DNA मराठी

Maharashtra News: स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, 4 लाखांची सुगंधी तंबाखू जप्त, 3 आरोपींना अटक

IMG 20241207 WA0002

Maharashtra News:  शेवगाव येथे स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत 4 लाखांची सुगंधी तंबाखू जप्त करून 6  जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर यापैकी 3 आरोपींना ताब्यात देखील घेण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी शेवगाव येथे अवैधरित्या विकत घेऊन विक्रीसाठी ठेवलेला 4 लाख रुपये किमतीचा विविध कंपनीचा सुगंधी पानमसाला- तंबाखू व गुटखा शेवगाव शहरातील खालची वेस येथे पकडला. 

याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस कॉन्स्टेबल शिवाजी अशोक ढाकणे यांच्या फिर्यादीवरून बिलाल मोहंमद हनिफ तांबोळी (वय 34), अरबाज मोहंमद रफीक तांबोळी (वय 22), अजीम फारूक तांबोळी (वय 41), (सर्व राहणार खालची वेस, काझी गल्ली, शेवगाव), अख्तर महेबूब आंबेकर (रा. ता. पैठण), दादासाहेब अंकुश जाधव, आदिनाथ अंकुश जाधव (दोघे, रा. ता. गेवराई) या सहा जणांविरोधात अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *