Dnamarathi.com

Ahmednagar Shivaji Maharaj Statue : ऐतिहासिक अहमदनगर शहरातील महानगरपालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात येणार आहे. 

 या पुतळ्याचे अनावरण मराठा समाजाच्या हक्कासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते करण्यात यावे अशी मागणी पालिका सभागृहात नगरसेविका शिला दीप चव्हाण यांनी केली आहे. तसेच मनपा आयुक्त व महापौर यांना देखील त्यांनी या मागणीचे पत्र दिले आहे.

त्यांनी या निवेदनात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व समाजाला बरोबर घेऊन आदर्श राज्याची निर्मिती केली आहे. यामुळे त्यांचा महापालिकेत बसविण्यात आलेला पुतळा सर्वांना प्रेरणा व ऊर्जा देणारा आहे.

अहमदनगर महापालिका प्रशासनाने गुरुवारी (दि.21 डिसेंबर) रोजी महानगरपालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचे नियोजन केले आहे.

 या पुतळ्याचे अनावरण मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते झाल्यास सर्व नगरकरांना आनंद होईल.मनोज जरांगे पाटील यांनी समाजाला आरक्षण मिळावा यासाठी स्वत:च्या मालकीची जमीन विकून संघर्ष करत आहे. यामुळे ते एक लढवय्ये कार्यकर्ते आहे. आज समाजासाठी सर्वस्वी त्याग करण्याची त्यांची भूमिका आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *