Chandrashekhar Bawankule : ‘लँड टायटलिंग ॲक्ट’ जुलैमध्ये लागू होणार; महाराष्ट्र ठरणार देशातील पहिले राज्य

chandrashekhar bawankule

Chandrashekhar Bawankule : ‘लँड टायटलिंग ॲक्ट’ येत्या जुलै महिन्यात राज्यात लागू होणार असून असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे. या कायद्यामुळे राज्यातील १४ कोटी जनतेची मालमत्ता ही निश्चित प्रॉपर्टी म्हणून गणली जाणार असून जगातील कुठल्याही देशात ती कॅश करता येईल, असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

बावनकुळे म्हणाले, स्वर्गीय डॉ. पतंगराव कदम यांनी शिक्षण क्षेत्रात उभारलेले कार्य हे महाराष्ट्राच्या अभिमानाचे प्रतीक आहे. ‘गल्लीतली शाळा’ ते भारती विद्यापीठाला जागतिक स्तरावर नेण्याचा संकल्प केला आणि तो पूर्ण करून दाखवला. त्यांच्या विचारांचा प्रकाश आज देश-विदेशात पोहोचत आहे.

ते म्हणाले, शिक्षणाशिवाय विकसित भारताची संकल्पना पूर्ण होऊ शकत नाही. राज्य शासनाने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) धोरण राबवून दीड हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार केले आहेत. तसेच दीड लाख विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता ( ए. आय)तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. आगामी काळात विद्यापीठांनी तंत्रज्ञान आणि ए.आय. स्वीकारणे अत्यावश्यक आहे.

विद्यार्थ्यांना शैक्षणिक कागदपत्रांसाठी कोणत्याही स्टॅम्प पेपरची आवश्यकता राहिलेली नसून विविध प्रमाणपत्रे विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान’ अंतर्गत राज्यातील ३० लाख विद्यार्थ्यांपर्यंत आवश्यक कागदपत्रे मोफत पोहोचविण्याची व्यवस्था उभी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान प्रशासन हीच छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा असल्याचे सांगत सरकारने समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले पाहिजे, असेही ते म्हणाले. नागपूर येथे भारती विद्यापीठाचा विस्तार व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी आवश्यक जागा व शासनस्तरीय सहकार्य देण्याची ग्वाही दिली. तसेच ‘टिटबिट पॉलिसी’च्या माध्यमातून अडचणीत असलेल्या भूखंडांचा मार्ग काढण्याबाबतही सकारात्मक भूमिका मांडली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *


Fatal error: Uncaught Error: Class "Elementor\Plugin" not found in /home/u374334301/domains/dnamarathi.com/public_html/wp-content/plugins/essential-addons-for-elementor-lite/includes/Traits/Elements.php:454 Stack trace: #0 /home/u374334301/domains/dnamarathi.com/public_html/wp-includes/class-wp-hook.php(324): Essential_Addons_Elementor\Classes\Bootstrap->render_global_html() #1 /home/u374334301/domains/dnamarathi.com/public_html/wp-includes/class-wp-hook.php(348): WP_Hook->apply_filters() #2 /home/u374334301/domains/dnamarathi.com/public_html/wp-includes/plugin.php(517): WP_Hook->do_action() #3 /home/u374334301/domains/dnamarathi.com/public_html/wp-includes/general-template.php(3208): do_action() #4 /home/u374334301/domains/dnamarathi.com/public_html/wp-content/themes/astra/footer.php(33): wp_footer() #5 /home/u374334301/domains/dnamarathi.com/public_html/wp-includes/template.php(810): require_once('/home/u37433430...') #6 /home/u374334301/domains/dnamarathi.com/public_html/wp-includes/template.php(745): load_template() #7 /home/u374334301/domains/dnamarathi.com/public_html/wp-includes/general-template.php(92): locate_template() #8 /home/u374334301/domains/dnamarathi.com/public_html/wp-content/themes/astra/single.php(39): get_footer() #9 /home/u374334301/domains/dnamarathi.com/public_html/wp-includes/template-loader.php(113): include('/home/u37433430...') #10 /home/u374334301/domains/dnamarathi.com/public_html/wp-blog-header.php(19): require_once('/home/u37433430...') #11 /home/u374334301/domains/dnamarathi.com/public_html/index.php(17): require('/home/u37433430...') #12 {main} thrown in /home/u374334301/domains/dnamarathi.com/public_html/wp-content/plugins/essential-addons-for-elementor-lite/includes/Traits/Elements.php on line 454