DNA मराठी

DNA Marathi News

Maratha Reservation: लोकं घराला कुलूप लावून रस्त्यावर उतरणार,  सरकारला मराठा समाजाचा इशारा

Maratha Reservation: सत्ताधारी आणि विरोधक गेंड्याच्या कातडीचे झाले आहे. त्यांना लोकांचे भावना समजत नाही. समाजाला हे वारंवार आश्वासन देत आहे मात्र ते पाडले जात नाही. ज्यामुळे पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी शांतता रॅलीचे आयोजन केले आहे. अशी प्रतिक्रिया डीएनए मराठीशी बोलताना गजेंद्र दांगट यांनी दिली. मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील 12 ऑगस्ट रोजी अहमदनगर शहरात दाखल होणार आहे.  अहमदनगर शहरात 12 ऑगस्ट रोजी जरांगे पाटील यांचे नेतृत्वाखाली मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.  यासाठी अखंड मराठा समाज अहमदनगर यांच्या वतीने साईमुरली लॉन येथे जिल्हास्तरीय बैठक आयोजन करण्यात आली होती. यावेळी डीएनए मराठीशी बोलताना गजेंद्र दांगट म्हणाले की, सत्ताधारी आणि विरोधक गेंड्याच्या कातडीचे झाले आहे. त्यांना लोकांचे भावना समजत नाही. समाजाला हे वारंवार आश्वासन देत आहे मात्र ते पाडले जात नाही. ज्यामुळे पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी शांतता रॅलीचे आयोजन केले आहे.  या रॅलीला मराठवाड्यात मोठा समर्थन मिळाला आहे तर आता आपल्या भागात या रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. नगर शहरात होणाऱ्या या रॅलीत दहा लाख लोक येणार आहे. सध्या लोकांमध्ये सरकार आणि विरोधकांबद्दल मोठा रोष निर्माण झाला आहे. 12 तारखेला लोकं घराला कुलूप लावून रस्त्यावर उतरणार आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी आम्ही आरक्षण मिळवून राहणार. असं यावेळी गजेंद्र दांगट म्हणाले.  असा असणार रॅलीचा मार्ग  12 ऑगस्त रोजी मनोज जरांगे पाटील यांची रॅली दिल्लीगेट, कापड बाजारहून शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळ संपणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

Maratha Reservation: लोकं घराला कुलूप लावून रस्त्यावर उतरणार,  सरकारला मराठा समाजाचा इशारा Read More »

Manoj Jarange Patil: 12 ऑगस्तला जरांगे पाटील अहमदनगर शहरात! ‘या’ मार्गाने निघणार शांतता रॅली

Manoj Jarange Patil: मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील 12 ऑगस्ट रोजी अहमदनगर शहरात दाखल होणार आहे.  अहमदनगर शहरात 12 ऑगस्ट रोजी जरांगे पाटील यांचे नेतृत्वाखाली मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.  यासाठी अखंड मराठा समाज अहमदनगर यांच्या वतीने साईमुरली लॉन येथे जिल्हास्तरीय बैठक आयोजन करण्यात आली होती.  सत्ताधारी आणि विरोधक गेंड्याच्या कातडीचे झाले आहे. त्यांना लोकांचे भावना समजत नाही. समाजाला हे वारंवार आश्वासन देत आहे मात्र ते पाडले जात नाही. ज्यामुळे पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी शांतता रॅलीचे आयोजन केले आहे.  या रॅलीला मराठवाड्यात मोठा समर्थन मिळाला आहे तर आता आपल्या भागात या रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. नगर शहरात होणाऱ्या या रॅलीत दहा लाख लोक येणार आहे. सध्या लोकांमध्ये सरकार आणि विरोधकांबद्दल मोठा रोष निर्माण झाला आहे. 12 तारखेला लोकं घराला कुलूप लावून रस्त्यावर उतरणार आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी आम्ही आरक्षण मिळवून राहणार. अशी प्रतिक्रिया डीएनए मराठीशी बोलताना गजेंद्र दांगट यांनी दिली. असा असणार रॅलीचा मार्ग  12 ऑगस्त रोजी मनोज जरांगे पाटील यांची रॅली दिल्लीगेट, कापड बाजारहून शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळ संपणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

Manoj Jarange Patil: 12 ऑगस्तला जरांगे पाटील अहमदनगर शहरात! ‘या’ मार्गाने निघणार शांतता रॅली Read More »

Ahmednagar News: नगर अर्बन बँक अपहार प्रकरणी संचालकास जामीन मंजूर …

Ahmednagar News: अहमदनगर येथील विशेष जिल्हा न्यायाधिश क्र. २ पी. आर. सित्रे यांनी अर्बन बैंक अपहार प्रकरणातील शंकर घनश्यामदास अंदानी यांना तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. सदरचा आदेश दि. २६/०७/२०२४ रोजी देण्यात आलेला आहे.    बँकेचे तांत्रिक संचालक शंकर अंदानी यांना अर्बन बैंक अपहार प्रकरणामध्ये फेब्रुवारी २०२४ मध्ये अटक करण्यात आली होती व तेव्हापासून ते न्यायालयीन कोठडीमध्ये होते. त्यांचे वतीने ॲड. सतिश एस. गुगळे यांनी अंदानी हे व्यवसायाने सनदी लेखापाल असून सध्या ऑडीटचे सर्व कामकाज ठप्प पडले असल्याने व आरोपी हे व्यवसायाने लेखापाल असल्याने त्यांचे व्यवसायाचे व पर्यायाने कुटूंबाचे आर्थिक नुकसान होत आहे असा युक्तीवाद करुन शंकर अंदानी यांना तात्पुरता जामीन देण्याची मागणी ॲड. सतिश गुगळे यांनी न्यायालयास केली, त्यावर सरकार पक्षाने तीव्र विरोध दर्शविला, परंतू न्यायालयाने प्रकरणामध्ये असलेला त्यांचा सहभाग तसेच त्यांच व्यवसायीक अडचण व होणारे आर्थिक नुकसान या सर्व बाबींचा विचार करुन दि. २६/८/२०२४ पावेतो त्यांना तात्पुरता जामीन मंजूर केलेला आहे. सदर प्रकरणात मुळ जामीन अर्ज हा न्यायालयापुढे अद्यापही प्रलंबीत असून त्यावर नजीकचे भविष्य काळात सुनावणी होणे अपेक्षीत आहे.  या प्रकरणात  शंकर अंदानी यांचे वतीने ॲड. सतिश गुगळे यांनी पाहिले, त्यांना ॲड. चंद्रकांत भोसले, ॲड. अक्षय गवारे, ॲड. अजित चोरमले, ॲड. हर्षद तांगडे, ॲड. अभिषेक म्हस्के यांनी सहकार्य केले.

Ahmednagar News: नगर अर्बन बँक अपहार प्रकरणी संचालकास जामीन मंजूर … Read More »

Nilesh Lanke: मोठी बातमी! खासदार लंके यांच्या मागण्या मान्य, उपोषण सोडला

Nilesh Lanke: एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार गेल्या चार दिवसांपासून पोलीस खात्यात होत  असलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात अहमदनगरचे खासदार नीलेश लंके अहमदनगर पोलीस अधीक्षक कार्यालया बाहेर उपोषणाल बसले होते. आज निलेश लंके यांच्या मागण्या मान्य झाले असून नाशिक ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिलखेरकर यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याने लंके यांनी उपोषण मागे घेतले आहे. नाशिक ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिलखेरकर यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आणि ही चौकशी इन्कॅमेरा होणार असल्याचे लेखी आश्वासन नाशिक विभागीय पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी दिले आहे.बाळासाहेब थोरात यांची यशस्वी मध्यस्थीमुळे उपोषण सुटला आहे.

Nilesh Lanke: मोठी बातमी! खासदार लंके यांच्या मागण्या मान्य, उपोषण सोडला Read More »

Kangana Ranaut: कंगना राणौतची खासदारकी रद्द होणार? हायकोर्टाने ‘त्या’ प्रकरणात बजावली नोटीस

Kangana Ranaut:  बॉलीवूडची क्वीन आणि भाजप खासदार कंगना रणौतच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून कंगनाला कायदेशीर आव्हान देण्यात आले आहे. सिमला उच्च न्यायालयाने त्यांची निवडणूक रद्द करण्याच्या याचिकेवर नोटीस बजावली. याचिकाकर्ते लायक राम नेगी यांनी आरोप केला आहे की मंडीतून निवडणूक लढवण्यासाठी त्यांचा उमेदवारी अर्ज रिटर्निंग ऑफिसरने चुकीच्या पद्धतीने नाकारला. नोटीस जारी करत न्यायमूर्ती ज्योत्स्ना रेवाल यांनी कंगना राणौतकडून 21 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितले आहे. जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण? माजी सरकारी कर्मचारी आणि किन्नौरचे रहिवासी असलेले लायक राम नेगी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. नेगी म्हणाले की त्यांनी 14 मे रोजी निवडणूक अर्ज दाखल केला आणि 15 मे रोजी इतर सर्व आवश्यक कागदपत्रे सादर केली. मात्र, इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, रिटर्निंग ऑफिसरने त्यांना स्वीकारले नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, न्यायमूर्ती ज्योत्स्ना रेवाल यांनी नोटीस बजावली आणि रणौत यांना 21 ऑगस्टपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले. कंगना रणौतच्या निवडीला लायक राम नेगी यांनी आव्हान दिले आहे, ज्यांनी म्हटले आहे की त्यांचा उमेदवारी अर्ज मंडीच्या उपायुक्तांनी रिटर्निंग ऑफिसर म्हणून चुकीच्या पद्धतीने नाकारला होता. वनविभागातील निवृत्त कर्मचारी नेगी यांनी उपायुक्तांनाही या प्रकरणात पक्षकार बनवले आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत मंडी लोकसभा मतदारसंघातून विजयी झाली होती. हिमाचलच्या सुखू सरकारमधील कॅबिनेट मंत्री विक्रमादित्य सिंह यांचा त्यांनी पराभव केला होता. या दोघांची ही पहिलीच लोकसभा निवडणूक होती. कंगनाने विक्रमादित्य सिंगचा सुमारे 74 हजार मतांनी पराभव केला. सध्या या प्रकरणाची सुनावणी आता 21 ऑगस्टला होणार आहे.

Kangana Ranaut: कंगना राणौतची खासदारकी रद्द होणार? हायकोर्टाने ‘त्या’ प्रकरणात बजावली नोटीस Read More »

Today Gold Price: आनंदाची बातमी! सोन्याचा भाव घसरला, जाणुन घ्या नवीन किंमत

Today Gold Price: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात सोन्या-चांदीवरील कस्टम ड्युटीमध्ये मोठ्या प्रमाणात कपात केल्याने आता देशातील बाजारात सोन्याचे भाव कमी होताना दिसत आहे. आज सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव 70,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या जवळ पोहोचला आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅम 64,940 रुपयांवर उपलब्ध आहे.   काय होती अर्थमंत्र्यांची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात सोने आणि चांदीच्या आयातीवरील कस्टम ड्युटी कमी करण्याची घोषणा केली होती. सध्याचे कस्टम ड्युटी 15 टक्क्यांवरून 6 टक्क्यांवर आणण्याबाबत ते बोलले. बेसिक कस्टम ड्युटी 10% वरून 5% पर्यंत कमी करण्यात आली आहे, तर त्यासोबत लागू करण्यात आलेला कृषी पायाभूत सुविधा विकास उपकर (AIDC) देखील 5% वरून 1% करण्यात आला आहे. या घोषणेनंतर लगेचच मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या किमती घसरल्या. एमसीएक्सवर 10 ग्रॅम सोन्याची किंमत सुमारे 4,000 रुपयांनी घसरून 72,838 रुपयांवरून 69,500 रुपयांवर आली आहे. एमसीएक्सवर चांदीची किंमतही 88,995 रुपये प्रति किलोवरून घसरून 84,275 रुपये झाली. दिल्ली सराफा बाजारातही भाव कमी झाले सराफा बाजारातही सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव बुधवारी 64,940 रुपयांवर पोहोचला आहे, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 70,850 रुपयांवर उपलब्ध आहे. दिल्ली सराफा बाजारात 22 कॅरेट सोने 65,090 रुपये आणि 24 कॅरेट सोने 71,000 रुपये प्रति 10 ग्रॅमने विकले जात आहे. चेन्नई-मुंबईसह इतर शहरांतील किमती चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 65,490 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 71,450 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, तर मुंबई, कोलकाता, बंगळुरू, हैदराबाद, केरळ आणि पुणे येथे 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 64,940 रुपये आहे. आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 70,850 रुपये आहे. वडोदरा आणि अहमदाबादमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमसाठी 64,990 रुपये मोजावे लागतात, तर 24 कॅरेट सोन्यासाठी 70,900 रुपये मोजावे लागतात. गुंतवणूक करण्याची संधी  सोन्याच्या दरातील ही घसरण काही काळच राहणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव अजूनही वाढत आहेत. भू-राजकीय मुद्द्यांमुळे सोन्याच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे, ज्याचा परिणाम भारतातही सोन्याच्या किमतीवर होईल. अशा परिस्थितीत, सध्याची कपात ही कमाईसाठी या सोन्यात   गुंतवणूक करणाऱ्यांसाठी चांगली संधी आहे.

Today Gold Price: आनंदाची बातमी! सोन्याचा भाव घसरला, जाणुन घ्या नवीन किंमत Read More »

Ahmednagar News: ते मार्गदर्शक होते, जयंत पाटलांचा पराभव मनाला वेदना देणारा…, सत्यजित तांबे

Ahmednagar News: विधान परिषदेचे निकाल जाहीर झाले असून यामध्ये 11 जागांसाठी महायुतीचे 9 तर महाविकास आघाडीचे 3 असे 12 उमेदवार मैदानात होते. यापैकी महायुतीचे 9 तर महाविकास आघाडीचे 2 उमेदवार विजयी झाले. मात्र यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचा विधानपरिषद निवडणुकीत पराभव झाला.  शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांचा   विधानपरिषदेच्या निवडणूकीतील पराभव हा मनाला वेदना देणारा आहे. पाटील हे विधानपरिषदेच्या सभागृहातील एक ज्येष्ठ व अनुभवी सदस्य होते. आमच्या सारख्या नव्या व तरुण सदस्यांचे ते मार्गदर्शक होते. सभागृहातील त्यांची अनुपस्थिती सर्वांना नक्कीच जाणवेल अशी प्रतिक्रिया आमदार सत्यजित तांबे यांनी दिली आहे.  लोकसभा निवडणुका झाल्यानंतर विधानपरिषदेच्या निवडणुकीवर राज्याचे लक्ष लागून होते, लोकसभेत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले तर महायुतीला धक्का बसला होता. यामुळे विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये काय होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. मात्र या निवडणुकीचा निकाल आता समोर आला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे. तर महायुतीचे सर्व 9 उमेदवार जिंकून आले आहेत. शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.  तांबे नेमकं काय म्हणाले? शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील साहेब यांचा आजच्या विधानपरिषदेच्या निवडणूकीतील पराभव हा मनाला वेदना देणारा आहे. भाई जयंत पाटील हे विधानपरिषदेच्या सभागृहातील एक ज्येष्ठ व अनुभवी सदस्य होते. आमच्या सारख्या नव्या व तरुण सदस्यांचे ते मार्गदर्शक होते. सभागृहातील त्यांची अनुपस्थिती सर्वांना नक्कीच जाणवेल. पाटलांचा पराभव हा शरद पवारांना धक्का जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून समर्थन पुरस्कृत उमेदवार होते. मात्र निवडणुकीच्या निकालात ते सुरुवातीपासूनच पिछाडीवर होते. पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये जयंत पाटील यांना दुहेरी आकडाही ओलांडता आला नव्हता. विजयासाठी जयंत पाटील यांना 23 संख्यापर्यंत पोहचायचं होतं. पण जयंत पाटील यांना फक्त 12 मते मिळाली.

Ahmednagar News: ते मार्गदर्शक होते, जयंत पाटलांचा पराभव मनाला वेदना देणारा…, सत्यजित तांबे Read More »

Maharashtra News : मुस्लिम कुटुंबाच्या घरी पंढरीच्या वारकऱ्यांचा मुक्काम, दिंडीचे स्वागत व वारकऱ्यांची सेवा

Maharashtra News: तीर्थक्षेत्र नाशिक राजापूर ते श्रीक्षेत्र पंढरपूर पायी दिंडी गेल्या सात वर्षापासून सोलापूर रोडवरील वाकोडी फाटा येथील वास्तव्यास असलेले माजी सैनिक युनूस टेंगे या मुस्लिम कुटुंबाकडे मुक्कामी असते. हे मुस्लिम कुटुंब वारकऱ्यांची मनोभावे सेवा करत आलेले आहेत. पंढरीच्या वारकऱ्यांना त्यांच्याकडून पंगत दिली जाते.  कुटुंब प्रमुख माजी सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे आरोग्य विभागाचे अध्यक्ष युनूस टेंगे हे एक माजी सैनिक आहेत. त्यांनी हिंदू मुस्लिम शीख ईसाई हम सब भाई भाई हीच एक सैनिकाची शिकवण असते, भारत माता ही एकच जात आणि एकच धर्म आहे. याचा आदर्श एका माजी सैनिकांनी समाजाला या माध्यमातून दिला आहे.  माजी सैनिक युनिस टेंगे मुस्लिम समाजाचे आहेत त्यांच्या घरी गेल्या सात वर्षापासून ही दिंडी मुक्कामी असते त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य दिंडीतील वारकऱ्यांची मनोभावे सेवा करतात. पूजा अर्चा करून त्यांच्या समवेत हरिनामाच्या गजरात विलीन होतात यापेक्षा दुसरी देशसेवा कोणतीच नसल्याचे ते म्हणाले.

Maharashtra News : मुस्लिम कुटुंबाच्या घरी पंढरीच्या वारकऱ्यांचा मुक्काम, दिंडीचे स्वागत व वारकऱ्यांची सेवा Read More »

Zika Virus: सावधान, ‘या’ शहरात वाढत आहे झिकाचा धोका, समोर आले 15 रुग्ण

Zika Virus:  राज्यात हळूहळू झिका वाढताना दिसत आहे. माहितीनुसार, पुण्यात आतापर्यंत झिकाचे 15 रुग्ण आढळून आले आहे.  त्यामध्ये 9 गर्भवती महिलांचाही समावेश आहे. तीन नवीन रुग्ण आढळल्याने मंगळवारी पुण्यातील झिका रुग्णांची संख्या 15 वर पोहोचली. तिन्ही बाधित महिला गर्भवती असून त्या जिल्ह्यातील पाषाण परिसरात राहतात. मिळालेल्या माहितीनुसार, 28 वर्षीय 23 आठवड्यांच्या गर्भवती महिलेचा अहवाल 5 जुलै रोजी पॉझिटिव्ह आला होता. तर 8 जुलै रोजी 18 वर्षांच्या 28 आठवड्यांच्या गर्भवती महिलेमध्ये संसर्गाची पुष्टी झाली. तिसरा केस, 23 आठवड्यांची गरोदर असलेल्या 19 वर्षीय महिलेची 8 जुलै रोजी चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यांना सांधेदुखी आणि सौम्य ताप होता. 20 जूनपासून, पुणे महानगरपालिकेने (PMC) झिका विषाणूची 15 प्रकरणे नोंदवली आहेत, ज्यात नऊ गर्भवती महिलांचा समावेश आहे. जर गर्भवती महिलांना झिकाची लागण झाली असेल तर त्यांच्या नवजात बालकांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता असते. डोळ्यांच्या समस्या, ऐकण्याची क्षमता कमी होणे अशा अनेक समस्या नवजात बालकांमध्ये उद्भवू शकतात. मेंदूच्या असामान्य विकासामुळे अनेक प्रकरणांमध्ये बाळाचे डोके खूपच लहान असते. देशात झिकाची अद्याप कोणतीही लस नाही. झिका   प्रामुख्याने संक्रमित एडिस डासांच्या चाव्याव्दारे पसरतो. हा संसर्ग गंभीर नसला तरी गर्भवती महिलेला संसर्ग झाल्यास तो गर्भासाठी धोकादायक ठरू शकतो. झिका  लैंगिक संभोगातूनही पसरू शकतो. याशिवाय, काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये, झिका संक्रमित रक्ताच्या संक्रमणाने देखील पसरतो.

Zika Virus: सावधान, ‘या’ शहरात वाढत आहे झिकाचा धोका, समोर आले 15 रुग्ण Read More »

Gautam Gambhir टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक, जय शाहने केली घोषणा

Gautam Gambhir :  BCCI ने मोठा निर्णय घेत गौतम गंभीरची भारतीय क्रिकेट संघाच्या नवीन मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्तीची घोषणा केली. जय शाहा यांनी ही घोषणा केली आहे. त्यामुळे आता गंभीर भारतीय संघाचा 25 वा मुख्य प्रशिक्षक बनणार आहे. T20 विश्वचषक 2024 नंतर राहुल द्रविडचा कार्यकाळ संपला होता.  आता गंभीर जुलैच्या अखेरीस सुरू होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघाचा नवा प्रशिक्षक म्हणून संघात सामील होणार आहे. सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (NCA) संचालक व्हीव्हीएस लक्ष्मण झिम्बाब्वे दौऱ्यावर अंतरिम मुख्य प्रशिक्षकाची भूमिका बजावत आहेत. सन्मान वाटत आहे… गौतम गंभीरनेही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर तिरंग्याचा फोटो पोस्ट करून आपल्या नियुक्तीवर प्रतिक्रिया दिली आणि लिहिले, “भारत माझी ओळख आहे आणि माझ्या देशाची सेवा करणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा विशेषाधिकार आहे. मला परत येण्याचा सन्मान वाटतो, यावेळी माझी टोपी वेगळी आहे. पण, प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा, हे माझे ध्येय नेहमीच एकच राहिले आहे. ‘मेन इन ब्लू’ 1.4 अब्ज भारतीयांची स्वप्ने त्यांच्या खांद्यावर घेत आहेत आणि ही स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी मी माझ्या सामर्थ्याने सर्वकाही करेन.” राहुल द्रविडचा कार्यकाळ संपल्याची बातमी येताच गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक होणार असल्याची चर्चा होती. त्यावर आता जय शहा यांनी अधिकृत शिक्कामोर्तब केले आहे. सध्या भारतीय संघ शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे आणि त्यानंतर तो श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे, जिथे गंभीर त्याची नवीन भूमिका साकारणार आहे. IPL 2024 पूर्वी गंभीर कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) मार्गदर्शक बनला आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली KKR ने चॅम्पियनशिप जिंकली. मुख्य प्रशिक्षकपदासाठी गंभीर हा एकमेव उमेदवार होता. प्रशिक्षकपदासाठी मुलाखत देण्यापूर्वी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. गौतम गंभीरसमोर आव्हान T20 विश्वचषक 2024 जिंकून भारतीय संघाने 11 वर्षांचा ICC ट्रॉफीचा दुष्काळ संपवला. आता त्याचे पुढील लक्ष्य पुढील एका वर्षात दोन आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचे आहे. नवे मुख्य प्रशिक्षक या नात्याने गंभीरसाठी ही जबाबदारी मोठी असेल. टीम इंडियाला 2025 च्या सुरुवातीला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भाग घ्यायचा आहे आणि जर भारतीय संघ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यात यशस्वी ठरला तर ते देखील जिंकण्याचे लक्ष्य असेल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना जून 2025 मध्ये खेळवला जाईल. गौतम गंभीरची क्रिकेट कारकीर्द टीम इंडियाच्या नवीन प्रशिक्षकाच्या क्रिकेट प्रवासाबद्दल बोलताना, त्याने खेळाच्या सर्वात लांब फॉरमॅटमध्ये, कसोटीमध्ये 58 सामने खेळले, ज्यामध्ये त्याने 104 डावांमध्ये 41.96 च्या सरासरीने 4154 धावा केल्या. 147 एकदिवसीय सामन्यांमध्ये, गंभीरने सुमारे 40 च्या सरासरीने 6144 धावा केल्या आणि श्रीलंकेविरुद्ध त्याची सर्वोच्च धावसंख्या 150 धावा होती. टी-20 बद्दल बोलायचे तर गौतमने या फॉरमॅटमध्ये 37 सामने खेळले, ज्यामध्ये त्याने 36 डावांमध्ये 27.41 च्या सरासरीने आणि 119.03 च्या स्ट्राइक रेटने 932 धावा केल्या. गौतम गंभीरनेही आपल्या कारकिर्दीत 154 आयपीएल सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 31.04 च्या सरासरीने 4,218 धावा केल्या आहेत.

Gautam Gambhir टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक, जय शाहने केली घोषणा Read More »