DNA मराठी

Chhatrapati Sambhajinagar : वडापावच्या दुकानाला भीषण आग; 5 लाखांचे साहित्य खाक

chhatrapati sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar : शहरातील मध्यवर्ती आणि नेहमी गजबजलेल्या जुबली पार्क परिसरात बुधवारी सकाळी भीषण आगीची घटना घडली. येथील एका प्रसिद्ध वडापावच्या दुकानाला अचानक आग लागली. आगीदरम्यान दुकानातील गॅस सिलेंडरचा प्रचंड स्फोट झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आणि नागरिकांची पळापळ झाली.

घटनेची माहिती मिळताच पदमपुरा मुख्य अग्निशमन केंद्र तसेच एन-९ अग्निशमन केंद्राचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने तत्परतेने आगीवर नियंत्रण मिळवल्याने पुढील मोठी दुर्घटना टळली.

या आगीत दुकानातील मौल्यवान साहित्य जळून खाक झाले असून सुमारे ५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असल्याची माहिती अशोक खांडेकर, मुख्य अग्निशमन अधिकारी, मनपा छत्रपती संभाजीनगर यांनी दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *