Dnamarathi.com

PM Kisan Samman Nidhi: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले आहे. 

मात्र आता शेतकऱ्यांसाठी एक दिलासा बातमी समोर आली आहे.  आज पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणार आहे.

होय, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. यासोबतच ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेचे दुप्पट पैसेही राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहेत. म्हणजेच राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण 6000 रुपये जमा होणार आहे.

पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या काळात पंतप्रधान किसान सन्मान निधीसोबतच राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचे पैसेही शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जातील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते किसान सन्मान निधीच्या 16व्या हप्त्याचे वितरण करतील. त्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आणखी एक भेट मिळणार आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना राज्य आणि केंद्राकडून मिळून 6000 रुपये मिळतील.

राज्यातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे 2000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता म्हणजे एकूण 4000 रुपये मिळणार आहेत. म्हणजेच आज राज्यातील शेतकऱ्यांना एकूण 6000 रुपये दिले जाणार आहेत.

महाराष्ट्रातील सुमारे 88 लाख पात्र शेतकरी कुटुंबांच्या आधार लिंक बँक खात्यात 6,000 रुपये थेट जमा केले जातील. शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.

नमो शेतकरी योजना काय आहे?

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने राज्यात नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 86 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना दरवर्षी आणखी 6,000 रुपये दिले जातील. 

राज्यातील शेतकऱ्यांना पीएम सन्मान निधीचे सहा हजार रुपये आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचे सहा हजार रुपये दरवर्षी हप्त्याने मिळणार आहेत. म्हणजेच दरवर्षी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण 12 हजार रुपये पाठवले जातील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *