Dnamarathi.com

Vijay Wadettiwar: संख्याबळ न पाहता विधानसभेत विरोधी पक्षनेत्याची नेमणूक व्हावी. अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आज सभागृहात केली आहे.

अधिवेशनाचे शेवटचे दोन दिवस उरले असल्याने ही नियुक्ती करावी. असं देखील या वेळी विजय वडेट्टीवार म्हणाले.

विधानसभा कामकाज कार्यपद्धतीवर बोलताना विजय वडेट्टीवार यांनी मुद्दा मांडला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले सत्ताधारी आणि विरोधक ही विकासाची दोन चाके आहेत. यातील ही चाक म्हणजे विरोधी पक्षनेता आहे. हे चाक सध्या सभागृहात नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेत्याची नेमणूक करावी असे वडेट्टीवार म्हणाले.

महाराष्ट्रात संख्याबळाच्या आधारावर विरोधी पक्षनेत्याची नेमणूक होते अशी परंपरा नाही. असे आम्ही पाहिले नाही. त्यामुळे नवीन परंपरा पाडू नये. महायुती सरकारला प्रचंड बहुमत मिळाले आहे, त्यांना लगाम घालायला आणि महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी विरोधी पक्षनेत्याची गरज आहे.

विधानसभेचे कामकाज एकतर्फी होऊ नये. अधिवेशनाचे अंतिम आठवड्याचे काम ती खुर्ची खाली ठेवून कामकाज होऊ नये. अध्यक्षांना अधिकार आहे त्यामुळे त्यांनी निर्णय घ्यावा असा मुद्दा काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी मांडला

विधानसभेचे अध्यक्ष यांनी यावेळी सभागृहातील कामकाज हे नियमानुसार चालणार तसेच नियमानुसार नियुक्त्या करण्यात येतील असे आश्वासन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *