DNA मराठी

Maharashtra Politics

pune ganesh visarjan

Pune Ganesh Visarjan : पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी CCTV, AI च्या माध्यमातून पोलिसांची नजर

Pune Ganesh Visarjan : गणेशोत्सवाच्या सांगतेनिमित्त होणाऱ्या विसर्जन मिरवणुकीसाठी पुणे पोलिसांनी कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. शहरातील विसर्जन मिरवणूक शांततेत आणि सुरक्षितपणे पार पडावी यासाठी तब्बल 10 हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. यासोबतच CCTV कॅमेरे, AI तंत्रज्ञान आणि विविध आधुनिक यंत्रणांचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. विसर्जन मिरवणुकीदरम्यान कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. संवेदनशील ठिकाणांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार असून, मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा रस्त्यावर असणार आहे. ढोल-ताशा पथकांच्या संख्येवर मर्यादा गणेश मंडळांच्या मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या ढोल-ताशा पथकांच्या संख्येवरही मर्यादा घालण्यात आली आहे. प्रत्येक गणेश मंडळासोबत दोनपेक्षा अधिक ढोल-ताशा पथकांना परवानगी दिली जाणार नाही. ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन होऊ नये यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. 112 ठिकाणी डेसिबल मीटर ध्वनिप्रदूषणाच्या मर्यादेचे पालन होते की नाही, यावर पोलिसांची विशेष नजर असणार आहे. त्यासाठी शहरातील 112 ठिकाणी डेसिबल मीटरसह पथके तैनात करण्यात येणार आहेत. ध्वनिक्षेपक आणि इतर ध्वनिवर्धक यंत्रणांच्या वापरावरही नियमांनुसार नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. 26 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था विसर्जन मिरवणुकीदरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी शहरात 26 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी शक्यतो पोलिसांनी निश्चित केलेल्या पार्किंगच्या ठिकाणीच वाहने पार्क करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. मिरवणूक किती वेळ चालते, हे महत्त्वाचे नाही तर… विसर्जन मिरवणूक नेमकी किती वेळ चालते, यापेक्षा ती शांततेत, उत्साहात आणि सुरक्षितपणे पार पडणे हे पोलिसांचे प्राधान्य असल्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी स्पष्ट केले आहे. “मिरवणूक किती वेळ चालेल, हे आमच्यासाठी प्राधान्य नाही. मात्र विसर्जन मिरवणूक उत्साहात आणि सुखरूप साजरी व्हावी, हे आमचे प्राधान्य आहे.

Pune Ganesh Visarjan : पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी CCTV, AI च्या माध्यमातून पोलिसांची नजर Read More »

rohit pawar and ram shinde

Rohit Pawar on Ram Shinde: जनताच त्यांची मस्ती जिरवाल…नामौललेख टाळत रोहित पवार यांचा राम शिंदेंवर निशाणा

Rohit Pawar on Ram Shinde : जिल्हा बँक निवडणूक ही येणाऱ्या काळात पार पडणार आहे. त्या अनुषंगाने विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी देखील निवडणुकीसाठी जोर लावला असून यावरती रोहित पवार यांनी भाष्य केले. ते म्हणाले मतदार संघात त्यांच्याकडे पद असून त्यांना काही एक काम करता आले नाही निवडणुकीचा विषय आला की ते फिरू लागतात मात्र त्यांना उभे राहता येणार नाही आपल्याकडे एवढे मोठे पद असून आपण त्या पदाचा वापर जनतेसाठी करावा असा टोला रोहित पवार यांनी लगावला पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले, सारखं सारखं स्वतःलाच सगळं काही भेटले पाहिजे यासाठी ते फिरतायत निवडणुकीमध्ये आपल्याला विजय मिळवण्यासाठी ते फिरतायत मात्र जनतेला हे समजलं आहे त्यांची जिरवल्याशिवाय जनता शांत बसणार नाही अशा शब्दात रोहित पवार यांनी राम शिंदे यांच्या वतीने जोरदार निशाणा साधला जेव्हा कांद्याला भाव मिळत नव्हता तेव्हा हे निवांत मस्ती करत होते हेलिकॉप्टरने फिरत होते तसेच सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक कर्जमाफीची घोषणा झाली तेव्हा आम्ही आंदोलनाला बसलो त्यावेळेस आमची चेष्टा मस्करी केली मात्र मुख्यमंत्र्यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या त्यानंतर शेतकऱ्यांबाबत त्यांनी जगाचा काठी टाकल्या होत्या. त्या देखील मागे घेतल्या यावरूनच तुमचं वजन काय हे समजतं तुम्हाला महत्व का दिला जातं तर तुम्ही केवळ कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार यांच्या विरोधात लढतात त्यामुळे तुम्हाला ताकद दिली आहे मात्र आम्हाला सर्वसामान्य लोकांनी ताकद दिली आहे म्हणून आम्ही त्यांचे प्रश्न मांडू शकतो. तुम्हाला रोहित पवारांना थांबवण्यासाठी पद दिला आहे मात्र किती दिवस ते पद घेऊन मिरवणार आहे मात्र त्या पदापेक्षा सर्वसामान्यांसाठी सामान्य लोकांसाठी त्यांनी काम केलं पाहिजे असं आमचं मत आहे असे शब्दात आमदार रोहित पवार यांनी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचा खरपूस समाचार घेतला.

Rohit Pawar on Ram Shinde: जनताच त्यांची मस्ती जिरवाल…नामौललेख टाळत रोहित पवार यांचा राम शिंदेंवर निशाणा Read More »

sunetra pawar

NCP Ajit Pawar : राज्यातील दुष्काळसदृश्य स्थितीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिबीर पुढे ढकलले

NCP Ajit Pawar : राज्यातील १९ जिल्ह्यात पावसाच्या अतिखंडामुळे दुष्काळसदृष्य स्थिती निर्माण झाली असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे २७ सप्टेंबर रोजी नाशिक येथे होणारे एक दिवसीय राज्यव्यापी शिबीर पुढे ढकलण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पक्षाचे जेष्ठ नेते छगन भुजबळ, खासदार पार्थ पवार यांच्यासह इतर वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करून हे शिबीर पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. राज्यात सध्या सरकारच्या माध्यमातून दुष्काळाच्या संकटाचा आढावा घेतला जात आहे. १९ जिल्ह्यातील पीक व चारा पाणी परिस्थिती काळजीची असल्याने शेतकरी हवालदिल आहे. या संवेदनशील भावनेतून पक्षाचे राज्यव्यापी शिबीर पुढे ढकलून परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर सदरचे शिबीर घ्यावे अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केली. दरम्यान, पक्षाचे मंत्री, नेते आणि पदाधिकारी यांनी आपापल्या परिसरातील दुष्काळाच्या संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी प्रशासनासोबत पुढाकार घेवून उपाययोजनांवर भर देण्याची गरज असल्याची भावना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली.

NCP Ajit Pawar : राज्यातील दुष्काळसदृश्य स्थितीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिबीर पुढे ढकलले Read More »

img 20260923 wa0003

Mangesh Chivate : शिक्षक आमदारकीच्या तिकिटासाठी मंगेश चिवटे यांची कर्नाटकातून फिल्डिंग; घेतली अमित शहा यांची भेट

Mangesh Chivate : पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक आमदारकीच्या निवडणुकीतील रंगात दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आणि पुणे शिक्षक मतदार संघातील इच्छुक उमेदवार मंगेश चिवटे यांनी कर्नाटकातील भाजपचे वजनदार नेते आणि के. एल. ई. शिक्षण संस्थेचे सर्वेसर्वा माजी खासदार डॉ.प्रभाकर कोरे आणि कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या मार्फत यांच्यामार्फत कर्नाटकातील हुबळी येथे थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन शिक्षक आमदारकीच्या उमेदवारीसाठी फिल्डिंग लावली आहे. के. एल. ई. संस्थेच्या हुबळी येथील वैद्यकीय महाविद्यालय उदघाटनासाठी आलेल्या केंद्रीय मंत्री अमित शाह यांचे स्वागत देखील मंगेश चिवटे यांनी केले. याच दरम्यान , के.एल.ई. चे सर्वेसर्वा माजी खासदार प्रभाकर कोरे यांनी मंगेश चिवटे यांच्या उमेदवारी साठी आपला शब्द टाकला असल्याचे समजते. एकूणच पुणे शिक्षक ही जागा शिवसेनेच्या पदरात पाडून घेऊन महायुतीची उमेदवारी मिळवण्यासाठी मंगेश चिवटे यांनी कर्नाटकातून जोरदार फिल्डिंग लावली असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. लिंगायतभूषण माजी राज्यसभा खासदार डॉ प्रभाकर कोरे यांस नुकताच पद्मश्री हा देशातील सर्वोच्च नागरी सन्मान मिळाला होता. याच पार्श्वभूमीवर डॉ प्रभाकर कोरे यांचा पुणे आणि मुंबईत लिंगायत समाजाच्या वतीने जाहीर सत्कार सोहळा आयोजित करण्यामध्ये मंगेश चिवटे यांनी पुढाकार घेतला होता. पुणे येथील याच कार्यक्रमात लिंगायत संघर्ष समितीचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांनी लिंगायत समाजातील मंगेश चिवटे या तरुण कार्यकर्त्याच्या मागे पुणे शिक्षक निवडणूकीत आपल्या नेतृत्वाखालील रयत शिक्षण संस्थेची अदृश्य ताकद पाठीशी ठेवा असे जाहीर आवाहन व्यासपीठावर उपस्थित जेष्ठ नेते शरदचंद्र पवार यांस केले होते. दरम्यान, भाजपनेते आणि उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक हे बुद्धिजीवी वर्गाचे मतदार संघ असून भाजपचे परंपरागत मतदारसंघ असल्याचा दावा करत यापैकी एकही मतदारसंघ महायुतीतील शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस आदी घटकपक्षाला सोडणार नसल्याची भीमगर्जना केली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी कागल येथील आपले कार्यकर्ते भैय्यासाहेब माने यांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी पुणे पदवीधर मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यात यावा आणि पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपने घ्यावा असे परस्पर जागावाटप जाहीर केले आहे. यावर आक्षेप घेत कोल्हापूरचे शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनी जागा वाटप विषयावर राज्यातील महायुतीतील शिर्षस्थ नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार घेतील. जिल्ह्यातील कोणत्याही नेत्याने परस्पर जागावाटप जाहीर करू नये अशी ठाम भूमिका घेतली आहे. तसेच, मंगेश चिवटे यांनी गेल्या 2 वर्षांपासून पुणे शिक्षक मतदारसंघात सर्व 5 जिल्ह्यात चांगली बांधणी केली असून महायुतीमध्ये चिवटेच उजवे उमेदवार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

Mangesh Chivate : शिक्षक आमदारकीच्या तिकिटासाठी मंगेश चिवटे यांची कर्नाटकातून फिल्डिंग; घेतली अमित शहा यांची भेट Read More »

vikram pachpute

Vikram Pachpute : राज्याकडे लक्ष मात्र मतदारसंघाकडे दुर्लक्ष…, श्रीगोंद्यात पाचपुते यांच्या विरोधात नाराजी

Vikram Pachpute : पहिल्याच टर्ममध्ये आमदारकीला गवसने घालणारे श्रीगोंदा मतदारसंघाचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्याकडून मतदार संघातील जनतेला मोठ्या अपेक्षा होत्या मात्र राज्य राजकारणात लक्ष देता देता स्वतःच्या मतदार संघावर होत असलेलं दुर्लक्ष नागरी समस्या वाढती गुन्हेगारी यामुळे पाचपुतेंच्या विरोधात मतदारसंघात नाराजीचा सूर उमटत असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली. विविध प्रश्नांवरून राज्यात आपला वेगळा ठसा निर्माण करणाऱ्या पाचपुते यांनी मतदारसंघातील समस्याही सोडवाव्यात अशी मागणी नागरिक करू लागले आहे दुष्काळाचे सावट… राज्यात यंदा पावसाने दडी मारल्याने मोठे दुष्काळाचे सावट हे निर्माण झाले आहे. यामुळे अनेक ठिकाणी जनावरांच्या चाऱ्यासह पाण्याचा देखील मोठा प्रश्न हा निर्माण झाला आहे. दुष्काळजन्य परिस्थितीचा आढावा घेत जनतेला दिलासा देण्यासाठी मंत्री आमदार यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जावे असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. मात्र मुंबईत रमलेले श्रीगोंदा मतदारसंघाचे आमदार विक्रम पाचपुते मतदारसंघातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या बांधावर दिसतील का असा प्रश्न काही जणांकडून व्यक्त केला जात आहे. राज्याकडे लक्ष मतदारसंघाकडे दुर्लक्ष एमपीएससीच्या कथित पेपर फुटी प्रकरणामुळे राज्यात एकच खळबळ उडाली मात्र आता याच प्रकरणावरून आमदार रोहित पवार व आमदार विक्रम पाचपुते यांच्यामध्ये शाब्दिक वाद सुरू झाले आहे. एमपीएससी पेपर मधील गैरप्रकार विरोधात पवार आक्रमक झाले असून आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा अशी मागणी पवार करतात दरम्यान याच प्रकरणी पाचपुते यांनी देखील एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भेटीगाठी घेतल्या. राज्यभर गाजणाऱ्या या मुद्द्यामुळे पाचपुते हे राज्यात चर्चेत आले. पवार विरुद्ध पाचपुते मुळे माध्यमांनी देखील याला प्रसिद्धी दिली मात्र दुसरीकडे मतदारसंघातील नागरी समस्या असतील रस्त्यांची झालेली दुरावस्था ठिकठिकाणी खड्डे तसेच वाढती गुन्हेगारी अमली पदार्थ वेळ का याकडे मात्र पाचपुते यांचे दुर्लक्ष झाल्याने मतदार संघामध्ये जनतेमध्ये नाराजी पसरली. तसेच शेतकरी पावसाअभावी संकटात सापडला असल्याने मुंबई वारी सोडून पाचपुते यांनी मतदारसंघाकडे लक्ष केंद्रित करावे व नागरिकांचे समस्या सोडवाव्यात अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. पाचपुते यांचा जनता दरबार आमदार विक्रम पाचपुते यांचा जनता दरबार यावर देखील आक्षेप घेण्यात आला आपल्या खाजगी निवासस्थानी भरविण्यात येणाऱ्या जनता दरबार च्या माध्यमातून शासकीय विभागातील अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जात असल्याचा देखील आरोप पाचपत्यांवर करण्यात आला. हे लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जनता दरबार घेतला जात असून विरोधकांच्या टीकाटिप्पणी कडे लक्ष देण्याऐवजी नागरिकांच्या समस्या सोडवण्यावरती भर दिला जात असल्याचं पाचपुते म्हणाले.

Vikram Pachpute : राज्याकडे लक्ष मात्र मतदारसंघाकडे दुर्लक्ष…, श्रीगोंद्यात पाचपुते यांच्या विरोधात नाराजी Read More »

img 20260922 wa0005

Eknath Shinde: पारनेरच्या पाणीप्रश्नावर मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक; वर्षभरात योजना पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन

Eknath Shinde : पारनेर शहराच्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पाणीप्रश्नाला कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पारनेर नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष विजयराव औटी यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन पाणीपुरवठा योजनेबाबत सविस्तर चर्चा केली. पारनेर शहराची वाढती लोकसंख्या, भविष्यातील पाण्याची वाढती गरज तसेच सध्याच्या पाणीपुरवठा व्यवस्थेमुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी याबाबत औटी यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांचे लक्ष वेधले. पारनेर शहरासाठी दीर्घकालीन आणि शाश्वत पाणीपुरवठा व्यवस्था निर्माण करण्यासाठी शासनाने ठोस निर्णय घेऊन कालबद्ध पद्धतीने या योजनेचे काम मार्गी लावावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पारनेर शहराच्या पाणीप्रश्नाकडे शासन सकारात्मकपणे पाहत असून येत्या सहा महिन्यांत या योजनेच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येईल. त्यानंतर साधारण एका वर्षाच्या कालावधीत योजना पूर्ण करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले. पारनेर शहराचा पाणीप्रश्न हा दरवर्षी उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या टंचाईपुरता मर्यादित नसून भविष्यातील शहराची गरज लक्षात घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यामुळे नव्या पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पारनेरकरांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा पाठपुरावा करण्यात आला असल्याचे माजी नगराध्यक्ष विजयराव औटी यांनी सांगितले. “पारनेरकरांचा पाणीप्रश्न हा आमच्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा आणि महत्त्वाचा विषय आहे. नागरिकांना दरवर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागू नये, यासाठी कायमस्वरूपी पाणीपुरवठा व्यवस्था निर्माण होणे गरजेचे आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे या प्रश्नाला आता गती मिळत आहे. निविदा प्रक्रिया आणि प्रत्यक्ष काम कालबद्ध पद्धतीने पूर्ण करून पारनेरकरांना दिलासा मिळावा, यासाठी पुढील काळातही सातत्याने पाठपुरावा केला जाईल,” असे विजयराव औटी यांनी सांगितले. पारनेर शहराच्या पाणीप्रश्नासाठी झालेल्या या पाठपुराव्यामुळे आगामी काळात शहरासाठी शाश्वत पाणीपुरवठा योजनेच्या प्रत्यक्ष कार्यवाहीला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Eknath Shinde: पारनेरच्या पाणीप्रश्नावर मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक; वर्षभरात योजना पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन Read More »

Money

EPFO Pension Scheme : EPFO चा मोठा निर्णय; PF पासून पेन्शन आणि विम्यापर्यंत बदल

EPFO Pension Scheme : देशातील नोकरदार आणि पगारदार कर्मचाऱ्यांसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) महत्त्वाचा बदल केला आहे. केंद्र सरकारने EPFO च्या अनिवार्य कव्हरेजसाठी असलेली मासिक वेतन मर्यादा 15 हजार रुपयांवरून 25 हजार रुपये केली आहे. हा बदल 17 सप्टेंबर 2026 पासून लागू झाला आहे. त्यामुळे 15 हजार ते 25 हजार रुपये मासिक वेतन असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांना आता EPFOच्या सामाजिक सुरक्षा व्यवस्थेत अनिवार्यपणे समाविष्ट केले जाणार आहे. या निर्णयाचा परिणाम केवळ PF खात्यावर होणार नसून EPF, Employees’ Pension Scheme (EPS) आणि Employees’ Deposit Linked Insurance Scheme (EDLI) या तिन्ही सुविधांवर होणार आहे. त्यामुळे पात्र कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती बचतीसोबतच पेन्शन आणि विमा संरक्षणाच्या कक्षेतही वाढ होणार आहे. 15 हजारांची मर्यादा आता 25 हजार रुपये EPFO च्या अनिवार्य कव्हरेजसाठी यापूर्वी 15 हजार रुपये मासिक वेतनाची मर्यादा होती. ही मर्यादा सप्टेंबर 2014 पासून बदललेली नव्हती. आता केंद्र सरकारने ती वाढवून 25 हजार रुपये केली आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, या निर्णयामुळे 15 हजार ते 25 हजार रुपये वेतन असलेले सुमारे 51 लाख कर्मचारी EPFOच्या अनिवार्य सामाजिक सुरक्षा व्यवस्थेच्या कक्षेत येऊ शकतात. यामुळे अधिक कर्मचाऱ्यांना PF बचत, पेन्शन आणि विमा संरक्षणाचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. PF मध्ये किती फरक पडणार? वेतन मर्यादा वाढल्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांचे PF योगदान पूर्वी 15 हजार रुपयांच्या मर्यादेवर मोजले जात होते, त्यांच्यासाठी योगदानाचा आधार 25 हजार रुपयांपर्यंत वाढू शकतो. उदाहरणार्थ, योगदान केवळ वैधानिक मर्यादेपर्यंतच केले जात असल्यास कर्मचारी हिस्सा 12 टक्के धरला, तर 15 हजार रुपयांच्या वेतन मर्यादेवर तो 1,800 रुपये होता. 25 हजार रुपयांवर हा हिस्सा 3,000 रुपये होऊ शकतो. मात्र, प्रत्यक्ष कपात कर्मचाऱ्याच्या वेतनरचनेनुसार आणि नियोक्त्याच्या योगदान पद्धतीनुसार बदलू शकते. महत्त्वाचे म्हणजे, आधीपासून प्रत्यक्ष वेतनावर PF योगदान करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत केवळ वेतन मर्यादा वाढल्यामुळे एकूण योगदानात तितकाच वाढीव भार पडेलच असे नाही. अशा प्रकरणांत EPF आणि EPSमधील योगदानाचे विभाजन बदलू शकते. पेन्शनमध्येही होणार बदल EPFOच्या नव्या वेतन मर्यादेचा परिणाम Employees’ Pension Scheme म्हणजेच EPS वरही होणार आहे. पूर्वी 15 हजार रुपयांच्या मर्यादेनुसार 8.33 टक्के योगदान मोजले जात असल्याने EPSमध्ये नियोक्त्याचा मासिक हिस्सा कमाल 1,250 रुपये होता. आता 25 हजार रुपयांच्या मर्यादेनुसार हा हिस्सा सुमारे 2,083 रुपये प्रतिमहिना होऊ शकतो. म्हणजेच पेन्शन फंडाकडे जाणाऱ्या रकमेत सुमारे 833 रुपयांची वाढ होऊ शकते. याचा अर्थ काही कर्मचाऱ्यांच्या प्रकरणात EPF खात्यात जमा होणारी रक्कम आणि EPSमध्ये जाणारी रक्कम यांचे प्रमाण बदलू शकते. त्यामुळे कर्मचाऱ्याच्या भविष्यातील पेन्शनवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. कोणत्या कर्मचाऱ्यांना थेट फायदा? 15 हजार ते 25 हजार रुपये वेतन असलेला आणि यापूर्वी EPFOचा सदस्य नसलेला पात्र कर्मचारी या बदलामुळे नव्याने अनिवार्य EPF कव्हरेजमध्ये येऊ शकतो. तसेच, आधीपासून EPFO सदस्य असलेल्या आणि ज्यांचे योगदान 15 हजार रुपयांच्या मर्यादेवर प्रतिबंधित होते, त्यांच्यासाठीही नव्या मर्यादेमुळे योगदानाचा आधार वाढू शकतो. मात्र, नेमका परिणाम कर्मचाऱ्याच्या PF वेतनाची रचना आणि कंपनीच्या योगदान पद्धतीवर अवलंबून असेल. 25 हजार रुपयांपेक्षा जास्त वेतन असलेला आणि आधीपासून EPFOचा सदस्य नसलेला प्रत्येक कर्मचारी आपोआप या नव्या अनिवार्य कव्हरेजमध्ये येईल, असे मात्र नाही. अशा कर्मचाऱ्यांसाठी लागू असलेल्या नियमांनुसार वेगळी तरतूद आहे. EDLI विमा संरक्षणातही वाढ EPFO शी संबंधित आणखी एक महत्त्वाची सुविधा म्हणजे Employees’ Deposit Linked Insurance Scheme (EDLI). EPFO च्या नव्या वेतन मर्यादेमुळे या योजनेतील विमा संरक्षणाच्या गणनेवरही परिणाम होऊ शकतो. उपलब्ध माहितीनुसार, कमाल विमा संरक्षणाची रक्कम पूर्वीच्या मर्यादेपेक्षा वाढू शकते. त्यामुळे EPFO सदस्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या पात्र कुटुंबीयांना मिळणाऱ्या विमा संरक्षणात वाढ होण्याची शक्यता आहे. पेन्शनची गणना मात्र वेगळ्या पद्धतीने EPFO च्या नव्या नियमांमध्ये पेन्शनची मूलभूत गणना पद्धत बदललेली नाही. EPS अंतर्गत मासिक पेन्शनची गणना पेंशनयोग्य वेतन × पेंशनयोग्य सेवा ÷ 70 या सूत्रानुसार केली जाते. पेन्शनयोग्य वेतन ठरवताना संबंधित नियमांनुसार मागील 60 महिन्यांच्या सरासरी वेतनाचा विचार केला जातो. त्यामुळे वेतन मर्यादा वाढली असली तरी प्रत्येक कर्मचाऱ्याची पेन्शन लगेच किंवा समान प्रमाणात वाढेल असे नाही. पात्रता, सेवा कालावधी, वेतन आणि योगदानाची पद्धत यानुसार अंतिम परिणाम बदलतो. EPFOच्या नव्या व्यवस्थेत डिजिटल प्रक्रियांवरही भर EPFOच्या 2026 च्या नव्या चौकटीत डिजिटल प्रक्रियांना अधिक महत्त्व देण्यात आले आहे. ऑनलाइन रिटर्न, इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड, डिजिटल सदस्य खाती आणि ऑनलाइन क्लेम प्रक्रियेसारख्या बाबींना अधिकृत स्वरूप देण्यात आले आहे. पेन्शनच्या दाव्यांच्या प्रक्रियेसाठीही वेळेची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. पूर्ण कागदपत्रांसह आलेला पेन्शन दावा 20 दिवसांत निकाली काढणे किंवा त्यातील त्रुटी अर्जदाराला कळवणे अपेक्षित आहे. कारण नसताना विलंब झाल्यास 12 टक्के वार्षिक व्याज देण्याची तरतूदही नव्या व्यवस्थेत नमूद करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांनी काय लक्षात ठेवावे? EPFOच्या या बदलानंतर कर्मचाऱ्यांनी आपल्या पगाराच्या रचनेनुसार PFमध्ये किती योगदान जमा होत आहे, EPSमध्ये किती रक्कम जात आहे आणि UANशी संबंधित KYC माहिती अद्ययावत आहे का, हे तपासणे महत्त्वाचे ठरणार आहे. विशेषतः 15 हजार ते 25 हजार रुपयांच्या वेतन श्रेणीत असलेल्या आणि आतापर्यंत EPFOच्या कक्षेबाहेर असलेल्या कर्मचाऱ्यांनी आपल्या नियोक्त्याकडून या बदलाचा त्यांच्या PF खात्यावर नेमका कसा परिणाम होणार आहे, याची माहिती घेणे आवश्यक आहे.

EPFO Pension Scheme : EPFO चा मोठा निर्णय; PF पासून पेन्शन आणि विम्यापर्यंत बदल Read More »

rahul bondre

Rahul Gandhi on Rahul Bondre : राहुल गांधींच्या एका फोननंतर राहुल बोंद्रेंचा मोठा निर्णय; भाजप प्रवेशाचा निर्णय बदलला

Rahul Gandhi on Rahul Bondre : चिखली विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला अखेर नाट्यमय वळण मिळाले आहे. काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पक्षप्रवेशाच्या काही तास आधीच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बोंद्रे यांच्याशी फोनवरून संवाद साधला. या चर्चेनंतर बोंद्रे यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय मागे घेत काँग्रेसमध्येच राहण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. राहुल बोंद्रे यांनी यापूर्वी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला होता. 22 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत त्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार असल्याची चर्चा होती. त्यासाठी भाजपकडून तयारीही करण्यात आली होती. मात्र, त्याआधीच घडलेल्या या राजकीय घडामोडीमुळे संपूर्ण समीकरण बदलले. राहुल गांधींचा थेट फोन मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मध्यस्थीनंतर राहुल गांधी आणि राहुल बोंद्रे यांच्यात फोनवरून संवाद झाला. या संभाषणात राहुल गांधी यांनी बोंद्रे यांना घाईघाईने निर्णय घेऊ नका, पक्ष तुमच्यासोबत असल्याचे सांगितल्याचे वृत्त आहे. तसेच, संघर्षाच्या काळात पक्ष सोडण्यापेक्षा लढत राहण्याचा संदेश त्यांनी दिल्याचे सांगण्यात येत आहे. या फोननंतर राहुल बोंद्रे भावूक झाल्याचे सांगितले जाते. राहुल गांधी यांनी आपली दखल घेत फोन केला, यामुळे आपला निर्णय बदलल्याचे बोंद्रे यांनी संभाषणात म्हटल्याचे वृत्त आहे. “सगळं गमावलं तरी तुमच्यासोबत राहून लढेन”, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केल्याचे विविध वृत्तांत नमूद करण्यात आले आहे. राहुल गांधी यांनी यावेळी पराभव हा संघर्षाचा एक भाग असल्याचा संदेश देत “पराभवानंतरच विजय” असा उल्लेख केल्याचे वृत्त आहे. या फोन कॉलचा व्हिडीओ बोंद्रे यांच्या कार्यालयाकडून सोशल मीडियावर शेअर करण्यात आल्याने त्याचीही मोठी चर्चा सुरू झाली आहे. भाजप प्रवेशासाठी तयारी सुरू होती राहुल बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा मागील काही काळापासून सुरू होती. पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमासाठी मुंबईत तयारी करण्यात आली होती. चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले यांच्याशीही बोंद्रे संपर्कात असल्याचे वृत्त आहे. कार्यक्रमाची वेळ, पक्ष कार्यालयातील नियोजन आणि इतर बाबींवर चर्चा देखील झाली होती मात्र, राहुल गांधी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर हे नियोजन ऐनवेळी बदलले. चिखलीच्या राजकारणात राहुल बोंद्रे आणि श्वेता महाले हे प्रमुख राजकीय प्रतिस्पर्धी राहिले आहेत. त्यामुळे बोंद्रे भाजपमध्ये गेल्यास स्थानिक राजकारणात त्याचे परिणाम काय होतील, याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, आता बोंद्रे यांनी काँग्रेसमध्येच राहण्याचा निर्णय घेतल्याने चिखलीतील राजकीय समीकरणांबाबत पुन्हा चर्चा रंगली आहे. 2024 मध्ये अवघ्या काही हजार मतांनी पराभव राहुल बोंद्रे हे चिखली विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा आमदार राहिले आहेत. 2009 आणि 2014 मध्ये त्यांनी विधानसभा निवडणूक जिंकली होती. त्यानंतर 2019 आणि 2024 मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या श्वेता महाले यांना 1 लाख 9 हजार 212 मते, तर राहुल बोंद्रे यांना 1 लाख 6 हजार 11 मते मिळाली. त्यामुळे बोंद्रे यांचा पराभव 3,702 मतांनी झाला होता.

Rahul Gandhi on Rahul Bondre : राहुल गांधींच्या एका फोननंतर राहुल बोंद्रेंचा मोठा निर्णय; भाजप प्रवेशाचा निर्णय बदलला Read More »

img 20260921 wa0003

Ahilyanagar News : महाविद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती सत्र

Ahilyanagar News : डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या कॉलेज ऑफ नर्सिंग, अहिल्यानगर येथील वैद्यकीय-शल्य परिचर्या विभाग व महिला तक्रार निवारण कक्ष (Women Cell) यांच्या वतीने, बी.पी.एच.ई. सोसायटीचे अहमदनगर महाविद्यालय, अहिल्यानगर यांच्या सहकार्याने तसेच महाराष्ट्र सायबर व क्विक हील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १९ सप्टेंबर २०२६ रोजी सायबर सुरक्षा जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले. या सत्रास महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पदवीपूर्व व पदव्युत्तर विद्यार्थी उपस्थित होते. ऐमन अत्तर यांनी आधुनिक आर्थिक फसवणूक, लक्ष्यित फसवणूक, प्रवेश व नोकरीच्या नावाखाली होणारी फसवणूक, उपकरणांची सुरक्षितता, संकेतशब्द आणि सायबर कायद्याचे वास्तव याबाबत मार्गदर्शन केले. समृद्धी घोरपडे यांनी वास्तविक व आभासी अर्थव्यवस्था, कर्ज अॅप्समधील फसवणूक तसेच सामाजिक माध्यमांवरील धोके व सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमास वैद्यकीय संचालक डॉ. अभिजीत दिवटे, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. रामचंद्र पडळकर, प्राचार्य डॉ. प्रतिभा अरुण चांदेकर आणि उपप्राचार्य डॉ. योगिता औताडे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विभागप्रमुख अमोल टेमकर, डॉ. निलेश म्हसके, वर्षा शिंदे, पूजा मोरे, प्रमोद सूर्यवंशी, रुशाली कुंजीर, प्रतीक्षा थोरात आणि सुदर्शन पाडेकर यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन रुशाली कुंजीर यांनी, तर आभार प्रदर्शन प्रतीक्षा थोरात यांनी केले. सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करणारे हे सत्र विद्यार्थ्यांसह सर्व उपस्थितांसाठी माहितीपूर्ण व मार्गदर्शक ठरले.

Ahilyanagar News : महाविद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती सत्र Read More »

img 20260919 wa0002

Manoj Jarange: आंदोलनाचा मार्ग : संघर्ष की संयम?

Manoj Jarange: लोकशाहीमध्ये आंदोलन हा केवळ रस्त्यावर उतरलेला जमाव नसतो. आंदोलन म्हणजे व्यवस्थेला आरसा दाखवण्याचे माध्यम असते. सरकारच्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित करण्याचा, अन्यायाविरोधात आवाज उठवण्याचा आणि जनतेच्या मागण्या सत्तेच्या कानापर्यंत पोहोचवण्याचा तो घटनात्मक मार्ग आहे. मात्र आंदोलनाची ताकद केवळ गर्दीत नसते ती त्याच्या नैतिक भूमिकेत, संयमात आणि जनतेच्या विश्वासात असते. महात्मा गांधींनी सत्याग्रहाच्या माध्यमातून हीच ताकद दाखवून दिली. सत्य, अहिंसा आणि आत्मक्लेश यांच्या आधारावर उभे राहिलेले आंदोलन हे तात्पुरते यश मिळवण्यासाठी नव्हे, तर समाजाच्या मनात दीर्घकाळ टिकणारा विश्वास निर्माण करण्यासाठी असते. आजच्या काळात मात्र आंदोलनाच्या भाषेत मोठा बदल होताना दिसतो. सामाजिक माध्यमे आणि २४ तासांच्या वृत्तवाहिन्यांच्या युगात आवाज मोठा करणे म्हणजे आंदोलन अधिक प्रभावी करणे, अशी एक धोकादायक समजूत तयार झाली आहे. अरेरावी, शिवीगाळ, धमक्या, वैयक्तिक आयुष्य चव्हाट्यावर आणणे, विरोधकांना लक्ष्य करणे आणि आंदोलनासाठी इतरांचा वापर करणाऱ्या प्रवृत्ती वाढल्या तर आंदोलनाचा नैतिक आधारच कमकुवत होतो. सरकारच्या समर्थनाचा किंवा विरोधाचा प्रश्न वेगळा आहे. पण एखाद्या आंदोलनाला सत्तेच्या राजकीय गणिताचा आधार मिळतोय का? आंदोलनकर्त्यांचा वापर कुणाच्या राजकीय फायद्यासाठी होतोय का, याबाबत समाजाने सतर्क राहणे आवश्यक आहे. कारण लोकांच्या भावनांवर उभे राहिलेले आंदोलन जर कोणाच्या राजकीय रणनीतीचे साधन बनले, तर शेवटी नुकसान जनतेचेच होते. याच संदर्भात मनोज जरांगे-पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाकडे पाहावे लागेल. मराठा समाजाला कुणबी नोंदींच्या आधारे ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळावा, ही मागणी जरांगे-पाटील यांनी सातत्याने मांडली आहे. या मागणीभोवती कायदेशीर, सामाजिक आणि राजकीय असे अनेक गुंतागुंतीचे प्रश्न आहेत. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर केवळ भावनेतून किंवा घोषणांमधून मिळणार नाही; त्यासाठी संविधानिक चौकट, उपलब्ध नोंदी, न्यायालयीन निर्णय आणि सरकारची कार्यवाही या सर्वांचा विचार करावा लागेल. मात्र आंदोलनाच्या पद्धतीकडे पाहताना एक वेगळा मुद्दा समोर येतो. १७ सप्टेंबर २०२६ रोजी २० दिवसांचे उपोषण मागे घेताना मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला तीन महिन्यांची मुदत दिली आहे. सरकारच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय म्हणजे मागे हटणे की पुढच्या लढाईसाठी घेतलेले पाऊल, याचे मूल्यमापन प्रत्येकाने आपल्या राजकीय किंवा सामाजिक भूमिकेनुसार करावे. पण लोकशाहीच्या दृष्टीने त्यातील एक महत्त्वाचा संदेश दुर्लक्षित करता येणार नाही. प्रत्येक आंदोलनाचा शेवट तात्काळ विजयात होत नाही; अनेकदा संवादासाठी वेळ देणे हाही आंदोलनाचाच एक भाग असतो. सरकारने मागणी मान्य केली नाही म्हणून आंदोलन अपयशी आणि मागणी मान्य झाली म्हणून आंदोलन यशस्वी, अशी सरळ गणिती मांडणी लोकशाहीत चालत नाही. आंदोलन म्हणजे वाटाघाटीही आहेत. दबावही आहे. संयमही आहे. आणि आवश्यक तेव्हा माघार घेण्याची राजकीय-सामाजिक शहाणपणाची तयारीही आहे. याच ठिकाणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे  यांच्या आंदोलनाच्या पद्धतीची आठवण होते. अण्णांनी महाराष्ट्रातील विविध प्रश्नांवर अनेकदा उपोषणाचा मार्ग स्वीकारला. माहितीचा अधिकार, भ्रष्टाचारविरोधी लढा आणि जनलोकपाल यांसारख्या विषयांवर त्यांनी सरकारवर दबाव निर्माण केला. २०११ च्या जनलोकपाल आंदोलनाने तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अभूतपूर्व जनसमर्थन मिळवले. मात्र अण्णांच्या आंदोलनाच्या इतिहासात एक गोष्ट प्रकर्षाने दिसते, सरकारने प्रत्येक मागणी पहिल्याच दिवशी मान्य केलेली नव्हती. आश्वासने आली, काही वेळा ती अपुरी ठरली, पुन्हा आंदोलन झाले. संघर्ष आणि संवाद यांची ही प्रक्रिया अनेक वर्षे चालली. म्हणूनच आंदोलनकर्त्याने प्रत्येक वेळी दोन पावले पुढेच गेले पाहिजे, असा नियम लोकशाहीत नाही. काही वेळा एक पाऊल मागे घेणे म्हणजे पराभव नसतो. ते पुढच्या लढाईसाठी जागा निर्माण करणारे पाऊल असू शकते. जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाबाबतही हेच वस्तुनिष्ठपणे पाहण्याची गरज आहे. त्यांच्या काही वक्तव्यांवर टीका झाली आहे. भाषेतील आक्रमकता, राजकीय व्यक्तींवरील वक्तव्ये किंवा आंदोलनाची पद्धत याबाबत मतभेद असू शकतात. पण एखाद्या आंदोलनकर्त्याच्या काही वक्तव्यांवरून संपूर्ण आंदोलनाची मागणी किंवा त्यामागील समाजाची भावना नाकारता येत नाही. त्याचप्रमाणे आंदोलनाला मोठा जनसमर्थनाचा आधार मिळतो म्हणून त्यातील प्रत्येक भूमिका आपोआप योग्य ठरत नाही. हीच लोकशाहीची खरी कसोटी व्यक्तीवर प्रेम असो किंवा विरोध असो मुद्द्याचे परीक्षण स्वतंत्रपणे झाले पाहिजे. मराठा आरक्षणाचा प्रश्नही असाच आहे. एका बाजूला मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीचा प्रश्न आहे. दुसऱ्या बाजूला ओबीसी समाजाच्या विद्यमान आरक्षणाच्या हक्कांबाबतच्या चिंता आहेत. या दोन्ही भावना वास्तविक आहेत. त्यामुळे हा प्रश्न एका समाजाचा विजय आणि दुसऱ्या समाजाचा पराभव अशा भाषेत मांडला, तर सामाजिक तणाव वाढण्याचा धोका आहे. आरक्षणाच्या प्रश्नाचे अंतिम उत्तर घोषणांमध्ये नाही; ते कायदेशीर आणि घटनात्मक प्रक्रियेत आहे आणि म्हणूनच आंदोलनाचा आवाज जितका प्रखर असेल, तितकाच त्यामागचा विवेकही प्रखर असायला हवा. आज प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडिया यांची भूमिका येथे अत्यंत महत्त्वाची आहे. एखाद्याच्या संतापाचा छोटा व्हिडिओ काही मिनिटांत लाखो लोकांपर्यंत पोहोचतो. शिवीगाळ बातमी बनते, धमकी चर्चेचा विषय बनते आणि वैयक्तिक आरोप ‘कंटेंट’ बनतात. यातून प्रश्न सुटत नाहीत; उलट प्रश्नाभोवती धुरळा निर्माण होतो. पत्रकारितेचे काम त्या धुरळ्यात आणखी धूर निर्माण करणे नाही. सत्य आणि आरोप यांच्यातील रेषा स्पष्ट करणे हे तिचे काम आहे. त्यामुळे आंदोलनकर्त्यानेही माध्यमांवर अवलंबून राहताना सावध असले पाहिजे आणि माध्यमांनीही आंदोलनकर्त्याच्या प्रत्येक आक्रमक वक्तव्याला आंदोलनाची अधिकृत भूमिका मानू नये. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे असोत किंवा मनोज जरांगे-पाटील दोघांच्या आंदोलनांची पार्श्वभूमी, प्रश्न आणि राजकीय संदर्भ वेगवेगळे आहेत. त्यामुळे दोघांची तुलना पूर्णपणे समान पातळीवर करता येणार नाही. पण एका व्यापक अर्थाने साम्य नक्कीच दिसते, लोकहिताच्या प्रश्नासाठी सरकारवर दबाव आणताना उपोषण आणि आंदोलन हे साधन म्हणून वापरणे आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आंदोलनकर्त्याच्या मागे उभ्या असलेल्या लोकांची भूमिका. आंदोलनाचे नेतृत्व एका व्यक्तीभोवती केंद्रित झाले की त्या व्यक्तीला देवत्व देण्याचा मोह निर्माण होतो. तिथून पुढे प्रश्न विचारण्याची क्षमता कमी होते. नेता काहीही बोलला तरी समर्थक टाळ्या वाजवतात आणि विरोधक काहीही बोलला तरी त्याला शत्रू मानले जाते. ही दोन्ही टोकाची भूमिका लोकशाहीसाठी घातक आहे. आंदोलनकर्त्यावर प्रश्न विचारणे म्हणजे आंदोलनाचा विरोध नव्हे. आणि आंदोलनाला समर्थन देणे म्हणजे आंदोलनकर्त्याच्या प्रत्येक शब्दाचे समर्थन करणेही नव्हे. लोकशाहीमध्ये नेत्याला प्रश्न विचारता येतो, सरकारला प्रश्न विचारता येतो आणि स्वतःच्या समाजालाही प्रश्न विचारता येतो. आज गरज आहे ती याच विवेकाची. आंदोलनाला सरकारने घाबरावे, एवढेच पुरेसे नाही; सरकारने आंदोलनातील योग्य प्रश्न समजून घ्यावेत, ही खरी अपेक्षा असली पाहिजे. त्याचवेळी आंदोलनकर्त्यांनीही सरकारशी संवादाचे दरवाजे पूर्णपणे बंद करू नयेत. कारण शेवटी सरकार बदलत राहतात, आंदोलने येतात-जातात, नेते बदलतात; पण प्रश्न मात्र जनतेचेच राहतात. म्हणून आंदोलनाचा मार्ग कितीही कठीण असला तरी तो गांधीवादी असेल, संयमी असेल आणि नैतिक विश्वासावर उभा असेल तर त्याची ताकद दीर्घकाळ टिकते. आवाज मोठा असण्यापेक्षा तो विश्वासार्ह असणे महत्त्वाचे आहे. आंदोलन किती दिवस चालले यापेक्षा त्यातून समाजात काय बदल घडला हे महत्त्वाचे आहे. आणि नेता किती आक्रमक आहे यापेक्षा तो आपल्या मागणीसाठी किती प्रामाणिक, संयमी आणि उत्तरदायी आहे, हे महत्त्वाचे आहे. मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाचे अंतिम फलित काय असेल, हे आज सांगणे घाईचे ठरेल. सरकारला दिलेली तीन महिन्यांची मुदत काय परिणाम घडवते, सरकार प्रत्यक्षात काय पावले उचलते आणि पुढे आंदोलन कोणत्या मार्गाने जाते, हे काळच ठरवेल. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे. लोकशाहीत सरकारला झुकवण्यापेक्षा सरकारला जनतेच्या प्रश्नासमोर उत्तरदायी बनवणे मोठे असते आणि त्यासाठी कधी दोन पावले पुढे जावे लागते, कधी एक पाऊल मागे यावे लागते; पण

Manoj Jarange: आंदोलनाचा मार्ग : संघर्ष की संयम? Read More »