोध होईल, त्या ठिकाणी मी ढाल बनून उभा राहीन, आमदार खताळ

Amol Khatal : शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत सहभागी झाले या निषेधार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी ज्या ठिकाणी त्यांचा निषेध केला त्याच ठिकाणी आपण शिवसेना स्थापना दिवस साजरा करू. तसेच ज्या ठिकाणी खासदार वाकचौरे यांना विरोध होईल, त्या ठिकाणी मी त्यांची ढाल बनून उभा राहीन अस वक्तव्य आमदार अमोल खताळ यांनी केले. शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्व सामान्य शिवसैनिकांना न्याय देण्याचे काम करत आहेत. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे काम शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे करत सल्याचे गौरवोद्गार आमदार अमोल खताळ पाटील यांनी काढले. संगमनेर येथील बसस्थानक येथे शिवसेना स्थापनादिनाच्या निमित्त संगमनेर शिवसेना महायुतीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना आ. खताळ म्हणाले की, लोकशाही व्यवस्थेत जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींवर मतदारसंघाचा विकास कामे करण्याची मोठी जबाबदारी असते. विकासकामांना गती देण्यासाठी अनेकदा कठोर निर्णय घ्यावे लागतात. जनतेच्या हितासाठी आणि मतदारसंघाच्या प्रगतीसाठी सत्तेसोबत राहून विकासाची जबाबदारी स्वीकारणे आवश्यक असल्याचे आमदार खताळे यांनी सांगितले ऑपरेशन टायगर बाबत भाष्य करताना आमदार यांनी विरोधकांवर टीका करताना म्हणाले , तुमच्यासोबत असलेले तुमचे सहा खासदार जर तुम्हाला सोडून गेले असतील, तर त्यामागे काही ना काही कारण असणारच. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी आपले खासदार आपल्याला का सोडून गेले याचे आत्मपरीक्षण करावे असा सल्ला आमदार अमोल खताळ यांनी दिला. शिवसेना स्थापना दिनानिमित्त झालेल्या या कार्यक्रमा तून संगमनेर तालुक्यात शिवसेना संघटना अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. तसेच आगामी काळात पक्षवाढीसह जनतेच्या विकासासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केले.

Amol Khatal : ज्या ठिकाणी खासदार वाकचौरे यांना विरोध होईल, त्या ठिकाणी मी ढाल बनून उभा राहीन, आमदार खताळ Read More »

Ahilyanagar News : धरणांतील पिण्याचे पाणी 30 सप्टेंबरपर्यंत राखून ठेवणार, पाऊस लांबल्याने मुदत वाढविली

Ahilyanagar News : यावर्षी पावसाला होणार उशीर आणि संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता धरणांतील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा आदेश दिला आहे. यापूर्वी पिण्याचे पाणी 31 ऑगस्टपर्यंत राखीव ठेवण्यात आले होते. मात्र, बदलती परिस्थिती लक्षात घेता आता पाणी 30 सप्टेंबरपर्यंत राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. पाणीटंचाईचा आढावा घेण्यासाठी विखे पाटील यांनी आज बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. त्यानी सांगितले की, धरण क्षेत्र व अन्य उदभव क्षेत्रातून पाणी उपसा तात्काळ थांबवण्याचे सांगितले आहे. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य आहे. त्यामुळे पाणी पिण्यासाठीच राखून ठेवले जाणार आहे. टंचाई असलेल्या भागात पाण्याचे टँकर वेळापत्रकानुसार गावात जाणार आहेत. त्यांच्यासाठीच्या पाण्याच्या उद्भव परिसरात वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. टँकरचे पाणी गावातील विहिरीत टाकले जाणार नाही. तेथील पाणी पुरवठा योजनेत किंवा गावच्या लोकसंख्येनुसार दोन ते पाच हजार लिटर क्षमतेच्या टाक्यांमध्ये पाणी टाकले जाणार आहे. या टाक्यांना कॉक बसवले जाणार आहे. त्यामुळे गावकऱ्यांना पुरेसे पाणी उपलब्ध होईल व ते वायाही जाणार नाही. यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून निधी देण्यात येणार आहे, असेही विखे यांनी स्पष्ट केले. जनावरांसाठी चारा सध्या मुबलक असला तरी पुन्हा सर्वेक्षण करून प्रत्यक्षात किती चारा उपलब्ध होईल याचा अहवाल पाच सहा दिवसात येईल व त्यानुसार नियोजन केले जाईल, असेही विखे यांनी सांगितले.

Ahilyanagar News : धरणांतील पिण्याचे पाणी 30 सप्टेंबरपर्यंत राखून ठेवणार, पाऊस लांबल्याने मुदत वाढविली Read More »

bala nandgaonkar

Bala Nandgaonkar : राजकारणातील पक्षांतर जनतेला मान्य नाही; बाळा नांदगावकरांचे वक्तव्य

Bala Nandgaonkar : राजकारणातील पक्षांतर जनतेला मान्य नाही असे वक्तव्य मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केलं आहे. माध्यमांशी बोलताना बाळा नांदगावकर म्हणाले की, देशाच्या राजकारणात सध्या जे काही सुरू आहे, ते सामान्य माणसांना आवडणारे नाही. पश्चिम बंगालमध्येही तेच झाले, महाराष्ट्रातही तसेच झाले. आम आदमी पक्षामध्येही असे प्रकार झाले. लोकांनी ज्या लोकप्रतिनिधींना निवडून दिले, ज्या पक्षाकडे पाहून मतदान केले, त्या मतांचा सन्मान राखला जात नाही. त्यामुळे हा लोकांचाही अपमान आहे.दुर्दैवाने राजकारणाबाबत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की जाणारे आहेत म्हणून घेणारे तयार आहेत.त्यामुळे पक्ष सोडून जाणाऱ्या मंडळींनीही स्वतः विचार केला पाहिजे की आपण काय करत आहोत. शेवटी जनता सर्व काही पाहत असते.-लोकांचा ईव्हीएम मशीनवरील विश्वास उडत चालला आहे.-त्यामुळे जाणाऱ्यांनाही असे वाटते की ईव्हीएम असल्यामुळे काही अडचण नाही. लोकांच्या मतांचा सन्मान राखला जात नाही. त्यामुळे आम्ही सरकारलाही आणि विरोधी पक्षांनाही बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली आहे.-विरोधी पक्षांनाही आम्ही सांगितले होते की, जोपर्यंत बॅलेट पेपरवर निवडणुका होत नाहीत, तोपर्यंत मतदानावर बहिष्कार टाकावा. सरकारला जर एवढा आत्मविश्वास असेल की जनता आमच्या विचारधारेला आणि कामांना मतदान करते, तर बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यास काय अडचण आहे? त्यामुळे लोकांच्या मनातील शंका दूर होतील असं बाळा नांदगावकर म्हणाले. NDA ची ताकद वाढवण्यासाठी भाजपचे प्रयत्न तर एनडीएवर बोलताना जर एखादा नेता पक्षात येणार असेल, तर त्याच्यासोबत त्याच्या विचारांचे लोकही येणारच. त्याला कोणतेही नाव दिले तरी त्याचा फारसा अर्थ नाही.1967 मध्ये हरियाणामध्ये ‘आयाराम-गयाराम’ संस्कृतीचा जन्म झाला होता.तेथील एका आमदाराने अवघ्या नऊ तासांत तीन पक्ष बदलले होते.त्यानंतर पक्षांतरबंदीचा कायदा आला. मात्र त्यावरील वाद आणि निर्णय आजही सुरू आहेत.कायदा असला तरी त्याचे पालन होत नाही. न्यायालय तातडीने निर्णय देत नाही आणि अध्यक्षांकडे गेल्यानंतरही निर्णय होण्यास वेळ लागतो.त्यामुळे या सर्व बाबींचा काही जणांकडून फायदा घेतला जात आहे असं बाळा नांदगावकर म्हणाले.

Bala Nandgaonkar : राजकारणातील पक्षांतर जनतेला मान्य नाही; बाळा नांदगावकरांचे वक्तव्य Read More »

eknath shinde

Eknath Shinde : नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीची ताकद प्रदर्शन; नगरसेवकांच्या भेटीसाठी भिवंडीत एकनाथ शिंदे

Eknath Shinde : नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या समर्थनार्थ नाशिक जिल्ह्यातील बहुतांश नगरसेवकांना भिवंडी तालुक्यातील अंजूर येथील साया गार्डन रिसॉर्टमध्ये मुक्कामासाठी ठेवण्यात आले होते. मतदानावेळी कोणताही दगाफटका होऊ नये आणि सर्व नगरसेवक एकत्र राहावेत यासाठी ही खबरदारी घेण्यात आली होती. मतदानाच्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गिरीश महाजन यांनी रिसॉर्टमध्ये जाऊन नगरसेवकांची भेट घेतली. यावेळी मतदान प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच नाशिकसह सर्व जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला. यावेळी मंत्री गिरीश महाजन, रवींद्र फाटक यांच्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. भेटीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गिरीश महाजन नाशिककडे रवाना झाले. तर नगरसेवकही उत्साहाच्या वातावरणात बसमधून नाशिकच्या दिशेने रवाना झाले.

Eknath Shinde : नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीची ताकद प्रदर्शन; नगरसेवकांच्या भेटीसाठी भिवंडीत एकनाथ शिंदे Read More »

maharashtra government

Maharashtra Government: सामान्य प्रशासन विभागाचे विभाजनमाहिती व जनसंपर्क, राजशिष्टाचार दोन स्वतंत्र विभाग

Maharashtra Government: सामान्य प्रशासन विभागातून माहिती व जनसंपर्क आणि राजशिष्टाचार असे दोन स्वतंत्र विभाग नव्याने निर्माण करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. गत मंत्रिमंडळ बैठकीचे इतिवृत्त कायम करताना हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता राज्याच्या ३३ प्रशासकीय विभागांच्या विभाजन- समावेशनानंतर आता स्वतंत्र असे ४६ विभाग अस्तित्वात येणार आहेत. सध्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय सामान्य प्रशासन विभागातंर्गत कार्यरत आहे. राज्य शासनाच्या प्रचार, प्रसिद्ध आणि जनसंपर्कासाठी कार्यरत या महासंचालनालयाची सात विभागीय कार्यालये आहेत. शिवाय उपराजधानी नागपूर येथे संचालक कार्यालय देखील आहे. देशाच्या राजधानीत नवी दिल्ली येथे, तसेच गोवा राज्यात पणजी येथे महाराष्ट्र परिचय केंद्राच्या माध्यमातून देखील शासनाच्या जनसंपर्काचे काम केले जाते. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा माहिती कार्यालयांच्या माध्यमातून शासनाच्या योजना व विकास कामांसह, लोकोपयोगी उपक्रमांसाठी जाणीव जागृतीसह, प्रसिद्धीचे कामकाज चालते. महासंचालनालय मुख्यालय तसेच या सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून आपत्त्कालिन परिस्थिती, ते सण – उत्सव आणि तातडीच्या परिस्थितीत शासकीय – प्रशासकीय यंत्रणेसह, माध्यम आणि नागरिकांसाठी संपर्क – संवादासाठी कार्यरत असते. स्वतंत्र विभाग निर्मितीमुळे निर्णय प्रक्रीयेत आणि कामकाजात गतीमानता येणार आहे. मुंबईतील मंत्रालयांतील विविध विभागांच्या कामकाजात सुसूत्रता यावी दृष्टीने गत मंत्रिमंडळ बैठकीत प्रशासकीय विभागांच्या पुनर्रचनेच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार ३३ विभागांची पुनर्रचना करून, ४५ विभाग करण्यास मान्यता देण्यात आली होती. आता त्यांची संख्या ४६ झाली आहे. या विभागांच्या पुनर्रचना आणि विभाजन- समावेशनामुळे एकंदर कामकाजात सुसूत्रता येणार आहे. तसेच निर्णय प्रक्रीया गतीने राबविता येणे शक्य होणार आहे. सुधारित निर्णयानुसार अस्तित्वात असलेल्या विभागांचे विभाजन करून, निर्माण होणारे नवीन विभाग पुढीलप्रमाणे – कृषि व पदुम विभागाचे विभाजन करुन कृषि विभाग आणि पदुम विभाग असे दोन स्वतंत्र विभाग. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे विभाजन स्वतंत्र सहकार विभाग, पणन विभाग आणि वस्त्रोद्योग विभाग असे तीन स्वतंत्र विभाग. सामान्य प्रशासन विभागातून राजशिष्टाचार व माहिती व जनसंपर्क हे दोन उप विभाग वेगळे करुन राजशिष्टाचार विभाग व माहिती व जनसंपर्क विभाग असे दोन स्वतंत्र विभाग. गृह विभागातून स्वतंत्र परिवहन विभाग. उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाचे विभाजन करुन उद्योग व खनिकर्म विभाग, ऊर्जा विभाग आणि कामगार विभाग असे तीन स्वतंत्र विभाग. महसूल व वन विभागाचे विभाजन करुन महसूल विभाग, मदत व पुनर्वसन विभाग आणि वन विभाग असे तीन स्वतंत्र विभाग. पूर्वी “भूसंपादन” हा विषय वन विभागाकडे होता. आता तो महसूल विभागाकडे राहील. तद्वतच “नोंदणी व मुद्रांक शुल्क” हा विषय पूर्वीप्रमाणे महसूल विभागाकडेच राहील. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे विभाजन करुन शालेय शिक्षण विभाग आणि क्रीडा विभाग असे दोन स्वतंत्र विभाग. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे विभाजन करुन सांस्कृतिक कार्य विभाग आणि पर्यटन विभागा असे दोन स्वतंत्र विभाग. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे विभाजन करुन स्वतंत्र अन्न व औषध प्रशासन विभाग. तसेच नियोजन विभागातून रोजगार हमी योजना विभाग वगळून त्याचा समावेश मृद व जलसंधारण विभागामध्ये करण्यात येणार.

Maharashtra Government: सामान्य प्रशासन विभागाचे विभाजनमाहिती व जनसंपर्क, राजशिष्टाचार दोन स्वतंत्र विभाग Read More »

मोठी बातमी; 22 जूनपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन; ‘या’ दिवशी होणार शेवट

Maharashtra Assembly Session: राज्याचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै दरम्यान मुंबईत होणार असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. विधानभवन येथे आयोजित विधानसभा व विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीत पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाचे नियोजन आणि कार्यक्रमाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीस विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, उच्च व तंत्र शिक्षण तसेच संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह आमदार सुधीर मुनगंटीवार, दीपक केसरकर, नाना पटोले, जयंत पाटील, डॉ. नीलम गोऱ्हे, अनिल परब, प्रसाद लाड, हेमंत पाटील, प्रवीण दरेकर, विक्रम काळे, सतेज पाटील, विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे व संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या अधिवेशनात विरोधक वाढत्या महागाईवरून, राज्यातील कायदा सुव्यवस्था, गुन्हेगारी, महिला सुरक्षा आणि इतर मुद्यांवर सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याचे चिन्हे आहे.

मोठी बातमी; 22 जूनपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन; ‘या’ दिवशी होणार शेवट Read More »