Dnamarathi.com

Biscuits Side Effects : डायजेस्टिव बिस्टिकटच्या जाहिराती आपल्याला जेवणामधील जास्त कळाचं अंतर व भूक सहन करण्याच्या सवयीवरून घाबरवतात. 

यापासून बचाव करण्यासाठी डायजेस्टिव बिस्किट चांगला पर्याय असल्याचं सांगितलं जातं. शुगर, फॅट व सोडियम फ्री असल्याचा दावा करणा-या बिस्किटामध्ये खरं तर खूप प्रमाणात साखर, फॅट, सोडियम व रिफाइंड पीठ असतं. शिवाय चविष्ट लागावं म्हणून यामध्ये केमिकलयुक्त टेस्ट इनहेंसर देखील वापरलं जातं.

यामध्ये वापरली जाणारी सामग्री आपल्या आरोग्यावर काय परिणाम करते आणि खरंच ही बिस्किटं आरोग्यासाठी लाभदायक असतात का? डायजेस्टिव बिस्किट खरं तर डॉक्टर्सच्या सल्ल्यावरून जुलाब  व खराब डायजेशनमधून जाणा-या रुग्णांसाठी बनवली गेली आहेत. 

बाजारात मिळणा-या इतर बिस्किटांच्या तुलनेत डायजेस्टिव बिस्किटात फायबरयुक्त, प्रोटीन, व्हिटॅमिन व मिनरल असण्यासोबतच कोलेस्ट्रॉल व फॅट फ्री असल्याचं सांगितलं जातं व नाश्ता किंवा चहासोबत खाण्याचा सल्ला दिला जातो.

 ही बिस्किटं मधुमेहांच्या  रुग्णांसाठी किंवा यापासून बचाव करण्यासाठी उपयुक्त असल्याचं समजलं जातं.

ग्लुटेनची मात्रा करू शकते घात

बेकरी आयटम्स मैद्यापासून बनलेले असतात. डायजेस्टिव बिस्किटात मैद्याऐवजी गव्हाच्या पीठाचा वापर केला जात असल्याचं सांगितलं जातं. या गव्हाच्या पीठात ग्लुटेन असतं. वेगवेगळ्या ब्रॅंडच्या डायजेस्टिव बिस्किटांमध्ये ग्लुटेनची मात्रा देखील वेगवेगळ्या प्रमाणात वापरली जाते.

 जर तुम्हाला ग्लुटेनची अ‍ॅलर्जी असेल तर हे बिस्किट तुमच्यासाठी लाभदायक नाही. ग्लुटेनच्या अतिप्रमाणात केलेल्या सेवनाने पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडीटी, डायरिया व जुलाब यांसारख्या समस्या होऊ शकतात.

सॅच्युरेटेड फॅटमुळे नुकसान

डायजेस्टिव बिस्किटांच्या पाकिटावर फॅट फ्री असं लिहिलेलं असतं. पण यामध्ये सॅच्युरेटेड फॅट व फॅटच्या दुस-या पर्यायांचा वापर केला जातो. जास्त प्रमाणात सॅच्युरेटेड फॅटचं सेवन केल्यामुळे कोलेस्ट्रॉल व गैस्ट्रोइंटेस्टाइनलशी निगडीत आजारांचं शिकार होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे जरी ही बिस्किटं तुम्ही खात असाल तरी मर्यादीत प्रमाणात सेवन करणे कधीही उत्तम.

प्रिजरव्हेटिव्हसचा भडिमार

बाजारात डायजेस्टिव बिस्किटाला खूप मागणी आहे आणि ही मागणी पूर्ण करण्यासाठी इतर बिस्किटांप्रमाणेच यामध्ये प्रिजरव्हेटिव्हस मिसळले जातात. जेणे करून बिस्किटं बराच काळ खराब न होता टिकून राहतील. सोबतच सुगंधासाठी यामध्ये इसेंस टाकणंही मजबूरी असते. 

आता ही बिस्किटं तुमच्यासाठी लाभदायक आहेत की नुकसानकारक, हे त्यामध्ये मिसळलेल्या प्रिजरव्हेटिव्हसच्या प्रमाण व क्वालिटीवरच अवलंबून असते. हे प्रिजरव्हेटिव्हस व इसेंस शेवटी केमिकलच आहेत.

शुगरलेस नाही

डायजेस्टिव बिस्किट हे दुस-या बिस्किटांच्या तुलनेत कमी गोड असतात. पण यामध्ये नैसर्गिक स्वीटनर्ससोबतच साखरेचाही वापर केला जातो. याचाच अर्थ ही बिस्किटं शुगरलेस नाहीत. ही बिस्किटं खालल्याने तुम्ही नकळतच एक्स्ट्रा साखरेचं सेवन करता. त्यामुळे जर यातील साखरेचे प्रमाण मर्यादेबाहेर असेल तर लठ्ठपणा, ह्रदयाशी निगडीत आजार व डायबिटीज सारख्या आजारांचा धोका कमी होताना दिसतच नाही.

सोडियममुळे होऊ शकतात समस्या

बिस्किटाचा स्वाद वाढवण्यासाठी व हलकंसं नमकिन बनवण्यासाठी यामध्ये सोडियम मिक्स केलं जातं. सोडियमचं जास्त प्रमाण हाय ब्लड प्रेशर, हायपरटेन्शन व स्ट्रोक सारख्या जीवघेण्या आजारांचं कारण बनतं. प्रत्येक आजार व रुग्ण वेगवेगळा असतो. त्यामुळे कोणताही पदार्थ डोळे झाकून सेवन करण्याआधी ते बनवण्यासाठी वापरल्या जाणा-या सामग्रीची माहिती लक्ष देऊन वाचा. डायजेस्टिव बिस्किटाऐवजी ड्रायफ्रुट्स, स्प्राऊट्स आणि फळांचा आपल्या आहारात समावेश करावा.

 यासोबतच भात, साबुदाणा किंवा कोकोनट बिस्किटं किंवा असे पदार्थच खा जे कोणत्याही प्रकारचं नुकसान, अ‍ॅलर्जीपासून बचाव करून आरोग्यास फायदे मिळवून देईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *