Ram Shinde on Rohit Pawar : नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विधान परिषदेचे सभापती राम शिंदे प्रथमच रिंगणात उतरणार असल्याने ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. यावर प्रतिक्रिया देताना आमदार रोहित पवार म्हणाले निवडणुकीपूर्वी चर्चा होतातच पण ऐनवेळी मोठे बदल दिसतात. काही लोक स्वतःचे महत्त्व वाढवून तडजोडी करण्यासाठीच चर्चा आणि आवाज करतात.
या रोहित पवारांच्या टीकेला उत्तर देताना सभापती राम शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. शिंदे म्हणाले, माझ्यासाठी ही पहिलीच जिल्हा बँक निवडणूक असल्याने ती सोपी की अवघड, हे मला माहिती नाही. निवडणूक ही निवडणूकच असते. पण स्वतःचा मतदार संघ सोडून जे लोकप्रतिनिधी पाच महिने सहा महिने संपूर्ण राज्यभर फिरतात आणि महत्व कमी करण्यासाठी फिरतात.
त्यामुळे रोहित पवारांची सूचना योग्य मानून मी निवडणुकीचा सखोल अभ्यास करूनच मैदानात उतरणार असल्याचे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी म्हटले.






