Nilesh Lanke : महावितरणच्या कथित निष्काळजी व जनविरोधी कारभारामुळे नागरिक, शेतकरी, व्यापारी आणि ग्राहकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांच्या पार्श्वभूमीवर खासदार नीलेश लंके यांनी आज अहिल्यानगर येथील महावितरण कार्यालयासमोर तीव्र जनआंदोलन करण्यात आले. दरम्यान चाणक्य चौकातून पदयात्रा काढत छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत हा मोर्चा महावितरण कार्यालयात धडकला. यावेळी अहिल्यानगर शहरातील स्टेशन रोड येथील आनंदनगर परिसरात एका साडेतीन वर्ष चिमुरडीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. त्या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे. अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. तसेच मतदारसंघातील अनेक भागांत सुरू असलेले अघोषित व अनियमित लोडशेडिंग, जळालेले ट्रान्सफॉर्मर (डीपी) वेळेत न बदलणे, स्मार्ट मीटरमुळे वाढीव व चुकीची वीजबिले, अतिवृष्टी व वादळामुळे नुकसान झालेल्या वीज यंत्रणेची रखडलेली दुरुस्ती, सौरऊर्जा व नेट मीटरिंग प्रकरणांतील विलंब, तक्रार निवारण यंत्रणेचे अपयश, कृषी वीजजोडणीतील विलंब आणि देखभालीच्या अभावामुळे निर्माण होणारे वारंवार तांत्रिक बिघाड या प्रमुख प्रश्नांकडे त्यांनी निवेदनातून लक्ष वेधले आहे.
NDA सोबत जाणार नाही
राष्ट्रवादी पक्षाच्या कोणत्याही गुप्त बैठका झाल्या नाही तसेच जयंत पाटील व विनोद तावडे यांची भेट ही कामनिमित्त झाली असेल आमच्या देखील भेटीगाठी होत असतात. यामुळे त्या राजकोट चर्चा झाल्या असे नसते. तसेच शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो यामुळे वरिष्ठांना निर्णय काय असतो यावर आम्ही विश्वास ठेवतो . यामुळे या चर्चांवर भाष्य करणे लंके यांनी टाळले. विरोधकांना निधी मध्ये डावलले जात असल्याचे याबाबत खुद्द लंके यांनी देखील खंत व्यक्त केली. विरोधकांना निधी कसा मिळणार नाही याकडे सत्ताधाऱ्यांकडून डावपेच आखले जातात. मात्र सत्ताधाऱ्यांनी राज्याचा विकास कसा होईल यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असते . सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे समान निधी मिळला पाहिजे अशी मागणी देखील खासदार निलेश लंके यांनी केली.






