Nilesh Ghaywal : कारागृहात असताना खंडणी मागितलेल्या प्रकरणी आजमेहेरबान मोका न्यायालयाने निलेश घायवळ सह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. आरोपी निलेश घायवळ याच्या वतीने ज्येष्ठ वकील विपुल दुशिंग,आरोपी मुसा शेख याच्या वतीने ॲड. रितेश गदादे, आरोपी अक्षय गोगावले याच्या वतीने ॲड. अनिश पाडेकर, आरोपी कुणाल कंधारे याच्या वतीने ॲड बिलाल मणियार,आरोपी संतोष धुमाळ आणि विपुल माझीरे याच्यासाठी ॲड सलमान पठाण यांनी कामकाज पाहिले.सध्या देशातून फरार असलेला निलेश घायवळ याला सबंधित प्रकरणात न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे.
आरोपी देशात नसताना देखील केस चा निर्दोष निकाल लागणे ही दुर्मिळ घटना मानली जात आहे.याबाबत अधिक माहिती अशी की निलेश घायवळ २०२० हा दुसऱ्या एका प्रकारात कारागृहात असताना संतोष धुमाळ याने फिर्यादीकडे भाऊच्या रॅली साठी जीप हवी आहे या स्वरूपात खंडणीची मागणी केली होती, आणि गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी हा गुन्हा उघडकीस आणला होता. परंतु लगेचच फिर्यादीने पोलिसांवर आणि तपास यंत्रणेवर गंभीर आरोप करत न्यायालयात आपली फिर्याद दबाव टाकून नोंदवली आहे.अशा स्वरूपाचे प्रतिद्यापत्र दाखल केले होते.
तसेच मेहेरबान उच्च न्यायालयात देखील याबाबत रीट याचिका दाखल करत याबाबत आपले म्हणणे मांडले होते. यावर मेहेरबान उच्च न्यायालयाने कडक शब्दात ताशेरे ओढत पोलिसांना फिर्यादीचा पुन्हा एकदा जबाब नोंदवण्याचे आदेश दिले होते. या जबाबात देखील फिर्यादीने संपूर्ण घटनाक्रम नाकारला असून अशा प्रकारे गुन्हा घडला नसल्याचे नमूद केले होते.कालांतराने सदर खटला मे मोका न्यायाधीश साळुंखे यांच्या न्यायालयात चालवला गेला. त्यावेळी देखील फिर्यादीने संपूर्ण फिर्याद नाकारत गुन्हे शाखा आणि तपास यंत्रणेने दबाव टाकून फिर्याद नोंदवली तसेच संपूर्ण फिर्याद मे न्यायालयात शपथेवर नाकारली आणि अशी घटना घडली नसल्याचे कोर्टात सांगितले.
इतर सर्व साक्षीदार आणि पंच यांनी देखील या संपूर्ण घटनाक्रम नाकारला आहे. निलेश घायवळ या टोळीवर नुकतेच अनेक गुन्हे दाखल असून याबाबत मे उच्च न्यायालयात ॲड विपुल दुशिंग यांच्या वतीने निलेश घायवळ व इतर आरोपींनी रीट याचिका दाखल केल्या आहेत.
यावेळी आरोपींचे वकील ॲड विपुल दुशिंग यांनी निकालाचे स्वागत केले.अशा प्रकारचे निकाल हे सुदृढ न्यायव्यवस्थेचे प्रतीक आहेत अशी भावना व्यक्त केली व न्याय व्यवस्थेचे आभार मानले.






