DNA मराठी

क्राईम

siya goyal

Siya Goyal :पुण्यातील केतन अग्रवाल हत्याप्रकरण : सिया गोयल व चेतन चौधरी यांना 16 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी

Siya Goyal : लोहगड किल्ल्यावरून ढकलून २५ वर्षीय रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल यांची हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांना वडगाव मावळ न्यायालयाने १६ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. १८ जून रोजी घडलेल्या या घटनेत २० वर्षीय सिया गोयल आणि २२ वर्षीय चेतन चौधरी यांनी केतन अग्रवाल यांना लोहगड किल्ल्यावरील कड्यावरून ढकलून त्यांचा खून केल्याचा आरोप आहे. केतन आणि सिया यांचा विवाह याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात होणार होता. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर दोन्ही आरोपींना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एम. विभुते यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सरकारी पक्षाने आणखी तीन दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. आरोपींच्या मोबाईलमधील चॅटमध्ये सांकेतिक शब्द आणि संकेतांचा वापर आढळून आल्याने त्या संभाषणांचा अर्थ उलगडण्यासाठी तसेच तपास पुढे नेण्यासाठी आरोपींची पोलीस कोठडी आवश्यक असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. मात्र, बचाव पक्षाने या मागणीला विरोध करत, तपासासाठी पोलिसांना यापूर्वीच पुरेसा कालावधी मिळाल्याने पुढील पोलीस कोठडीची आवश्यकता नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने अतिरिक्त पोलीस कोठडीची मागणी फेटाळून लावत सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना १६ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

Siya Goyal :पुण्यातील केतन अग्रवाल हत्याप्रकरण : सिया गोयल व चेतन चौधरी यांना 16 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी Read More »

marathi actresshigh profile sex racket case

Marathi Actress : हाय-प्रोफाईल देहव्यापार प्रकरणात धक्कादायक खुलासा; दोन अभिनेत्रींची सुटका, मेकअप आर्टिस्ट अटकेत

Marathi Actress: गिरगावातील हाय-प्रोफाईल देहव्यापार रॅकेट प्रकरणात आता नवीन खुलासा झाल्याने एकच खळबळ उडाली आली. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या मानवी तस्करीविरोधी पथकाने गिरगावातील एका आलिशान हॉटेलवर छापा टाकत या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. पोलिसांनी या कारवाईत मराठी चित्रपटसृष्टीतील एका अभिनेत्रींसह आणखी एका अभिनेत्रीची सुटका केली आहे. तर या प्रकरणातील प्रमुख संशयित मेकअप आर्टिस्टला देखील अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी एका पोलिसाला बनावट ग्राहक म्हणून हॉटेलमध्ये पाठविण्यात आले होते. व्यवहार निश्चित झाल्याची खात्री होताच पथकाने तातडीने छापा टाकून दोन्ही महिलांची सुटका केली. प्राथमिक तपासात आरोपी मेकअप आर्टिस्टने मनोरंजन क्षेत्रातील ओळखींचा गैरवापर करून महिलांना या रॅकेटमध्ये ओढल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. सुटका करण्यात आलेल्या महिलांपैकी एक मराठी चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री असून, दुसरी अभिनेत्री हिंदी आणि बंगाली चित्रपटांमध्ये लहान भूमिका करत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांनी त्यांची ओळख गोपनीय ठेवली आहे. या प्रकरणात आर्थिक व्यवहार, रॅकेटचे इतर सदस्य, तसेच संबंधित हॉटेल व्यवस्थापनाची भूमिका याचाही तपास सुरू आहे. या रॅकेटमागे आणखी काही व्यक्तींचा सहभाग असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, तपासानंतर आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Marathi Actress : हाय-प्रोफाईल देहव्यापार प्रकरणात धक्कादायक खुलासा; दोन अभिनेत्रींची सुटका, मेकअप आर्टिस्ट अटकेत Read More »

sex racket

Girgaon High Profile sex Racket : हाय-प्रोफाईल देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश; मराठी अभिनेत्रीसह दोन महिलांची सुटका, मेकअप आर्टिस्ट अटकेत

Girgaon High Profile sex Racket : गिरगाव परिसरातील एका नामांकित हॉटेलवर छापा टाकत मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने कथित हाय-प्रोफाईल देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत दोन महिलांची सुटका करण्यात आली असून, या प्रकरणात सिनेसृष्टीशी संबंधित एका महिला मेकअप आर्टिस्टला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे. प्राथमिक माहितीनुसार, आरोपी मेकअप आर्टिस्टने चित्रपट क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना ग्राहकांशी जोडण्याचे काम केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी सापळा रचून कारवाई करत आरोपीला रंगेहाथ ताब्यात घेतले. तपासादरम्यान दोन महिलांसाठी एकूण दोन लाख रुपयांचा व्यवहार ठरल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीने या व्यवहारातून कमिशन घेऊन महिलांना संबंधित हॉटेलमध्ये आणल्याचा पोलिसांचा दावा आहे. सुटका करण्यात आलेल्या महिलांपैकी एक मराठी चित्रपट क्षेत्राशी संबंधित असल्याची माहिती समोर आली असली, तरी पोलिसांनी कोणत्याही महिलेची ओळख जाहीर केलेली नाही. तपासादरम्यान आर्थिक अडचणींचा गैरफायदा घेत महिलांना या रॅकेटमध्ये ओढण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच इतर दलाल किंवा संबंधित व्यक्तींचा संबंध आहे का, याचा तपास मुंबई पोलीस करत आहेत. हॉटेल व्यवस्थापनाच्या भूमिकेचीही चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Girgaon High Profile sex Racket : हाय-प्रोफाईल देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश; मराठी अभिनेत्रीसह दोन महिलांची सुटका, मेकअप आर्टिस्ट अटकेत Read More »

ketan agarwal

Ketan Agarwal : होणारी पत्नीनेच केला खून; केतन अग्रवाल प्रकरणात आत्तापर्यंत सर्वात मोठा खुलासा

Ketan Agarwal : पुण्यातील लोहगड किल्ल्यावरून पाय घसरल्याने तरुण व्यावसायिक केतन अग्रवाल यांचा 18 जून रोजी मृत्यू झाला होता. तर आता या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला असून होणाऱ्या पत्नीनेच (सिया गोयल) केतन अग्रवालची आपल्या प्रियकराच्या (चेतन चौधरी) मदतीने हत्या केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 जून रोजी केतन अग्रवाल लोहगड किल्ल्यावर टर्किंग करत असताना पाय घसरल्याने 350 फूट खोल दरीत पडल्याने त्याचा मृत्यु झाला होता. या प्रकरणात सुरुवातीला लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू (B.N.S.S. 194) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात तपास करत असताना सियाचे चेतनसोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी सखोल चौकशी करत दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांच्याविरोधात लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. (B.N.S.) कलम 103 आणि 61(2) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. प्रेमसंबंध अन् हत्या सिया गोयलचे प्रेमसंबंध चेतन चौधरीसोबत असल्याने तिला केतनसोबत लग्न करायचे नव्हते. प्रेमसंबंधात अडसर ठरत असल्याने सिया आणि चेतन या दोघांनी मिळून केतनचा काटा काढण्याचा कट रचला. कटाचा भाग म्हणून सियाने केतनला लोहगड किल्ल्यावर फिरण्याच्या बहाण्याने नेले आणि तिथे सिया आणि चेतनने केतनची हत्या केली. तर दुसऱ्याकडे या प्रकरणात केतन अग्रवाल यांच्या कुटुंबियांनी सिया गोयलच्या कुटुंबियांवर फसवणुकीचा आरोप केला आहे. विशाल अग्रवाल यांनी सियाच्या प्रेमसंबंधाबाबत सर्वकाही माहिती असून देखील तिच्या कुटुंबियांनी कोणतीही माहिती दिली नसल्याचा दावा केतन अग्रवाल यांचे वडील विशाल अग्रवाल यांनी केला आहे.

Ketan Agarwal : होणारी पत्नीनेच केला खून; केतन अग्रवाल प्रकरणात आत्तापर्यंत सर्वात मोठा खुलासा Read More »

img 20260622 wa0001

Ahilyanagar Crime: नगर पाथर्डी रोडवरील हॉटेल शौर्य येथे तरुणाचा खून; एक जण गंभीर जखमी

Ahilyanagar Crime: अहिल्यानगर शहरातील पाथर्डी रोडवरील महेशनगर परिसरातील हॉटेल शौर्य येथे रविवारी रात्री झालेल्या हल्ल्यात एका तरुणाचा चाकूने वार करून खून करण्यात झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सागर धोत्रे व त्यांचा सहकारी हॉटेलमध्ये जेवणासाठी बसले असताना त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात सागर धोत्रे यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर साईदीप हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार, जयेश पाटोळे व त्याच्या दोन साथीदारांनी हा हल्ला केल्याच संशयित आरोपी आहे. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते. घटनेची माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलीस उपधीक्षक दिलीप टिपरसे, एपीआय तेजश्री थोरात यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळाची तपासणी केली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. दरम्यान, संशयित आरोपी जयेश पाटोळे याला पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Ahilyanagar Crime: नगर पाथर्डी रोडवरील हॉटेल शौर्य येथे तरुणाचा खून; एक जण गंभीर जखमी Read More »

tukaram munde

Shevgao Police: शेगावात पोलिसांचा मोठा दणका; 70 लाखांच्या प्रतिबंधित पानमसाल्यासह ट्रक जप्त

Shevgao Police: पवित्र तीर्थक्षेत्र शेगाव शहरात अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे एक मोठी कारवाई केली आहे. शेगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान, यादव बेकरी समोर (वरवट बकाल रोड) रात्रीच्या सुमारास तब्बल ७० लाख १३ हजार ९२० रुपयांचा अवैध व प्रतिबंधित पानमसाला, सुगंधित तंबाखू आणि मालवाहू ट्रक जप्त करण्यात आला आहे. आज सकाळ पर्यंत हि कारवाई सुरु होती. मिळालेल्या माहितीनुसार, १३ जून रोजी रात्री २२:१० वाजताच्या सुमारास अन्न सुरक्षा अधिकारी गुलाबसिंग किंता वसावे (अन्न व औषध प्रशासन, बुलढाणा) हे पोलीस कर्मचाऱ्यांसह खाजगी वाहनाने अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी वरवट बकाल रोडवरील यादव बेकरी समोर संशयास्पद वाटणारा एक अशोक लेलँड ट्रक (क्र. MH-40-GT-2965) अडवून त्याची तपासणी करण्यात आली. या तपासणीत शासकीय आदेशांचे उल्लंघन करून विक्री व वाहतुकीसाठी नेला जाणारा मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित साठा आढळला. यामध्ये बाजीराव गोल्ड पानमसाला: ५० पोते, मस्तानी तंबाखू ११ पोते, नजर १००० पानमसाला व N-05 प्रीमियम तंबाखू: एकूण ५० पोते, प्रीमियम नजर पोते, अशोक लेलँड ट्रूक असा एकूण जप्त मुद्देमाल: ७०,१३,९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यावेळी सुरुर अहम्मद नूर अहमद (वय ३७, रा. फिरदोस कॉलनी, अकोला) या ट्रक चालकला अटक करण्यात आली.तर M/S Shree Siddheshwar Tobacco Prod. PVT. LTD. (पांढुर्णा, छिंदवाडा, म.प्र.) चे मालक/भागीदार संचालक.या दोघांविरुद्ध नवीन भारतीय न्याय संहिता नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Shevgao Police: शेगावात पोलिसांचा मोठा दणका; 70 लाखांच्या प्रतिबंधित पानमसाल्यासह ट्रक जप्त Read More »

img 20260612 wa0114

Chandrapur Crime : सावलीत तंबाखू माफियांवर पोलिसांचा धडक छापा; 11 लाखांचा माल जप्त

Chandrapur Crime : सावली तालुक्यातील मौजा रखाडी येथे सुरू असलेल्या अवैध सुगंधित तंबाखू उत्पादन व पॅकिंग केंद्रावर स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी), सावली पोलीस आणि अन्न सुरक्षा विभागाने संयुक्त कारवाई करत मोठा साठा जप्त केला. या कारवाईत सुगंधित तंबाखू, पॅकिंग साहित्य, यंत्रसामग्री आणि वाहनासह एकूण ११ लाख ३१ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, मौजा रखाडी येथील विजय भांडेकर हा शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखूची साठवणूक करून मशीनच्या सहाय्याने त्याचे पॅकिंग करत असल्याचे समोर आले होते. या माहितीच्या आधारे संयुक्त पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकून कारवाई केली. कारवाई दरम्यान HOLA आणि EAGLE ब्रँडचा हुक्का शिशा तंबाखू, खुला सुगंधित तंबाखू, पॅकिंगसाठी लागणारे साहित्य, उत्पादन प्रक्रियेसाठी वापरली जाणारी यंत्रसामग्री तसेच एमएच-३४-सीजे-९६२५ क्रमांकाचे वाहन जप्त करण्यात आले. जप्त साहित्याची एकूण किंमत ११.३१ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्राथमिक चौकशीत आरोपीने हा माल गडचिरोली येथील एका व्यक्तीकडून खरेदी केल्याची माहिती दिली असून मोठ्या प्रमाणात तंबाखूचे पॅकिंग करून विक्रीसाठी तयार करण्यात येत असल्याचे उघड झाले आहे. या संदर्भातील अधिक माहिती अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांनी दिली.

Chandrapur Crime : सावलीत तंबाखू माफियांवर पोलिसांचा धडक छापा; 11 लाखांचा माल जप्त Read More »

crime

Shrirampur News : श्रीरामपूर हादरल! शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यावर गोळीबार!

Shrirampur News : श्रीरामपूर शहरातून थरारक घटना समोर आली आहे. गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी थेट गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. हल्लेखोरांचा निशाणा चुकल्याने कहाणे यांचा प्राण थोडक्यात बचावला. भररस्त्यात चालत्या वाहनावर झालेल्या या प्राणघातक हल्ल्यामुळे श्रीरामपूर परिसर खळबळ उडाली आहे. तसेच पुन्हा एकदा जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. यातच श्रीरामपूर मध्ये गेल्या काही दिवसांमध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना सोमवारी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास घडली. शिवसेना नेते प्रशांत कहाणे हे त्यांच्या चारचाकी वाहनातून जात होते. त्याचवेळी गोंधवणी परिसरात दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी वाहनाच्या दिशेने थेट गोळीबार केला. प्रशांत कहाणे यांना संपवण्याच्या उद्देशानेच हा गोळीबार केला होता. मात्र, सुदैवाने हल्लेखोरांचा नेम चुकल्याने एक मोठी दुर्घटना टळली. प्रशांत कहाणे या जीवघेण्या हल्ल्यातून थोडक्यात आणि सुखरूप बचावले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सध्या पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून, गोळीबार करून पळून गेलेल्या अज्ञात हल्लेखोरांसह त्यांच्या दुचाकीचा शोध घेत आहे.

Shrirampur News : श्रीरामपूर हादरल! शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यावर गोळीबार! Read More »

img 20260607 wa0006

Salman Dolare : दोन वर्षांपासून फरार असलेला कुख्यात बिल्डर सलमान डोलारे अखेर जेरबंद; घरातील कपाटात लपलेला असताना पोलिसांची कारवाई

Salman Dolare : खोट्या कागदपत्रांच्या आधारे आरक्षित भूखंडांवर अनधिकृत इमारती उभारल्याच्या आरोपांमुळे चर्चेत असलेला कुख्यात बिल्डर सलमान डोलारे अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. विविध पोलीस ठाण्यांमध्ये 12 गुन्हे दाखल असलेला सलमान डोलारे गेल्या दोन वर्षांपासून फरार होता. कल्याण पश्चिमेतील दुधनाका परिसरातील खोटाल मंझिल इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये सलमान डोलारे लपून बसल्याची माहिती कल्याण गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे कल्याण क्राईम ब्रँच, बाजारपेठ पोलीस ठाणे आणि महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त कारवाई करत संबंधित ठिकाणी छापा टाकला. कल्याण क्राईम ब्रँच युनिट-3 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांच्या पथकाने फ्लॅटमध्ये प्रवेश करून तपासणी केली असता, सलमान डोलारे घरातील कपाटात लपलेला आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी पंचनामा सुरू केल्यानंतर परिसरात ही माहिती वेगाने पसरली आणि इमारतीखाली नागरिकांनी मोठी गर्दी केली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. सलमान डोलारे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी कल्याण परिसरात खोट्या कागदपत्रांच्या आधारे आरक्षित भूखंडांवर अनेक अनधिकृत इमारती उभारल्याचा आरोप आहे. युसुफ हाइट्स, मरियम टॉवरसह अनेक प्रकल्पांची चौकशी विविध तपास यंत्रणांकडून सुरू आहे. याशिवाय या इमारतींशी संबंधित फाईल चोरी प्रकरणी महापालिकेने बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्याचाही तपास सुरू आहे. सलमान डोलारेविरोधात बाजारपेठ आणि महात्मा फुले पोलीस ठाण्यात एकूण 12 गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणाचा तपास कल्याण क्राईम ब्रँच, ठाणे क्राईम ब्रँच तसेच विशेष तपास पथक अर्थात एसआयटीकडून करण्यात येत आहे. तपासादरम्यान केवळ सलमान डोलारेच नव्हे, तर त्याचे काही सहकारी आणि इतर संबंधित व्यक्तींचाही सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. काही अधिकारी देखील चौकशीच्या कक्षेत असल्याची चर्चा असून, सलमान डोलारेच्या अटकेनंतर या प्रकरणाच्या तपासाला अधिक गती मिळण्याची शक्यता आहे. आता या तपासातून आणखी कोणते धक्कादायक खुलासे समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Salman Dolare : दोन वर्षांपासून फरार असलेला कुख्यात बिल्डर सलमान डोलारे अखेर जेरबंद; घरातील कपाटात लपलेला असताना पोलिसांची कारवाई Read More »

img 20260607 wa0080

Ahilyanagar Police : रायगड जिल्हा परिषद सदस्याला सोन्याचे आमिष दाखवून लुटणारे गजाआड

Ahilyanagar Police : रायगड जिल्हा परिषद सदस्याला स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून लुटणाऱ्या आरोपींना अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नांदेड जिल्ह्यातून ७ जून रोजी जेरबंद केले. तीन दिवसांपूर्वी अहिल्यानगर रेल्वे स्टेशन जवळील अरणगाव हद्दीत ही घटना घडली होती. या संदर्भात अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल होता. या प्रकरणात पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून २६ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. शिवाजी विठ्ठल मोहिते (वय ५२), राजू रामदास मोहिते (वय ३६, दोघे रा. झेंडीगुळा लोणी, ता. किनवट, जि. नांदेड) अक्षय रामदास मोहिते (वय २७, रा. मालठा ता.हातगाव, जि.नांदेड), छगन दशरथ मोहिते (वय ३६, रा. याडी ता.नेर जि. यवतमाळ) व दिनेश सुदाम जाधव (वय २४, रा.दगडवाडी, ता.हातगाव, जि.नांदेड) अशी जेरबंद आरोपींची नावे आहेत. गुन्हा दाखल झाल्यावर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या घटनेचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविला होता. पथकाने दरोड्याच्या गुन्ह्यामधील आरोपींची माहिती संकलित करुन व्यवसायिक कौशल्याचे आधारे माहिती काढण्यास सुरुवात केली. त्याचवेळी पथकाला गुप्त बातमीदारामार्फत या गुन्ह्यातील आरोपी हे झेंडीगुळा लोणी (ता.किनवट, जि. नांदेड) येथे असल्याची माहिती मिळाली. पथकाने तात्काळ झेंडीगुळा लोणी येथील आरोपींच्या घरी छापा टाकुन त्यांना शिताफिने ताब्यात घेतले. आरोपीचे कब्जातून १६ लाख ५० हजार रुपये रोख, एक लाख ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिणे, एक स्विप्ट कार, बनवाट सोन्याची नाणी, कोयता असा एकुण २६ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

Ahilyanagar Police : रायगड जिल्हा परिषद सदस्याला सोन्याचे आमिष दाखवून लुटणारे गजाआड Read More »