Vikram Pachpute : पहिल्याच टर्ममध्ये आमदारकीला गवसने घालणारे श्रीगोंदा मतदारसंघाचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्याकडून मतदार संघातील जनतेला मोठ्या अपेक्षा होत्या मात्र राज्य राजकारणात लक्ष देता देता स्वतःच्या मतदार संघावर होत असलेलं दुर्लक्ष नागरी समस्या वाढती गुन्हेगारी यामुळे पाचपुतेंच्या विरोधात मतदारसंघात नाराजीचा सूर उमटत असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली. विविध प्रश्नांवरून राज्यात आपला वेगळा ठसा निर्माण करणाऱ्या पाचपुते यांनी मतदारसंघातील समस्याही सोडवाव्यात अशी मागणी नागरिक करू लागले आहे
दुष्काळाचे सावट…
राज्यात यंदा पावसाने दडी मारल्याने मोठे दुष्काळाचे सावट हे निर्माण झाले आहे. यामुळे अनेक ठिकाणी जनावरांच्या चाऱ्यासह पाण्याचा देखील मोठा प्रश्न हा निर्माण झाला आहे. दुष्काळजन्य परिस्थितीचा आढावा घेत जनतेला दिलासा देण्यासाठी मंत्री आमदार यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जावे असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. मात्र मुंबईत रमलेले श्रीगोंदा मतदारसंघाचे आमदार विक्रम पाचपुते मतदारसंघातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या बांधावर दिसतील का असा प्रश्न काही जणांकडून व्यक्त केला जात आहे.
राज्याकडे लक्ष मतदारसंघाकडे दुर्लक्ष
एमपीएससीच्या कथित पेपर फुटी प्रकरणामुळे राज्यात एकच खळबळ उडाली मात्र आता याच प्रकरणावरून आमदार रोहित पवार व आमदार विक्रम पाचपुते यांच्यामध्ये शाब्दिक वाद सुरू झाले आहे. एमपीएससी पेपर मधील गैरप्रकार विरोधात पवार आक्रमक झाले असून आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा अशी मागणी पवार करतात दरम्यान याच प्रकरणी पाचपुते यांनी देखील एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भेटीगाठी घेतल्या.
राज्यभर गाजणाऱ्या या मुद्द्यामुळे पाचपुते हे राज्यात चर्चेत आले. पवार विरुद्ध पाचपुते मुळे माध्यमांनी देखील याला प्रसिद्धी दिली मात्र दुसरीकडे मतदारसंघातील नागरी समस्या असतील रस्त्यांची झालेली दुरावस्था ठिकठिकाणी खड्डे तसेच वाढती गुन्हेगारी अमली पदार्थ वेळ का याकडे मात्र पाचपुते यांचे दुर्लक्ष झाल्याने मतदार संघामध्ये जनतेमध्ये नाराजी पसरली. तसेच शेतकरी पावसाअभावी संकटात सापडला असल्याने मुंबई वारी सोडून पाचपुते यांनी मतदारसंघाकडे लक्ष केंद्रित करावे व नागरिकांचे समस्या सोडवाव्यात अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
पाचपुते यांचा जनता दरबार
आमदार विक्रम पाचपुते यांचा जनता दरबार यावर देखील आक्षेप घेण्यात आला आपल्या खाजगी निवासस्थानी भरविण्यात येणाऱ्या जनता दरबार च्या माध्यमातून शासकीय विभागातील अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जात असल्याचा देखील आरोप पाचपत्यांवर करण्यात आला. हे लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जनता दरबार घेतला जात असून विरोधकांच्या टीकाटिप्पणी कडे लक्ष देण्याऐवजी नागरिकांच्या समस्या सोडवण्यावरती भर दिला जात असल्याचं पाचपुते म्हणाले.






