Dnamarathi.com

Ahmednagar News: बसमध्ये प्रवाशांचे दागिने व रोख रकमेची चोरी करणारी महिला आरोपींची टोळी 2 लाख 38 हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह जेरबंद करण्यात आली आहे. अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

22 मे 2023 रोजी फिर्यादी रुपेश रोहिदास गायकवाड तारकपुर बस स्टँड अहमदनगर येथुन आळेफाटा जाणेकरीता बस मध्ये चढत असतांना अज्ञात आरोपींनी 10 ग्रॅम वजनाची सोन्याचे चैन चोरुन नेली होती.

या गुन्ह्याची नोंद कलम 379 प्रमाणे तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली होती.

 गुन्हाची नोंद झाल्यानंतर दिनेश आहेर यांच्या पथकाने तारकपुर बस स्टँड येथे सापळा रचुन तीन संशयीत महिलानां तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये पुढील तपासकामी हजर केले असून या प्रकरणाच्या पुढील तपास करत आहे.

सदरची कारवाई राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर , अनिल कातकाडे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *