DNA मराठी

DNA Marathi News

Chhatrapati Shivaji Maharaj : मनपाच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे लोकार्पण सोहळा संपन्न 

Chhatrapati Shivaji Maharaj : आज अहमदनगर महापालिकाच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे लोकार्पण सोहळा संपन्न. यावेळी खासदार सुजय विखे यांच्या पत्नी धनश्री विखे आमदार संग्राम जगताप देखील उपस्थित होते.  आपण पुतळे उभारतो मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांचे आचार आणि विचार आपल्या मुलांमध्ये रुजवले गेले पाहिजे असे मत खासदार सुजय विखे यांच्या पत्नी धनश्री विखे यांनी व्यक्त केलं अहमदनगर महानगरपालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण खासदार विखे यांच्या पत्नी धनश्री विखे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शहरातील अहमदनगर महानगरपालिकेचे पदाधिकारी अधिकारी उपस्थित होते  यावेळी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, आमदार संग्राम जगताप, महापौर रोहिणी शेंडगे, आयुक्त डॉ. पंकज जावळे, रणरागिणी महिला मंचच्या धनश्री विखे पाटील, उपमहापौर गणेश कवडे, सभापती गणेश कवडे, विरोधी पक्षनेते संपत बारस्कर,  अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे सभागृह नेते विनीत पाऊलबुद्धे, सुनील त्र्यंबके, सभापती पुष्पाताई बोरूडे, मीनाताई चोपडा, रूपाली वारे आदींसह सर्वपक्षीय नगरसेवक उपस्थित होते. दरम्यान, महापौर रोहिणी शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले, सभापती गणेश कवडे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी केले. सूत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी केले तर, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे यांनी आभार मानले. प्रशासकाचा कारभार माझ्याकडे यावा नगर शहराला 500 वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शहराच्या वैभवात भर घालणार महत्त्वाचा पैलू आहे. मनपाचा प्रशासकीय कारभार माझ्याकडे असल्यास सीना नदी अतिक्रमण मुक्त करण्यासाठी प्रयत्न करू. ज्या शहरात नदी वाहते त्या शहराचा विकास होतो. नगरसेवकांनी छत्रपतींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करावे. शहराचे प्रश्न सोडविण्यासाठी नगरकरांच्या बाजूने उभे राहू, असे आश्वासन जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी दिले.

Chhatrapati Shivaji Maharaj : मनपाच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे लोकार्पण सोहळा संपन्न  Read More »

Sandip Mitke: हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटवर छापा, 4 परप्रांतीय पिडीत मुलींची सुटका

Sandip Mitke : Dysp संदीप मिटके यांच्या पथकाने कारवाई करत शिर्डी येथील द युनिक स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटवर छापा टाकून 4 परप्रांतीय पिडीत मुलींची सुटका केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी एक महिला आरोपी अटक केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 डिसेंबर 2023 रोजी Dysp संदीप मिटके यांना द युनिक स्पा सेंटरच्या नावाखाली हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट चालवून वेश्याव्यवसाय करून घेतल्या जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहिती वरून संदीप मिटके यांनी सदर ठिकाणी बनावट ग्राहक पाठवुन पंचासमक्ष छापा टाकुन 4 पिडीत परप्रांतीय मुलींची सुटका केली आहे. याच बरोबर एक महिला एजंट आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.  आरोपींविरुद्ध अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायद्यानुसार महिला पोलीस कर्मचारी सुनंदा भारमल यांच्या  फिर्यादीवरून शिर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

Sandip Mitke: हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटवर छापा, 4 परप्रांतीय पिडीत मुलींची सुटका Read More »

Jalna News : जालना येथे भीषण अपघात,कार कंटेनरला धडकली, 3 जणांचा मृत्यू

Jalna News : मागच्या काही दिवसांपासून राज्यात रोड   अपघाताची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. काही दिवसापूर्वी अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यात भीषण रस्ता अपघात झाला होता. या अपघातामध्ये 12 जणांचा मृत्यू झाला होता.  तर आता जालना जिल्ह्यात एक भीषण रस्ता अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला.   जिल्ह्यातील अंबड तालुक्यात धुळे-सोलापूर महामार्गावर हा भीषण अपघात झाला. पुलावर उभ्या असलेल्या कंटेनरला भरधाव वेगाने येणाऱ्या कारने मागून धडक दिली. यामध्ये कारमधून प्रवास करणाऱ्या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन पुरुष आणि एका 10 वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी अंबड तालुक्यातील अंकुश नगर येथील धुळे-सोलापूर महामार्गावर अंकुश नगर सहकारी साखर कारखान्यासमोर उभ्या असलेल्या कंटेनरला कारने मागून धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला.  तसेच कारमध्ये प्रवास करणाऱ्या तिघांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. अपघाताच्या वेळी अल्टो कारचा वेग जास्त असल्याने तिचा पुढील भाग कंटेनरमध्ये घुसल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. त्यामुळे कारमधील कोणालाही वाचवता आले नाही.  कार संभाजीनगरहून बीडच्या दिशेने जात होती. मृताची ओळख अद्याप पटलेली नसून पोलीस तपास करत आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की, डब्याखालून खराब झालेली कार काढण्यासाठी जेसीबीची मदत घ्यावी लागली. तर मृतदेहांची विटंबना करण्यात आली होती. अपघातानंतर रस्त्यावर मोठी जाम झाली होती. मात्र, पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून हटवून रस्ता खुला केला.

Jalna News : जालना येथे भीषण अपघात,कार कंटेनरला धडकली, 3 जणांचा मृत्यू Read More »

Chhagan Bhujbal : महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात नवा ट्विस्ट, छगन भुजबळ यांच्या अडचणीत वाढ? वाचा सविस्तर

Chhagan Bhujbal – राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. याचा मुख्य कारण म्हणजे महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. या प्रकरणात मंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या खटल्यातील तीन आरोपींनी माफीचे साक्षीदार होण्यासाठी केलेल्या अर्जावर सुनावणी करण्याचे न्यायालयाने मान्य केले आहे.  महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी सुनील नाईक, सुधीर साळसकर आणि अमित बलराज या तीन आरोपींना अटक करण्यात आली असून  या तिन्ही आरोपींनी माफीचे साक्षीदार होण्यासाठी अर्ज दाखल केले आहे.  या प्रकरणात मुख्य आरोपी छगन भुजबळ यांच्यासह इतरांनी दोषमुक्तीसाठी याचिका दाखल केली होती. मात्र, ही सुनावणी थांबवून आधी आमच्या माफीचे साक्षीदार होण्यासाठी त्यांच्या अर्जावर निर्णय घ्या, अशी मागणी तिघांनी केली होती  न्यायालयाने ती मान्य केली आहे. सुनील नाईक, सुधीर साळसकर आणि अमित बलराज या तीन आरोपींनी मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर माफीनामा पत्र सादर केले होते.  आरोपी सुनील नाईक, सुधीर साळसकर आणि अमित बलराज यांनी साक्षीतून वगळण्यासाठी अर्ज सादर केला होता. या अर्जावर ईडीला 20 डिसेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले होते. या प्रकरणात विद्यमान मंत्री छगन भुजबळ हे मुख्य आरोपी आहेत. सध्या ते जामिनावर बाहेर आहेत  सन 2005 मध्ये कोणतीही निविदा प्रक्रिया न करता विकासकाची नियुक्ती केल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर ईडीनेही या प्रकरणात पीएमएलए अंतर्गत कारवाई केली. ACB ने मुंबई सत्र न्यायालयात IPC कलम 409 (लोकसेवक असूनही सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे) आणि 471 (A) (खोटी कागदपत्रे तयार करणे) अंतर्गत आरोप दाखल केले. काय आहे महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरण? मुंबईतील अंधेरी येथील ‘आरटीओ’च्या जमिनीवर झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाला परवानगी देताना राज्य सरकारने दिल्लीतील महाराष्ट्र सदन इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी तसेच मुंबईतील मलबार हिल येथील विश्रामगृहाच्या बांधकामाचे कंत्राट संबंधित कंपनीला दिले. या कामासाठी कोणतीही निविदा प्रक्रिया झाली नाही. कालांतराने संबंधित कंपनीने दुसऱ्या विकास कंपनीशी करार करून विकास हक्क विकले.  यापूर्वी विकासकाला 80 टक्के नफा मिळत होता, तर कंत्राटदार आस्थापनेला राज्य सरकारच्या निकषानुसार 20 टक्के नफा मिळणे अपेक्षित होते. यामध्ये आस्थापनाला 190 कोटी रुपयांचा नफा झाला.  भुजबळ कुटुंबीयांना 13 कोटी 50 लाख रुपये आस्थापनेकडून दिल्याचा आरोप लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने केला आहे.

Chhagan Bhujbal : महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात नवा ट्विस्ट, छगन भुजबळ यांच्या अडचणीत वाढ? वाचा सविस्तर Read More »

Agriculture News : राज्यातील 72 टक्के दूध खाजगी संस्थांना ! अनुदान फक्त सहकारीला

Agriculture News : राज्यातील शेतकरी गेल्या दोन महिन्यापासून दुधाचे दर कोसळल्याने अडचणीत सापडला आहे. यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना अनुदान द्यावे या मागणीसाठी किसान सभा, विविध शेतकरी संघटना व दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती गेले दोन महिने सातत्याने आंदोलन करत आहे.  आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी 22 नोव्हेंबर 2023 रोजी सह्याद्री अतिथीगृहावर बोलावलेल्या बैठकीतही किसान सभेने याबाबत जोरदार मागणी केली होती. राज्यभर तहसील कार्यालयांवर दुध ओतून करण्यात आलेल्या आंदोलनांमध्येही हीच मागणी करण्यात आली होती.  आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर सरकार याबाबत सकारात्मक निर्णय करेल असे आश्वासन विखे पाटील यांनी वारंवार दिले होते. मात्र बैठकीला आज महिना उलटून गेला तरी प्रत्यक्ष अनुदानाची घोषणा अजूनही करण्यात आलेली नाही.  विधी मंडळाच्या नागपूर अधिवेशनात अर्थातच याचे पडसाद उमटले. सभागृहात दूध प्रश्नाबाबत दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना आ. हरिभाऊ बागडे, आ. बाळासाहेब थोरात, आ. जयंत पाटील, आ. राजेश टोपे  यांनी लक्षवेधी अंतर्गत  प्रश्न विचारले.  किमान या प्रश्नांना उत्तर देताना तरी दुग्धविकास मंत्री अनुदानाची घोषणा करतील अशी अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही. सरकार अनुदान देण्याबाबत सकारात्मक आहे हीच ध्वनीफीत यावेळीही वाजविण्यात आली.  दुध अनुदानाबाबतची सरकारची ही चालढकल संतापजनक असून अनुदान देण्यात होणारी ही दिरंगाई दुध कंपन्यांना लाभ पोहचविण्यासाठीच केली जात आहे. सध्या दुध क्षेत्रात पृष्ठकाळ (फ्लश सीजन) सुरु आहे. या काळात दुधाचे उत्पादन वाढलेले असते.  दुध कंपन्या या काळात स्वस्तात दुध घेऊन त्याची पावडर बनवितात. जानेवारीनंतर हळूहळू दुधाचे उत्पादन कमी होते. परिणामी दुधाचे भाव आपोआप वाढू लागतात. मार्च अखेरपर्यंत फ्लश सीजन संपून लीन सीजन सुरु होतो.  दुधाचे भाव तेंव्हा पुरवठा घटल्याने स्वाभाविकपणे वाढलेले असतात. जेंव्हा भाव आपोआप वाढतात तेंव्हा अनुदान देण्याचा मुहूर्त साधून त्याचा  लाभ कंपन्यांना पोहचविला जातो. अनुदानाबाबत  आजवरचा हाच अनुभव शेतकरी घेत आले आहेत. यावेळीही अनुदान जाहीर करण्यात होत असलेली दिरंगाई यासाठीच सुरु आहे.   दुग्धविकास मंत्र्यांनी अधिवेशन संपण्यापूर्वी अनुदानाची घोषणा होईल असे सांगितले असले तरी प्रत्यक्षात किती अनुदान देणार याबाबत खुलासा केलेला नाही ही बाबही चिंताजनक आहे.  भेसळ रोखण्यासाठीचे अधिकार दुग्धविकास विभागाला द्यावेत ही किसान सभेची मागणी आहे. सभागृहात लक्षवेधीला उत्तर देताना ही मागणी मान्य झाल्याचे दुग्धविकास मंत्र्यांनी  सभागृहात जाहीर केले आहे. मात्र मिल्कोमिटर व वजन काट्यात होणारी लूटमार रोखण्याबाबत असलेल्या मागणीबाबत अद्यापही धोरण घेण्यात आलेले नाही.  पशुखाद्याचे भाव कमी करण्याबाबतही  सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे. तत्काळ किमान भाव फरका इतकी रक्कम अनुदान म्हणून जाहीर करून पूर्वलक्षी प्रभावाने गेले दोन महिन्याचा भाव फरक सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावा, पुढील काळातही हे अनुदान शेतकऱ्यांना सरळ खात्यावर द्यावे तसेच पशुखादय, औषधे व चाऱ्याचे  दर कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी किसान सभा व दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती करत आहे.  डॉ. अशोक ढवळे, डॉ. अजित नवले, उमेश देशमुख, इंजि.  सतीश देशमुख, जोतीराम जाधव, दादा गाढवे, दीपक वाळे, राजकुमार झोरी, श्रीकांत करे,  डॉ. अशोक ढगे, नंदू रोकडे,  सदाशिव साबळे, अमोल गोर्डे, धनंजय धोरडे, रामनाथ वदक, सुदेश जाधव, सुदेश इंगळे, रवी हासे, दीपक अण्णा काटे, सागर जाधव, अप्पा अनारसे, अरविंद कापसे.

Agriculture News : राज्यातील 72 टक्के दूध खाजगी संस्थांना ! अनुदान फक्त सहकारीला Read More »

Ahmednagar Shivaji Maharaj Statue: शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते करा : नगरसेविका शिला दीप चव्हाण यांची मागणी

Ahmednagar Shivaji Maharaj Statue : ऐतिहासिक अहमदनगर शहरातील महानगरपालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात येणार आहे.   या पुतळ्याचे अनावरण मराठा समाजाच्या हक्कासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते करण्यात यावे अशी मागणी पालिका सभागृहात नगरसेविका शिला दीप चव्हाण यांनी केली आहे. तसेच मनपा आयुक्त व महापौर यांना देखील त्यांनी या मागणीचे पत्र दिले आहे. त्यांनी या निवेदनात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व समाजाला बरोबर घेऊन आदर्श राज्याची निर्मिती केली आहे. यामुळे त्यांचा महापालिकेत बसविण्यात आलेला पुतळा सर्वांना प्रेरणा व ऊर्जा देणारा आहे. अहमदनगर महापालिका प्रशासनाने गुरुवारी (दि.21 डिसेंबर) रोजी महानगरपालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचे नियोजन केले आहे.  या पुतळ्याचे अनावरण मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते झाल्यास सर्व नगरकरांना आनंद होईल.मनोज जरांगे पाटील यांनी समाजाला आरक्षण मिळावा यासाठी स्वत:च्या मालकीची जमीन विकून संघर्ष करत आहे. यामुळे ते एक लढवय्ये कार्यकर्ते आहे. आज समाजासाठी सर्वस्वी त्याग करण्याची त्यांची भूमिका आहे.

Ahmednagar Shivaji Maharaj Statue: शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते करा : नगरसेविका शिला दीप चव्हाण यांची मागणी Read More »

Maharashtra Weather Update: राज्यात तापमानात घट! ‘या’ दिवसापासून थंडी वाढणार

Maharashtra Weather Update: राज्यात पुन्हा एकदा थंडी वाढणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात 25 डिसेंबरनंतर पुन्हा तापमानात घट होण्याची शक्यता आहे. यामुळे थंडी वाढणार आहे.  मंगळवारी मुंबईतील IMD च्या सांताक्रूझ हवामान केंद्रात किमान तापमान 23.7 अंशांवर पोहोचले, जे सामान्यपेक्षा सहा अंशांनी जास्त आहे. तर कुलाबा येथील हवामान केंद्रात किमान तापमान 19.4 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. यापूर्वी 12 डिसेंबर रोजी हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली होती, जी 19.4 अंश होती. हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार, मंगळवारी कमाल तापमान 32 अंश सेल्सिअसच्या आसपास होते. सोमवारी सांताक्रूझमध्ये किमान तापमान 23.6 अंशांवर घसरले, तर कुलाबा येथे 24 अंश सेल्सिअसची नोंद झाली. आयएमडी मुंबईचे संचालक सुनील कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्याच्या हवामान प्रणालीमुळे अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाले आहे. शहरापासून दूर असले तरी त्याचा परिणाम तापमानात वाढ होत आहे. मात्र, 25 डिसेंबरनंतर पश्चिमी विक्षोभ तसेच उत्तरेकडील वाऱ्यांमुळे तापमानात घट होण्याची शक्यता आहे. परंतु, तोपर्यंत किमान तापमान 21 ते 22 अंशांच्या दरम्यान राहील. त्याचवेळी स्कायमेट वेदरचे महेश पलावत यांनी तापमानात वाढ होण्यामागे उत्तर कोकणातील कुंड असल्याचे सांगितले आहे. जेव्हा जेव्हा कुंड तयार होते तेव्हा वाऱ्याची हालचाल घड्याळाच्या विरुद्ध असते. जोपर्यंत उत्तरेचे वारे येत नाहीत तोपर्यंत तापमान जास्तच राहील. साधारणत: 15 डिसेंबरच्या आसपास कमाल तापमानात घट झाल्यानंतर हिवाळा वाढू लागतो. मात्र, गेल्या वर्षी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मुंबईचे कमाल तापमान 35 अंश सेल्सिअसच्या आसपास होते.

Maharashtra Weather Update: राज्यात तापमानात घट! ‘या’ दिवसापासून थंडी वाढणार Read More »

MIDC Police: श्री संत सावता महाराज मंदीरात चोरी करणा-या सराईत गुन्हेगारास अटक, MIDC पोलीसांची कामगिरी

MIDC Police: MIDC पोलीसांनी मोठी कारवाई करत पिंपळगाव माळवी येथील श्री संत सावता महाराज मंदीरात चोरी करणा-या सराईत गुन्हेगारास अटक केली आहे. MIDC पोलीसांनी दोन गुन्हे उघडकीस आणुन तब्बल एक लाख रुपये किमतीचा मुददेमाल जप्त केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 03 डिसेंबर 2023 रोजी फिर्यादी श्रीकृष्ण बबन रायकर ( रा पिंपळगाव माळवी ता.जि.अहमदनगर) यांनी श्री. संत सावता महाराज मंदीरातील विठठल रुख्मीनीच्या डोक्यातील मुकुट व रुख्मीणीच्या गळयातील मणीमंगळ सुत्रातील सोण्याचे 4 मणी कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेल्याची फिर्याद दाखल केली होती. एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये भादवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हयाचा  तपास करत असतांना सपोनि राजेंद्र सानप यांना गोपनिय माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा राहुल नानासाहेब शिंदे आणि कुणाल विजय बनसोडे यांनी केला आहे आणि ते  सध्या वडगाव गुप्ता येथे आहेत.  त्यानुसार सपोनि राजेंद्र सानप यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे एक पथक तयार करुन त्यांना वडगाव येथे पाठविले. सदर पोलीस पथकांनी वडगाव गुप्ता येथुन सदर आरोपीला सापळा रचुन शिताफिने ताब्यात घेतले.  सदर आरोपीनी गुन्हयाची कबुली दिली असुन त्यांचेकडे एक नटराज देवताची मृती मिळुन आली. तसेच त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबुल आहे. तसेच त्यांनी सदरची मृती कोटुन आणली याबाबत त्यांना काहीएक सांगता आले नाही. त्यामुळे त्यांचेवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 124 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचे आरोपी हे सराईत गुन्हेगार आहे.

MIDC Police: श्री संत सावता महाराज मंदीरात चोरी करणा-या सराईत गुन्हेगारास अटक, MIDC पोलीसांची कामगिरी Read More »

Navneet Rana : नवनीत राणा पुन्हा चर्चेत! ‘त्या’ प्रकरणात कोर्टाने फेटाळली याचिका

Navneet Rana : राज्याचे राजकारणात पुन्हा एकदा   अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा चर्चेत आले आहे.  माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खासगी निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’बाहेर हनुमान चालीसा पठण केल्याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने निकाल दिला आहे. हा खटला रद्द करण्याची मागणी करणारी राणा दाम्पत्याची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसाचे पठण केल्याप्रकरणी अमरावतीचे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे आरोपी आहेत. त्याच्यावर खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. हे प्रकरण रद्द करण्यासाठी राणा दाम्पत्याने याचिका दाखल केली होती. ती याचिका न्यायालयाने फेटाळली. राणा दाम्पत्याने दावा केला होता की एफआयआर नोंदवण्यापूर्वीच अटक करण्यात आली होती, जी बेकायदेशीर होती. मात्र न्यायालयाने त्यांचा दावा फेटाळून लावला. या खटल्याची सुनावणी होऊन अतिरिक्त सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांनी निकाल राखून ठेवला होता, जो आज सुनावण्यात आला. तसेच खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना पुढील सुनावणीत हजर राहण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. मात्र, याचिका फेटाळल्यानंतर आता न्यायालयातून खटल्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. याप्रकरणी आरोप निश्चित करण्याची प्रक्रिया पुढील वर्षी 5 जानेवारीला होणार आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? महाविकास आघाडी (MVA) सरकारच्या काळात अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा आणि त्यांच्या खासदार पत्नी नवनीत यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’बाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्याची घोषणा केली होती. मात्र, बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत मुंबई पोलिसांनी त्यांना तसे न करण्याची नोटीस बजावली होती. मात्र, पोलिसांची नोटीस न जुमानता राणा दाम्पत्याने ठाकरे यांच्या विरोधात आंदोलनाचा गजर केला. त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी खार पोलिसांनी त्याला अटक केली. मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याविरुद्ध आयपीसी कलम 153अ, 34,37 आणि मुंबई पोलिस अधिनियम 135 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.  नंतर आयपीसीच्या कलम 124A अंतर्गत देशद्रोहाच्या गुन्ह्यातही वाढ करण्यात आली. वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. अनेक दिवस तुरुंगात घालवल्यानंतर नवनीत आणि रवी राणा यांना सशर्त जामीन मिळाला.

Navneet Rana : नवनीत राणा पुन्हा चर्चेत! ‘त्या’ प्रकरणात कोर्टाने फेटाळली याचिका Read More »

Ahmednagar News:  दागिने व रोख रकमेची चोरी करणारी महिला आरोपींची टोळी जेरबंद

Ahmednagar News: बसमध्ये प्रवाशांचे दागिने व रोख रकमेची चोरी करणारी महिला आरोपींची टोळी 2 लाख 38 हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह जेरबंद करण्यात आली आहे. अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आली आहे. 22 मे 2023 रोजी फिर्यादी रुपेश रोहिदास गायकवाड तारकपुर बस स्टँड अहमदनगर येथुन आळेफाटा जाणेकरीता बस मध्ये चढत असतांना अज्ञात आरोपींनी 10 ग्रॅम वजनाची सोन्याचे चैन चोरुन नेली होती. या गुन्ह्याची नोंद कलम 379 प्रमाणे तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली होती.  गुन्हाची नोंद झाल्यानंतर दिनेश आहेर यांच्या पथकाने तारकपुर बस स्टँड येथे सापळा रचुन तीन संशयीत महिलानां तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये पुढील तपासकामी हजर केले असून या प्रकरणाच्या पुढील तपास करत आहे. सदरची कारवाई राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर , अनिल कातकाडे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Ahmednagar News:  दागिने व रोख रकमेची चोरी करणारी महिला आरोपींची टोळी जेरबंद Read More »