Ahilyanagar News : उन्हाळ्याची तीव्रता वाढल्यामुळे अहिल्यानगर ल्ह्यातील ग्रामीण भागात पाणी टंचाईचे संकट अधिक गडद झाले आहे. जिल्ह्यातील एकूण ९२ गावे आणि तब्बल ५०० वाड्या-वस्त्यांवर सध्या तीव्र टंचाई जाणवत आहे.
या गावे वाड्या वस्त्यांवरील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती थांबवण्यासाठी प्रशासना कडून ७३ टँकर्सद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. यामध्ये १२ शासकीय आणि ६२ खासगी टँकरचा समावेश असून, याद्वारे यातील सुमारे १ लाख ४१२२ लोकसंख्येची तहान भागवली जात आहे.
तसेच नगर तालुक्यातील काही गावांना उन्हाळ्यामध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून जानेवारी फेब्रुवारी पासूनच या परिसरात पाणीटंचाई जाणवू लागते नगर तालुक्यातील बहिरवाडी या गावात पाणी टंचाई तीव्र झाले असून पाण्याचे टँकर दर चार ते पाच दिवसांनी येत असलं तरी तो गावाला पूर्णपणे पाणी देऊ शकत नाही
त्यामुळे अनेक गावकऱ्यांना दीड हजार रुपयापर्यंत पाण्याचा टँकर विकत घ्यावा लागतो तर काही परिसरात पाण्याचे टँकर येत नसल्यामुळे ग्रामस्थ आता आक्रमक झाले आहे.दरम्यान, जलजीवन योजने अंतर्गत जिल्ह्यात ९०० कोटींवर खर्च होऊनही जिल्ह्यातील ९२ गावे आणि ५०० वाड्यांना ७३ टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे.
त्यामुळे जलजीवन पाणी योजना जिल्ह्यासाठी एक मृगजळ ठरत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पाणीटंचाईवर कायमस्वरूपी केव्हा तोडगा निघणार असा प्रश्न टंचाईग्रस्त गावांतील नागरिक करीत आहेत.






