Dnamarathi.com

Mumbai News:  मुंबईमधील मीरा भाईंदर परिसरात अचानक लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू झाला आहे. 

 मीरा रोडवरील गोल्डन नेस्टजवळील आझाद नगर भागात बुधवारी पहाटे ही आग लागल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

या आगीत एकाचा मृत्यू झाला आहे. दीपक चौरसिया उर्फ ​​पप्पू पानवाला असे मृताचे नाव आहे. आग विझवताना अग्निशमन दलाचे किमान दोन जवानही जखमी झाले आहेत.

अग्निशमन दलाच्या सुमारे तीस गाड्या घटनास्थळी हजर झाले होते. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. घटनास्थळी पोहोचलेले डीसीपी प्रकाश गायकवाड म्हणाले, “मीरा रोडवरील आझाद नगरच्या झोपडपट्टीत आग लागली आहे. आज पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास झोपडपट्टीजवळ टाकलेल्या कचऱ्यातून ही आग लागली. हळूहळू आग वाढत जाऊन झोपडपट्टीपर्यंत पसरली. महापालिकेने आग आटोक्यात आणली आहे.

मुंबई, ठाणे, वसई-विरार येथील अग्निशमन दलाच्या सुमारे 27 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग विझवण्याचे काम सुरू केले.  या आगीत एकाचा मृत्यू झाला आहे.

 तर पालिकेच्या अग्निशमन दलाचे दोन कर्मचारी जखमी झाले. याशिवाय आणखी 2-3 जण जखमी झाले आहेत. सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता नाही. जखमींची प्रकृती फारशी गंभीर नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, या भीषण आगीत एका भंगाराच्या गोदामासह जवळपासच्या पन्नासहून अधिक झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. या आगीत एक जण जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र दुर्दैवाने तो वाचू शकला नाही. सध्या अग्निशमन दलाकडून कुलिंगचे काम सुरू आहे. परिसरात धुराचे ढग पसरले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *