DNA मराठी

ऑटोमोबाईल

मोठी बातमी! डबलडेकर बसला भीषण आग, 5 प्रवाशांचा जागीच मृत्यू

Double-decker Bus Fire : गुरुवारी सकाळी उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एक धक्कादायक घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, लखनऊमध्ये गुरुवारी सकाळी एका डबल डेकर बसला भीषण आग लागली, ज्यामध्ये 5 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. मोहनलालगंजजवळील किसान पथावर हा अपघात झाला. ही बस दिल्लीहून बिहारला जात होती आणि त्यात 60 हून अधिक प्रवासी होते. अपघाताच्या वेळी बहुतेक प्रवासी झोपेत होते. अचानक बस धुराने भरली तेव्हा सर्वांना जाग आली. आग लागल्यानंतर चालक आणि कंडक्टर बसमधून उड्या मारून पळून गेले. आपत्कालीन गेट उघडला नाही त्यामुळे प्रवाशांना बाहेर पडता आले नाही म्हणून अनेक प्रवासी बसमध्ये अडकले. आगीची परिस्थिती आणि बचाव कार्य बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी आजूबाजूचे लोक मदतीला आले. मात्र आग इतकी भीषण होती की, आगीच्या ज्वाळा 1 किलोमीटर अंतरापर्यंत दिसत होत्या. अग्निशमन दलाच्या 6 गाड्यांनी तासन्तास अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आणि तपास सुरू केला. आगीचे कारण एका प्रवाशाने सांगितले की, गिअरजवळील ठिणगीमुळे आग लागली. आगीमुळे बस अवघ्या 10 मिनिटांत पूर्णपणे जळून खाक झाली. दुसऱ्या प्रवाशाने सांगितले की, आग लागल्यानंतर बसमध्ये चेंगराचेंगरी झाली आणि त्याने त्याच्या पत्नीला उठवले आणि दोघेही बसमधून बाहेर पडले.

मोठी बातमी! डबलडेकर बसला भीषण आग, 5 प्रवाशांचा जागीच मृत्यू Read More »

“ऑनलाइन गेमचं विष पेरलंय – उद्याच्या दंगलींसाठी जमीन तयार!”

DNA मराठी विश्लेषण टीम: आपल्या देशातील तरुणांच्या हातात काम नाही. शिक्षण पूर्ण करूनही रोजगार नाही, उद्योग धंद्यांचे दरवाजे बंद आणि नवनवीन संधी निर्माण व्हायच्या ऐवजी हरवत चाललेल्या. अशा स्थितीत, तरुणांच्या हातात येतो तो स्मार्टफोन आणि ऑनलाइन गेमचा नसा. या गेम्सना केंद्र सरकारने अधिकृत परवानग्या दिल्या आहेत. कुणी म्हणेल, उद्योग चालावा म्हणून. कुणी म्हणेल, कर महसूल वाढावा म्हणून. पण खरी भीती ही आहे की यामागे आहे एक सूक्ष्म पण ठोस रणनीती – तरुणांना विचार करण्याच्या क्षमतेपासून दूर ठेवण्याची. गेम्स खेळल्याने काही केवळ ‘मनोरंजन’ होतंय का? नव्हे. मुले आता क्षुल्लक कारणांवरही रागावतात. चिडचिड करतात. संयम हरवतोय. संवाद हरवत चाललाय. निर्णय क्षमताही कमी झाली आहे. आपल्या आजूबाजूला वावरताना ते स्पष्ट जाणवतं. पूर्वीची खेळांची मैदानं ओस पडलीत, आणि डिजिटल रणांगणं गजबजलीयत. हा सर्व प्रकार कुठे तरी जाणीवपूर्वक घडतोय, अशी शंका का यावी? कारण समाजात शांत, विचारशील आणि सुज्ञ नागरिकांपेक्षा – संतापलेल्या, उत्तेजित, नेतृत्वाच्या नावावर उफाळून येणाऱ्या जमावाची गरज काही राजकीय शक्तींना अधिक असते. समाजात जेव्हा विचारसरणी कमकुवत होते, तर नेतृत्वासाठी विचार न करता झेंडा उचलणारे हात सहज तयार होतात आणि मग वेळ पडली की हेच तरुण, रस्त्यावर उतरवले जातात. कुणाच्या तरी घोषणांनी भारलेले, कुठल्या तरी मुद्द्यावर एकमुखाने ओरडणारे, पण प्रत्यक्षात त्या मुद्द्याच्या मुळाशी काय आहे हे न समजलेले. तरुण पिढीला रोजगाराच्या संधी न देता, त्यांच्या रचनात्मक ऊर्जेचा योग्य वापर न करता, त्यांना डिजिटल व्यसनात अडकवणं – हे आधुनिक काळातील ‘soft control’ आहे. हे केवळ सरकार किंवा व्यवस्थेच्या चुकीचं नव्हे, तर आपल्यालाही आरसा दाखवणारं वास्तव आहे. पालकांनी, शिक्षकांनी आणि समाजाने एकत्र येऊन, या धोरणांच्या पार्श्वभूमीचा विचार करणे आवश्यक आहे. कारण देशाचा खरा भविष्यकाळ ही त्याची विचार करणारी तरुण पिढी असते – आणि ती जर भावनिक, रागीट आणि विचारशून्य झाली, तर आपल्याला काळजी घ्यायलाच हवी.

“ऑनलाइन गेमचं विष पेरलंय – उद्याच्या दंगलींसाठी जमीन तयार!” Read More »

आनंदाची बातमी, एसटीत लवकरच नोकरभरती, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा

Pratap Sarnaik : एसटीत विभागात लवकरच मोठ्या प्रमाणात नोकरभरती होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. एसटीला आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी भविष्यात आपण 25 हजार स्वमालकीच्या बसेस घेत आहोत. या बसेसच्या चालविण्यासाठी आपल्याला मनुष्यबळाची गरज लागणार असून चालक तथा वाहक पदा बरोबरच अन्य काही वर्गातील पदे देखील येत्या काही वर्षात एसटी महामंडळात भरती केली जाणार आहेत. त्याबाबतच्या ठरावाला नुकतीच संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली. अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्री सरनाईक पुढे म्हणाले की, एसटी महामंडळाची तत्कालीन आर्थिक परिस्थिती लक्षात घेता माननीय उच्च न्यायालयाने एसटी महामंडळातील नोकर भरतीला सन. 2024 पर्यंत मनाई केली होती. तथापि, येत्या काही वर्षांमध्ये निवृत्त होणाऱ्या कर्मचारी यांची लक्षणिय संख्या लक्षात घेता, नव्या बसेस चालवण्यासाठी चालक तथा वाहक या पदासह अन्य कर्मचारी व अधिकाऱ्यांची भरती करणे अत्यंत आवश्यक असून याबाबतच्या ठरावाला एस टी महामंडळाच्या 307 व्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे. तसेच सदर प्रस्ताव शासनाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात वाढत्या चालनीय बस संख्येनुसार कर्मचाऱ्यांच्या नवीन आकृतीबंधाला मंजुरी घेण्यात येईल त्यानुसार पुढील भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. अभियंत्यांची रिक्त पदे भरणार सध्या एसटी महामंडळाच्या अनेक विभागांमध्ये कुशल मनुष्यबळाचा अभाव आहे. अनेक ठिकाणी चांगले शिक्षण अधिकारी आवश्यक असून विशेषतः भविष्यात पीपीपी तत्त्वावर विकसित होणाऱ्या एसटीच्या जागे बाबतीत बांधकाम विभागाकडे कुशल अभियंत्यांची गरज भासणार आहे. त्यामुळे सध्या रिक्त असलेल्या अभियंत्यांच्या जागा करार पद्धतीने आणि सरळ सेवा भरतीच्या माध्यमांतून भरण्यात येणार आहेत. नव्या नोकर भरतीच्या अनुषंगाने एसटीच्या प्रत्येक खात्यांनी आपल्या विभागातील रिक्त पदांचा फेर आढावा घेऊन आवश्यक असणाऱ्या पदांची भरती करणे संदर्भात एकत्रित मागणी सादर करावी, असे निर्देश संबंधित देण्यात आल्याची माहिती यावेळी मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

आनंदाची बातमी, एसटीत लवकरच नोकरभरती, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा Read More »

जीएसटी विभागात घोळ, गोपनीय माहितीची गळती होतेय; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप

Ambadas Danve : विधानपरिषद विरोध पक्षनेते अंबादास दानवे यांनी जीएसटी विभागात घोळ होत असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी जीएसटी नोंदणी संबंधित गोपनीय माहितीच्या गळतीच्या प्रकरणाची उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. जीएसटीसाठी अर्ज केलेल्या अनेक व्यावसायिकांना नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यावर विविध बँकांकडून सदर कंपनीच्या नावाने खाते उघडण्यासाठी फोन येण्यास सुरूवात झालेली आहे. जीएसटी विभागाकडे असलेली करदात्याची गोपनीय माहिती काही अधिकारी व कर्मचारी तृतीय पक्षांना देत असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. वस्तू व सेवा कर अधिनियम व संबंधित नियमांनुसार करदात्याची माहिती अत्यंत गोपनीय असून उक्त माहिती कोणत्याही परिस्थितीत बाह्य घटकांसोबत सामायिक करणे, ही बाब कायद्याची उल्लंघन करणारी आहे. या प्रकरणामध्ये करदात्याची माहिती तृतीय पक्षांपर्यंत पोहोचल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे. त्यामुळे या प्रकरणात विभागातील काही कर्मचाऱ्यांकडून माहितीची बेकायदेशीर विक्री किंवा गळती होत असल्याचा संशयही दानवे यांनी व्यक्त केला आहे. तसेच ग्राहकांची संवेदनशील माहिती ही व्यवसायिक स्पर्धकांपर्यंत पोहोचवली जात असल्याने निष्पक्ष व्यावसायिक स्पर्धेवरही विपरीत परिणाम होत असल्याचे दानवे यांनी म्हटले. ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून त्यामुळे शासन व कर प्रशासन यांच्याबाबत करदात्यांमध्ये अविश्वासाची भावना निर्माण झाली असल्याची बाब माझ्या निदर्शनास आली असल्याचे दानवे यांनी म्हटले. त्यामुळे या गंभीर प्रकरणाची उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. तसेच भविष्यात असे प्रकार घडू नयेत म्हणून योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणीही अंबादास दानवे यांनी वित्तमंत्री यांच्याकडे केली आहे.

जीएसटी विभागात घोळ, गोपनीय माहितीची गळती होतेय; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप Read More »

भारताने दिला पाकिस्तानला धक्का, 40 सैनिक मारले तर 100 हून अधिक दहशतवादी ठार

DGMO Rajiv Ghaiv : गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावा वाढत असून दोन्ही देशांकडून हवाई हल्ले करण्यात येत आहे. 7 ते 10 मे दरम्यान पाकिस्तानला दिलेल्या प्रत्युत्तरात भारताने पाकिस्तान सैन्याचे 35 – 40 सैनिक मारले असून तसेच 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले असल्याची माहिती लष्कराचे महासंचालक (डीजीएमओ) लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, म्हणाले की या काळात भारताने 5 शूर सैनिकही गमावले, परंतु या मोहिमेचे यश धोरणात्मक दृष्टिकोनातून ऐतिहासिक आहे. पाकिस्तानी सैन्यावर मोठा हल्ला डीजीएमओ म्हणाले की, पाकिस्तानकडून काही एअरफील्ड आणि गोदामांवर वारंवार हवाई हल्ले होत होते, जे भारतीय सैन्याने पूर्णपणे हाणून पाडले. 7 ते 10 मे दरम्यान, नियंत्रण रेषेवर तोफखाना आणि लहान शस्त्रांच्या गोळीबारात 35 ते 40 पाकिस्तानी सैनिक मारले गेले. ऑपरेशन सिंदूर दहशतवाद्यांचा अंत ठरला लेफ्टनंट जनरल राजीव घई म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर 7 आणि 8 मार्चच्या मध्यरात्री सुरू करण्यात आले. या अचूक आणि गुप्त कारवाईत, 100 हून अधिक दहशतवादी मारले गेले, ज्यात अनेक उच्च दर्जाच्या लक्ष्यांचा समावेश होता. डीजीएमओ म्हणाले की, आम्ही युसूफ अझहर, अब्दुल मलिक रौफ आणि मुदस्सीर अहमद सारख्या दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे जे आयसी-814 अपहरण आणि पुलवामा बॉम्बस्फोट यासारख्या हल्ल्यांमध्ये सहभागी होते.

भारताने दिला पाकिस्तानला धक्का, 40 सैनिक मारले तर 100 हून अधिक दहशतवादी ठार Read More »

शहीद सचिन वनंजे यांच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री अजित पवारांची सांत्वनपर भेट

India Pakistan War: नांदेड मधील देगलूर तालुक्यातील तमलूर गावाचे सुपुत्र, भारतीय लष्करातील शहीद जवान सचिन यादवराव वनंजे यांच्या कुटुंबीयांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देगलूर येथील त्यांच्या राहत्या घरी सांत्वनपर भेट घेतली. शहीद सचिन यांच्या कुटुंबीयांना शासनाच्यावतीने सर्वोतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही अजित पवार यांनी यावेळी दिली. आमदार प्रतापराव चिखलीकर, आमदार विक्रम काळे, आमदार जितेश अंतापूरकर, उपविभागीय अधिकारी अनुप पाटील, तहसीलदार भरत सूर्यवंशी, नगर परिषदेच्या मुख्याधिकारी नीलिमा कांबळे आदिंची यावेळी उपस्थिती होती. भारतीय लष्करातील जवान सचिन यांचा मृत्यू ही अतिशय दुःखद घटना आहे. सचिन यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. त्यांच्या कुटुंबीयांना शासनाच्या घरकुल योजनेतून घर दिले जाईल. त्यांच्या पत्नी वा भावाला नोकरी दिली जाईल. त्यांच्या मुलीच्या शिक्षण व उज्वल भविष्यासाठी शासनाच्यावतीने तरतूद करण्यात येईल. त्यांच्या पेन्शनची कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी स्वतः तहसीलदारांनी लक्ष द्यावे, अशी यावेळी सूचना करून अजित पवार यांनी करतानाच शहीद सचिन वनंजे यांना शहिदाचा दर्जा मिळावा यासाठी देखील शासन प्रयत्न करेल, असे स्पष्ट केले.

शहीद सचिन वनंजे यांच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री अजित पवारांची सांत्वनपर भेट Read More »

भारत-पाकिस्तान युद्ध, 15 पर्यंत बंद राहणार ‘या’ शहरातील विमानसेवा

Airport Closed: भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढत असलेल्या तणावात केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत 15 पर्यंत देशातील 32 शहरांची विमानसेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नागरी विमान वाहतूक नियामकानुसार, 9 आणि 10 मे च्या मध्यरात्रीपासून, श्रीनगर आणि अमृतसरसह देशाच्या उत्तर आणि पश्चिम भागातील 32 विमानतळ 15 मे पर्यंत नागरी उड्डाणांसाठी बंद करण्यात आले आहेत. शनिवारी सकाळी जाहीर करण्यात आलेला हा निर्णय 7 मे रोजी भारताने दहशतवादी छावण्यांवर केलेल्या हल्ल्यांपासून आणि त्यानंतर सीमावर्ती भागात पाकिस्तानने केलेल्या गोळीबारापासून भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी तणावाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) आणि संबंधित विमान वाहतूक अधिकाऱ्यांनी एअरमेनना सूचना (NOTAMs) ची मालिका जारी केली आहे, ज्यामध्ये उत्तर आणि पश्चिम भारतातील 32 विमानतळ सर्व नागरी उड्डाण ऑपरेशन्ससाठी तात्पुरते बंद करण्याची घोषणा करण्यात आली आहे. डीजीसीएने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, ही तात्पुरती बंदी 9 मे ते 15 मे पर्यंत सकाळी 5:29 वाजेपर्यंत लागू असेल. या विमानतळांमध्ये श्रीनगर, अंबाला, अमृतसर, अवंतीपूर, भूज, बिकानेर, भटिंडा, चंदीगड आणि जम्मू यांचा समावेश आहे. यामध्ये चंदीगड, श्रीनगर, अमृतसर, लुधियाना, भुंतर, किशनगड, पटियाला, शिमला, धर्मशाला, भटिंडा, जैसलमेर, जोधपूर, लेह, बिकानेर, पठाणकोट, जम्मू, जामनगर आणि भुज येथील विमानतळांचा समावेश आहे. “भारतातील अनेक विमानतळ बंद करण्याबाबत विमान वाहतूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेनंतर, जम्मू, श्रीनगर, लेह, जोधपूर, अमृतसर, चंदीगड, भुज, जामनगर आणि राजकोटला जाणारी एअर इंडियाची उड्डाणे 15 मे रोजी सकाळी 5.29 वाजेपर्यंत रद्द करण्यात येत आहेत,” असे एअरलाइनने ‘एक्स’ वरील पोस्टमध्ये म्हटले आहे. एअर इंडियाने असेही म्हटले आहे की या कालावधीत प्रवासासाठी वैध तिकिटे असलेल्या ग्राहकांना रीशेड्युलिंग शुल्कात एक वेळ सूट दिली जाईल किंवा रद्द केल्यास पूर्ण परतफेड दिली जाईल. इंडिगोने ‘एक्स’ वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की संबंधित अधिकाऱ्यांच्या ताज्या सूचनांनुसार, विमानतळ तात्पुरते बंद असल्याने 15 मे रोजी सकाळी 5.29 वाजेपर्यंत 10 ठिकाणांवरील सर्व उड्डाणे रद्द राहतील.

भारत-पाकिस्तान युद्ध, 15 पर्यंत बंद राहणार ‘या’ शहरातील विमानसेवा Read More »

जैसलमेर-बाडमेर सीमेवर रेड अलर्ट, पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले

India vs Pakistan : गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढत असलेल्या तणावामुळे पाकिस्तानकडून भारताच्या सीमेलगतच्या शहरांवर ड्रोन हल्ले करण्यात येत आहे तर दुसरीकडे भारत देखील या हल्ल्यांना प्रत्युत्तर देत आहे. तर आता ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या घटनांनंतर जैसलमेर, बारमेर, श्रीगंगानगर आणि हनुमानगडसह अनेक जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून श्रीगंगानगरमध्ये वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे, तर इतर जिल्ह्यांमध्ये रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित होत आहे. बाडमेरच्या उत्तरलाई भागातील स्थानिकांनी सकाळी आकाशातून जळत्या वस्तू पडताना पाहिल्या. प्रत्यक्षदर्शींच्या मते, या वस्तू मोठ्या स्फोटाने जमिनीवर पडल्या आणि त्यांचे तुकडे काही भागात आढळले. लष्कराने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, परिसर सुरक्षित केला आणि तपास सुरू केला. जैसलमेर, बारमेर आणि बिकानेरमध्ये क्षेपणास्त्रे डागली जैसलमेर, बारमेर आणि बिकानेरमध्येही क्षेपणास्त्रासारख्या वस्तू पडल्याचे वृत्त आहे. त्याच वेळी, पाकिस्तानने सलग दुसऱ्या रात्री जैसलमेर आणि बारमेरमधील भारतीय लष्करी तळांना लक्ष्य केले, परंतु भारतीय सैन्याने हवेत हे हल्ले उधळून लावले. एमबीबीएस आणि नर्सिंगच्या परीक्षा रद्द या तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेता, राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे आणि पंचायत राज पोटनिवडणुका पुढे ढकलल्या आहेत. यासोबतच, राजस्थान आरोग्य विज्ञान विद्यापीठाने एमबीबीएस आणि नर्सिंग परीक्षाही पुढील आदेशापर्यंत पुढे ढकलल्या आहेत. राजस्थानमधील 5 विमानतळ 14 मेपर्यंत बंद हवाई क्षेत्राची सुरक्षितता लक्षात घेऊन, बिकानेर, जैसलमेर, जोधपूर, किशनगड आणि उत्तरलाई विमानतळ 14 मे पर्यंत बंद करण्यात आले आहेत. सैन्याच्या सतर्कतेमुळे आणि सतर्कतेमुळे मोठा धोका टळला आहे, परंतु सीमावर्ती भागात भीतीचे वातावरण अजूनही कायम आहे.

जैसलमेर-बाडमेर सीमेवर रेड अलर्ट, पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले Read More »

चारधाम यात्रेदरम्यान मोठी दुर्घटना, 5 भाविकांचा मृत्यू

Chaar Dham Yatra : उत्तरकाशी जिल्ह्यातील गंगोत्री धामजवळ खासगी हेलिकॉप्टर कोसळले असल्याची माहिती समोर आली आहे. भागीरथी नदीच्या काठावरील नाग मंदिराखाली हेलिकॉप्टर अचानक खाली पडल्याने हा अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे आणि दोन जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. चारधाम यात्रा 30 एप्रिलपासून सुरू झाली आहे आणि लाखो भाविक उत्तराखंडच्या चार धामकडे जात आहेत. हेलिकॉप्टरमध्ये कोण कोण होते? हेलिकॉप्टरमध्ये एकूण सात जण होते, ज्यात एक पायलट आणि सहा प्रवासी होते. त्या वैमानिकाचे नाव कॅप्टन रॉबिन सिंग असल्याचे सांगितले जात आहे. उर्वरित प्रवाशांची ओळख खालीलप्रमाणे झाली आहे: विनीत गुप्ता अरविंद अग्रवाल विपिन अग्रवाल पिंकी अगरवाल रश्मी किशोर जाधव त्यामध्ये दोन महिलांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. हे सर्व भाविक चारधाम यात्रेसाठी आले होते. अपघाताचे कारण काय? गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंडमध्ये हवामान खराब आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पाऊस, गारपीट आणि गडगडाट होत आहे. हवामान खात्याने अनेक जिल्ह्यांमध्ये आधीच अलर्ट जारी केला होता. या अपघातामागे खराब हवामान हे एक मोठे कारण असू शकते असे मानले जात आहे. बचाव कार्य सुरू अपघाताची माहिती मिळताच पोलिस, लष्कर, आपत्ती व्यवस्थापन क्यूआरटी टीम, रुग्णवाहिका आणि प्रशासन घटनास्थळी पोहोचले. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे. त्याच वेळी, उर्वरित लोकांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी आणि अपघाताची चौकशी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या अपघातामुळे चार धाम यात्रेसाठी आलेल्या यात्रेकरूंना धक्का बसला आहे. जिथे एकीकडे श्रद्धा आणि श्रद्धेने प्रवास सुरू होता, तिथे आता भीती आणि दुःखाचे वातावरण आहे. हवामानाची माहिती घेऊनच प्रवास करण्याचे आणि सुरक्षित मार्गांचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून लोकांना केले जात आहे.

चारधाम यात्रेदरम्यान मोठी दुर्घटना, 5 भाविकांचा मृत्यू Read More »

HPCL च्या सॅप प्रणालीमध्ये तांत्रिक अडचण, इंधन पुरवठा विस्कळीत

HPCL Petrol: हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) या ऑईल कंपनीच्या सॅप प्रणालीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मागील 36 तासांपासून कंपनीचे पेट्रोल व डिझेल पुरवठा यंत्रणा ठप्प झाली आहेत. या अडचणीमुळे इंधन पुरवठा करणाऱ्या HPCL च्या देशभरातील सर्व डेपोमधून पेट्रोल पंप ला पुरवठ्याचे कामकाज ठप्प झालेले असून, परिणामी अनेक पेट्रोल पंपांवरील इंधन पुरवठा विस्कळीत झाला आहे. कंपनीचे तांत्रिक तज्ञ सदर प्रणाली पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर करत असून, त्याचप्रमाणे सदर पुरवठा हा मॅन्युअल मोडमध्ये देखील सुरळित करण्याचे काम सुरू आहे परंतु सर्व प्रणाली संलग्न असल्याने त्यात देखील पाहिजे तशी सुधारणा होत नाहीये. त्यात सुधारणा न झाल्यास सर्व स्थिती सुरळीत होण्यासाठी अंदाजे आणखी 48 तास लागू शकतात. नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी घाबरून जाऊ नये. ही केवळ तांत्रिक अडचण असून, पेट्रोल अथवा डिझेल याची कोणतीही टंचाई नाही. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम यांसारख्या इतर कंपन्यांचे वितरण सुरळीत सुरू असून इंधन सहज उपलब्ध आहे. तरी कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये आणि संयम राखावा इतर पंपावर गर्दी करू नये कोणत्याही प्रकारची इंधन टंचाई झालेली नाही केवळ तांत्रिक प्रणाली सदोष झाल्याने अडचण निर्माण झालेली आहे सर्व परिस्थिती लवकरच सामान्य होईल. अशी माहिती अमित गुप्ता अध्यक्ष फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्रा पेट्रोल डीलर्स असोसिएशन यांनी दिली आहे.

HPCL च्या सॅप प्रणालीमध्ये तांत्रिक अडचण, इंधन पुरवठा विस्कळीत Read More »