Maharashtra News: अहिल्यानगर तालुक्यातील सारोळा कासार गावामध्ये करमवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या प्रसाद ठोकळ या विद्यार्थ्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे.
वर्गातील एका विद्यार्थीसोबत झालेल्या किरकोळ वादानंतर ही धक्कादायक घटना घडलीय. कार्तिक काळे असं आरोपींचे नाव आहे. माहितीनुसार,
प्रसाद ठोकळ याचे त्याच्या वर्गातील एका विद्यार्थी सोबत किरकोळ वाद झाला होता. शाळेतील शिक्षकांच्या मध्यस्थीनी मिटवण्यात आले परंतु त्या वादाचा राग धरून त्या मुलाने गावातील काही गुंड प्रवृत्तीचे 10 ते 15 मुलांना शाळेच्या बाहेर बोलवले व प्रसाद ठोकळला बेदम मारहाण करून तिथून पळ काढला. सध्या प्रसाद ठोकळवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून या प्रकरणात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.