Dnamarathi.com

Chhatrapati Shivaji Maharaj : आज अहमदनगर महापालिकाच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे लोकार्पण सोहळा संपन्न. यावेळी खासदार सुजय विखे यांच्या पत्नी धनश्री विखे आमदार संग्राम जगताप देखील उपस्थित होते. 

आपण पुतळे उभारतो मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांचे आचार आणि विचार आपल्या मुलांमध्ये रुजवले गेले पाहिजे असे मत खासदार सुजय विखे यांच्या पत्नी धनश्री विखे यांनी व्यक्त केलं

अहमदनगर महानगरपालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण खासदार विखे यांच्या पत्नी धनश्री विखे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शहरातील अहमदनगर महानगरपालिकेचे पदाधिकारी अधिकारी उपस्थित होते

 यावेळी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, आमदार संग्राम जगताप, महापौर रोहिणी शेंडगे, आयुक्त डॉ. पंकज जावळे, रणरागिणी महिला मंचच्या धनश्री विखे पाटील, उपमहापौर गणेश कवडे, सभापती गणेश कवडे, विरोधी पक्षनेते संपत बारस्कर,  अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे सभागृह नेते विनीत पाऊलबुद्धे, सुनील त्र्यंबके, सभापती पुष्पाताई बोरूडे, मीनाताई चोपडा, रूपाली वारे आदींसह सर्वपक्षीय नगरसेवक उपस्थित होते.

दरम्यान, महापौर रोहिणी शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले, सभापती गणेश कवडे यांनी मनोगत व्यक्त केले.

प्रास्ताविक आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी केले. सूत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी केले तर, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे यांनी आभार मानले.

प्रशासकाचा कारभार माझ्याकडे यावा

नगर शहराला 500 वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शहराच्या वैभवात भर घालणार महत्त्वाचा पैलू आहे. मनपाचा प्रशासकीय कारभार माझ्याकडे असल्यास सीना नदी अतिक्रमण मुक्त करण्यासाठी प्रयत्न करू. ज्या शहरात नदी वाहते त्या शहराचा विकास होतो. नगरसेवकांनी छत्रपतींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करावे. शहराचे प्रश्न सोडविण्यासाठी नगरकरांच्या बाजूने उभे राहू, असे आश्वासन जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *