DNA मराठी

DNA Marathi News

Sai Tamhankar : रुख्मिणीने जिंकल प्रेक्षकांचं मन, बॉलिवुडमध्ये सईच्या अभिनयाचा बोलबाला !

Sai Tamhankar : बॅक टू बॅक प्रोजेक्ट्स आणि दर्जेदार भूमिका साकारणारी सुपरस्टार सई ताम्हणकर सध्या बॉलिवूड गजवताना दिसतेय. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या “अग्नी” मधून हे पुन्हा एकदा सई ने तिच्या अभिनयाची छाप पाडली. 2024 मध्ये दमदार काम करणारी आणि कमालीच्या भूमिका साकारणारी सई पुन्हा एकदा प्रेक्षकांना मोहित करून गेली आहे. 2024 हे वर्ष सई साठी अनेक गोष्टींसाठी खास ठरलं आणि यात तिच्या वैविध्यपूर्ण भूमिका तर होत्याच पण सोबतीने अनेक आव्हानं पेलत तिने बॉलिवुड मध्ये स्वतःच्या अभिनयाची जादू दाखवली आहे. मिमी, भक्षक आणि आता अग्नी सईच्या वेगळ्या धाटणीच्या भूमिका या कायम लक्षवेधी ठरतात. अग्नी मधली रुख्मिणी प्रेक्षकांना भावली तर खरंच पण बॉलिवूड मधल्या बड्या कलाकारांच्या सोबतीने तिने तिची भूमिका चोख पार पाडली आहे. एक गृहिणी असलेली रुख्मिणी खंबीर पाठिंबा देणारी बायको, बहीण आणि आई आहे हे तिने यातून सिद्ध केलं आहे. सईच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत असताना बॉलिवूड सोबतीने मराठी कलाकारांनी देखील तिच्या भूमिकेच कौतुक केलं आहे. दिग्गज दिग्दर्शक हंसल मेहता पासून नवाज उद्दिन सिद्दीकी, नोरा फतेह ते मराठी मधल्या अनेक कलाकारांनी अग्नी ला वाहवा दिली आहे. येणाऱ्या काळात सई अनेक बॉलिवूड प्रोजेक्ट्स मध्ये दिसणार असून ग्राउंड झीरो, डब्बा कार्टेल हे तिचे आगामी प्रोजेक्ट आहेत.

Sai Tamhankar : रुख्मिणीने जिंकल प्रेक्षकांचं मन, बॉलिवुडमध्ये सईच्या अभिनयाचा बोलबाला ! Read More »

Maharashtra News: जलसंधारण कामांमुळे करंजीतील फळबागा बहरल्या

Maharashtra News: पाथर्डी तालुक्यातील करंजी गावात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत जलसंधारणाची विविध कामे केल्याने शाश्वत जलसाठा उपलब्ध झाला असून फळबागांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले आहे. करंजी हे बाजारपेठेचे गाव म्हणून ओळखले जाते. दिवसभरात दहा ते पंधरा हजार प्रवासी गावात ये-जा करतात. त्यामुळे गावकऱ्यांसोबत या प्रवाशांसाठीदेखील पिण्याचे पाणी आवश्यक असते. गावात फळबागांचे प्रमाणही अधिक अर्थात एकूण पिकांच्या 75 टक्के आहे. या फळबागांसाठीदेखील मुबलक प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. पाण्याचे योग्य नियोजन करण्यासोबत पाणीसाठ्यात वाढ करण्याची आवश्यकता लक्षात घेवून गावाने प्रधानमंत्री कृषी सिंचन योनजेअंतर्गत जलसंवर्धनाची विविध कामे हाती घेतली. जलस्रोतांमधील गाळ मोठ्या प्रमाणात काढण्यात आला आणि आवश्यक तिथे दुरूस्तीची कामे करण्यात आली. गाळ काढून परिसरातील शेतात टाकण्यात आल्याने शेतीसाठी त्याचा फायदा झाला. गावात पाणलोट विकास समितीमार्फत 4 ठिकाणी सिमेंट नाला बांध दुरुस्ती आणि 19 सामुहीक शेततलावाची कामे घेण्यात आली. याशिवाय 3 मातीनाला बांध, 8 चेक डॅम, समतल चर, संयुक्त गॅबियन, सलग समतल चर अशी 39 कामे पूर्ण करण्यात आली आहेत. या कामांवर 1 कोटी 34 लाख रुपये खर्च करण्यात आले. या सर्व कामांमुळे गावातील पाणीसाठा वाढण्यास मदत झाली. गावाला आता पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही. पिण्यासाठी आणि सिंचनासाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाले आहे. एवढ्यावर समाधान न मानता जलसंधारणाची आणखी कामे घेण्याचा ग्रामस्थांचा निर्धार आहे. एकूणच गावात जलसंवर्धनाचे नवे पर्व सुरू झाले आहे. रफिक शेख, सरपंच-एरवी पावसाळ्यानंतर दोन ते तीन महिन्यात विहिरींचे पाणी अटत असे. यावर्षी मात्र विहिरींना चांगल्या प्रमाणात पाणी असल्याने फळबागांना पुरेसे पाणी मिळते आहे. पाण्यामुळे इतरही परिसर बहरला आहे. गावात असणाऱ्या प्रत्येक बंधाऱ्यातील गाळ काढण्यासोबत जलयुक्त शिवार आणि गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत विविध कामे घ्यायची आहेत.

Maharashtra News: जलसंधारण कामांमुळे करंजीतील फळबागा बहरल्या Read More »

Maharashtra News: स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, 4 लाखांची सुगंधी तंबाखू जप्त, 3 आरोपींना अटक

Maharashtra News:  शेवगाव येथे स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत 4 लाखांची सुगंधी तंबाखू जप्त करून 6  जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर यापैकी 3 आरोपींना ताब्यात देखील घेण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी शेवगाव येथे अवैधरित्या विकत घेऊन विक्रीसाठी ठेवलेला 4 लाख रुपये किमतीचा विविध कंपनीचा सुगंधी पानमसाला- तंबाखू व गुटखा शेवगाव शहरातील खालची वेस येथे पकडला.  याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस कॉन्स्टेबल शिवाजी अशोक ढाकणे यांच्या फिर्यादीवरून बिलाल मोहंमद हनिफ तांबोळी (वय 34), अरबाज मोहंमद रफीक तांबोळी (वय 22), अजीम फारूक तांबोळी (वय 41), (सर्व राहणार खालची वेस, काझी गल्ली, शेवगाव), अख्तर महेबूब आंबेकर (रा. ता. पैठण), दादासाहेब अंकुश जाधव, आदिनाथ अंकुश जाधव (दोघे, रा. ता. गेवराई) या सहा जणांविरोधात अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे करीत आहेत.

Maharashtra News: स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, 4 लाखांची सुगंधी तंबाखू जप्त, 3 आरोपींना अटक Read More »

Maharashtra Cabinet : भाजपकडून 20, शिंदे गटातून 13 तर राष्ट्रवादीकडून ‘इतके’ आमदार घेणार मंत्री पदाची शपथ

Maharashtra Cabinet: देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. तर दुसरीकडे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे मात्र इतर कोणत्याही आमदाराने मंत्रीपदाची शपथ घेतली नसल्याने कोणत्या पक्षाकडे किती मंत्रिपदे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यातच काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, मंत्रिमंडळात भाजपच्या कोट्यातून 20 मंत्री केले जातील, 13 मंत्री शिवसेनेच्या शिंदे गटातून आणि 10 मंत्री राष्ट्रवादीच्या कोट्यातून केले जातील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी संध्याकाळी पदाची शपथ घेतल्यानंतर येथील राज्य सचिवालय ‘मंत्रालय’ येथे आपली नवीन अधिकृत जबाबदारी स्वीकारली. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील ‘महायुती’ आघाडीच्या तीन नेत्यांनी आझाद मैदानावर एका भव्य समारंभात शपथ घेतली, ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, उद्योगपती आणि चित्रपट कलाकार उपस्थित होते. 288 सदस्यांच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने 132 जागा जिंकल्याने फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार म्हणून समोर आले होते. ‘महायुती’चे घटक पक्ष – भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मिळून विधानसभेच्या 236 जागा आहेत. भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी फडणवीस यांची एकमताने निवड झाल्यानंतर लगेचच ‘महायुती’च्या शिष्टमंडळाने बुधवारी राजभवन येथे राज्यपालांची भेट घेतली. नव्या सरकारची पहिली मंत्रिमंडळ बैठक ‘मंत्रालय’ येथे पोहोचल्यावर तिन्ही नेत्यांचे कर्मचाऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. यानंतर फडणवीस व त्यांच्या सहकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, जिजाबाई, बी.आर.आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर फडणवीस, शिंदे आणि पवार यांनी नव्या सरकारची पहिली मंत्रिमंडळ बैठक घेतली आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

Maharashtra Cabinet : भाजपकडून 20, शिंदे गटातून 13 तर राष्ट्रवादीकडून ‘इतके’ आमदार घेणार मंत्री पदाची शपथ Read More »

Maharashtra News: किरकोळ वादानंतर विद्यार्थ्याला बेदम मारहाण, गुन्हा दाखल

Maharashtra News: अहिल्यानगर तालुक्यातील सारोळा कासार गावामध्ये करमवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या प्रसाद ठोकळ या विद्यार्थ्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे. वर्गातील एका विद्यार्थीसोबत झालेल्या किरकोळ वादानंतर ही धक्कादायक घटना घडलीय. कार्तिक काळे असं आरोपींचे नाव आहे. माहितीनुसार, प्रसाद ठोकळ याचे त्याच्या वर्गातील एका विद्यार्थी सोबत किरकोळ वाद झाला होता. शाळेतील शिक्षकांच्या मध्यस्थीनी मिटवण्यात आले परंतु त्या वादाचा राग धरून त्या मुलाने गावातील काही गुंड प्रवृत्तीचे 10 ते 15 मुलांना शाळेच्या बाहेर बोलवले व प्रसाद ठोकळला बेदम मारहाण करून तिथून पळ काढला. सध्या प्रसाद ठोकळवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून या प्रकरणात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maharashtra News: किरकोळ वादानंतर विद्यार्थ्याला बेदम मारहाण, गुन्हा दाखल Read More »

Maharashtra CM: भाजपकडून नाव फिक्स! 5 डिसेंबरला देवेंद्र फडणवीस घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

Maharashtra CM : मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव फिक्स झाले असल्याची माहिती राजकीय वर्तुळात आली आहे. माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील. 4 तारखेला होणाऱ्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची निवड निश्चित असून, देवेंद्र फडणवीस हे 5 डिसेंबरला शपथही घेणार आहेत. त्यांच्यासोबत दोन उपमुख्यमंत्री असतील, त्यापैकी एक अजित पवार, दुसरा एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या पक्षातील कोणताही नेता असू शकतो. विजय रुपाणी (माजी गुजरातचे मुख्यमंत्री), महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी दोन केंद्रीय निरीक्षकांपैकी एक, यांनी सोमवारी सांगितले की, सहमतीने नेता निवडण्याचा प्रयत्न केला जाईल. फडणवीस आघाडीवरमहाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण असेल याचा निर्णय 4 डिसेंबर रोजी होणार आहे, जेव्हा भाजप विधिमंडळ पक्ष आपला नवा नेता निवडेल. भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले देवेंद्र फडणवीस हे या सर्वोच्च पदासाठी आघाडीवर मानले जात आहेत. बुधवारी सकाळी विधानभवनात बैठक होणार असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. भाजप बहुमताच्या जवळ20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या, ज्याचे निकाल तीन दिवसांनंतर जाहीर झाले, ‘महायुती’ आघाडीने विधानसभेच्या 288 पैकी 230 जागा जिंकल्या. भाजप 132 जागांसह आघाडीवर आहे, तर शिवसेनेला 57 आणि राष्ट्रवादीला 41 जागा मिळाल्या आहेत.

Maharashtra CM: भाजपकडून नाव फिक्स! 5 डिसेंबरला देवेंद्र फडणवीस घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ Read More »

Maharashtra News: अश्लील चाळे अन् कोतवाली पोलिसांची एन्ट्री, कोर्ट गल्लीत नेमकं घडलं तरी काय?

Maharashtra News: नगर शहरातील कॅफे कोर्ट गल्लीत कोतवाली पोलिसांनी अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करुन देणा-या कॅफे चालक व मालक यांचेवर कारवाई केली आहे. कोतवाली पोलिसांनी गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई केली आहे. द परफेक्ट कॅफे, कोर्ट गल्ली, कर्डीले डायग्नोस्टीक समोर प्लायवुडचे कंम्पार्टमेंट करुन पडदे लावुन अंधारकरुन शाळा कॉलेजमधील मुला मुलींना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्यात आली असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून पोलीस निरीक्षक दराडे यांनी सदर ठिकाणी जावुन खात्री करुन तात्काळ छापा टाकुन कारवाई करण्याचे आदेश दिले. कोतवाली गुन्हे शोध पथकाने सदर ठिकाणी पंचा समक्ष पथकाने छापा टाकला. तेव्हा सदर ठिकाणी प्लाऊड बोर्डचे पार्टीशन करुन वेगवेगळे कंपार्टमेंट केलले दिसले त्यात काही कॉलेजचे मुले व मुली अश्लील चाळे करताना मिळुन आले. या कारवाईत पोलिसांनी शिवप्रसाद कुमार (वय 20 वर्ष), कॅफे मॅनेजरला ताब्यात घेतला आहे. तसेच सदर कॉलेजचे मुले व मुली यांना त्यांचे नाव, गाव विचारुन खात्री करुन त्यांचे वय व ओळख पत्राची पाहणी करुन त्यांना तोंडी समज देवुन सोडण्यात आले. तर दुसरीकडे सदर कॉफी शॉपचे चालक व मालक यांचे विरुध्द पोकॉ/ सतिष शिंदे यांचे फिर्यादीवरुन कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 129.131 (क) (क) अन्वये प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maharashtra News: अश्लील चाळे अन् कोतवाली पोलिसांची एन्ट्री, कोर्ट गल्लीत नेमकं घडलं तरी काय? Read More »

Bollywood News : झी स्टुडिओज आणि रिंकू राजगुरू पुन्हा एकत्र, ‘जिजाई’ चित्रपटाचा मुहूर्त सोहळा संपन्न

Bollywood News: झी स्टुडिओज आणि कोकोनट फिल्म्स निर्मित ‘जिजाई’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्याने ‘जिजाई’बद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. नुकताच जिजाई चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला असून नवोदित दिग्दर्शक तृशांत इंगळे दिग्दर्शित या चित्रपटात ‘सैराट फेम’ रिंकू राजगुरू प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तर अपूर्वा शाळीग्राम या चित्रपटाच्या डीओपी आहेत. कपाळी चंद्रकोर लावलेली रिंकू या चित्रपटात एका वेगळ्याच अंदाजात दिसणार आहे. ‘सैराट’च्या यशानंतर रिंकू राजगुरू आणि झी स्टुडिओज यांच्यात एक वेगळं नातं निर्माण झालं आहे. आता या जोडीने पुन्हा एकदा ‘जिजाई’च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्याचा निर्धार केला असून हा नवीन चित्रपट लवकरच प्रकारांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार, याची आता प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. झी स्टुडिओजचे बवेश जानवलेकर म्हणतात, ‘’झी स्टुडिओजने नेहमीप्रमाणे नवोदितकलाकारांना आणि दिग्दर्शकांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊ असते. झी स्टुडिओजने प्रेक्षकांसाठी कायमच दर्जेदार आणि वेगळ्या आशयाचे चित्रपट सादर केले आहेत. ‘जिजाई’ हा त्याच परंपरेचा भाग आहे.’’

Bollywood News : झी स्टुडिओज आणि रिंकू राजगुरू पुन्हा एकत्र, ‘जिजाई’ चित्रपटाचा मुहूर्त सोहळा संपन्न Read More »

Maharashtra News: मोठी बातमी! जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी, ‘हे’ आहे कारण

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू : २९ नोव्हेंबर ते १२ डिसेंबरपर्यंत लागू राहणार अहिल्यानगर – जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिति अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी कडक पावले उचलली असून, मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे. हा आदेश २९ नोव्हेंबर २०२४ पासून ते १२ डिसेंबर २०२४ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत प्रभावी राहणार आहे. या आदेशानुसार कोणतीही व्यक्ती शस्त्र, दारूगोळा, धारदार शस्त्रे, काठ्या, किंवा इतर घातक साधने बाळगू शकणार नाही. सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास तसेच कोणतीही सभा किंवा मिरवणूक काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. तथापि, धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, लग्न मिरवणुका किंवा प्रेतयात्रांवरील जमावावर या आदेशाची अंमलबजावणी होणार नाही. याशिवाय, पोलिस अधिकारी, शासकीय सेवेत कार्यरत अधिकारी व कर्मचारी तसेच पूर्वपरवानगी घेतलेल्या सभा किंवा मिरवणुकांवरही बंदी लागू होणार नाही. या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. नागरिकांनी कायद्याचे पालन करून शांतता राखावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Maharashtra News: मोठी बातमी! जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी, ‘हे’ आहे कारण Read More »

NIA Raids in Human Trafficking Case : मानवी तस्करी प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, 22 ठिकाणी छापे

NIA Raids in Human Trafficking Case: एनआयएने मोठी कारवाई करत मानवी तस्करी प्रकरणात देशभरात छापे टाकले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 6 राज्यांमध्ये 22 ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू आहे. एनआयएने विदेशी सहभागाच्या संशयावरून ही मोठी कारवाई केली आहे.हे छापे 6 राज्यांमध्ये सुरू असून अनेक देशांशी त्याचे आंतरराष्ट्रीय संबंध आहेत. राष्ट्रीय तपास यंत्रणेने 2024 मध्ये गुन्हा दाखल केला होता. सायबर फसवणूक प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने ही मोठी कारवाई केली आहे. सायबर फ्रॉडच्या माध्यमातून बिहार गोपालगंज येथील तरुणांना परदेशात नोकरीचे आमिष दाखवून परदेशात गेल्यावर त्यांना बनावट कॉल सेंटरमध्ये बंधक बनवून सायबर फसवणूक करण्यात आली. या रॅकेटचा म्यानमार आणि लाओसशी संबंध असण्याची शक्यता आहे. यापूर्वी, 5 ऑक्टोबर रोजी एनआयएने दहशतवादी कट आणि दहशतवादी फंडिंगच्या संशयावरून 5 राज्यांतील 22 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले होते. एनआयएने महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश, आसाम आणि दिल्ली येथे छापे टाकले. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित प्रकरणांबाबत ही कारवाई करण्यात आली. एनआयएने जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला आणि इतर भागातही छापे टाकले होते. बारामुल्ला येथील मौलवी इक्बाल भट यांच्या घराची एनआयएने सुरक्षा दलांच्या मदतीने झडती घेतली. 1 ऑक्टोबर रोजी पश्चिम बंगालमधील अनेक जिल्ह्यांमध्ये छापे टाकण्यात आले. 1 ऑक्टोबर रोजी एनआयएच्या पथकाने दक्षिण 24 परगणा, आसनसोल, हावडा, नादिया आणि कोलकाता येथे 11 ठिकाणी छापे टाकले होते.

NIA Raids in Human Trafficking Case : मानवी तस्करी प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, 22 ठिकाणी छापे Read More »