DNA मराठी

DNA Marathi News

MP Sujay Vikhe

Ahmednagar News:  प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांच्या इमारत बांधकामास भरीव निधी मंजूर: खा. डॉ. सुजय विखे पाटील

Ahmednagar News: राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कर्जत तालुक्यातील ३ गावांमध्ये तसेच राहुरी, श्रीगोंदा आणि जामखेड तालुक्यातील प्रत्येकी एका गावी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या नवीन मुख्य इमारतीच्या बांधकामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.  कर्जत तालुक्यातील मौजे बहिरोबावाडी, मौजे सितपूर आणि मौजे म्हाळंगी येथे तसेच राहुरी तालुक्यातील मौजे चेडगाव, श्रीगोंदा तालुक्यातील मौजे मुगुंसगाव आणि जामखेड तालुक्यातील मौजे जवळके येथे नवीन उपकेंद्र इमारतीचे बांधकाम करण्याच्या कामासाठी प्रत्येकी ५५.५० लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला असल्याची माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. सदरील विविध प्राथमिक आरोग्य उपकेंद्र निर्माणासाठी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्याकडे नागरिकांनी मागणी केली असता त्यांनी शासन स्तरावर याबाबतीत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे या नवीन उपकेंद्रांच्या इमारत बांधकामासाठी शासनाकडून भरीव निधी उपलब्ध झाला आहे. याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आणि नागरिकांना मोठा दिलासा यामुळे मिळणार असल्याचे स्पष्ट केले.  आरोग्याच्या बाबतीत संपूर्ण जिल्ह्यात विविध सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे मत सुजय विखेंनी मांडले. आरोग्य क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याकडे अहमदनगर जिल्ह्याची वाटचाल सुरू झाली असून येणाऱ्या काळात सर्वांनाच आपल्या जवळील उपकेंद्रात उपचार घेणे शक्य होईल असे मत खासदार विखे पाटील यांनी मांडले.  तसेच त्यांनी सदरील निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्दिले, आमदार राम शिंदे व आमदार बबनदादा पाचपुते, यांचे मनःपूर्वक आभार मानले.

Ahmednagar News:  प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांच्या इमारत बांधकामास भरीव निधी मंजूर: खा. डॉ. सुजय विखे पाटील Read More »

IMG 20240315 WA0015

Ahmednagar News : लोकांची कामे करण्‍यात तालुक्‍याच्‍या नेत्‍यांना कोणतेही स्‍वारस्‍य नाही, विखेंची नाव न घेता बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका

Ahmednagar News: मंत्रीपद असूनही तालुक्‍यात रोजगाराची कोणतीही साधनं निर्माण करता आली नाहीत, लोकांची कामे करण्‍यात तालुक्‍याच्‍या नेत्‍यांना कोणतेही स्‍वारस्‍य नाही, हेलपाटे मारायला लावण्‍यातच त्‍यांना स्‍वारस्‍य  वाटते. तालुक्‍यातील जनतेने आता पर्याय शोधला पाहीजे. गावगुंडाच्‍या  राजकारणापेक्षा विकासाचा मंत्र घेवून येणा-यांना पाठबळ द्या असे आवाहन महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले.  तालुक्‍यातील खांबा येथे ना.विखे पाटील यांच्‍या उपस्थितीत सुमारे २५ कोटी रुपयांच्‍या विविध विकास कामांचा शुभारंभ करण्‍यात आला. खांबा ग्रामपंचायतीचे सरपंच रविंद्र दातिर यांच्‍यासह सर्व सदस्‍य आणि गावातील युवक कार्यकर्त्‍यांनी भाजपामध्‍ये प्रवेश केला. याप्रसंगी भाजपाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.  मंत्री विखे पाटील आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, संगमनेर तालुक्‍याला १४५ कोटी रुपयांचा निधी उपलब्‍ध करुन दिला आहे. महायुती सरकारमुळे मिळालेल्‍या निधीचे श्रेय कोणी घेत असले तरी जनता जागरुक आहेत. कारण वर्षानुवर्षे या भागाला रस्‍ते मिळाले नाहीत, पाण्‍याचा प्रश्‍न सुटला नाही. अनेक वर्षे मंत्रीपद मिळूनही रोजगारची कुठलीही साधनं तुम्‍हाला निर्माण करता आली नाहीत. मग तुमचा तालुका नेमका कशात पुढे आहे असा सवाल त्‍यांनी उपस्थित केला.  दुष्‍काळी भागाला वरदान ठरणा-या निळवंडे धरणाचे कामही महायुती सरकारमुळे मार्गी लागले असून, भोजापूर चारीचा प्रश्‍नही लवकरच मार्गी लागेल. पठार भागातील पाणी प्रश्‍नाबाबतही आपण गांभिर्याने सरकारच्‍या माध्‍यमातून प्रयत्‍न करु अशी ग्‍वाही देतानाच युवकांच्‍या रोजगारासाठी आता जिल्‍ह्यात तीन औद्योगिक वसाहती विकसीत होत आहेत. यापुर्वी असे निर्णय होवू शकले नव्‍हते. अनेक उद्योजक आता जिल्‍ह्यात येण्‍यास तयार झाले आहेत.  जिल्ह्यातील युवकांना जिल्‍ह्यातच रोजगार उप‍लब्‍ध करुन देण्‍याचे उदिष्‍ठ आपण ठेवले असून, जिल्‍ह्यामध्‍ये संत गाडगे बाबा कौशल्‍य प्रशिक्षण प्रबोधि‍नी स्‍थापन करण्‍याचा निर्णय केला आहे. संगमनेर तालुक्‍यातही ही कौशल्‍य प्रबोधिनी स्‍थापन करण्‍यास आपण प्राधान्‍य देणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.   पशुसंवर्धन विभागाच्‍या माध्‍यमातून धनगर समाजाकरीता मेंढी व शेळी सहकार विकास महासंघाची स्‍थापना करण्‍यात आली असून, या माध्‍यमातून रोजगार निर्मिती करण्‍याचा निर्णय राज्‍य सरकारने घेतला आहे. दूध उत्‍पादक शेतक-यांना दिलासा देण्‍यासाठी ५ रुपये अनुदानाची योजना सुरु केली मात्र अनेक दूध संघानी शेतक-यांची माहीती उपलब्‍ध न करुन दिल्‍यामुळेच शेतकरी अनुदानापासून वंचित राहत आहेत. अनुदान मिळत नाही म्‍हणून सरकारच्‍या विरोधात ओरडणा-यांनीच अनुदान मिळण्‍यापासून शेतक-यांना वंचित ठेवल्‍याचा आरोप विखे पाटील यांनी केला.   मंत्री विखे पाटील यांची भव्‍य मिरवणूक काढण्‍यात आली. रणखांब आणि परिसरातील गावांमध्‍ये भव्‍य स्‍वागत करण्‍यात आले. श्रीक्षेत्र बाळेश्‍वर येथेही विकास कामांचा भूमीपुजन समारंभ संपन्‍न झाला. श्रीक्षेत्र बाळेश्‍वर येथे पर्यटन विकास योजनेच्‍या माध्‍यमातून अधिक निधी उपलब्‍ध करुन देण्‍याचे त्‍यांनी सांगितले. याबाबत महसूल व वन विभागाच्‍या आधिका-यांना त्‍यांनी पर्यटन विकासाचा प्रकल्‍प आराखडा तयार करण्‍याच्‍या सुचना त्‍यांनी दिल्‍या. खांबा येथील पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवी होळकर यांचे स्‍मारक हे एक प्रेरणास्‍थान आहे. जिल्‍ह्याला त्‍यांचे नाव द्यावे ही अनेक वर्षांची मागणी महायुती सरकारने पुर्ण केल्‍याचे मंत्री विखे पाटील म्‍हणाले. खांबा येथील जोगींदरा तलाव, जवळटेक तलाव दुरुस्‍तीसाठी निधी देण्‍याचे आश्‍वासन देतानाच आता संपूर्ण गाव आणि ग्रामपंचायतच भाजपमय झाल्‍यामुळे या गावाच्‍या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्‍याचे आश्‍वासनही त्‍यांनी दिले.

Ahmednagar News : लोकांची कामे करण्‍यात तालुक्‍याच्‍या नेत्‍यांना कोणतेही स्‍वारस्‍य नाही, विखेंची नाव न घेता बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका Read More »

Biscuit

Biscuits Side Effects : हेल्दी समजून अतिप्रमाणात करू नका ‘या’ बिस्किटांचे सेवन, नाहीतर ….

Biscuits Side Effects : डायजेस्टिव बिस्टिकटच्या जाहिराती आपल्याला जेवणामधील जास्त कळाचं अंतर व भूक सहन करण्याच्या सवयीवरून घाबरवतात.  यापासून बचाव करण्यासाठी डायजेस्टिव बिस्किट चांगला पर्याय असल्याचं सांगितलं जातं. शुगर, फॅट व सोडियम फ्री असल्याचा दावा करणा-या बिस्किटामध्ये खरं तर खूप प्रमाणात साखर, फॅट, सोडियम व रिफाइंड पीठ असतं. शिवाय चविष्ट लागावं म्हणून यामध्ये केमिकलयुक्त टेस्ट इनहेंसर देखील वापरलं जातं. यामध्ये वापरली जाणारी सामग्री आपल्या आरोग्यावर काय परिणाम करते आणि खरंच ही बिस्किटं आरोग्यासाठी लाभदायक असतात का? डायजेस्टिव बिस्किट खरं तर डॉक्टर्सच्या सल्ल्यावरून जुलाब  व खराब डायजेशनमधून जाणा-या रुग्णांसाठी बनवली गेली आहेत.  बाजारात मिळणा-या इतर बिस्किटांच्या तुलनेत डायजेस्टिव बिस्किटात फायबरयुक्त, प्रोटीन, व्हिटॅमिन व मिनरल असण्यासोबतच कोलेस्ट्रॉल व फॅट फ्री असल्याचं सांगितलं जातं व नाश्ता किंवा चहासोबत खाण्याचा सल्ला दिला जातो.  ही बिस्किटं मधुमेहांच्या  रुग्णांसाठी किंवा यापासून बचाव करण्यासाठी उपयुक्त असल्याचं समजलं जातं. ग्लुटेनची मात्रा करू शकते घात बेकरी आयटम्स मैद्यापासून बनलेले असतात. डायजेस्टिव बिस्किटात मैद्याऐवजी गव्हाच्या पीठाचा वापर केला जात असल्याचं सांगितलं जातं. या गव्हाच्या पीठात ग्लुटेन असतं. वेगवेगळ्या ब्रॅंडच्या डायजेस्टिव बिस्किटांमध्ये ग्लुटेनची मात्रा देखील वेगवेगळ्या प्रमाणात वापरली जाते.  जर तुम्हाला ग्लुटेनची अ‍ॅलर्जी असेल तर हे बिस्किट तुमच्यासाठी लाभदायक नाही. ग्लुटेनच्या अतिप्रमाणात केलेल्या सेवनाने पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडीटी, डायरिया व जुलाब यांसारख्या समस्या होऊ शकतात. सॅच्युरेटेड फॅटमुळे नुकसान डायजेस्टिव बिस्किटांच्या पाकिटावर फॅट फ्री असं लिहिलेलं असतं. पण यामध्ये सॅच्युरेटेड फॅट व फॅटच्या दुस-या पर्यायांचा वापर केला जातो. जास्त प्रमाणात सॅच्युरेटेड फॅटचं सेवन केल्यामुळे कोलेस्ट्रॉल व गैस्ट्रोइंटेस्टाइनलशी निगडीत आजारांचं शिकार होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे जरी ही बिस्किटं तुम्ही खात असाल तरी मर्यादीत प्रमाणात सेवन करणे कधीही उत्तम. प्रिजरव्हेटिव्हसचा भडिमार बाजारात डायजेस्टिव बिस्किटाला खूप मागणी आहे आणि ही मागणी पूर्ण करण्यासाठी इतर बिस्किटांप्रमाणेच यामध्ये प्रिजरव्हेटिव्हस मिसळले जातात. जेणे करून बिस्किटं बराच काळ खराब न होता टिकून राहतील. सोबतच सुगंधासाठी यामध्ये इसेंस टाकणंही मजबूरी असते.  आता ही बिस्किटं तुमच्यासाठी लाभदायक आहेत की नुकसानकारक, हे त्यामध्ये मिसळलेल्या प्रिजरव्हेटिव्हसच्या प्रमाण व क्वालिटीवरच अवलंबून असते. हे प्रिजरव्हेटिव्हस व इसेंस शेवटी केमिकलच आहेत. शुगरलेस नाही डायजेस्टिव बिस्किट हे दुस-या बिस्किटांच्या तुलनेत कमी गोड असतात. पण यामध्ये नैसर्गिक स्वीटनर्ससोबतच साखरेचाही वापर केला जातो. याचाच अर्थ ही बिस्किटं शुगरलेस नाहीत. ही बिस्किटं खालल्याने तुम्ही नकळतच एक्स्ट्रा साखरेचं सेवन करता. त्यामुळे जर यातील साखरेचे प्रमाण मर्यादेबाहेर असेल तर लठ्ठपणा, ह्रदयाशी निगडीत आजार व डायबिटीज सारख्या आजारांचा धोका कमी होताना दिसतच नाही. सोडियममुळे होऊ शकतात समस्या बिस्किटाचा स्वाद वाढवण्यासाठी व हलकंसं नमकिन बनवण्यासाठी यामध्ये सोडियम मिक्स केलं जातं. सोडियमचं जास्त प्रमाण हाय ब्लड प्रेशर, हायपरटेन्शन व स्ट्रोक सारख्या जीवघेण्या आजारांचं कारण बनतं. प्रत्येक आजार व रुग्ण वेगवेगळा असतो. त्यामुळे कोणताही पदार्थ डोळे झाकून सेवन करण्याआधी ते बनवण्यासाठी वापरल्या जाणा-या सामग्रीची माहिती लक्ष देऊन वाचा. डायजेस्टिव बिस्किटाऐवजी ड्रायफ्रुट्स, स्प्राऊट्स आणि फळांचा आपल्या आहारात समावेश करावा.  यासोबतच भात, साबुदाणा किंवा कोकोनट बिस्किटं किंवा असे पदार्थच खा जे कोणत्याही प्रकारचं नुकसान, अ‍ॅलर्जीपासून बचाव करून आरोग्यास फायदे मिळवून देईल.

Biscuits Side Effects : हेल्दी समजून अतिप्रमाणात करू नका ‘या’ बिस्किटांचे सेवन, नाहीतर …. Read More »

IMG 20240313 WA0005

Ahmednagar News: मुळा, जायकवाडी प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी लागणार मार्गी!

Ahmednagar News:  अहमदनगर जिल्ह्यातील मुळा  व जायकवाडी प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांचे विविध प्रश्न प्रलंबित असल्याने खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी पुढाकार घेत पालकमंत्री तथा राज्याचे महसूलमंत्री मा. राधाकृष्ण विखे पाटील व मदत व पुनर्वसन विभागाचे मंत्री मा. अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन बुधवारी मंत्रालयातील दालनात केले होते.  यावेळी महसूलमंत्री आणि मदत व पुनर्वसन मंत्री यांनी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या आणि अडचणी जाणून घेत त्या तातडीने सोडविण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले. यामुळे या प्रकल्पग्रस्तांना दिलासा मिळणार आहे.  अहमदनगर जिल्ह्यातील मुळा, जायकवाडी प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तानां शासनाने जमिनी देण्याचे सोपास्कार केले मात्र अद्यापही अनेक जमिनी या भोगवाटा २ मध्ये असून त्यात वन विभागांच्या जमिनींचा सुद्धा समावेश आहे.   यामुळे त्यांना घरकुल योजना आणि इतर शासकीय योजना राबविताना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. या जमिनी ह्या १९७३ पुर्वीच्या दिल्या गेल्याने त्यातील अनामत रकमा रखडल्यामुळे या जमीन शासन जमा केल्या जाणार आहेत. यामुळे प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा यासाठी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी महसूल मंत्री तथा मदत व पुनर्वसन मंत्री यांच्याकडे प्रस्ताव पाठऊन अशा जमिनीवरील तत्कालीन धोरणातील १०० टक्के, ७५ टक्के अनामत रक्कम भरण्याची अट शिथिल करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर प्रकल्पग्रस्तांना दाखले देण्यासंदर्भातील प्रश्न मार्गी लावण्याची मागणी खासदारांनी केली.  वन अधिनियम १९८० अस्तितवात येण्यापुर्वी वाटप केलेल्या जमिनी भोगवाटा २ वर्गातील जमिनी सरकट वर्ग १ मध्ये करण्यात याव्यात. तसेच रहिवाशी प्रयोजनातील वाटप करण्यात आलेले भुखंड आणि पुनर्वसन गावठाणातील जमिनी नियमाकुल करण्याबाबत धोरण निश्चित करण्याची मागणी यावेळी खासदार डॉ. विखे पाटील यांनी केली. या सर्व मागण्याच्या बाबतीत सखोल चर्चा होऊन दोन्ही मंत्र्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी सोडविण्यासाठी महसलू, मदत व पुनर्वसन आणि वन विभागाला निर्देश दिले.  या बैठकीला मंत्रालयातील दालनात महसूल व मदत व पुनर्वसन विभागांच्या मंत्र्यांसह आमदार श्रीमती मोनिका राजळे आणि महसूल, मदत पुनर्वसन व वन विभागाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.  तर दृकश्राव्य माध्यमातून खासदार डॉ. सुजय विखे पाटील,अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिध्दिराम सालीमठ आणि प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Ahmednagar News: मुळा, जायकवाडी प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी लागणार मार्गी! Read More »

Rohit Pawar

Rohit Pawar: आंदोलनाचा सातवा दिवस, आ. रोहित पवार व तीन विद्यापीठ समितीसमोर पाच तासांच्या चर्चेनंतर विद्यार्थी उपोषणावर ठाम

आ. रोहित पवार व तीन विद्यापीठ समितीसमोर पाच तासांच्या चर्चेनंतर विद्यार्थी उपोषणावर ठाम Rohit Pawar : जामखेड येथील रत्नदीप वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची आंदोलनस्थळी जाऊन आमदार रोहित पवार यांनी कैफियत ऐकून घेतली. यावेळी विद्यार्थ्यांना रडू कोसळले. आंदोलनस्थळी पाच तास बसून त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. दरम्यान, रत्नदीपबाबत विधिमंडळाच्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.   रत्नदीप फौंडेशनच्या अध्यक्षाच्या शैक्षणिक, आर्थिक, माणसिक, शाररीक पिळवणूकमुळे त्रस्त विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाच्या सोमवारी सातव्या दिवशी आ. रोहीत पवार, सावित्रीबाई फुले विद्यापीठ, लोणारे विद्यापीठ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्यासमवेत विद्यार्थ्यांनी खुली चर्चा सुमारे साडेचार तास केली.  चार मुद्दयावर विद्यापीठ प्रतिनिधीनी कुलगुरू समवेत होणाऱ्या मिटींग नंतर निर्णय घेतले जातील असे अश्वासन दिले परंतु विद्यार्थ्यांनी निर्णय होईपर्यंत आंदोलन चालू ठेवण्याचा निर्णय घेतला डॉ. भास्कर मोरे याला 24 तासात अटक करण्याची मुदत संपली 100 घंटे झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे सांगितले.   महिला आयोगाकडून दखल रत्नदीप संस्थेच्या अध्यक्षाकडून मुलींचे माणसिक, अर्थिक शाररीक, अत्याचारामुळे सुरू असलेल्या  अंदोलनाची राज्य महिला आयोगाने स्वता:हून दखल घेतली आहे.  आयोगाने अहमदनगरचे जिल्हा पोलिस अधीक्षक यांना जामखेडमध्ये सुरु असलेल्या या प्रकरणाबाबत पत्र लिहीले आहे. या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालय अधिनियम, 1993 अंतर्गत कलम 10(1) (फ) (एक) व (2) नुसार महाराष्ट्र राज्य महिला आयोगास स्त्रियांच्या तक्रारी विचारार्थ स्विकारणे आणि त्या बाबींची स्वाधिकारे दखल घेणे व माहीती कळवण्यास सांगितले आहे.

Rohit Pawar: आंदोलनाचा सातवा दिवस, आ. रोहित पवार व तीन विद्यापीठ समितीसमोर पाच तासांच्या चर्चेनंतर विद्यार्थी उपोषणावर ठाम Read More »

IMG 20240311 WA0045

Nanded News : गुरुद्वारा दमदमा साहिबच्या ऐतिहासिक तलावाला प्रदूषण व अतिक्रमणाचा विळखा

Nanded News : गुरुद्वारा दमदमा साहिब वसमतनगर येथील ऐतिहासिक तलाव परिसरामध्ये अतिक्रमण वाढले असून त्यांच्याकडून ड्रेनेजचे पाणी तलावामध्ये सोडल्याने घाणीचे साम्राज्य वाढले असून संसर्गजन्य आजारांचा धोका वाढल्याने त्याचा बंदोबस्त करून कारवाई करावी अशी मागणी हजुरी पाठी संघटनेने हिंगोली जिल्हाधिकारी जितेंद्र पापीलवार यांना केली आहे.   नांदेड येथील सचखंड गुरुद्वारा बोर्ड प्राधिकरणाच्या अधिपत्याखाली चालणारा हिंगोली जिल्ह्यातील वसमतनगर येथील गुरुद्वारा दमदमा साहिब येथील तलावाशेजारी मागील दहा ते बारा वर्षांपासून अतिक्रमण वाढले आहे.  अतिक्रमणधारकांनाकडून तलावामध्ये ड्रेनेजचे घाण पाणी सोडले जात असल्याने संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे. दमदमा साहिब गुरुद्वाराच्या दर्शनासाठी जगभरातून भाविक मोठ्या श्रद्धेने येत असतात. प्रदूषित तलावाच्या पाण्यामुळे भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.         ऐतिहासिक तलावातील दुर्गंधी व घाणीमुळे आजारांचा धोका निर्माण झाल्याने या परिसरातील अवैधरित्या करण्यात आलेले अतिक्रमण हटवून तलावाला प्रदूषित करणाऱ्यांवर कारवाई करून तलावाची पावित्र्य कायम ठेवावे अशी मागणी हजूरी पाठी संघटनेचे अध्यक्ष दलजीतसिंघ बिशनसिंघ हजूरीपाठी, परदीपसिंघ जितसिंघ रागी, जगदीपसिंघ नंबरदार, महेंद्रसिंघ पैदल, हुकुमसिघ काराबिन यांनी हिंगोली जिल्हाधिकारी, वसमत उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी , सचखंड गुरद्वारा बोर्ड अधिक्षकांसह नांदेड जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.

Nanded News : गुरुद्वारा दमदमा साहिबच्या ऐतिहासिक तलावाला प्रदूषण व अतिक्रमणाचा विळखा Read More »

RBI

RBI Bank : सावधान, एकाच मोबाईल नंबरशी अनेक बँक खाती लिंक असेल तर आरबीआय करणार कारवाई

RBI Bank : आपल्या देशातील अनेक जणांचे आज एकापेक्षा जास्त बँक खाते आहे. जर तुमचे देखील एकापेक्षा जास्त बँक खाते असेल तर तुमच्यासाठी हा लेख महत्त्वाचा ठरणार आहे.  तुम्हाला हे माहिती असेलच की, जेव्हा तुम्ही बँक खाते उघडण्यासाठी जाल तेव्हा तुम्हाला KYC फॉर्म भरायला लावला जातो. ज्यामध्ये खाते पडताळणीशी संबंधित सर्व माहिती आणि ग्राहकांची माहिती असते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही एकापेक्षा जास्त खाती ठेवत असाल आणि त्यांना एकाच मोबाइल नंबरशी लिंक करत असाल तर तुम्ही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. ही प्रणाली बदलण्यासाठी आरबीआय बँकेला माहिती देऊ शकते. RBI बदल करू शकते बँकांमधील खात्यांची सुरक्षा मजबूत करण्यासाठी, RBI बँकांच्या सहकार्याने KYC नियम कडक करू शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बँका त्यांच्या ग्राहकांच्या पडताळणीसाठी अतिरिक्त स्तर लागू करू शकतात. नियम कोणाला लागू होणार? मीडिया रिपोर्ट्सनुसार, बँकांवरील या नियमाचा परिणाम संयुक्त खाते आणि समान संख्या असलेल्या अनेक खातेधारकांवर अधिक होईल. यासाठी त्यांना केवायसी फॉर्ममध्ये दुसरा नंबर टाकावा लागेल. संयुक्त खात्याच्या बाबतीत ग्राहकांना पर्यायी नंबर देखील टाकावा लागेल. वित्त सचिव टी.व्ही. सोमनाथन यांच्या नेतृत्वाखालील एक समिती संपूर्ण वित्तीय क्षेत्रात इंटरऑपरेबल KYC नियमांचे मानकीकरण आणि खात्री करण्यासाठी काम करत आहे. फिनटेक कंपन्यांकडून केवायसी नियम शिथिल करण्याबाबतच्या चिंता दूर करणे हा या निर्णयाचा उद्देश आहे. त्यामुळे कर्ज घेणाऱ्यांना धोका वाढू शकतो. तुम्हाला कोणत्या कामात मदत मिळेल ते जाणून घ्या या प्रकरणाची माहिती असलेल्या एका वरिष्ठ बँक अधिकाऱ्याने मीडियाला सांगितले की ते संयुक्त खात्यांसाठी पॅन, आधार आणि मोबाइल नंबर यासारख्या बहु-स्तरीय दुय्यम ओळख पद्धतींचा देखील विचार करत आहेत.  दुय्यम मान्यता एखाद्या व्यक्तीच्या एकाधिक खात्यांमध्ये प्रवेश करण्यास अनुमती देईल. जर ती लिंक नसेल आणि एकाधिक KYC कागदपत्रांसह उघडली गेली असेल. हे खाते एकत्रित करणाऱ्या किंवा संयुक्त खात्यापर्यंत पोहोचण्यास मदत करेल. सध्या, वैयक्तिक अंतर्गत आर्थिक तपशील सामायिक करण्यासाठी एकल खातेधारकाचा समावेश करण्यात आला आहे.

RBI Bank : सावधान, एकाच मोबाईल नंबरशी अनेक बँक खाती लिंक असेल तर आरबीआय करणार कारवाई Read More »

IMG 20240311 WA0043

Ahmednagar News: चार धारदार तलवारी जप्त, 2 आरोपी ताब्यात, शेवगाव पोलीसांची धडाकेबाज कारवाई

Ahmednagar News: शेवगाव पोलीसांनी धडाकेबाज कारवाई शेवगाव शहरातुन दोन आरोपींकडुन चार धारदार तलवारी जप्त करुन त्यांना अटक केली आहे.   09 मार्च 2024 रोजी आपले पोस्टे हद्दीत कोम्बींग ऑपरेशन राबवुन अवैध धंद्यावर कारवाई, अग्निशस्त्रे व हत्यारे याबाबत मोहीम राबवावी याबाबत  पोलीस अधिक्षक राकेश ओला यांचे आदेश प्राप्त झाले होते.   त्याअनुषंगाने शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांचे आदेशाने दोन पोलीस पथके रवाना करण्यात आली होती. पोलीस निरीक्षक  शेवगाव पोलीस स्टेशन यांना गुप्त बातमीदारामार्फत 06.30 वा. चे सुमारास शेवगाव शहरात कोरडे वस्ती येथील दोन इसम यांनी स्वतः जवळ तलवार बाळगली असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून  विशाल संपत भाकरे (वय-२३ वर्षे रा. कोरडेवस्ती ता. शेवगाव जि. अहमदनगर) व संतोष अशोक घोंगडे (वय-२५ वर्ष रा. कोरडेवस्ती ता. शेवगाव जि. अहमदनगर) यांना पोलीस पथकाने ताब्यात घेवुन सदर तलवारी बाबत विचारपुस केली असता त्यांनी प्रथम उडवडीचे उत्तरे दिली परंतु पोलीस पथकाने अधिक विश्वासामध्ये घेऊन विचारले असता त्यांनी सांगितले की, सदरच्या तलवारी ह्या घरामध्ये लपवून ठेवल्या आहेत. तुम्ही आमच्या सोबत चला त्या आम्ही काढून देतो.  तेव्हा आमचे कडिल पोलीस स्टाफ व पंचासमक्ष वरिल दोन्ही आरोपींनी त्यांचे ताब्यातील चार तलवारी काढुन दिल्यानंतर शेवगाव पोलीस स्टेशन भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 प्रमाने वरिल दोन्ही आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई ही  पोलीस अधिक्षक  राकेश ओला सो.अ.नगर,अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे अ.नगर, मा.उपविभागिय पोलीस अधिकारी  सुनिल पाटील उपविभाग शेवगांव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे, पोसई अमोल पवार, पोहेकॉ नाकाडे, पोहेकॉ दराडे, पोना उमेश गायकवाड, पोकों शाम गुंजाळ, पोकों बप्पासाहेब धाकतोडे, पोकों एकनाथ गर्कळ, पोकों कृष्णा मोरे, पोकों संतोष वाघ, पोकों संपत खेडकर यांनी केली असून पुढील तपास पो.नि. दिंगबर भदाणे यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकाँ दराडे हे करत आहेत.

Ahmednagar News: चार धारदार तलवारी जप्त, 2 आरोपी ताब्यात, शेवगाव पोलीसांची धडाकेबाज कारवाई Read More »

Rape

Ahmednagar News: धक्कादायक घटना, श्रीगोंदा तालुक्यात नऊ वर्षाच्या मुलीवर सामुहिक अत्याचार, दोन आरोपींना अटक

Ahmednagar News: ८ मार्च म्हणजे सगळीकडे जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो मात्र श्रीगोंद्यात एका अल्पवयीन मुलीवरती सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दोघांना जेरबंद करत न्यायालयात हजर केल्यावर त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील दक्षिणेकडील एका गावातील एका अल्पवयीन म्हणजे नऊ वर्षाच्या मुली वरती दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील मुख्य आरोपी संतोष रामभाऊ पवार व युवराज नंदू शेंडगे यांनी अल्पवयीन मुली सोबत एक महिन्यांपासून वारंवार बलात्कार केला असून त्याचे मोबाईल चित्रीकरण केल्यानंतर मोबाईल मधील चित्रीकरण नातेवाईकांनी पाहिल्यानंतर ही बाब त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत या दोघांना विचारणा केली असता त्यांनी सुरुवातीला उडवा उडवीची उत्तर दिली.  मात्र प्रकरण चांगलेच अंगाशी येत आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांनी घडलेल्या सगळा प्रकार सांगितला यावरून मुलीच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरून संतोष रामभाऊ पवार, युवराज नंदू शेंडगे यांच्यावर पोक्सो ॲट्रॉसिटीसह सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत पोलिसांनी दोघांना जेरबंद केले असून त्यांना आज न्यायालयात हजर केले असता त्यांना 14 मार्चपर्यंत पोलीस कोठवडी सुनावण्यात आली.  या घटनेस चा सर्व प्रकार उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग विवेकानंद वाखारे हे करत आहेत मात्र जागतिक महिलादिनी असा प्रकार घडल्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

Ahmednagar News: धक्कादायक घटना, श्रीगोंदा तालुक्यात नऊ वर्षाच्या मुलीवर सामुहिक अत्याचार, दोन आरोपींना अटक Read More »

IMG 20240309 WA0006

Pune News: राष्ट्रवादी काँग्रेसकडून महिला दिनानिमित्त मेडिकल शिबिरचं आयोजन

Pune News: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाच्या वतीने महिला दिनानिमित्त मेडिकल शिबिर आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व महिलांना कौतुकाचे प्रमाणपत्र आणि सर्व महिलांच्या समानता आणि सक्षमीकरणाची सहानुभूती आणि प्रतीक म्हणून गुलाबांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवर नेते, पदाधिकारी उपस्थित होते,मा.शांतिलालजी मिसाळ प्रदेश पदाधिकारी,मा अब्दुलसत्तार शेख भाई सरचिटणीस अल्पसंख्याक सेल,नरेश इन्द्रसेन जाधव अध्यक्ष कॅन्टोन्मेट विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर, फरदीन पटेल युवक कार्याध्यक्ष कॅन्टोन्मेट विधानसभा मतदारसंघ ,मा.जयदेवराव इसवे अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग,मा.गौरीजी जाधव प्रभारी अध्यक्ष पुणे महिला विंग,मा अलिमभाई शेख कार्याध्यक्ष अल्पसंख्याक सेल पुणे शहर,मा. दिनेशजी अर्धाळकर ब्लॉक अध्यक्ष कॅन्टोन्मेट बोर्ड पुणे,मा.दिनेशजी परदेशी उपाध्यक्ष पुणे शहर,मा.रुहीजी सय्यद सरचिटणीस पुणे शहर,मा.आयाजभाई शेख उपाध्यक्ष कॅन्टोन्मेट विधानसभा,मा. अतुलजी जाधव अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग मा.शुभमजी शिंदे अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग,मा.विशाल गद्रे , मा.विकास कांबळे मा.विनायक जाधव आणि इतर क्षेत्रातील मान्यवर अॅड.मंगलाताई भोसले,मा अर्पणाताई यादव शिक्षिका कॅम्प एज्युकेशन सोसायटी उपस्थित होते.

Pune News: राष्ट्रवादी काँग्रेसकडून महिला दिनानिमित्त मेडिकल शिबिरचं आयोजन Read More »