Nana Patekar Death : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण महाराष्ट्रासह हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. वयाच्या ७५व्या वर्षी नाना पाटेकर यांनी गोव्यातील डोना पावला येथील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या शेवटच्या काही तासांमध्ये नेमकं काय घडलं, याची माहिती समोर आली आहे.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर यांनी मध्यरात्रीनंतर आपल्या एका मित्राला आपण अस्वस्थ असल्याचा संदेश पाठवला होता. मात्र, तो संदेश मित्राच्या निदर्शनास लगेच आला नाही. त्यानंतर काही वेळातच परिस्थिती गंभीर झाली.
रात्री 2.30 वाजता मित्राला मेसेज
नाना पाटेकर यांनी रात्री साधारण २.३० वाजता आपल्या मित्राला मेसेज करून अस्वस्थ वाटत असल्याचे सांगितले होते. त्यांना शरीराच्या डाव्या बाजूला, विशेषतः छातीच्या भागात वेदना जाणवत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र हा मेसेज त्यावेळी मित्राने पाहिला नव्हता. पहाटेच्या सुमारास त्याच्या निदर्शनास हा संदेश आला आणि त्याने तातडीने नाना पाटेकर यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला.
पहाटे 4 वाजता मित्र नानांच्या घरी पोहोचला
मेसेज पाहिल्यानंतर नानांचा मित्र पहाटे सुमारे ४ वाजता त्यांच्या डोना पावला येथील घरी पोहोचला. त्यावेळी नाना पाटेकर यांची प्रकृती अत्यंत गंभीर झाली होती. ते जमिनीवर पडलेले आणि प्रतिसाद देत नसल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांच्या केअरटेकरच्या मदतीने तातडीने रुग्णवाहिका बोलावण्यात आली. नाना पाटेकर यांना रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांना सीपीआर देण्यास सुरुवात करण्यात आली होती. रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेत असतानाही त्यांच्यावर उपचार सुरू होते.
पहाटे 4.20 वाजता रुग्णालयात दाखल
नाना पाटेकर यांचे निवासस्थान मणिपाल रुग्णालयापासून काही मिनिटांच्या अंतरावर होते. पहाटे साधारण ४.२० वाजता त्यांना मणिपाल रुग्णालयात आणण्यात आले. रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. सीपीआर आणि कार्डियाक मसाजसह जवळपास ४५ मिनिटे त्यांना पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र उपचारांना त्यांचा प्रतिसाद मिळाला नाही.
पहाटे 5.20 वाजता मृत घोषित
सर्व वैद्यकीय प्रयत्न करूनही नाना पाटेकर यांची हृदयाची हालचाल पुन्हा सुरू होऊ शकली नाही. अखेर पहाटे ५.२० वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. डॉक्टरांच्या प्राथमिक माहितीनुसार त्यांचा मृत्यू कार्डियाक अरेस्टमुळे झाला. मणिपाल रुग्णालयाचे डॉक्टर डॉ. शेखर साळकर यांनी सांगितले की, नाना पाटेकर यांना रुग्णालयात आणण्यात आले तेव्हा त्यांची अवस्था अत्यंत गंभीर होती. डॉक्टरांनी शक्य ते सर्व प्रयत्न केले, मात्र त्यांना वाचवता आले नाही.
मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनानंतर स्पष्ट होणार
नाना पाटेकर यांच्या मृत्यूचे प्राथमिक कारण कार्डियाक अरेस्ट असल्याचे डॉक्टरांनी सांगितले असले तरी त्यामागील नेमके वैद्यकीय कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. नाना पाटेकर हे रुग्णालयाचे नियमित नोंदणीकृत रुग्ण नसल्याने या प्रकरणाची मेडिको-लीगल केस (MLC) म्हणून नोंद करण्यात आली. त्यांचे पार्थिव गोवा मेडिकल कॉलेजमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. शवविच्छेदनानंतर मृत्यूच्या परिस्थितीबाबत अधिक स्पष्ट माहिती मिळण्याची शक्यता आहे.
अवघ्या तीन तासांत सगळं संपलं…
रात्री २.३० वाजता अस्वस्थ वाटत असल्याचा मित्राला मेसेज करणारे नाना पाटेकर काही तासांतच काळाच्या पडद्याआड गेले. पहाटे ४ वाजता मित्र त्यांच्या घरी पोहोचला, त्यानंतर रुग्णवाहिका आणि सीपीआरची धडपड सुरू झाली. ४.२० वाजता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि जवळपास ४५ मिनिटांच्या प्रयत्नांनंतरही पहाटे ५.२० वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले.
नाना पाटेकर यांच्या अचानक निधनामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या दमदार अभिनयाची शैली, प्रभावी संवादफेक आणि ‘नटसम्राट’, ‘क्रांतिवीर’, ‘परिंदा’ यांसारख्या चित्रपटांमधील भूमिका रसिकांच्या कायम स्मरणात राहतील.






