DNA मराठी

Maharashtra Politics

harshwardhan sapkal

Harshvardhan Sapkal : आदिवासी विद्यार्थ्यांची तात्काळ सुटका करा; अन्यथा वर्षा बंगल्याला घेराव घालणार

Harshvardhan Sapkal : नाशिकहून मुंबईकडे लाँग मार्च काढलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांनी रात्रीच्या मुक्कामासाठी काँग्रेसच्या टिळक भवन मुख्यालयात आश्रय घेतला होता. मात्र, मध्यरात्रीपासून पोलिसांनी विद्यार्थ्यांचा ससेमिरा सुरू केला आणि काँग्रेसच्या मुख्यालयात बेकायदा प्रवेश करून विद्यार्थीनींना धमकावले ताब्यात घेतले. पोलिसांनी NSUI अध्यक्ष सागर साळुंखे तसेच मुंबई NSUI अध्यक्षांना अटक केली आहे. “काँग्रेसच्या मुख्यालयात पोलिसांनी अशा बेकायदा पद्धतीने प्रवेश करून केलेली कारवाई दंडेलशाहीचे लक्षण आहे. अटक केलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांची तसेच NSUI पदाधिकाऱ्यांची तात्काळ सुटका करावी,” “विद्यार्थ्यांची सुटका केली नाही, तर महाराष्ट्रातील काँग्रेसचे सर्व नेते मुंबईत येऊन वर्षा बंगल्याला घेराव घालतील असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे.

Harshvardhan Sapkal : आदिवासी विद्यार्थ्यांची तात्काळ सुटका करा; अन्यथा वर्षा बंगल्याला घेराव घालणार Read More »

balasaheb thorat

Balasaheb Thorat : आदिवासी बांधवांनी आपल्या न्याय्य हक्कांसाठी आंदोलन करणे हा गुन्हा आहे का?

Balasaheb Thorat : आपल्या न्याय्य मागण्यांसाठी नाशिकहून पायी मुंबईपर्यंत आलेले आदिवासी विद्यार्थी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या टिळक भवन या मुख्यालयात मुक्कामी थांबले होते. मात्र मध्यरात्रीपासून पोलीस बेकायदेशीर रित्या, टिळक भवनमध्ये घुसून या विद्यार्थ्यांवर दबाव निर्माण करत आहेत, त्यांना धमकावत आहेत आणि चुकीच्या पद्धतीने अटकेची कारवाई केली जात असल्याची प्रतिक्रिया राज्याचे माजी मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. हे अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह आहे असा उल्लेख करत त्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. आपल्या हक्कांसाठी शांततेच्या मार्गाने आवाज उठवणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांशी सरकारने संवाद साधला पाहिजे. त्यांच्या समस्या ऐकल्या पाहिजेत. त्याऐवजी त्यांना पोलीस बळाच्या जोरावर दडपण्याचा प्रयत्न कशासाठी? लोकशाहीत प्रश्न विचारणे गुन्हा नाही. न्याय मागणे गुन्हा नाही. आंदोलन करणे गुन्हा नाही. महाराष्ट्र हा कायद्याचा, लोकशाहीचा आणि सामाजिक न्यायाचा सन्मान करणारा प्रदेश आहे. त्या महाराष्ट्रात न्याय मागणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांशी संवाद करण्याऐवजी, सरकार त्यांना बेड्या ठोकत आहे. सरकारच्या या दडपशाहीच्या भूमिकेचा आम्ही तीव्र निषेध करतो. आदिवासी विद्यार्थ्यांच्या लढ्यात आम्ही ठामपणे त्यांच्या पाठीशी आहोत असं यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले.

Balasaheb Thorat : आदिवासी बांधवांनी आपल्या न्याय्य हक्कांसाठी आंदोलन करणे हा गुन्हा आहे का? Read More »

img 20261002 wa0030

Vikhe Patil: शेवगावच्या हक्काचे पाणी कोणीही काढून घेणार नाही

Vikhe Patil: शेवगावच्या हक्काचे पाणी कोणीही काढून घेणार नाही.ताजनापूरच्या पहील्या आणि दुसर्या टप्प्यातील गावांना पाणी देताना कोणावरही अन्याय होवू न देता ताजपूरच्या तिसर्या टप्प्याची सुरूवात करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला असून,त्याच्या सर्व्हेक्षणासाठी एक कोटी रूपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहीती  न जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. शेवगाव  येथे  मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत टंचाई आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.आ.मोनिका राजळे अतिरिक्त जिल्हाधिकारी शैलेंद्र हिंगे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता अरूण नाईक अभियंता सुनंदा जगताप पल्लवी जगताप जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मंत्री विखे पाटील यांनी तब्बल अडीच तास शेवगाव पाथर्डी तालुक्यातील शेतकरी नागरीक यांच्या तक्रारी जाणून घेत उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नाबाबत त्यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण घेतले.प्राधान्याने पाणी व चारा यांचा प्रश्न गंभीर असून यावरच अधिक सूक्ष्मपणे आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांना दिल्या.टंचाईच्या परीस्थीतीत  शेतकर्यांना पशुधनाचाच आधार मिळणार असून पशुधन वाचविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार असल्याचे गांभिर्य अधिकार्यांनी घ्यावे आशा सूचना मंत्री विखे पाटील यांनी दिल्या. ताजनापूरच्या संदर्भात बोलतांना मंत्री विखे पाटील म्हणाले की सर्व शेतकऱ्यांना पाणी मिळावे हीच आमची भूमिका आहे.शेवगावचे हक्काचे पाणी कोणी काढून घेतलेले नाही.ताजनापूरच्या टप्पा एक मधील राहीलेली आठ गावे,दुसर्या टप्प्यातील बावीस गावांना पाणी देण्यासाठी आवश्यक असलेल्या निधीस मंजूरी देण्यात आली असून,राहीलेल्या गावांसाठी तिसरा टप्पा करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला असून या गावांचे सर्व्हेक्षण करण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल पुढच्या तीन महीन्यात हे सव्हेक्षण पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्याना दिले. दुष्काळाची धग मोठ्या प्रमाणात असल्याने दोन्ही तालुक्यात असलेल्या सर्व पाझर तलावतील आणि बंधार्यातील गाळ काढण्याची मोहीम तातडीने सुरू करावी.यासाठी मागेल त्याला काम देण्याची तयारी ठेवून लोकांना दिलासा देण्याची जबाबदारी प्रशासकीय अधिकार्यानी घ्यावी. उपलब्ध असलेले पाणी पाण्यासाठी राखून ठेवावे लागणार आहे.उरर्वित पाणी शेतीला देण्याचा विचार होईल परंतू पाईप फोडून पाणी उचलण्याचा प्रयत्न झाल्यास गुन्हे दाखल करण्याचे  आदेश दिलै असून,आतापर्तय ११४७ मोटारी जप्त करण्यात आल्याची माहीती मंत्री विखे पाटील यांंनी दिली. आ.मोनिका राजळे यांनी आपल्या भाषणात ताजनापूरच्या संदर्भात संभ्रम निर्माण करण्याचे काम झाले.त्यामुळे तिसरा टप्पा निर्माण करण्याचा जलसंपदा मंत्र्यांनी घेतेलेल्या निर्णयामुळे दोन वर्षात तिसरा टप्पा पूर्ण होईल आशी अपेक्षा व्यक्त केली.

Vikhe Patil: शेवगावच्या हक्काचे पाणी कोणीही काढून घेणार नाही Read More »

img 20261001 wa0013

Radhakrishna Vikh Patil : चारा टंचाईवर मात करण्यासाठी सखोल नियोजन करणार

Radhakrishna Vikh Patil : जिल्ह्यातील पशुधनाची एकूण संख्या, लागणारा चारा आणि भविष्यातील चारा टंचाईवर मात करण्यासाठी अधिक सखोल नियोजन होण्याची आवश्यकता असून पशुसंवर्धन विभागाने तालुकानिहाय याचा सविस्तर आढावा घेवून आराखडा तयार करण्याच्या सूचना जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या. श्रीगोंदा तालुक्यातील टंचाई परीस्थीतीचा आढावा मंत्री विखे पाटील यांनी घेतला.आ.विक्रमसिंह पाचपुते भगवान पाचपुते राजेंद्र नागवडे अतिरीक्त जिल्हाधिकारी शैलेंद्र हिंगे कुकडीच्या अधिक्षक अभियंता अलका अहीरराव कृषि अधिकारी सुधाकर बोराळे महावितरण कंपनीचे अभियंता पवार यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. श्रीगोंदा येथे टंचाई आढावा बैठकीत मंत्री विखे पाटील यांनी तालुक्यातील पशुधन आणि चारा नियोजनाबाबत पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या सादरीकरणावर नाराजी व्यक्त केली.लहान मोठे जनावरे आणि शेळी मेंढी यांची संख्या चार्याची गरज यामध्ये तफावत दिसत असल्याने पशुसंवर्धन विभागाने शेतकर्याकडे असलेले पशुधन त्यांच्याकडून उपलब्ध होणारा चारा आणि पशुधन आहे पण चारा नाही,मूरघास बनविणारे शेतकरी आशी आकडेवारी पुन्हा संकलित करण्यास सांगितले.पशुधनाची सांख्यिकी माहीती विभागाने संकलित केली असल्याने त्याची मदत होईल याकडे मंत्र्यांनी लक्ष वेधले. वीज वितरण कंपनीने तालुक्यात मोठ्या संख्येने सौर कृषी पंप दिले.तरीही भारनियमानाचे प्रमाण कमी का होत नाही असा प्रश्न विखे पाटील यांनी उपस्थित केला.तालुक्यात असलेले फिडर त्यावर येत असलेला भार याचाही आढावा घेवून घेण्याच्या सूचना त्यांनी महावितरणच्या अधिकार्यांना दिल्या. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या नऊ पैकी आठ योजनांची काम पन्नास टक्के एवढीच झाली आहेत.यासाठी किती निधीची आवश्यकता आहे त्याचा प्रस्तावही सादर करण्याचे निर्देश दिले. टॅकरच्या नियोजनासाठी तहसिलदार गटविकास अधिकारी ग्रामसेवक आणि तलाठी यांनी वस्तूनिष्ठ माहीतीचा आरखडा पुन्हा सादर करावा भविष्यातील पाणी टंचाई लक्षात घेवून कुकडी आणि सीना लाभक्षेत्रात किती टॅकरची आवश्यकता आहे त्याचे वेळापत्रक आणि अॅप मध्ये माहीती भरावी. पीकविमा योजनेपासून शेतकरी दूर जात आहे.मंत्री विखे पाटील यांनी मागील वर्षी शेतकर्याना मिळालेला विमा योजनेचा लाभ आणि आता योजनेत कमी झालेली शैतकर्यांची संख्या यामध्ये फरक असल्याने कृषी विभागाने योजनेच्या संदर्भात अधिक प्रसार प्रचार करण्याची अपेक्षा व्यक्त केली. दुष्काळी परीस्थीतीच्या पार्श्वभूमीवर लोकांचा रोष खूप मोठा आहे.मात्र इतर योजनांचा लाभ सुरू असल्याने नागरीकांना दिलासा मिळतो.मात्र आशा काळात सरकार आणि प्रशासनाची जबाबदारी ही समाजघटकांना आधार देण्याची आहे.अतिशय संवेदनशील आणि पारदर्शीपणे संकटात काम करा असे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले. मंत्री विखे पाटील यांनी साकळाई योजनेला मंजूरी मिळवून निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल उपस्थित शेतकऱ्यांनी त्यांचे आभार मानले.मात्र सिना धरणातून आवर्तन देण्याची मागणी केली.यासंर्भात पाण्याची उपलब्धता लक्षात घेवून शेतकरी हिताचा निर्णय करण्याची ग्वाही त्यांनी लाभधारक शेतकऱ्यांशी बोलतांना दिली.

Radhakrishna Vikh Patil : चारा टंचाईवर मात करण्यासाठी सखोल नियोजन करणार Read More »

vikhe patil

Vikhe Patil: कोणताही नियम आणि कायद्याची अडचण सांगून शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवू नका; मंत्री विखे स्पष्टच म्हणाले…

Vikhe Patil: टंचाई परीस्थीतीला सामोरे जाताना प्रशासकीय यंत्रणेने अतिशय संवेदनशीलपणे काम करावे.कोणताही नियम आणि कायद्याची अडचण सांगून शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवू नका.शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असून जामखेड तालुका दुष्काळमुक्त करण्यासाठी जलसंपदा विभागाने महत्वपूर्ण निर्णयांची कार्यवाही सुरू केली आहे.कुकडी धरण समूहातील पाण्याचा लाभ आवर्तनाच्या माध्यमातून देण्याबाबत निश्चित विचार करण्याची ग्वाही जलसंपदा तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. मंत्री विखे पाटील यांनी जामखेड तालुक्यातील दुष्काळी परीस्थीतीचा आढावा घेतला.आरणगाव येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जावून शेती पीकांची पाहाणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला. कर्जत जामखेड तालुक्यातील दुष्काळी भागातील प्रश्न समजावून घेण्यासाठी आढावा बैठक सभापती प्रा राम शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.आ.सुनिल कर्जतकर भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग नगराध्यक्षा सौ.प्रांजली चिंतामणी अतिरीक्त जिल्हाधिकारी शैलेंद्र हिंगे अधिक्षक अभियंता अलका अहीरराव वीज कृषी अधिकारी सुधाकर बोराळे वितरण कंपनीचे रमेश पवार जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी दशरथ दिघे प्रांताधिकारी नितीन पाटील विनायक देशमुख अंबादास पिसाळ यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. दुष्काळी भागाला न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलदगतीने निर्णय केले.पाण्याचे पाणी राखून ठेवतानाच जनावारांसाठी चारा व पाण्याचे नियोजन प्राधान्य आहे.तालुक्यात चारा उत्पादन होण्यासाठी पशुसंवर्धन आणी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकत्रित नियोजन करण्याच्या सूचना केल्या. पंचनामे सर्वाचे परीस्थीती गंभीरहोतील. .मदतीपासून कोणी वंचित राहाणार नाही आशी असे स्पष्ट करून टॅकर नियोजन करण्यासाठी ग्रामसेवक तलाठी यांनी उपस्थित राहाणे सक्तीचे करावे.परीस्थीती गंभीर असल्याने प्रत्येक विभागाचे अधिकारी, क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवून काम करावे.खोटी माहीती बैठकीत देवू नये.अधिकार्यांच्या हलगर्जीपणा मुळे लोकांमध्ये रोष निर्माण होवू देवू नका.कारवाई करण्यास भाग पाडू नका असा इशारा मंत्री विखे पाटील यांनी दिला. अतिवृष्टीमुळे नूकसान झालेल्या कवडगाव चौंडी जवळा या कोल्हापूर बंधार्याची काम,मोहरी तलावाचा सांडवा,तसेच कुकडी कालव्यांची अतिवृष्टीमुळे झालेल्या नूकसानग्रस्त भागाच्या दुरूस्तीसाठी निधीची उपलब्धता जलसंपदा विभागाने करून दिली असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले. सभापती राम शिंदे यांंनी तालुक्यातील प्रश्नाचा आढावा घेवुन,कृष्णा खोर्यातील अतिरीक्त पाणी जामखेड तालुक्याला मिळावे आशी अपेक्षा व्यक्त केली.शासनाने दुष्काळी परीस्थीतीतीला सामोरे जाण्यासाठी सर्व निर्णय केले आहेत.प्रभावी अंमलबजावणीची जबाबदारी अधिकार्यांची आहे.कोणाला खूष करण्यासाठी चुकीची माहीती देवू नका.पीक विमा वीज प्रश्न जलजीवन मिशनच्या योजनाबाबत प्रशासनाने अधिक गांभीर्याने काम करण्यची गरज सभापती राम शिंदे यानी व्यक्त केली.याप्रसंगी आ.सुनिल कर्जतकर यांनी सूचना केल्या.

Vikhe Patil: कोणताही नियम आणि कायद्याची अडचण सांगून शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवू नका; मंत्री विखे स्पष्टच म्हणाले… Read More »

img 20260930 wa0002

Vikhe Patil: कृष्णा आणि गोदावरी खोऱ्यातील सिंचन क्षमतेचे सर्व्हेक्षण होणार; मंत्री विखेंची मोठी घोषणा

Vikhe Patil : कृष्णा आणि गोदावरी खोऱ्यातील सर्व मोठ्या धरणाच्या लाभ क्षेत्रात सिंचन क्षमतेचे आणि झालेल्या अर्थिक सामाजिक बदलांच सर्व्हेक्षण करण्यात येणार असल्याची असल्याची माहीती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. मराठवाडा गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या अंतर्गत येणार्या सर्व जिल्ह्यातील वरीष्ठ अधिकार्यांची बैठक सिंचन भवन येथे संपन्न झाली.बैठकीला महामंडळाचे कार्यकारी संचालक जयंत गवळी,अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने मुख्य अभियंता अरूण नाईक, सुनंदा जगताप,यांच्यासह सर्व जिल्ह्याचे अधिक्षक अभियंता कार्यकारी अभियंता नदीजोड प्रकल्पाचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.प्रत्येक जिल्ह्यातील धरणाची पाणी परीस्थीती भविष्यातील पाणी नियोजन सिंचन प्रकल्पांची कामांची सद्यस्थिती,निधीची उपलब्धता याबाबत त्यांनी आढावा घेतला. सध्याची दुष्काळी परीस्थीतीची तीव्रता मोठी आहे.परंतू आशा भीषण परिस्थितीलाच संधी मानून समन्वयाने काम करण्याचे सूचित करून मंत्री विखे पाटील म्हणाले की,जनतेला दिलासा देण्यासाठी जलसंपदा विभाग निश्चित काम करेल.उपलब्ध पाणी साठा प्राधान्याने पिण्यासाठी राखीव ठेवावा.वरीष्ठ अधिकार्यांनी आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकार्यांची भेट घेवून उपलब्ध पाण्याच्या नियंत्रणाबाबत समन्वय साधून भीषण परीस्थीतीत लघु पाटबंधारे तलाव,मध्यम प्रकल्पातील पाण्यातील बिगरसिंचन आरक्षण तसेच बेकायदेशीर उपसा थांबविण्यासाठी सुध्दा त्यांची मदत घेण्याबाबत त्यांनी सूचित केले. लाभक्षेत्रातील सिंचन प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी नाबार्ड टप्पा एक आणि दोनचा निधी उपलब्ध असून त्यामाध्यमातून प्रकल्प पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे.प्रकल्पाचे आराखडे ना हरकत दाखले याबाबतही तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी दिल्या. लाभक्षेत्रात मोठ्या धरणाचे काम झाले.मात्र यामाध्यमातून किती सिंचन स्थापीत किंवा पुर्नस्थापीत झाले याचा कोणताही डाटा उपलब्ध नाही.लाभक्षेत्रात किती शेती उत्पादन वाढले कृषी क्षेत्रातील बदलामुळे अर्थिक सामाजिक बदल काय झाले या आढावा कधीच घेतला गेला नसल्याने याबाबत गोखले इन्स्टिट्यूट किंवा टाटा सोशल सायन्स संस्थेच्या माध्यमातून विभागाच्या वतीने सर्व्हेक्षण करण्यात येणार असल्याची माहीती मंत्री विखे पाटील यांनी बैठकीत दिली. जलसंपदा आणि कृषी विभाग यांच्यात समन्वय नसल्याची खंत व्यक्त करून,धरणातील पाणी तसेच पीक पध्दती बाबत नेमकी आकडेवारी कधीच समोर येवू न शकल्याने आरोप प्रत्यारोप होतात.शेतकर्यांचे नूकसान टाळायचे असेल कृषी क्षेत्राला सुसंगत असे धोरण घेवून जलसंपदा विभागाला काम करण्याची आवश्यकता आहे.सिंचनाच्या माध्यमातून पाठबळ दिले तर कृषी उत्पादन वाढेल असे मत त्यांनी बैठकीत व्यक्त केले. सध्याच्या दुष्काळी परीस्थीतीच्या पार्श्वभूमीवर पाणी पट्टी वसुलीबाबत जलसंपदा विभाग आग्रही भूमिका घेणार नाही.मात्र भविष्यात पाणी पट्टी वसुलीसाठी सॅटेलाइट इमेज ग्राह्य धरली जाणार असून कोणत्या पीकासाठी पाणी वापरले याची शास्त्रशुध्द माहीती उपलब्ध होईल असा विश्वास व्यक्त करून महानगरपालिका नगरपालिका आणि ग्रामपंचायत यांच्याकडून विभागाला वसूल मिळत नाही त्यामुळेच कार्यपध्दतीत बदल करण्याची वेळ आली असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले. फ्लोटींग सोलर,पर्यटन धोरण विभागाच्या जागांवरील अतिक्रमण काढणे,कालवे अतिक्रमणमुक्त करणे आणि याबाबत मंत्री विखे पाटील यांनी प्रत्येक जिल्ह्यातील कामकाजाचा आढावा सकाळी दहा वाजल्यापासून घेतला.

Vikhe Patil: कृष्णा आणि गोदावरी खोऱ्यातील सिंचन क्षमतेचे सर्व्हेक्षण होणार; मंत्री विखेंची मोठी घोषणा Read More »

sugarcane crushing season

Sugarcane Crushing Season : ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून; परवाना प्राप्त कारखान्यांना त्यापूर्वीही गाळपाची मुभा

Sugarcane Crushing Season : महाराष्ट्रातील सन २०२६-२७ च्या साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, राज्यातील सहकारी व खासगी साखर कारखान्यांना १५ ऑक्टोबर २०२६ पासून किंवा त्यापूर्वी गाळप हंगाम सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याबाबत ९ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीतील सूचनांनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार ज्या साखर कारखान्यांनी गाळप परवाना मिळविण्यासाठी आवश्यक असलेली सर्व कायदेशीर व प्रशासकीय पूर्तता पूर्ण केली आहे, असे कारखाने १५ ऑक्टोबरपासून किंवा त्यापूर्वी गाळप सुरू करू शकतील. दरम्यान, शासनाच्या वतीने कोणत्याही साखर कारखान्याला गाळप हंगाम लवकर सुरू करण्याची सक्ती नाही. तसेच १५ ऑक्टोबरपूर्वी गाळप परवान्यासाठी अर्ज करणाऱ्या कारखान्यांना गाळप परवाना देण्यात येईल. सर्व साखर कारखान्यांना गाळप सुरू करण्यापूर्वी साखर आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडून आवश्यक अधिकृत गाळप परवाना प्राप्त करून घेणे बंधनकारक राहणार आहे. सन २०२६-२७ चा गाळप हंगाम सुरळीतपणे पार पडावा यासाठी राज्यातील सर्व साखर कारखाने व संबंधित घटकांनी शासन तसेच साखर आयुक्त कार्यालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन साखर आयुक्त कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

Sugarcane Crushing Season : ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून; परवाना प्राप्त कारखान्यांना त्यापूर्वीही गाळपाची मुभा Read More »

naval kishore ram

मनपा आयुक्त नवल किशोर राम यांच्या पाठीशी शिवसेना;कथित राजकीय दबावप्रकरणी CM फडणवीसांना पत्र

Naval Kishore Ram : पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांच्यावर कथित राजकीय दबाव आणून त्यांना धमकावल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक झाली आहे. या प्रकरणाची तातडीने आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, तसेच प्रशासनातील अधिकाऱ्यांना निर्भयपणे काम करण्यासाठी संरक्षण द्यावे, अशी मागणी करत शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देण्यात आले आहे. “पुण्यातील रामाला कोण वाचवणार?” या बोचऱ्या शीर्षकातून शिवसेनेने राज्य सरकारला थेट सवाल केला आहे. पुणे महापालिकेच्या सुमारे ९० कोटी रुपयांच्या रस्ते कामाच्या निविदा प्रक्रियेत एका भाजप आमदाराने आपल्या मर्जीतील ठेकेदाराला काम मिळवून देण्यासाठी आयुक्त नवल किशोर राम यांच्यावर दबाव आणल्याचा आरोप असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. तसेच ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला असून, या घटनेला आयुक्तांनी दुजोरा दिल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे. “लंकेचा रावण दहा तोंडाचा होता; मात्र पुणे महापालिकेत अनेक तोंडांचे रावण महापालिकेचे लचके तोडण्यासाठी या रामावर तुटून पडत आहेत. या रामाला कोण वाचवणार?” असा सवाल पत्रातून करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे, संबंधित निविदा इतर ठेकेदारांच्या तुलनेत अधिक दराची असल्याने महापालिकेचे सुमारे नऊ कोटी रुपये वाचल्याची माहिती समोर आल्याचा दावा पत्रात करण्यात आला आहे. पुणेकरांच्या कररूपी पैशांची बचत करण्यासाठी नियमांनुसार निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यावरच जर राजकीय दबाव येत असेल, तर हा प्रकार गंभीर असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आयुक्त नवल किशोर राम यांनी नियमानुसार घेतलेल्या निर्णयांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे स्पष्ट केले आहे. महापालिकेच्या विकासकामांमध्ये पारदर्शकता राहावी, पुणेकरांच्या पैशांचा योग्य विनियोग व्हावा आणि प्रशासनाचा कारभार राजकीय हस्तक्षेपाशिवाय चालावा, अशी भूमिका पक्षाने मांडली आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ लक्ष घालावे, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. संबंधित आमदाराकडून आयुक्तांना धमकी दिल्याच्या आरोपांची स्वतंत्र चौकशी, निविदा प्रक्रियेतील कथित राजकीय हस्तक्षेपाची चौकशी, अधिकारी-कर्मचाऱ्यांना संरक्षण आणि निविदेशी संबंधित कागदपत्रांची तपासणी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणण्याची मागणी पत्रातून करण्यात आली आहे. “प्रशासनातील अधिकाऱ्यांना राजकीय दबावाशिवाय काम करता येणे ही लोकशाही व्यवस्थेची गरज आहे. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांनी या प्रकरणात तत्परतेने लक्ष घालून आयुक्त नवल किशोर राम यांना अभय द्यावे,” अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालय आता या पत्राची आणि करण्यात आलेल्या मागण्यांची काय दखल घेते, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे. हे पत्र शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख संजय मोरे आणि पुणे मनपा गटनेते नितीन गावडे यांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहे.

मनपा आयुक्त नवल किशोर राम यांच्या पाठीशी शिवसेना;कथित राजकीय दबावप्रकरणी CM फडणवीसांना पत्र Read More »

nilesh ghaywal

Nilesh Ghaywal : देशातून फरार असलेला निलेश घायवळ ‘त्या’ प्रकरणात निर्देश मुक्त…

Nilesh Ghaywal : कारागृहात असताना खंडणी मागितलेल्या प्रकरणी आजमेहेरबान मोका न्यायालयाने निलेश घायवळ सह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. आरोपी निलेश घायवळ याच्या वतीने ज्येष्ठ वकील विपुल दुशिंग,आरोपी मुसा शेख याच्या वतीने ॲड. रितेश गदादे, आरोपी अक्षय गोगावले याच्या वतीने ॲड. अनिश पाडेकर, आरोपी कुणाल कंधारे याच्या वतीने ॲड बिलाल मणियार,आरोपी संतोष धुमाळ आणि विपुल माझीरे याच्यासाठी ॲड सलमान पठाण यांनी कामकाज पाहिले.सध्या देशातून फरार असलेला निलेश घायवळ याला सबंधित प्रकरणात न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. आरोपी देशात नसताना देखील केस चा निर्दोष निकाल लागणे ही दुर्मिळ घटना मानली जात आहे.याबाबत अधिक माहिती अशी की निलेश घायवळ २०२० हा दुसऱ्या एका प्रकारात कारागृहात असताना संतोष धुमाळ याने फिर्यादीकडे भाऊच्या रॅली साठी जीप हवी आहे या स्वरूपात खंडणीची मागणी केली होती, आणि गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी हा गुन्हा उघडकीस आणला होता. परंतु लगेचच फिर्यादीने पोलिसांवर आणि तपास यंत्रणेवर गंभीर आरोप करत न्यायालयात आपली फिर्याद दबाव टाकून नोंदवली आहे.अशा स्वरूपाचे प्रतिद्यापत्र दाखल केले होते. तसेच मेहेरबान उच्च न्यायालयात देखील याबाबत रीट याचिका दाखल करत याबाबत आपले म्हणणे मांडले होते. यावर मेहेरबान उच्च न्यायालयाने कडक शब्दात ताशेरे ओढत पोलिसांना फिर्यादीचा पुन्हा एकदा जबाब नोंदवण्याचे आदेश दिले होते. या जबाबात देखील फिर्यादीने संपूर्ण घटनाक्रम नाकारला असून अशा प्रकारे गुन्हा घडला नसल्याचे नमूद केले होते.कालांतराने सदर खटला मे मोका न्यायाधीश साळुंखे यांच्या न्यायालयात चालवला गेला. त्यावेळी देखील फिर्यादीने संपूर्ण फिर्याद नाकारत गुन्हे शाखा आणि तपास यंत्रणेने दबाव टाकून फिर्याद नोंदवली तसेच संपूर्ण फिर्याद मे न्यायालयात शपथेवर नाकारली आणि अशी घटना घडली नसल्याचे कोर्टात सांगितले. इतर सर्व साक्षीदार आणि पंच यांनी देखील या संपूर्ण घटनाक्रम नाकारला आहे. निलेश घायवळ या टोळीवर नुकतेच अनेक गुन्हे दाखल असून याबाबत मे उच्च न्यायालयात ॲड विपुल दुशिंग यांच्या वतीने निलेश घायवळ व इतर आरोपींनी रीट याचिका दाखल केल्या आहेत. यावेळी आरोपींचे वकील ॲड विपुल दुशिंग यांनी निकालाचे स्वागत केले.अशा प्रकारचे निकाल हे सुदृढ न्यायव्यवस्थेचे प्रतीक आहेत अशी भावना व्यक्त केली व न्याय व्यवस्थेचे आभार मानले.

Nilesh Ghaywal : देशातून फरार असलेला निलेश घायवळ ‘त्या’ प्रकरणात निर्देश मुक्त… Read More »

Police

Pune Police: पुण्यात पोलिसांवर मोठी कारवाई; ‘त्या’ प्रकरणात 15 जणांच्या तडकाफडकी बदल्या

Pune Police : अल्पवयीन आरोपींना कारच्या बोनेटवर बसवून त्यांची धिंड काढल्याप्रकरणी पुणे पोलीस दलातून एक मोठी बातमी समोर आली आहे. याप्रकरणी सीआयडीने गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कठोर पाऊल उचलत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील ४ अधिकारी आणि ११ अंमलदार अशा एकूण १५ पोलिसांच्या तडकाफडकी बदल्यांचे आदेश दिले आहेत. या प्रशासकीय कारवाईमुळे पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही अल्पवयीन आरोपींना कारच्या बोनेटवर बसवून त्यांची धिंड काढण्यात आली होती. या गंभीर प्रकारामुळे पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. राज्य मानवाधिकार आयोगाने या घटनेची अत्यंत गंभीर दखल घेत पुणे पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. याशिवाय, याच पोलीस ठाण्यात आरोपींना बेकायदेशीररीत्या डांबून मारहाण केल्याचा आरोपही समोर आला होता, ज्यामुळे पोलिसांच्या अडचणी आणखी वाढल्या. सीआयडी मार्फत अल्पवयीन मुलांच्या धिंड प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी सुरू होती. या चौकशीत दोषी आढळल्यानंतर संबंधित पोलिसांवर दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये ३ पोलीस उपनिरीक्षक आणि १ सहायक पोलीस निरीक्षकाचा समावेश आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या ४ अधिकाऱ्यांची विशेष शाखेत तर ११ पोलीस अंमलदारांची पोलीस मुख्यालयात बदली केली आहे. बदली झालेले अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक: स्नेहल संभाजी थोरात, पोलीस उपनिरीक्षक: निलेश राजेंद्र मोकाशी, अण्णा मधुकर दराडे, सद्दाम हुसैन दस्तगीर फकीर तसेच, पोलीस मुख्यालयात बदली झालेले अमलदारांमध्ये सुनील दादा हनवते, दिनेश विनायक तापकीर, मितेश दत्तात्रय चोरमले, सागर चंद्रकांत बोरगे, सोहम कैलास शेंडकर, मंगेश जयसिंग पवार, राहुल अशोक औंधकर, रवींद्र शंकर गायकवाड, संदीप लक्ष्मण आगळे, तुकाराम पंडित सुतार आणि सुवर्णा दत्तात्रय भिसे आदींचे नावे आहेत. दरम्यान, मानवाधिकार आयोगाचा वचक, सीआयडीचा सखोल तपास आणि त्यानंतर झालेली ही मोठी प्रशासकीय कारवाई यामुळे पुणे पोलिसांमधील शिस्तीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. सीआयडीच्या पुढील तपासात या प्रकरणात आणखी कोणकोणते नवे धागेदोरे हाती लागतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Pune Police: पुण्यात पोलिसांवर मोठी कारवाई; ‘त्या’ प्रकरणात 15 जणांच्या तडकाफडकी बदल्या Read More »