Dnamarathi.com

Maharashtra News: तीर्थक्षेत्र नाशिक राजापूर ते श्रीक्षेत्र पंढरपूर पायी दिंडी गेल्या सात वर्षापासून सोलापूर रोडवरील वाकोडी फाटा येथील वास्तव्यास असलेले माजी सैनिक युनूस टेंगे या मुस्लिम कुटुंबाकडे मुक्कामी असते.

हे मुस्लिम कुटुंब वारकऱ्यांची मनोभावे सेवा करत आलेले आहेत. पंढरीच्या वारकऱ्यांना त्यांच्याकडून पंगत दिली जाते. 

कुटुंब प्रमुख माजी सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे आरोग्य विभागाचे अध्यक्ष युनूस टेंगे हे एक माजी सैनिक आहेत.

त्यांनी हिंदू मुस्लिम शीख ईसाई हम सब भाई भाई हीच एक सैनिकाची शिकवण असते, भारत माता ही एकच जात आणि एकच धर्म आहे. याचा आदर्श एका माजी सैनिकांनी समाजाला या माध्यमातून दिला आहे. 

माजी सैनिक युनिस टेंगे मुस्लिम समाजाचे आहेत त्यांच्या घरी गेल्या सात वर्षापासून ही दिंडी मुक्कामी असते त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य दिंडीतील वारकऱ्यांची मनोभावे सेवा करतात.

पूजा अर्चा करून त्यांच्या समवेत हरिनामाच्या गजरात विलीन होतात यापेक्षा दुसरी देशसेवा कोणतीच नसल्याचे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *