Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणुन मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणला बसले आहेत.
त्यांची तबीयत खराब होत असल्याने त्याच्या समर्थनार्थ अहमदनगर शहरात मराठा समाज्याच्या कार्यत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळाला हार घालुन शहरात उघडलेली दुकान बंद करण्यासाठी गांधीगिरी करत गुलाबाचे फुल देऊन दुकान बंद करण्याचे आव्हान करत शहरात रॅली काढण्यात आली होती. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मराठा समाज्याला आरक्षण ओबीसी कोट्यातुन आरक्षण मिळावे या मागणीसाठी पुन्हा एकदा त्यांनी उपोषणला सुरूवात केली.
गेल्या सहा दिवसापासुन सुरू असलेल्या उपोषणावर राज्य सरकारकडून दखल घेतली जात नसल्याने राज्यभर बंदची हाक देण्यात आली होती.
अहमदनगर शहरात बंदला संमिश्र पाठिंबा मिळत असल्याने मराठा समाज्याच्या कार्यकर्त्यानी गांधीगिरी करत सुरू असलेल्या दुकान मालकांना गुलाबाचे फुल देत दुकान बंद ठेवण्याचे आव्हान करण्यात आले.