Dnamarathi.com

Nanded News : गुरुद्वारा दमदमा साहिब वसमतनगर येथील ऐतिहासिक तलाव परिसरामध्ये अतिक्रमण वाढले असून त्यांच्याकडून ड्रेनेजचे पाणी तलावामध्ये सोडल्याने घाणीचे साम्राज्य वाढले असून संसर्गजन्य आजारांचा धोका वाढल्याने त्याचा बंदोबस्त करून कारवाई करावी अशी मागणी हजुरी पाठी संघटनेने हिंगोली जिल्हाधिकारी जितेंद्र पापीलवार यांना केली आहे.

  नांदेड येथील सचखंड गुरुद्वारा बोर्ड प्राधिकरणाच्या अधिपत्याखाली चालणारा हिंगोली जिल्ह्यातील वसमतनगर येथील गुरुद्वारा दमदमा साहिब येथील तलावाशेजारी मागील दहा ते बारा वर्षांपासून अतिक्रमण वाढले आहे.

 अतिक्रमणधारकांनाकडून तलावामध्ये ड्रेनेजचे घाण पाणी सोडले जात असल्याने संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे. दमदमा साहिब गुरुद्वाराच्या दर्शनासाठी जगभरातून भाविक मोठ्या श्रद्धेने येत असतात. प्रदूषित तलावाच्या पाण्यामुळे भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.      

  ऐतिहासिक तलावातील दुर्गंधी व घाणीमुळे आजारांचा धोका निर्माण झाल्याने या परिसरातील अवैधरित्या करण्यात आलेले अतिक्रमण हटवून तलावाला प्रदूषित करणाऱ्यांवर कारवाई करून तलावाची पावित्र्य कायम ठेवावे अशी मागणी हजूरी पाठी संघटनेचे अध्यक्ष दलजीतसिंघ

बिशनसिंघ हजूरीपाठी, परदीपसिंघ जितसिंघ रागी, जगदीपसिंघ नंबरदार, महेंद्रसिंघ पैदल, हुकुमसिघ काराबिन यांनी हिंगोली जिल्हाधिकारी, वसमत उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी , सचखंड गुरद्वारा बोर्ड अधिक्षकांसह नांदेड जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *