DNA मराठी

क्राईम

img 20260316 wa0004

Pune Crime: पुण्यातील कोंढवा-पर्वती परिसरात सराइतांकडून पिस्तुले जप्त, चौघांना अटक

Pune Crime: पुण्यातील कोंढवा-पर्वती परिसरात सराइतांकडून पिस्तुले जप्त करत चार जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्वती परिसरात केलेल्या कारवाईत अजित सागर कसबे याला अटक करण्यात आली असून त्याच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. परिसरात दहशत माजविण्याच्या उद्देशाने तो पिस्तूल बाळगत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार १३ मार्च रोजी पोलिस पथकाने सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक काडतूस जप्त करण्यात आले दरम्यान, गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने कोंढव्यातील काकडे वस्तीमधून प्रकाश तुळशीराम पवार, मुस्ताक इक्राइम शेख आणि ओंकार दयानंद पवार या तिघांना अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक काडतूस जप्त करण्यात आले. या प्रकरणी पुढील तपास सुरू करण्यात आला असल्याची देखील माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Pune Crime: पुण्यातील कोंढवा-पर्वती परिसरात सराइतांकडून पिस्तुले जप्त, चौघांना अटक Read More »

sagar moholkar death

Sagar Moholkar Death : घायवाळच्या कानशिलात लावणाऱ्या सागर मोहोळकराचा गोळीबारानंतर 13 दिवसांनी मृत्यू

Sagar Moholkar Death : जामखेडमध्ये पैलवान सागर मोहोळकरवर गोळीबाराची घटना घडली होती. गोळीबार झालेला पैलवान सागर मोहोळकर याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. गेल्या 13 दिवसांपासून सागर मोहोळकर हा मृत्यूशी झुंज देत होता. अहिल्यानगरच्या जामखेडमध्ये पैलवान सागर मोहोळकर याच्यावर गोळीबार झाल्याची घटना 9 मार्च रोजी घडली होती. त्याच्या तोंडातही गोळी लागल्याची माहिती होती. त्याच्यावर जवळून गोळीबार करण्यात आला होता. त्याच्या शरीरात सहा गोळ्या लागल्या होत्या. सागरला उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आले. घटनेचा तपास पोलीस पथकाने सुरू केला व तातडीने तपासाचे चक्र फिरवले. अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने जामखेड येथील अभिमन्यू याला ताब्यात घेऊन चौकशी केली. यामध्ये गोळीबार करणाऱ्या पुणे येथील चार्ली उर्फ माऊली उर्फ ज्ञानेश्वर साठे, रोहित विठ्ठल आखाडे, चिन्या या आरोपींनी गोळीबार केल्याची माहिती असून यामध्ये दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मोहोळकरवर अनेक गंभीर गुन्हे दाखल नगरच्या जामखेड शहरात पैलवान सागर मोहोळकर याच्यावर गोळीबार करण्यात आला होता. या घटनेनंतर पोलिसांनी जखमीला उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल केलं होतं. या घटनेचा तपास सुरू केला होता. सागर मोहळकर याने कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या कानाखाली मारल्याची घटना धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात एका जत्रेदरम्यान घडली होती. तेव्हापासून सागर मोहोळकर हा चांगलाच चर्चेत आला होता. तसेच त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून त्यानुसार नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला होता.

Sagar Moholkar Death : घायवाळच्या कानशिलात लावणाऱ्या सागर मोहोळकराचा गोळीबारानंतर 13 दिवसांनी मृत्यू Read More »

crime

Dhavalpuri Case : ढवळपुरी प्रकरण; श्रद्धेच्या आवरणामागचे भयावह वास्तव

Dhavalpuri Case: अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे उघडकीस आलेले अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरण केवळ एक गुन्हेगारी घटना म्हणून पाहून चालणार नाही ते समाजाच्या नैतिक अध:पतनाचे आणि आंधळ्या श्रद्धेच्या धोकादायक परिणामांचे गंभीर उदाहरण आहे. वारकरी संप्रदायाची परंपरा ही संत विचार, नैतिकता, समता आणि मानवतेच्या मूल्यांवर उभी आहे. मात्र, याच परंपरेच्या नावाखाली समाजात प्रतिष्ठा मिळवलेल्या व्यक्तीकडून असा अमानुष प्रकार घडल्याचा आरोप होणे, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. या प्रकरणात आरोपीने अल्पवयीन मुलीवर दीर्घकाळ अत्याचार केल्याचा आरोप असून, पीडितेला धमक्या देत गप्प ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. अधिक धक्कादायक म्हणजे, यापूर्वीही त्याच व्यक्तीवर बलात्कारासंदर्भातील गुन्हे दाखल झाले होते. एका प्रकरणात निर्दोष मुक्तता झाली असली, तरी दुसरे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची माहिती समोर येते. यामुळे प्रश्न केवळ एका आरोपीपुरता मर्यादित राहत नाही तर समाज आणि व्यवस्थेने अशा संकेतांकडे वेळेत गांभीर्याने पाहिले का, हा मूलभूत प्रश्न उपस्थित होतो. भारतीय समाजात धार्मिक व्यक्तींना सहजपणे नैतिक श्रेष्ठत्व बहाल केले जाते. ‘महाराज’, ‘बाबा’, ‘कीर्तनकार’ अशा पदव्या अनेकदा प्रश्न विचारण्याची प्रवृत्तीच नष्ट करतात. परिणामी, पीडितांना आवाज उठवणे अधिक कठीण होते. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील सीमारेषा पुसली गेली की सत्तेचा गैरवापर सुरू होतो. ढवळपुरी प्रकरण हे त्याचेच उदाहरण मानावे लागेल. या घटनेत पीडित मुलीने अनेक वर्षे भीतीपोटी मौन बाळगल्याचे दिसते. हे मौन समाजाच्या अपयशाचे प्रतीक आहे. कुटुंब, शाळा, ग्रामव्यवस्था आणि स्थानिक समाजरचना या सर्व स्तरांवर मुलांना सुरक्षित वातावरण मिळणे अपेक्षित असते. परंतु जेव्हा प्रभावशाली व्यक्तीविरुद्ध तक्रार करण्याची भीती निर्माण होते, तेव्हा न्यायव्यवस्था उशिरा का होईना, हस्तक्षेप करते पण तोपर्यंत मोठी हानी झालेली असते. या पार्श्वभूमीवर दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. पहिली म्हणजे, धार्मिक किंवा सामाजिक प्रतिष्ठा ही कायद्यापेक्षा मोठी नाही, हा संदेश ठामपणे पोहोचणे आवश्यक आहे. दुसरी म्हणजे, अल्पवयीनांवरील अत्याचार प्रकरणांमध्ये तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया अधिक विश्वासार्ह आणि संवेदनशील बनवणे गरजेचे आहे. पोलिसांनी नागरिकांना पुढे येण्याचे केलेले आवाहन ही सकारात्मक बाब असली, तरी समाजानेही पीडितांच्या बाजूने उभे राहण्याची मानसिकता विकसित करणे तितकेच आवश्यक आहे. वारकरी संप्रदाय हा संत तुकाराम, ज्ञानेश्वरांच्या विचारांनी घडलेला आहे. करुणा, संयम आणि सत्य यांची शिकवण देणारा. त्यामुळे अशा घटनांमुळे संप्रदाय नव्हे, तर त्याच्या नावाचा गैरवापर करणाऱ्या व्यक्ती उघडकीस येतात, हे समाजाने लक्षात ठेवले पाहिजे. अन्यथा, काही व्यक्तींच्या कृत्यामुळे संपूर्ण परंपरेवर संशयाची सावली पडण्याचा धोका निर्माण होतो. ढवळपुरी प्रकरण हे केवळ गुन्हेगारी बातमी नाही; ते समाजाला स्वतःकडे पाहण्यास भाग पाडणारे आरसे आहे. श्रद्धा ठेवावी, पण प्रश्न विचारण्याची क्षमता गमावू नये हाच या घटनेतून घ्यायचा सर्वात मोठा धडा आहे.

Dhavalpuri Case : ढवळपुरी प्रकरण; श्रद्धेच्या आवरणामागचे भयावह वास्तव Read More »

utter pradesh crime

Utter Pradesh Crime : सून प्रियकारासोबत ‘बेड’ वर आक्षेपार्ह अवस्थेत, अचानक सासूची एन्ट्री अन् सुनेने केलं असं काही…

Utter Pradesh Crime: मथुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भाणखरपूर बसेला गावात, एका सुनेने आपला प्रियकर आदिल याच्याशी संगनमत करून सासूची निर्घृण हत्या केली. ही घटना 3 मार्चच्या रात्री 1 च्या सुमारास घडली. समोर आलेल्या माहितीनुसार, सासूने सुनेला तिच्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले होते. यानंतर दोघांनी सासूच्या चेहऱ्यावर उशी दाबून तिचा गुदमरून जीव घेतला. त्यानंतर, सुनेने आपल्या पतीला फोन करून सासूला “सायलेंट हार्ट अटॅक” आल्याचा कट रचला, ज्यामुळे कुटुंबाने मृतदेह दफन केले. मात्र मृत महिलेच्या पतीला संशय आल्याने, पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दफन केलेला मृतदेह पुन्हा बाहेर काढला आणि त्यानंतर करण्यात आलेल्या शवविच्छेदनात मृत्यूचे कारण मानेचे हाड मोडणे आणि गुदमरणे हे असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी कारवाई करत या गुन्ह्यातील आरोपींना अटक केली. प्रियकरासोबत रंगेहाथ पकडल्यानंतर रचला कट पोलिसांच्या चौकशीत असे उघड झाले की, सदर सुनेचे त्याच परिसरात राहणाऱ्या आदिल नावाच्या तरुणाशी अनैतिक संबंध होते. 3 मार्चच्या रात्री जेव्हा आदिल तिला भेटण्यासाठी घरी आला होता, तेव्हा सासूला जाग आली. त्या दोघांना आक्षेपार्ह अवस्थेत पाहताच, सासूने यावर आक्षेप घेतला. आपला हा प्रकार उघडकीस येईल या भीतीने, प्रियकर आणि सुनेने संगनमत करून सासूचा जीव घेण्याचे ठरवले त्यांनी सासूच्या गळ्यावर आणि चेहऱ्यावर उशी दाबून धरली, जोपर्यंत तिचा श्वास पूर्णपणे थांबला नाही. “हार्ट अटॅक”चा बनाव हत्येचा हा प्रकार लपवण्यासाठी सुनेने एक कपटी योजना आखली पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास तिने आपल्या पतीला फोन केला आणि त्याची आईला “सायलेंट हार्ट अटॅक” आल्याचा खोटा दावा केला. कोणताही संशय न आल्याने, कुटुंबाने मृतदेहाचे दफन केले. मात्र, मृत महिलेच्या पतीला नंतर काहीसा संशय आला आणि त्याने पोलिसांना याबद्दल माहिती दिली. मथुराचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (SSP) यांच्या माहितीनुसार, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून दफन केलेली जागा खोदून मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. या प्रक्रियेतूनच या खळबळजनक हत्येमागील सत्य समोर आले. सत्य उघडकीस आणि आरोपींची अटक एसएसपी (SSP) यांनी स्पष्ट केले की, शवविच्छेदन अहवालाने सुनेने रचलेली खोटी कहाणी पूर्णपणे खोडून काढली आहे. या अहवालातून हे स्पष्टपणे सिद्ध झाले की, त्या महिलेचा मृत्यू मानेचे हाड मोडल्यामुळे आणि गुदमरल्यामुळे झाला होता. पोलिसांनी तातडीने पावले उचलत खुनाचा गुन्हा दाखल केला आणि सून व तिचा प्रियकर आदिल या दोघांनाही अटक करून, त्यानंतर त्यांची रवानगी कारागृहात केली.

Utter Pradesh Crime : सून प्रियकारासोबत ‘बेड’ वर आक्षेपार्ह अवस्थेत, अचानक सासूची एन्ट्री अन् सुनेने केलं असं काही… Read More »

img 20260312 wa0003

Pune Crime : पुणे हादरले! किरकोळ वादातून मारहाण अन् तरुणाची हत्या

Pune Crime : पुण्यातील कॅम्प परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, किरकोळ वादावरून एकाची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात 4 जणांना अटक केली असून 2 आरोपींचा शोध घेत आहे. फैसल खान असं मयत तरुणाचं नाव आहे. तर बजाद अली सय्यद, अली अब्बास अश्रफअली सय्यद, सोहेल युसुफ तांबोली, शाहबाज चांद शेख, तालिब अली सय्यद, अश्रफली सय्यद अशी आरोपींची नावे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शाहबाज शेख आणि मयत फैसल खान दोघे मित्र होते. शहबाज शेख याची मयत फैसल खान याने थटटा मस्करी केली, त्याचा राग आल्याने शहबाज याने मयताचे कानाखाली चापट मारली आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये वाद वाढला. यानंतर शहबाज शेख व त्याच्या बाकीदारांनी धारधार चाकुने मयत फैसल खान याच्या छातीत, पाठीत, हातावर, आणि डोक्यात वार करत त्याची हत्या केली. सध्या या प्रकरणात दोन आरोपी फरार असून सीसीटीव्हीच्या मदतीने पोलीस त्यांचा शोध घेत आहे. तर दुसरीकडे पुण्यात दिवसेंदिवसे गुन्हेगारीचा आलेख वाढताना दिसत आहे. हत्या, चोरी सारखे गुन्हे दररोज दाखल होत असल्याने कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

Pune Crime : पुणे हादरले! किरकोळ वादातून मारहाण अन् तरुणाची हत्या Read More »

Ahilyanagar Crime: धक्कादायक, नगर जिल्ह्यात चक्क पोलिसांना मारहाण; गुन्हा दाखल

Ahilyanagar Crime: चारचाकी गाडीला कट लागल्याच्या कारणावरुन ट्रक चालकाला मारहाण करत असताना एका पोलीस कर्मचाऱ्याने मज्जाव केला. याचा राग मनात धरून सुमारे १५ आरोपींनी दारूच्या नशेत पोलिस कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला करत लोखंडी गज, लाकडी दांडा व लाथा बूक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना ८ मार्च रोजी सायंकाळी डिग्रस फाटा येथे त्यानंतर रात्रीच्या दरम्यान राहुरी शहर हद्दीत घडली. सायंकाळी ५ राहुरी तालुक्यातील नगर मनमाड महामार्गावर डिग्रस फाटा येथे १० ते १२ जण दारुच्या नशेत असताना चारचाकी वाहनाला कट लागल्याच्या कारणावरुन ट्रक चालकाला लाकडी दांडी व लाथा बूक्क्यांनी मारहाण करत होते. त्यावेळी राहुरी पोलिस ठाण्यातील पोलीस हवालदार विकास रंगनाथ वैराळ हे त्यांच्या चारचाकी वाहनातून नगरकडून राहुरीकडे येत असताना त्यांनी सदर प्रकार पाहिला. त्यावेळी त्यांनी आरोपींना ट्रक चालकाला मारहाण करण्यास मज्जाव केला. त्यावेळी आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून दमदाटी केली होती. त्यानंतर हवालदार विकास वैराळ हे रात्री ११.३० वाजे दरम्यान राहुरी शहरातील ग्रीन हॉटेल चौक येथे ड्युटी करत असताना तेच आरोपी तेथे आले. त्यांनी हवालदार विकास वैराळ यांना पून्हा विनाकारण शिवीगाळ केली. तसेच फायटर, लोखंडी गज, लाकडी दांडा व लाथा बूक्क्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेत हवालदार विकास वैराळ हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहिल्यानगर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांनी दिलेल्या जबाबावरून राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी खंडु वसंत काळे, वैभव बाबासाहेब तारडे, संतोष अंकुश काळे, सर्व रा. बुरुडगाव, ता. जि. अहील्यानगर तसेच महेश निमसे व अनोळखी ११ इसम अशा एकुण १५ जणांवर गुन्हा रजि. नं. २२०/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम १०९, ११९ (१), ११८ (१), १८९ (२), १९१ (१), १९१ (३), १९०, ११५ (२), ३५१ (२), ३५२ प्रमाणे शिवीगाळ, दमदाटी, जीवघेणा हल्ला व सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस पथकाने आरोपी खंडु काळे, वैभव तारडे, संतोष काळे यांना ताब्यात घेऊन गजाआड केले. तर इतर आरोपी पसार झाले. तसेच आरोपींचे चारचाकी वाहन जप्त करण्यात आले. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक समाधान फडोळ हे करीत आहे.

Ahilyanagar Crime: धक्कादायक, नगर जिल्ह्यात चक्क पोलिसांना मारहाण; गुन्हा दाखल Read More »

Ahilyanagar Crime: 4000 किलो मांगुर मासा जप्त; शिर्डीत पोलिसांची मोठी कारवाई

Ahilyanagar Crime: शिर्डी पोलीस ठाणे हद्दीमध्ये स्थानिक गुन्हे शाखेकडुन प्रतिबंधीत 4000 किलो मांगुर मासा जप्त करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने या कारवाईत तब्बल 29 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर कारवाई करा असे आदेश सोमनाथ घार्गे जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना आदेश दिले होते. या आदेशावरून शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध धंद्याची माहिती घेत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. 03 मार्च 2026 रोजी ट्रक नंबर WB25M5023ú केंद्र सरकारने प्रतिबंधीत केलेले मांगुर मासे भरुन नगर मनमाड हायवे रोडवरील निमगाव बायपास रोड चौक येथुन जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्याने पथकाने तात्काळ शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, पोउपनि/ सागर काळे व पोलीस अंमलदार यांना बोलावुन घेवुन निमगाव बायपास रोडवर सापळा रचुन ट्रक ताब्यात घेतला. या प्रकरणी स्वपन नियम डे , मकबुल रौफ सरदार कुतुब आयुब मंडल आणि मृत्युंजय मुकुल विश्वासला अटक केली आहे. चारही आरोपी पश्चिम बंगाल येथे राहणारे असल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांकडुन 4,00,000 रुपये किमतीचे 400 किलो प्रतिबंधीत मांगुर मासे व 25,00,000 रुपये किमतीचा ट्रक असा एकुण 29,00,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन प्रतिबंधीत मासे कायदेशीर प्रक्रिया करुन नाश करण्यात आले आहेत.

Ahilyanagar Crime: 4000 किलो मांगुर मासा जप्त; शिर्डीत पोलिसांची मोठी कारवाई Read More »

img 20260304 wa0006

Sagar Mohalkar : नगर जिल्ह्यात पुन्हा गोळीबार; कुख्यात सागर मोहळकर गंभीर जखमी

Sagar Mohalkar : नगर जिल्ह्यात पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडल्याने जिल्ह्यात अनेक चर्चांना उधाण आले आहे. जामखेड शहरातील न्युरानी कॉलनी येथे बुधवारी सायंकाळी कुख्यात गुंड सागर मोहळकर याच्यावर मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोराने थेट सात राऊंड फायर केल्याची धक्कादायक घटना घडली. यापैकी चार गोळ्या मोहळकरच्या अंगात घुसल्याची माहिती डॉक्टरांनी दिली असून त्याची प्रकृती गंभीर आहे. सागर मोहळकर हा नुकताच नाशिक मध्यवर्ती कारागृहातून जामीनावर बाहेर आला होता. त्याच्यावर यापूर्वी 307 सह विविध गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. दोन दिवसांपूर्वीच त्याच्या वडिलांनी त्याच्याविरोधात जामखेड पोलीस ठाण्यात एनसी दाखल केली होती. मोहळकर हा नशेच्या आहारी गेलेला असून जामखेड परिसरात त्याची दहशत असल्याची चर्चा आहे. गोळीबारानंतर जामखेड पोलिसांनी तात्काळ मोहळकरला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर शहरातील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नगर येथे हलविण्यात आले. डॉक्टरांच्या माहितीनुसार, त्याच्या शरीरात चार गोळ्या अडकल्या असून परिस्थिती चिंताजनक आहे. गोळीबार करणारा हल्लेखोर घटनेनंतर पसार झाला आहे. पोलिसांनी परिसर सील करून तपास सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिकांकडून माहिती घेतली जात आहे. दवाखान्याबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी जमल्याने काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. या थरारक गोळीबारामुळे जामखेड पुन्हा एकदा हादरले असून गुन्हेगारीच्या प्रश्नावर पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. पुढील तपास जामखेड पोलीस करत आहेत.

Sagar Mohalkar : नगर जिल्ह्यात पुन्हा गोळीबार; कुख्यात सागर मोहळकर गंभीर जखमी Read More »

Ahilyanagar Crime : कोपरगावात धक्कादायक घटना; दगडाने ठेचून 33 वर्षीय युवकाचा खून  

Ahilyanagar Crime :  अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. संवत्सरजवळील रामवाडी येथे दगडाने ठेचून 33 वर्षीय युवकाचा खून करण्यात आला आहे. रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, हनुमान मंदिरासमोर ही घटना घडली आहे. मृत युवकाचे नाव नवनाथ माधव कानफाटे (वय 33) असे असून, अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर दगड आणि विटांनी सपासप वार करत जागीच ठार मारल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात दगड-विटांचा खच आढळून आला असून, परिसर अक्षरशः रक्ताने माखलेला होता. या भीषण प्रकारामुळे रामवाडी गाव हादरून गेले आहे. घटनेची माहिती मिळताच शिर्डी विभागाचे पोलीस उपाधीक्षक अमोल भारती आणि कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी पथकासह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक संदीप सोन्ने, पीएसआय दीपक रोठे यांच्यासह अधिकाऱ्यांनी पंचनामा करत तपासाची चक्रे वेगाने फिरवली. संशयितांचा माग काढण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे.   खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी जुना वाद, वैयक्तिक वैर किंवा अन्य काही कारण या दिशेने पोलीस तपास करत आहेत. रात्री उशिरापर्यंत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास वेगाने सुरू आहे. दरम्यान, मृतदेह शवविच्छेदनासाठी अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेतून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. गावकऱ्यांमध्ये भीतीचे सावट असून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी जोर धरत आहे.  

Ahilyanagar Crime : कोपरगावात धक्कादायक घटना; दगडाने ठेचून 33 वर्षीय युवकाचा खून   Read More »

Maharashtra Crime : धक्कादायक, लोणीकंद मध्ये माजी जिल्हा परिषद सदस्यांकडून मोठ्या भावाला मारहाण

Maharashtra Crime : अभियांत्रिकी महाविद्यालयातील सी सी टीव्ही कॅमेऱ्याचा पासवर्ड का बदलला असे विचारले म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्याने मुलासह मोठ्या भावाला मारहाण केल्याचा प्रकार लोणीकंदमध्ये घडला. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंकर रामचंद्र भूमकर ( वय ५८) व त्यांचा मुलगा सिद्धांत ( वय २५ ) ( दोघेही रा. लोणीकंद ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी त्यांचे मोठे भाऊ उद्धव रामचंद्र भूमकर ( वय ६५, रा. लोणीकंद ) यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भूमकर कुटुंबीयांचे रामचंद्र एज्युकेशन सोसायटीचे रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनियरिंग हे महाविद्यालय आहे. उद्धव भूमकर हे त्या संस्थेचे खजिनदार आहेत. तर शंकर भूमकर हे संचालक असून माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत. बकोरी रोडवर हे महाविद्यालय आहे. या महाविद्यालयातील सी सी टीव्ही चा पासवर्ड सिद्धांत याने बदलला. तसेच सर्व आर्थिक व्यवहार शंकर व त्यांचा मुलगा बघतात. त्याबाबत उद्धव यांना काही कळू देत नाहीत. त्याबाबत विचारणा केली की दोघे शिवीगाळ करायचे. कॉलेजच्या काही महत्वाच्या फाईल जागी दिसल्या नाही. लोणीकंद येथील घरी उध्दव यांनी पासवर्ड व फाईल बद्दल शंकर यांना विचारले असता. दोघा बाप लेकांनी उद्धव यांना तू आम्हाला विचारणारा कोण म्हणून शिवीगाळ करीत आधी लाथा बुक्याने व नंतर कोणत्या तरी कठीण वस्तुने खाली पाडून मारहाण केली. उद्धव यांच्या पुतण्याने व पत्नीने त्यांची सोडवणूक केली. यानंतर त्यांनी लोणीकंद पोलिसात त्यांनी दोघांविरोधात फिर्याद दिली. पुढील तपास लोणीकंद पोलिस करीत आहेत.

Maharashtra Crime : धक्कादायक, लोणीकंद मध्ये माजी जिल्हा परिषद सदस्यांकडून मोठ्या भावाला मारहाण Read More »