DNA मराठी

Sandip Mitke: हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटवर छापा, 4 परप्रांतीय पिडीत मुलींची सुटका

Sandip Mitke : Dysp संदीप मिटके यांच्या पथकाने कारवाई करत शिर्डी येथील द युनिक स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटवर छापा टाकून 4 परप्रांतीय पिडीत मुलींची सुटका केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी एक महिला आरोपी अटक केली आहे.

या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 डिसेंबर 2023 रोजी Dysp संदीप मिटके यांना द युनिक स्पा सेंटरच्या नावाखाली हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट चालवून वेश्याव्यवसाय करून घेतल्या जात असल्याची माहिती मिळाली होती.

या माहिती वरून संदीप मिटके यांनी सदर ठिकाणी बनावट ग्राहक पाठवुन पंचासमक्ष छापा टाकुन 4 पिडीत परप्रांतीय मुलींची सुटका केली आहे. याच बरोबर एक महिला एजंट आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

 आरोपींविरुद्ध अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायद्यानुसार महिला पोलीस कर्मचारी सुनंदा भारमल यांच्या  फिर्यादीवरून शिर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.