Rahul Gandhi: राहुल गांधींच्या कार्यक्रमापूर्वी पुण्यात विद्यार्थी संघटनांमध्ये राडा; ABVP-NSUI आमनेसामने

rahul gandhi on election comission

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत शनिवारी पुण्यात ‘छात्रों की गूंज’ या विद्यार्थी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आरटीओ कार्यालय परिसरातील एसएसपीएमएसच्या मैदानावर दुपारी ४.३० ते रात्री ९.३० या कालावधीत हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमासाठी पोलिसांकडून काही अटी आणि नियमांच्या अधीन राहून परवानगी देण्यात आली आहे. मात्र, कार्यक्रमाच्या आदल्या रात्रीच विद्यार्थी संघटनांमध्ये झालेल्या वादामुळे काही काळ तणाव निर्माण झाला.

शुक्रवारी रात्री सीओईपी महाविद्यालयाच्या वसतिगृह परिसरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) आणि काँग्रेसशी संबंधित एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांमध्ये शुल्काच्या मुद्द्यावरून वाद झाला. सुरुवातीला झालेल्या शाब्दिक वादाचे रूपांतर घोषणाबाजी आणि गोंधळात झाले. दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेनंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही घटनास्थळी जाऊन परिस्थितीची माहिती घेतली.

दरम्यान, राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्थेसाठी विशेष नियोजन केले आहे. कार्यक्रमस्थळी आक्षेपार्ह फलक अथवा चित्रे लावू नयेत, तसेच कोणत्याही धर्माच्या भावना दुखावतील अशी वक्तव्ये होणार नाहीत याची काळजी घेण्याच्या सूचना आयोजकांना देण्यात आल्या आहेत.

या कार्यक्रमासाठी आतापर्यंत सुमारे ४२ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याची माहिती आहे. प्रत्यक्ष कार्यक्रमाला दहा हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मोठ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मैदानाच्या परिसरात सुमारे ५०० पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर वाहतुकीवर परिणाम होऊ नये यासाठी सुमारे ७०० वाहतूक पोलिसांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.

विद्यार्थी संघटनांमधील ताजा वाद आणि राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाला अपेक्षित असलेली मोठी गर्दी पाहता, पोलिसांकडून संपूर्ण परिसरावर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *


Fatal error: Uncaught Error: Class "Elementor\Plugin" not found in /home/u374334301/domains/dnamarathi.com/public_html/wp-content/plugins/essential-addons-for-elementor-lite/includes/Traits/Elements.php:454 Stack trace: #0 /home/u374334301/domains/dnamarathi.com/public_html/wp-includes/class-wp-hook.php(324): Essential_Addons_Elementor\Classes\Bootstrap->render_global_html() #1 /home/u374334301/domains/dnamarathi.com/public_html/wp-includes/class-wp-hook.php(348): WP_Hook->apply_filters() #2 /home/u374334301/domains/dnamarathi.com/public_html/wp-includes/plugin.php(517): WP_Hook->do_action() #3 /home/u374334301/domains/dnamarathi.com/public_html/wp-includes/general-template.php(3208): do_action() #4 /home/u374334301/domains/dnamarathi.com/public_html/wp-content/themes/astra/footer.php(33): wp_footer() #5 /home/u374334301/domains/dnamarathi.com/public_html/wp-includes/template.php(810): require_once('/home/u37433430...') #6 /home/u374334301/domains/dnamarathi.com/public_html/wp-includes/template.php(745): load_template() #7 /home/u374334301/domains/dnamarathi.com/public_html/wp-includes/general-template.php(92): locate_template() #8 /home/u374334301/domains/dnamarathi.com/public_html/wp-content/themes/astra/single.php(39): get_footer() #9 /home/u374334301/domains/dnamarathi.com/public_html/wp-includes/template-loader.php(113): include('/home/u37433430...') #10 /home/u374334301/domains/dnamarathi.com/public_html/wp-blog-header.php(19): require_once('/home/u37433430...') #11 /home/u374334301/domains/dnamarathi.com/public_html/index.php(17): require('/home/u37433430...') #12 {main} thrown in /home/u374334301/domains/dnamarathi.com/public_html/wp-content/plugins/essential-addons-for-elementor-lite/includes/Traits/Elements.php on line 454