Dnamarathi.com

MIDC Police: MIDC पोलीसांनी मोठी कारवाई करत पिंपळगाव माळवी येथील श्री संत सावता महाराज मंदीरात चोरी करणा-या सराईत गुन्हेगारास अटक केली आहे.

MIDC पोलीसांनी दोन गुन्हे उघडकीस आणुन तब्बल एक लाख रुपये किमतीचा मुददेमाल जप्त केला आहे.

या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 03 डिसेंबर 2023 रोजी फिर्यादी श्रीकृष्ण बबन रायकर ( रा पिंपळगाव माळवी ता.जि.अहमदनगर) यांनी श्री. संत सावता महाराज मंदीरातील विठठल रुख्मीनीच्या डोक्यातील मुकुट व रुख्मीणीच्या गळयातील मणीमंगळ सुत्रातील सोण्याचे 4 मणी कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेल्याची फिर्याद दाखल केली होती.

एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये भादवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्हयाचा  तपास करत असतांना सपोनि राजेंद्र सानप यांना गोपनिय माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा राहुल नानासाहेब शिंदे आणि कुणाल विजय बनसोडे यांनी केला आहे आणि ते  सध्या वडगाव गुप्ता येथे आहेत. 

त्यानुसार सपोनि राजेंद्र सानप यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे एक पथक तयार करुन त्यांना वडगाव येथे पाठविले. सदर पोलीस पथकांनी वडगाव गुप्ता येथुन सदर आरोपीला सापळा रचुन शिताफिने ताब्यात घेतले.

 सदर आरोपीनी गुन्हयाची कबुली दिली असुन त्यांचेकडे एक नटराज देवताची मृती मिळुन आली. तसेच त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबुल आहे. तसेच त्यांनी सदरची मृती कोटुन आणली याबाबत त्यांना काहीएक सांगता आले नाही. त्यामुळे त्यांचेवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 124 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचे आरोपी हे सराईत गुन्हेगार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *