Dnamarathi.com

Akshay Shinde :  बदलापूरच्या एका नामांकित शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झालाय. हा एन्काउंटर कसा झाला याचा माहिती आता समोर येत आहे. 

सोमवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास पोलीस अक्षय शिंदेला ट्रान्सिट रिमांडसाठी नेते होते. त्याचे पत्नीने केलेल्या लैंगिक अत्याचाराप्रकरणात हे रिमांड होते. याप्रकरणात चौकशीसाठी नेण्यात येत होते. तळोजा जेलमधून त्याला बदलापूरकडे नेण्यात येत होते.

साधारण साडेसहाच्या सुमारास पोलिसांची गाडी मुंब्रा बायपास जवळ आली. तेव्हा आरोपीने एका कॉन्स्टेबलच्या हातातून बंदूक हिसकावून गोळीबार सुरू केला. त्यातील एक गोळी एपीआय निलेश मोरे यांच्या पायाला लागली. त्यानंतर निलेश मोरे यांनी स्वसंरक्षणासाठी तीन गोळ्या झाडल्या. यामध्ये शिंदे हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी कळवा रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरनी शिंद याला मृत घोषित केलंय. तर जखमी एपीआय निलेश मोरेंवर सध्या उपचार सुरू आहेत. या प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

तर या प्रकरणावरून आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले असून, थेट देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे हे प्रकरणावरून राजकारण तापणार हे नक्की.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *