Vikram Pachpute : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचे पुणे या ठिकाणी सुरू असलेले आंदोलन हे आंदोलन राहिलेलं नसून रोहित पवार नाईट्स असल्याचा आरोप भाजपाचे आमदार विक्रम पाचपुते यांनी केला आहे. नाईट शिफ्टमध्ये हे आंदोलन सुरू आहे. दिवसभर तिथे फक्त 50, 100 लोक असतात हे काँग्रेस राष्ट्रवादीचे आंदोलन आहे.
खासदार ओम राजे निंबाळकर हे आंदोलन स्थळी पोहोचले असता त्यांना विद्यार्थ्यांनी ट्रोल केलं असल्याचा आरोप देखील भाजपाचे आमदार विक्रम पाचपुते यांनी केला. आंदोलन स्थळावर एंटरटेनमेंट असतं तिथं कॉमेडीयन येऊन गेले आहेत तिथे वेगवेगळे गाणी होतात आता हे आंदोलन फक्त करमणुकीचे साधन राहिले आहे.
रोहित पवार फक्त फार्स करतात, त्यांना लवकरच काँग्रेसमध्ये जायचं यासाठी त्यांचा आटापिटा सुरू आहे. त्यांना दिल्लीच्या नेतृत्वाला खुश करायचं महाराष्ट्राचे नवीन पप्पू तयार होता येते असं म्हणायला काही हरकत नाही असं म्हणत आमदार रोहित पवार यांच्यावरती भाजपचे आमदार विक्रम पाचपुते यांनी टीका केली.






