DNA मराठी

बोल्हेगावमध्ये बिनशेती जमीन शेती दाखवून विक्री? शासनाचा लाखोंचा महसूल बुडाल्याचा आरोप

Ahilyanagar News : अहिल्यानगर महानगरपालिका हद्दीतील बोल्हेगाव मिळकती एकत्र करून तयार करण्यात आलेल्या एकूण २४३२०० चौ.मी. क्षेत्रफळाच्या जमिनीला मा. तहसीलदारांनी रहिवासी वापरासाठी अकृषिक वापराची परवानगी दिली होती. मात्र, यामधील केवळ स.नं. ३४/३ या मिळकतीसाठी स्वतंत्र खरेदीखत करताना ती शेती म्हणून नोंदविण्यात आल्याचे समोर आले आहे.

हे खरेदीखत करताना संबंधित तलाठी व मंडल अधिकाऱ्यांच्या निदर्शनास असूनही त्यांनी कोणतीही कार्यवाही न केल्याने प्रशासकीय प्रणालीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, रहिवासी वापरासाठी आधीच अकृषिक परवानगी मिळालेल्या जमिनींपैकी एक भाग पुन्हा शेती दाखवून खरेदी केल्याने शासनाचा लाखोंचा महसूल बुडाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

या प्रकरणात शासकीय नियमबाह्य व्यवहार झाल्याचे स्पष्ट असून, महसूल विभागाने याची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. सरकारी महसुलात घोटाळा होऊनही संबंधित अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचे चित्र समोर येत आहे. यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *