DNA मराठी

Ahilyanagar Crime: नगर पाथर्डी रोडवरील हॉटेल शौर्य येथे तरुणाचा खून; एक जण गंभीर जखमी

img 20260622 wa0001

Ahilyanagar Crime: अहिल्यानगर शहरातील पाथर्डी रोडवरील महेशनगर परिसरातील हॉटेल शौर्य येथे रविवारी रात्री झालेल्या हल्ल्यात एका तरुणाचा चाकूने वार करून खून करण्यात झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सागर धोत्रे व त्यांचा सहकारी हॉटेलमध्ये जेवणासाठी बसले असताना त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात सागर धोत्रे यांचा जागीच मृत्यू झाला.

तर दुसरा युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर साईदीप हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार, जयेश पाटोळे व त्याच्या दोन साथीदारांनी हा हल्ला केल्याच संशयित आरोपी आहे. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते. घटनेची माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलीस

उपधीक्षक दिलीप टिपरसे, एपीआय तेजश्री थोरात यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळाची तपासणी केली आहे.

मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. दरम्यान, संशयित आरोपी जयेश पाटोळे याला पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *