DNA मराठी

Nilesh Lanke: मोठी बातमी! खासदार लंके यांच्या मागण्या मान्य, उपोषण सोडला

Nilesh Lanke: एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार गेल्या चार दिवसांपासून पोलीस खात्यात होत  असलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात अहमदनगरचे खासदार नीलेश लंके अहमदनगर पोलीस अधीक्षक कार्यालया बाहेर उपोषणाल बसले होते.

आज निलेश लंके यांच्या मागण्या मान्य झाले असून नाशिक ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिलखेरकर यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याने लंके यांनी उपोषण मागे घेतले आहे.

नाशिक ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिलखेरकर यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आणि ही चौकशी इन्कॅमेरा होणार असल्याचे लेखी आश्वासन नाशिक विभागीय पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी दिले आहे.बाळासाहेब थोरात यांची यशस्वी मध्यस्थीमुळे उपोषण सुटला आहे.