Dnamarathi.com

Maharashtra News: नगर शहरातील कॅफे कोर्ट गल्लीत कोतवाली पोलिसांनी अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करुन देणा-या कॅफे चालक व मालक यांचेवर कारवाई केली आहे. कोतवाली पोलिसांनी गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई केली आहे.

द परफेक्ट कॅफे, कोर्ट गल्ली, कर्डीले डायग्नोस्टीक समोर प्लायवुडचे कंम्पार्टमेंट करुन पडदे लावुन अंधारकरुन शाळा कॉलेजमधील मुला मुलींना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्यात आली असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून पोलीस निरीक्षक दराडे यांनी सदर ठिकाणी जावुन खात्री करुन तात्काळ छापा टाकुन कारवाई करण्याचे आदेश दिले.

कोतवाली गुन्हे शोध पथकाने सदर ठिकाणी पंचा समक्ष पथकाने छापा टाकला. तेव्हा सदर ठिकाणी प्लाऊड बोर्डचे पार्टीशन करुन वेगवेगळे कंपार्टमेंट केलले दिसले त्यात काही कॉलेजचे मुले व मुली अश्लील चाळे करताना मिळुन आले. या कारवाईत पोलिसांनी शिवप्रसाद कुमार (वय 20 वर्ष), कॅफे मॅनेजरला ताब्यात घेतला आहे.

तसेच सदर कॉलेजचे मुले व मुली यांना त्यांचे नाव, गाव विचारुन खात्री करुन त्यांचे वय व ओळख पत्राची पाहणी करुन त्यांना तोंडी समज देवुन सोडण्यात आले.

तर दुसरीकडे सदर कॉफी शॉपचे चालक व मालक यांचे विरुध्द पोकॉ/ सतिष शिंदे यांचे फिर्यादीवरुन कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 129.131 (क) (क) अन्वये प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *