Maharashtra Update

nilesh lanke

Nilesh Lanke: तुमच्याकडे कितीही शिक्षण संस्था, कारखाने व लोक असू द्या… तुम्हाला निलेश लंके पुरून उरणार

Nilesh Lanke : सत्ता आपल्या हातात आहे किंवा नाही, यापेक्षा जनतेच्या प्रश्नांसाठी प्रामाणिकपणे काम करण्याची इच्छाशक्ती महत्त्वाची आहे. सत्ता नसतानाही पिंपळगाव रोठा येथे अशोक घुले यांनी कोट्यवधी रुपयांची विकासकामे मार्गी लावली आहेत. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय देण्याची आपली भूमिका आहे. राजकारणात स्पर्धा करायची असेल तर ती विकासाची करा; विरोधकांना अडचणीत आणणे, पोलिसांवर दबाव आणणे […]

Nilesh Lanke: तुमच्याकडे कितीही शिक्षण संस्था, कारखाने व लोक असू द्या… तुम्हाला निलेश लंके पुरून उरणार Read More »

breakfast tips

Breakfast Tips : सकाळी उठल्यानंतर ‘या’ 3 स्वस्त पदार्थांचा आहारात करा समावेश; पचनालाही मिळेल फायदा

Breakfast Tips : दिवसाची सुरुवात आपण कशा पद्धतीने करतो, याचा परिणाम आपल्या दिवसभराच्या आहारावर आणि ऊर्जेवर होऊ शकतो. अनेक जण सकाळचा नाश्ता टाळतात किंवा उठल्यानंतर लगेच चहा-बिस्किटांवर भागवतात. मात्र शरीराला दिवसाच्या सुरुवातीलाच योग्य पोषण मिळणे महत्त्वाचे आहे. यासाठी महागडे ड्रायफ्रूट किंवा महागडी हेल्थ फूड उत्पादने घेण्याची गरज नाही. घरात सहज उपलब्ध होणारे आणि तुलनेने स्वस्त

Breakfast Tips : सकाळी उठल्यानंतर ‘या’ 3 स्वस्त पदार्थांचा आहारात करा समावेश; पचनालाही मिळेल फायदा Read More »

Onion Price : साखरेनंतर प्याज महाग ; देशभरात दरवाढीने सर्वसामान्यांचे बजेट बिघडले

Onion Price : आधी साखरेच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचे बजेट बिघडले असताना आता कांद्याच्या वाढत्या किमतीनेही ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. देशातील अनेक शहरांमध्ये कांद्याच्या किरकोळ दरात मोठी वाढ झाली असून काही ठिकाणी गेल्या वर्षाच्या तुलनेत दर जवळपास दुप्पट झाले आहेत. या वाढत्या किमतींवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने आपल्या बफर स्टॉकमधील कांदा बाजारात आणण्याचा निर्णय

Onion Price : साखरेनंतर प्याज महाग ; देशभरात दरवाढीने सर्वसामान्यांचे बजेट बिघडले Read More »

sim card

New SIM Rules: नवीन SIM कार्ड घ्यायचे आहे? आधी ‘हे’ नियम जाणून घ्या

New SIM Rules:   नवीन SIM कार्ड घेण्यापूर्वी आता तुमच्या नावावर आधीपासून किती मोबाईल कनेक्शन सुरू आहेत, याची माहितीअसणे गरजेचे आहे. बनावट कागदपत्रांद्वारे SIM कार्ड घेणे, मोबाईल कनेक्शनचा गैरवापर आणि सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी दूरसंचार विभागाने (DoT) मोबाईल कनेक्शनबाबत नियम कडक केले आहेत. त्यामुळे ठरावीक मर्यादेपेक्षा जास्त SIM कार्ड तुमच्या नावावर असतील, तर नवीन कनेक्शन मिळण्यात अडचण येऊ शकते. एका व्यक्तीच्या नावावर किती SIM कार्ड असू शकतात? दूरसंचार विभागाच्या नियमानुसार, भारतातील सामान्य नागरिकाच्या नावावर जास्तीत जास्त 9 मोबाईल कनेक्शन असू शकतात. ही मर्यादा एखाद्या एका कंपनीपुरती मर्यादित नाही. म्हणजेच तुमच्याकडे Jio, Airtel, Vi, BSNL किंवा इतर कंपन्यांचे SIM कार्ड असले तरी सर्व सक्रिय कनेक्शन एकत्र मोजले जातात.  उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीच्या नावावर Airtel चे 3, Jioचे 3 आणि Viचे 3 नंबर असतील, तर एकूण 9 कनेक्शन पूर्ण झाले असे समजले जाईल. अशा परिस्थितीत दहावे SIM कार्ड घेण्यासाठी अर्ज केल्यास नवीन कनेक्शन मिळणार नाही. या राज्यांमध्ये मर्यादा 6 SIMची असम, जम्मू-काश्मीर आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये ही मर्यादा आणखी कमी आहे. या भागातील ग्राहकाच्या नावावर जास्तीत जास्त 6 मोबाईल कनेक्शन ठेवता येतात. त्यामुळे या भागातील एखाद्या ग्राहकाकडे आधीच 6 सक्रिय नंबर असतील, तर नवीन SIM कार्ड घेता येणार नाही.  नवीन SIM घेण्यापूर्वी कंपन्या काय तपासणार? नवीन SIM कार्डसाठी अर्ज केल्यानंतर संबंधित टेलिकॉम कंपनी ग्राहकाच्या नावावर आधीपासून किती मोबाईल कनेक्शन आहेत, याची पडताळणी करेल. जर ग्राहकाने निर्धारित मर्यादा आधीच पूर्ण केली असेल, तर अतिरिक्त मोबाईल कनेक्शन देण्यास नकार दिला जाऊ शकतो.  या प्रक्रियेचा उद्देश केवळ SIMची संख्या नियंत्रित करणे नाही, तर एका व्यक्तीच्या ओळखपत्राचा वापर करून मोठ्या प्रमाणावर SIM कार्ड घेऊन त्यांचा गैरवापर होऊ नये, हा देखील आहे. तुमच्या नावावर किती SIM आहेत हे कसे तपासाल? तुमच्या नावावर सध्या किती मोबाईल नंबर सक्रिय आहेत, हे घरबसल्या तपासता येते. यासाठी केंद्र सरकारच्या संचार साथी (Sanchar Saathi) पोर्टलवर उपलब्ध असलेल्या ‘Know Mobile Connections in Your Name’ या सुविधेचा वापर करता येतो. ही सुविधा TAFCOP म्हणूनही ओळखली जाते. दूरसंचार विभागाच्या अधिकृत पोर्टलवर या सुविधेद्वारे तुमच्या नावावर जारी झालेल्या मोबाईल कनेक्शनची माहिती पाहता येते.  संचार साथीच्या अधिकृत पोर्टलवर तपासा यासाठी सामान्यतः तुमचा चालू मोबाईल नंबर, कॅप्चा आणि OTPच्या माध्यमातून पडताळणी करावी लागते. त्यानंतर तुमच्या नावावर नोंद असलेल्या मोबाईल कनेक्शनची माहिती स्क्रीनवर दिसते.  अनोळखी नंबर तुमच्या नावावर असेल तर? समजा, तुम्ही संचार साथी पोर्टलवर तुमच्या नावावर असलेल्या मोबाईल नंबरची यादी तपासली आणि त्यात असा नंबर आढळला जो तुम्ही कधी घेतलाच नाही. अशा वेळी ही बाब दुर्लक्षित करू नका. संबंधित नंबरबाबत पोर्टलवरून रिपोर्ट करता येतो. तसेच तुम्ही वापरत नसलेले किंवा आता आवश्यक नसलेले कनेक्शनही तपासून त्याबाबत योग्य पर्याय निवडता येतो. दूरसंचार विभागाच्या प्रक्रियेनुसार संशयास्पद कनेक्शनची पुन्हा पडताळणी केली जाऊ शकते आणि पडताळणी अयशस्वी झाल्यास ते कनेक्शन बंद केले जाऊ शकते.  जुना नंबर बंद केला असेल तर काय? अनेक लोक जुना मोबाईल नंबर वापरणे बंद करतात आणि नवीन नंबर घेतात. मात्र जुना नंबर अधिकृतपणे बंद किंवा निष्क्रिय झाला आहे की नाही, याची खात्री न केल्यास तुमच्या नावावर सक्रिय कनेक्शनची संख्या वाढू शकते. त्यामुळे नवीन SIM घेण्यापूर्वी जुन्या नंबरची स्थिती तपासणे फायदेशीर ठरते. विशेषतः अनेक वर्षांपासून वापरत नसलेले नंबर तुमच्या नावावर आहेत का, हे संचार साथीच्या माध्यमातून तपासता येते. सरकारने हे नियम कडक का केले? मोबाईल SIM कार्डचा वापर आता फक्त फोन कॉलसाठी होत नाही. बँकिंग, UPI, सोशल मीडिया, ई-कॉमर्स, OTP आणि अनेक डिजिटल सेवांसाठी मोबाईल नंबरचा वापर केला जातो. त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या नावावर अनधिकृत SIM कार्ड सक्रिय असणे गंभीर ठरू शकते. दूरसंचार विभागाने बनावट कागदपत्रांवर घेतलेल्या मोबाईल कनेक्शनविरोधातही मोठ्या प्रमाणावर कारवाई केली आहे. विभागाच्या माहितीनुसार, बनावट कागदपत्रांच्या आधारे घेतलेल्या संशयित मोबाईल कनेक्शनचे विश्लेषण करून लाखो कनेक्शन डिस्कनेक्ट करण्यात आले आहेत.

New SIM Rules: नवीन SIM कार्ड घ्यायचे आहे? आधी ‘हे’ नियम जाणून घ्या Read More »

raju shetti

Raju Shetti : साखरेच्या दरवाढीमागे 20 ते 22 हजार कोटींच्या काळाबाजाराचा संशय; राजू शेट्टींचा गंभीर आरोप

Raju Shetti : देशात साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध असतानाही साखरेच्या दरात अचानक झालेली वाढ ही नैसर्गिक नसून नियोजनबद्ध कटाचा भाग असल्याचा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. साखरेच्या दरवाढीच्या आड सुमारे 20 ते 22 हजार कोटी रुपयांचा काळाबाजार सुरू असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. कारखानदार आणि साखर व्यापाऱ्यांच्या

Raju Shetti : साखरेच्या दरवाढीमागे 20 ते 22 हजार कोटींच्या काळाबाजाराचा संशय; राजू शेट्टींचा गंभीर आरोप Read More »

rohit pawar

Rohit Pawar : कर्जत व जामखेडमधील उपजिल्हा रुग्णालये कार्यान्वित करा

Rohit Pawar : कर्जत आणि जामखेड या दोन्ही ठिकाणच्या उपजिल्हा रुग्णालयांची कामे अंतिम टप्प्यात आली असून इथे मंजूर केलेली पदे तातडीने भरावीत आणि या उपजिल्हा रुग्णालयांचे लोकार्पण करावे, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे केली. तसेच मिरजगाव येथील उपजिल्हा रुग्णालयासाठी वाढीव निधी आणि कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधण्याची मागणीही त्यांनी केली. आमदार रोहित

Rohit Pawar : कर्जत व जामखेडमधील उपजिल्हा रुग्णालये कार्यान्वित करा Read More »

satyajeet tambe

Satyajeet Tambe : पिंपळवंडीतील चिमुकलीवरील अत्याचाराची घटना मन हेलावणारी

Satyajeet Tambe : जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथील १० वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या झाल्याच्या घटनेने समाजमन हादरले आहे. या अमानुष कृत्याचा तीव्र निषेध करत दोषी नराधमाला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी केली. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. आपल्या समाजात इतक्या राक्षसी प्रवृत्तीचे

Satyajeet Tambe : पिंपळवंडीतील चिमुकलीवरील अत्याचाराची घटना मन हेलावणारी Read More »

img 20260819 wa0001

Junnar Murder Case : नसरापूर घटनेची पुनरावृत्ती जुन्नरमध्ये आमदाराच्या गावात 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून हत्या…

Junnar Murder Case : पुण्यात पुन्हा नसरापूर घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात मन हेलावून टाकणारी ही घटना समोर आली आहे. पिंपळवंडी गावात एका नऊ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, पोलिसांनी संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. मिळालेल्या

Junnar Murder Case : नसरापूर घटनेची पुनरावृत्ती जुन्नरमध्ये आमदाराच्या गावात 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून हत्या… Read More »

maruti baleno facelift

Maruti Baleno Facelift सप्टेंबरमध्ये येणार; लूकपासून फीचर्सपर्यंत काय बदलणार?

Maruti Baleno Facelift : प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटमध्ये लोकप्रिय असलेल्या मारुती सुझुकी बलेनोच्या नव्या फेसलिफ्ट मॉडेलची उत्सुकता आता वाढली आहे. कंपनी 5 सप्टेंबर 2026 रोजी बलेनो फेसलिफ्ट भारतीय बाजारात सादर करण्याची शक्यता आहे. टेस्टिंगदरम्यान या कारचे प्रोटोटाइप अनेकदा रस्त्यावर दिसून आले असून, त्यावरून कारच्या डिझाइन आणि फीचर्समध्ये काही महत्त्वाचे बदल होण्याचे संकेत मिळाले आहेत. समोरच्या डिझाइनमध्ये

Maruti Baleno Facelift सप्टेंबरमध्ये येणार; लूकपासून फीचर्सपर्यंत काय बदलणार? Read More »

stock market

Stock Market: शेअर बाजारात पुन्हा घसरण; सेन्सेक्स 250 अंकांहून अधिक घसरला, नेमकं कारण काय?

Stock Market : भारतीय शेअर बाजारासाठी मंगळवार, 18 ऑगस्ट 2026 रोजीची सुरुवात पुन्हा एकदा निराशाजनक झाली. मागील काही सत्रांपासून सुरू असलेली बाजारातील कमजोरी कायम राहिली असून, सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स 250 अंकांहून अधिक घसरला, तर निफ्टी 24,250 च्या आसपास खाली आला. विशेष म्हणजे निफ्टीच्या घसरणीचे हे सलग सहावे सत्र ठरले. सेन्सेक्स-निफ्टीची सुरुवात कशी झाली? मंगळवारी सुरुवातीच्या

Stock Market: शेअर बाजारात पुन्हा घसरण; सेन्सेक्स 250 अंकांहून अधिक घसरला, नेमकं कारण काय? Read More »